Skip to main content

Posts

Showing posts from January, 2014

13Jan2014

` जगातील सर्वात उंच पुतळा' अशी ज्याची ख्याती असेल तो सरदार वल्लभभाई पटेल यांचा  पुतळा गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणापासून ३.२ किमी. वर नर्मदा नदीमध्ये साधू नावाच्या बेटावर साकारला जाणार आहे. त्यावरून गेल्या महिन्यात काही विवाद झाले. नेहरू-पटेल विचारांवर टिप्पणी झाली. त्या प्रकल्पाविषयी.... स्टॅच्यू ऑफ युनिटी `स्टॅच्यू ऑफ युनिटी' ह्या प्रकल्पाचे जनक आर्किटेक्ट श्री.प्रभाकर महादेवराव कोल्हटकर सध्या पुण्यात स्थायिक आहेत. त्यांच्या मुलाखतीचे रूपांतर - ` हे काम माझ्या हातून होत आहे. आम्ही मूळ बडोद्याचे. माझे वडील श्री.महादेवराव कोल्हटकर हे उत्तम शिल्पकार होते. त्याकाळी शिल्पकलेचे शिक्षण कुठे मिळत नव्हते. सॅण्ड कास्टींग हा प्रकार औद्योगिक जगतात माहीत होता. लॉस वॅक्स कास्टींग हे ब्राँझ किंवा पंचधातूचे पुतळे करण्यासंबंधीचे ज्ञान माझ्या वडिलांनी परदेशी मासिकातून मिळवले आणि पुतळे करण्यामध्ये आपला खास ठसा उमटवला. त्यावेळी असे पुतळे कोणाला करता येत नव्हते. माझ्या वडिलांनी असे पुतळे तयार करण्यासाठी स्वत:ची फाऊंड्नीही सुरू केली होती. लहान-मोठे पुतळे करता करता एक काम व

about Harshad Godbole

हर्षदची चित्रकृती कोलंबोत सांगलीचा हर्षद गोडबोले याने आमिरखान यांच्या `तारे जमीं पर' चित्रपटाच्या टायटल्ससाठी `क्ले मॉडेलमेकिंगचे' काम केले. त्याची चित्रकृती नुकतीच कोलंबो येथे २५ नोव्हेंबर पासून भरलेल्या `आर्ट कट्टा' पुणे यांच्या इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशनमध्ये प्रदर्शित झाली. हर्षदने बापट बाल शिक्षण मंदिर व सिटी हायस्कूल सांगली येथे चित्रकलेचे प्राथमिक धडे गिरवले. पुण्यात कमर्शिअल आर्टचा पाच वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला. फोटोग्राफीची पदवी प्राप्त केली. कॉम्प्यूटर अॅनिमेशनमध्येही शिक्षण घेतले. त्याने `शाळा' या चित्रपटासाठी चित्ररेखाटनाचे काम केलेले आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झालेल्या `हॅपी प्लॅनेट' या शॉर्ट फिल्मचे क्ले मॉडेल मेकिंग केलेले असून पुण्यात होणाऱ्या एकांकिका स्पर्धांसाठीचे नेपथ्यही त्याने केलेले आहे. हिंदी/मराठी जाहिरातींसाठीचे/सिनेमांचे स्टोरी बोर्डींगचे कामही त्याने केलेले आहे. कोलंबो येथील इंडिया कल्चरल सेंटरमध्ये चित्रप्रदर्शनात हर्षदचेही चित्र प्रदर्शित झाले. पत्ता : द्वारा-माधव गोडबोले, प्लॉट नं.८, अकुजनगर, कुपवाड रोड, सांगली (मोब

30Dec.2013

अन्नसेवन : यज्ञकर्म की मस्ती? अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. तीही न भागविता येणारी कित्येक माणसे आहेत, पण त्याचवेळी अन्नाची नासाडी  करणारीही आपल्यासारखी कित्येक माणसे आहेत. लोकांना जेवू-खाऊ घालण्यात एक आनंद असतो; एकत्र जेवण्यातही आनंद असतो; आणि आग्रह करण्यात वा करून घेण्यातही आनंद असतो. अशा आनंदासाठी अन्नाचे चार घास वापरात आले तरी काही हरकत नाही. अगदी गरजेपुरतेच खावे हे तर वैज्ञानिकदृष्ट्या खरेच आहे परंतु परस्पर भावनांसही आयुष्यात स्थान असते. आपल्याकडे कोणी आले तर त्याचा पाहुणचार करण्यासाठी चहा देणे ही एक रीत आहे; गरज नक्कीच नाही. म्हणजे असा केवळ भावनिक चहाच्या कपाचा विचार केला तरी दररोज दर माणशी एक कप चहा `ज्यादा' होतो. त्या हिशेबाने देशात १०० कोटि कप म्हणजे पाचशे कोटि रुपयांचा चहा अनावश्यक होतो. पण तो `वाया' गेला असे मानले जात नाही कारण तसा चहा देण्या-घेण्यातला आनंद हीसुद्धा एक गरज आहेच. प्रश्न आहे तो चक्क वाया जाणाऱ्या म्हणजे फेकून दिल्या जाणाऱ्या अन्नाचा. लग्न-मुंज हे पूर्वी पिचत होणारे भव्य समारंभ. त्यातही अगदी निकटच्या अंतरावरून येण्याचे घडत असे. दळणवळण कमी. फारतर पं

23Dec.2013

माझी साहित्यविचार-यात्रा... काय झालं, माझ्या जरा उत्साही आणि शहाण्या मैत्रिणींनी, अचानक काहीतरी ललित लेखनाचं खूळ डोक्यात घेतलं. आता प्रत्येकीनं काहीतरी मदत करणं आलंच! कुणी लेख लिहितंय, कुणी चित्रं काढतंय, कविता करतंय! मला या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सर्वांसाठी चहा करणे किंवा त्यांना स्कूटरवर मागे लादून हेलपाटे मारणे एवढी `ढोबळ' कामे फक्त जमू शकतात. (असतं एखादं माणूस जाड! त्याला फस्कन हसायचं काय एवढं!) माझं बाई डोकं चालतं, पण जरा तिरकं! तर या सगळयाजणी कथाकाव्यनिबंध अशा रुणझुणत होत्या. काय काय चाललेलं! मी आपली म्हणतेय,`नवे प्रवाह, नव्या कल्पना, नवी आव्हाने' तर `तू चहा टाक जा परत एकदा' असं म्हणून मला पिटाळलं मेल्यांनी आत. इकडे चहाबरोबर माझे विचार उकळायलाच लागले. दररोज मी मुलीला सोडणे-आणणे, शाळा-क्लासेस अशा घिरट्या घालत असतेच. आता या सगळयात व्यायामाला कुठून वेळ आणू? पण खर्र सांगते, माझी दिव्य स्कूटर + आपले रस्ते हे मला रोजच्या स्कूटरिंगमध्ये व्हायब्रेशन मसाज, शॉक, अॅक्युप्रेशर असे फायदे सहज मिळवून देतात! शिवाय चाकाने जर या सगळयात `अॅक्युपंक्चर'केलं, तर तो जास्तीचा एक