Skip to main content

sampadkiya in 2 may 2013

विक्रम-वैराग्याशी राजकारणाची फारकत

विक्रम वैराग्य एकजागी नांदती
धर्म-राजकारण समवेत चालती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्न् देश हा ।
- श्री.कृ.कोल्हटकर

महाराष्ट्न् राज्याचा स्थापना दिन १९६० च्या १ मे पासून साजरा केला जातो. भाषावार प्रान्तरचना ही एक स्वतंत्र भारताची, संघराज्यांच्या निर्मितीप्रक्रियेतील सोय होती. तरीही भाषिक अस्मिता आणि त्यांतून अन्याय हे दोन्ही फुलत राहिल्याचा अनुभव पन्नास-साठ वर्षांनीही येत आहे. बराच काळ लोटला, पिढ्या मागे पडल्या, सभोवारची परिस्थिती बदलली परंतु त्या काळी सुरू झालेले वाद अजूनी संपत नाहीत. तेलंगण, विदर्भ, लडाख इथली फुणफुण चालू आहे. एकाच कुटुंबातील माणसे वेगळी राहू लागली तरी त्यांच्या अस्मितांमुळे वाद होतच राहतात. नंतर कधीतरी प्रसंगाने ती सगळी फुटलेली घरे एकत्र भेटतात, त्यावेळी मात्र `आपण एकाच मूळ बुडख्याच्या फांद्या आहोत' याचा साक्षात्कार वरकरणी तरी झाल्याचे दिसते. त्याच चालीवर या राज्यांना वादासाठी सतत निमित्त मिळतच असते - कधी भाषेचे, कधी पाणीवाटप, कधी गुन्हेगारी हस्तांतर किंवा कधी उद्योगांचे स्थलांतर.

हे वाद गृहित धरले तरी महाराष्ट्न् राज्याची म्हणून जी कामगिरी या प्रादेशिक विभागापुरती झालेली दिसते ती तरी पन्नास वर्षांच्या मानाने समाधानकारक आहे का? जड मनाने स्तब्धपणे आवंढा गिळावा एवढ्याच उत्तराचा हा प्रश्न आहे. तशी कामगिरी न होण्याचे मुख्य कारण राजकीय दुष्टपणात आहे. राजकारण सोडून इतर विषयात डोकावण्याचे, महारट्निदाष्नाच्या संदर्भात तरी आवश्यक नाही. कारण राज्यनिर्मिती हा मुळातच राजकीय सोयीचा, राजकीय निर्णय आहे आणि त्याबद्दल जे काही मत व्हायचे ते राजकीय मूल्यांकनावरच अवलंबून असणार.

स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीचा विचार केला तर सर्वत्र बदल तर घडत गेलेच आहेत. त्यातही प्रारंभीची काही वर्षे बदलाचा वेग कमी होता, तो हळूहळू वाढत जाऊन गेल्या चार-दोन वर्षात तो अचंबित करणारा वाटतो. महाराष्ट्न् राज्यातील राजकीय स्थितीचे खाली येणे तशाच गतीने घडत जाऊन गेल्या चारदोन वर्षांत राजकीय पटलावर जी भेसूर पडछाया दिसू लागली तीही अचंबित करणारी वाटते.

पहिले मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांच्या काळातील किंवा नाईक काळातील राजकारण हेही पक्के राजकारणीच होते, ते तसे असणे अनिवार्यही असेल. परंतु त्याच राजकारणाच्या आधाराने जमीन-पाणी-शिक्षण-सहकार-साहित्य-संस्उझ्र्मुण्-र्र्त्त्ीणु-िंींकॅ$ण-%ीकीर्द्धर्-%ीर्ीींडॅद्ग-%ं%ॅउ अशा सर्व अंगांनी होणारी वाटचाल थोडीतरी समाधानकारक होती. महाराष्ट्नची आजच्या काळातील जी काही बरी-चांगली नोंद करायची, त्यामध्ये त्याच काळाचा व त्या काळातील नेतृत्त्वाचा मोठाच वाटा आहेे. त्यानंतर मात्र आधीच्या नोंदवहीतही अनुचित फरकाटे उमटत जाऊ लागले आणि आता तर ती वही पाहावेनाशी झाली आहे.

राजकीय स्थितीचे स्पष्ट प्रतिबिंब विधानमंडळात उमटत असते. मंत्री-आमदार यांना अनेक मार्गांनी पैसा व सवलती मिळतात. त्याचा विनियोग कल्याणकारी राज्यकारभार व लोकहितासाठी करणे अपेक्षित आहे. याउलट पैसा व सवलतींवर समाधान न मानता निव्वळ अधाशी वखवख वाढत चालली आहे. राजकारण हा व्यवसायसुद्धा मानायला हरकत नाही, पण त्यातही काही सभ्यता, किमान सेवाभाव, उत्तरदायित्त्व असायला हवे होते. तेही अंशमात्र दिसत नाही. त्यामुळे दरोडेखोरी हासुद्धा व्यवसायच मानला जाऊन तोच निष्ठेने करावा, तशी रया राजकीय उद्योगास आली आहे.

अर्थातच त्याचा स्वाभाविक प्रभाव इतर सर्व क्षेत्रांवर पडत चालला आहे. साहित्य मंडळ, विद्यापीठ, दुष्काळमोचन, नाट्यसंस्था, वन्यप्राणी, पाठ्यपुस्तके, बियाणे-खते, आश्रमशाळा.... एकही क्षेत्र असे नाही की, जिथे त्या विषयात योग्य असे काही प्रगतीशील घडते आहे! सिंचन विभाग तर त्या दुष्कर यादीत घालण्याच्याही लायकीचा राहिला नाही. या प्रत्येक क्षेत्रात निव्वळ निराशा वाटेल अशी स्थिती आहे. शेजारची राज्ये फार वेगळी नाहीत पण तिथले काहीतरी बरे म्हटले की गोध्रा हत्त्याकांड, कानडी जुलूम, आंध्रातला नक्षलवाद यांवर घसरत जाऊन धर्मनिरपेक्षता, भाषिक अस्मिता, मुंबई पोलिसांचे पराक्रम असले दळकूट लावायचे. एखाद्या हुशार मुलाने चौथी-पाचवीपर्यंतच्या हुशारीतून मोठ्या अपेक्षा निर्माण कराव्यात, खेळ-हस्तव्यवसाय-संगीत यातून त्याने स्नेहसंमेलन गाजवावे पण पुढच्या काही वर्षात त्यास वाईट वळण लागून तो घसरत जावा; आणि ऐन तारुण्यात त्याची साऱ्या शाळेला दहशत वाटण्याइतकी बदफैली गुंडगिरी वाढावी तसे महाराष्ट्नचे झाले आहे.

हे सारे असले तरी देशभरात ज्यांनी प्रवास केलेला असतो त्यांचे एक विधान पक्के असते की, बाहेरची एकंदर सगळी स्थिती पाहिली तर त्या मानाने आपल्याकडे बरेच म्हणायचे! ही गोष्ट खरी असेलही; परंतु त्याचे श्रेय इथल्या सामान्य माणसांच्या सामान्य प्रवृत्तीला दिले पाहिजे. ती प्रवृत्ती घडण्यासाठी ज्या पूर्वसूरींनी काम करून ठेवले त्यांना श्रेय आहे. आणि त्या पुण्याईचा प्रभाव सामाजिक स्थितीवर असल्यामुळे हे राज्य जे काही बरे दिसते, ते तसे आहे. इथला पोलिस सामान्य माणूस म्हणून चांगला आहे, मदत करणारा आहे. पण गृहखात्याच्या ठाण्यावर त्याने पट्टा चढवला की तो जनतेला पीडा ठरतो.

या सामाजिकतेलाच आता राजकीय बजबज कमी करण्याचे आवाहन करायला हवे. राजकारण हा समाजकारणाचा एक भाग असतो, म्हणून मोकाट राजकारणास आवर घालून ताळयावर आणण्याचे आव्हान साहित्यापासून आश्रमशाळेपर्यंत प्रत्येेक अंगाने पेलावे लागेल. ही जबाबदारी सोपी नाही. व्यंकूची शिकवणी अशी मिरासदारांची एक कथा होती. त्यात व्यंकू नावाचा आडदांड डांबरट मुलगा एका निरागस गरीब मास्तरांची शिकवणी लावतो. त्यातून व्यंकू सुधारण्याऐवजी मास्तर `सगळया'त तयार होतो. जीवनाच्या इतर क्षेत्रांनी स्वत: स्वच्छ राहायचे आव्हान पेलले तरच आडदांड व्यंकूचे राज्यकारणही बदलेल.

ते घडले तर मात्र, राज्याच्या स्थापनादिनी त्याच त्या नेतेगिरीने टोपी अडकवून झेंडा लावावा आणि त्यांचे `पेड' फोटो छापावेत अशा इव्हेंटमधून सुटका होईल. महाराष्ट्नची अस्मिता ते बळ सामान्यांच्या मनगटास देवो अशी शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन