Skip to main content

about Harshad Godbole

हर्षदची चित्रकृती कोलंबोत
सांगलीचा हर्षद गोडबोले याने आमिरखान यांच्या `तारे जमीं पर' चित्रपटाच्या टायटल्ससाठी `क्ले मॉडेलमेकिंगचे' काम केले. त्याची चित्रकृती नुकतीच कोलंबो येथे २५ नोव्हेंबर पासून भरलेल्या `आर्ट कट्टा' पुणे यांच्या इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशनमध्ये प्रदर्शित झाली. हर्षदने बापट बाल शिक्षण मंदिर व सिटी हायस्कूल सांगली येथे चित्रकलेचे प्राथमिक धडे गिरवले. पुण्यात कमर्शिअल आर्टचा पाच वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला. फोटोग्राफीची पदवी प्राप्त केली. कॉम्प्यूटर अॅनिमेशनमध्येही शिक्षण घेतले. त्याने `शाळा' या चित्रपटासाठी चित्ररेखाटनाचे काम केलेले आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झालेल्या `हॅपी प्लॅनेट' या शॉर्ट फिल्मचे क्ले मॉडेल मेकिंग केलेले असून पुण्यात होणाऱ्या एकांकिका स्पर्धांसाठीचे नेपथ्यही त्याने केलेले आहे. हिंदी/मराठी जाहिरातींसाठीचे/सिनेमांचे स्टोरी बोर्डींगचे कामही त्याने केलेले आहे. कोलंबो येथील इंडिया कल्चरल सेंटरमध्ये चित्रप्रदर्शनात हर्षदचेही चित्र प्रदर्शित झाले.
पत्ता : द्वारा-माधव गोडबोले, प्लॉट नं.८, अकुजनगर,
कुपवाड रोड, सांगली (मोबा.९४२३२६८९३१)

हर्षदच्या टाकाच्या फेकी......
असं होईल का?
* मेसमधल्या जेवणातल्या बटाट्याला पर्याय उपलब्ध होईल का?
* जगातून किंवा कमीत कमी पुण्यातून फरस बी, मुळयाचा पाला, कारले, नवलकोल, सुरण, चवळीच्या शेंगा, पडवळ अशा वनस्पतींना भाज्या म्हणून कायद्याने बंदी घालता येईल का?
* ऑफीसात एक कंपोस्ट खताचा खड्डा तयार केला, तर अनेकजणांनी घरून आणलेला डबा खाल्यावर बाकी परत नेण्याच्या जाचातून सुटका होईल का?
* कुकरी शोमध्ये दाखवले जाणारे पदार्थ घरी बनवल्यावरसुद्धा तसेच दिसतील आणि (चवीला)लागतील का?

हाँगकाँग ची देशी डीश
`यू शुद त्लॉय श्तोफमॉक्ये' बारीक डोळे करकरून आमचा वेटर आम्हाला डीश सुचवत होता. त्याचं ऐकायला नको होतं. हाँगकाँगमध्ये असताना विचित्र नावांच्या रस्त्यावर आम्ही फिरत होतो. रस्त्यावर जोकर आणि विविध प्रकारच्या वस्तूंची खचाखच भरलेली दुकानं होती. दुंडास स्ट्नीट नावाच्या रस्त्यावर एका हॉटेलमध्ये जाण्याचा योग आला. तिथे खास हाँगकाँगची `देशी'सुद्धा उपलब्ध होती. एका मित्राला कापण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. गेल्या गेल्या सगळयांनी ढोसायला सुरुवात केली. मी आपला न पिणारा, मायनॉरिटीतला होतो. त्यामुळे चकणा संपवण्याचे काम ईमाने ईतबारे करत होतो. जे काही व्हेज म्हणून समोर येत होते ते ते टुथपिकमध्ये टोचून हातात घ्यायचे आणि स्वाहा करून टुथपिक बाजूला ठेवून द्यायची. असं इतका वेळ चालू होतं की, शेवटी तो ढीग छोट्याशा डोळयाच्या वेटरच्या डोळयात मावेनासा झाला आणि ती टुथपिकची मोळी त्याने नेली. सुदैवाने सगळया डोलणाऱ्या जहाजांची टायटॅनिक होण्याआधी जेवणाची ऑर्डर देण्याचे ठरले. सगळयांना पुरेल आणि अगदी देशी असेल अशी कोणती डीश घ्यायची यावर मतभेद झाले आणि शेवटी ``वेटरभाऊ, वेटरभाऊ आम्ही काय खाऊ?'' असे आम्ही त्या बारीक डोळयाला रिप्ेश्टलो. त्याने आम्हां सगळयांना पुरून उरेल अशी बेष्ट देशी डीश सांगितली, नाव होतं `श्तोफमोंक्ये'. साधारण अर्ध्या तासाने सिझलरसारखी एक डीश चुरचुर करत आमच्यापर्यंत आली. आजूबाजूचे चिंकी डोळे विस्फारले गेले. त्यांनी आमच्याकडे पाहून `आयला... लय भारी' वगैरे म्हटले आणि आम्हाला थम्स अप् केला. आम्हीही आता आपण छोट्या डोळयाला चांगली टीप द्यायची वगैरे मनात प्लॅन आखायला लागलो... आणि डीश समोर आली. अचानक आमच्या टेबलावर शांतता पसरली.... तिथून पुढच्या पाचव्या मिनिटाला आम्ही रेस्तराँमधून रस्त्यावर होतो. झालेला प्रकार भीषण होता. बाहेर आल्यावर दोन गोष्टींचा उलगडा झाला.
मघाशी आजूबाजूच्या लोकांचे जे थम्सअप् चाललं होतं, ते खरं तर `बेस्ट ऑफ लक' होतं
आणि
`श्तोफमोक्ये' याचा भारतीय उच्चार `स्टफ्ड मंकी' अर्थात `भरले माकड' असा होता.
E-mail : harshad.godbole@gmail.com

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...