Skip to main content

Posts

Showing posts from 2016

12 Dec 2016

बदल हवाच असतो `बदल करायला हवा' असे आपल्यातल्या प्रत्येकाला सतत वाटत असते. स्वस्थचित्त असलेल्या माणसालाही थोड्या वेळाने मांडी फिरवून बसावे वाटते. घरातला पलंग किंवा स्वैपाकाचे फडताळ आिकडून तिकडे हलवून ठेवले की आपल्याला सुधारणा झाल्याचे समाधान मिळते. पण जे कोणी त्या बदलात सामील नसतात, अनभिज्ञ असतात, त्यांना मात्र असा बदल केलेला रुचत नाही. घरच्या मोठ्या माणसांच्या माघारी तरुण पोरांनी किंवा सुनेने केलेला बदल, नंतर त्यांच्या पाहण्यात आला की, त्या मोठ्या -किंवा खरे सांगायचे तर कालबाह्य झालेल्या, -लोकांस तो अजिबात रुचत नाही. ही अशी हलवाहलवी करून घराचा सारा गोंधळ अुडवून दिलेला आहे, ही त्यांची हमखास प्रतिक्रिया असते. अेक वस्तू सापडत नाही, नव्या जागी ठेचकळायला होते, असे बदल करताना निदान विचारायचे तरी.... असा त्यांचा आक्रोश बराच काळ चालतो. काही वेळेला तो आितक ा असह्य होतो की, कुठून हा बदल आपण करायला गेलो, असे त्या अुत्साही नव्या पिढीला वाटू लागते. वास्तविक पहिली व्यवस्था तर साऱ्यांना गैरसोयीची होतीच होती, ती बदलायला हवीच होती. पण तो मोठा बदल प्र्रत्यक्षात केला, हे मात्र पुष्कळांना सहजी रुचत

5 Dec. 2016

राजकारणी पुरोगामीत्व  गेल्या महिन्यात पुराोगामी -म्हणजे अर्थातच विचारवंत - मंडळींचे अधिवेशन गोव्यात झाले, त्यास `दक्षिणायन' असे नाव देण्यात आले होते. त्या नावाच्या अनुरोधाने काही स्पष्टीकरणे झाली. दक्षिण दिशेने होणारी पुरोगामीत्वाची वाटचाल, असेही त्यात अनुस्यूत असेल. त्या अधिवेशनाचा समारोप करताना, यापुढचे अधिवेशन नागपुरात होणार असल्याचे जाहीर झाले, आणि त्याची वेळही पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तेंाडावरची घोषित करण्यात आले. नागपूरची निवड करण्यामागे, तिथूनच सारे प्रतिगामी धोरण छुप्या रीतीने राबविले जात असल्याचेही सांगण्यात आले. या साऱ्या पुरोगामी विचारांचा अर्थ वेगळा सांगण्याचे कारण नाही, पण भासते ते असे की, या खटाटोपातून रा.स्व.संघाला आणि प्रधानमंत्री मोदी यांना विरोध करण्यासाठी मंडळी सरसावली आहेत. पुरोगामीत्वाचा विरोध प्रतिगामी विचार आणि आचारांना नसून तो राजकारणी पक्षाला आहे. तो तसा असण्याला काहीच हरकत नाही. भारतीय जनता पक्ष हा स्पष्ट राजकीय - किंवा राजकारणी पक्ष आहे. त्याचा अुघड हेतू अेक राजकीय पक्ष म्हणून सत्तेचाच असणार आहे. राजकारण करणाऱ्यांनी त्या स्पर्धेत अुतरून त्यास नाम

14 Nov. 2016

मराठ्यांचा राज्यविस्तार मोगलांच्या कराल दाढेतून सुटका होणे हे छ. थोरले शाहू महाराज यांच्या दृष्टीने क्रांतीचे द्योतक होते. त्यांनी उत्साही, कर्तबगार व्यक्तींना प्रोत्साहित करून, स्वराज्य वृद्धीसाठी त्यांचा उपयोग करून घेतला. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्वराज्याचे साम्राज्य घडविण्याची किमया घडली. शाहू महाराज परिपूर्ण किंवा निर्दोष होते असे म्हणता येणार नाही. तरीही त्यांनी मराठा राज्यातील कर्तबगार सरदारांच्या व पेशव्यांच्या मदतीने भारत वर्षात अटकपासून कटकपावेतो दरारा निर्माण केला. अटक सध्या पाकिस्तानात आहे. कटक ओरीसामध्ये आहे. मराठा इतिहास अबोल आहे. आपलाच पराक्रम आपण अभिमानाने सांगत नाही हे दुर्दैव वाटते. भारतवर्षात भरून राहिलेला हा मराठी पराक्रम काळाच्या ओघांत विस्मृतीत गेला. तो इंग्रजांनी दाबून टाकला. पानिपतच्या संग्रामाला २५५ वर्षे पूर्ण झाली, पण त्या निमित्ताने मराठी पराक्रम भारतातच नव्हे तर इतरही खंडात पोहोचला. मराठी अंमल हिंदुस्थानात कोठे कोठे होता? गुजराथ, म.प्रदेश, हरियाणा, राजस्थान, ओरिसा, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, येथील अनेक दुर्गांवर कधी ना कधी मराठ्य

24 Oct. 2016

SAMPADAKIY निसर्गाने भारताला  अुत्तम हवा, विपुल पाणी व कसदार भूमी दिलेली आहे. जगाच्या पाठीवरच्या अनेक देशांमध्ये माणसाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशी नैसर्गिक संपन्नता कमी असल्यामुळे परस्पर लढाया आणि मारामाऱ्या यांनी जगाचा आितिहास घडला आहे. त्याअुलट भारतीय अुपखंडात मात्र प्रचंड ज्ञानाचा महासागर तयार झाला होता, असे आता अुघड होअू लागले आहे. ज्या काळात युरोपीय देशंात लोक रानटी राहणीमानाचे होते, त्यावेळी भारताचे लोक हिमालयाच्या चोटीवर अुभे राहून `कृण्वन्तो विश्वमार्यम्' (सारे जग सुप्रतिष्ठित करू) अशी अुद्घोषणा करत होते. अशा संपन्न वातावरणात राहात असताना स्वाभाविकच माणसाचा अुपजत अुत्सवी भाव सतत प्रकट होत असतो. भारत हा अुत्सवप्रिय देश आहे, असे म्हटले जाते. आपल्याकडे अेखाद्याचा वाढदिवस साजरा होतो. हल्ली तर त्याचे महाप्रस्थ माजले आहे; शेंबड्या पोरांचाही वाढदिवस चौकात शुभेच्छांचे फलक झळकल्याशिवाय साजरे होत नाहीत. पुढाऱ्यांच्या वाढदिवसाला बैलगाड्यांच्या शर्यती होण्यात कुणाला औचित्यभंग वाटत नाही. मोठ्या व्यक्तीची पुण्यतिथीही आपल्याकडे दु:खद श्रध्दांजलीअैवजी  ती अुत्सव म्हणून `साजरी

17 Oct. 2016

धर्म वरचढ नव्हेच. अेके काळी महाराष्ट्नचे वर्णन करताना  `धर्म राजकारण समवेत चालती' असे केले गेले होते. अलीकडच्या काळात, सर्वधर्मांसाठी समभाव प्रशासनात बाणवायचा असेल तर हिदूवाल्यांचा तिटकारा करायचा, अशी अेक पुरोगामी फॅशन आली आहे. अेखाद्या हिंदूप्रेमी  राजकीय सत्ताधाऱ्याने त्यांस अनुकूल असा काही निर्णय चुकून घेतलाच तर त्यांचे राजकीय आणि सामाजिक विरोधक असा काही गदारोळ अुठवून देतात की या देशात सांप्रत केवळ ंहिंदूराष्ट्न्च काय ते अवतरले असून आितर धर्मीयांचा आता खातमाच होणार असा कुणाचा समज व्हावा ! अर्थातच त्यांना वाचविण्यासाठी या विरोधकांना जिवाची बाजी लावावी लागणार असेही त्यांना वाटू लागते. पंढरीची पूजा शासनाच्या वतीने करण्याचा प्रघात आहे, त्यात कुणा काँग्रेसवाल्याला आजवर प्रशासनाचा धर्म दिसला नाही. मुस्लीम धर्मीयांच्या आिफ्तार पाटर््याना हजेरी लावण्यात प्रशासन आडवे येत नाही. आितकेच काय सध्या कित्येक शासकीय कार्यालयांच्या आवारांत देवळे नि देवस्थाने दिसू लागली आहेत. दत्त, हनुमान ही त्यांत लाडकी दैवते आहेत. यांतील काही देव नवसाला पावणारे असल्याचेही सांगितले जाते आणि त्यांच्या दर्शनाला

10 oct 2016

राजकारणी मोर्चेबांधणी गेल्या दोन तीन महिन्यांत महाराष्ट्न्भरात मराठा समाजाचे  महामोर्चे सुरू झाले ते साऱ्या जिल्ह्यांतून फिरून झाल्यानंतर बहुधा  मुंबआीतील मोहिमेने त्यांची सांगता होआील. आजपर्यंत कुठल्याही संघटनेचा मोर्चा म्हटले की साऱ्या नागरी जीवनाला धसका बसत असे; पण तो वेगळया अर्थाने! वाटेत कुणी आला तर त्याला तुडवतच जाण्याची आजवरची रीत होती. हे मोर्चे मात्र त्यास आजवर तरी सन्माननीय अपवाद ठरले आहेत. संख्येने फार मोठे असूनही ते शांततेने पार पडले आहेत. त्याचा काही अनिष्ट परिणाम झाला हेही नाकारण्यात अर्थ नाही.  कोणत्याही कारणाने आितकी माणसे रस्यावर अुतरायची म्हटल्यावर दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होणारच, तसा तो झालाही. त्या मोर्चावेळी सारे साऱ्यांचे व्यवहार सुरळीतच चालले असते तर आणखी कौतुक करता आले असते. शाळा चालू राहूनही कोणत्याही बालकास त्रास न होता घरी परतता आले असते तर मोर्चांची शान वाढली असती. पण काही ठिकाणी `दुकाने बंद राहतील, जी अुघडी राहतील त्यांच्या दुकानांत पुन्हा कुणी जाणार नाहीत' या आशयाच्या सूचना देण्यात आल्या असतील तर, अेवढ्या चांगल्या मोहिमेला परिपूर्ण श्रेय देता ये

12 sept. 2016

वास्तव सांगण्याचा सामाजिक धोका अुद्दाम आणि अुर्मट वृत्तीच्या कोणा गुन्हेगाराला कसलेही भय नाही अशी परिस्थिती आपल्याकडे आली आहे. सरळ सज्जनपणे शांतपणे राहू म्हणणाऱ्याला प्रत्येक बाबतीत अन्याय सहन करावा लागतो आहे. अुद्दाम लोकांंची अरेरावी सहन करावी लागत आहे. राक्षस राज्यांत राहण्याचा अनुभव येत आहे. ही स्थिती, म्हटली तर ज्याच्या त्याच्या कर्मानेच येते हे खरेच आहे. गेल्या चार पाच दशकांतील पिढ्यांची सामुदायिक अुदासीनता आता अशा टोकाला गेली आहे की, यापुढे सर्वोच्च मानली जाणारी न्यायालयेही हतबलच ठरतील अशी शक्यता वाटू लागली आहे. आपल्या देशातील पदपथ आणि रस्ते यांवर होणाऱ्या अतिक्रमणांच्या आणि अन्य समस्यांच्या विरोधात कोणी दखल घेत नाही, आणि कोणा प्रशासकाचे काही चालत नाही हे पाहून अेका संस्थेने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.  न्यायालयाने  याचिकाकर्त्याच्या विनंतीचा प्रतिवाद केल्यावर त्या संस्थेने कळवळून असे म्हटले की, `हे न्यायालय या प्रश्नाबाबत काही कारवाआी करणार नाही, किंवा कुठलेही निर्देश देणार नाही,  तर मग ते कोण देआील?' याचिका आधी अुच्च न्यायालयात द्यावी असा  तांत्रिक

29 august 2016

`मातृवंदना'       कासेगाव (ता.वाळवा) येथील काशिलिंग आडके हा तरुण सध्या प्रो कबड्डी च्या सामन्यांतून गाजतो आहे. त्या स्पर्धांतील  `दिल्ली दबंग' या संघाचा तो कप्तान आहे. त्याचे वडील कुस्तीगीर होते, त्यांचे लवकर निधन झाले. परंतु त्यांच्या माघारी काशिलिंगच्या आआीने गाडा सावरला. मुलगा शाळेत फारसा रमत नव्हता, पण खेळात तो पुढे असायचा. त्याचा कल ध्यानात घेअून या माअूलीने त्याला `खेळात मोठा हो' म्हणून सर्वतोपरी पाठिंबा दिला. ही आआी शेतामळयात मोलमजूरीची कामे करून पोराला योग्य संधी देत होती. त्या खेळाचे प्रशिक्षण आणि सराव करण्यास वाव देत होती. आज त्या लेकाने कष्टांचे चीज केले आहे.      सांगलीचे चौगुले कुटुंब आपल्या तीन्ही मुलांचे कौशल्य पाहून आज समाधानाने हसते आहे. श्री.चौगुले हे स्पर्धा परीक्षांच्या वर्गांना शिकवतात. ते स्वत: खेळाडू होते. त्यांचा मुलगा अजिंक्य हा पहिलीपासून शाळेच्या बाबतीत फार दमवायचा. कशीतरी त्याची ढकलगाडी तिसरीपर्यंत गेली पण तिथेच अडली. शाळेचे नाव काढले की तो भोकाड काढायचा, दूर जायचा, आजारी पडायचा. आआी वडील हताश झाले.  तो मैदानातून मात्र हलायचाच नाही. मध्यरात्

22 august 2016

संपादकीय आवाज बंद करावा गरजेपेक्षा कोणतीही गोष्ट जास्त झाली की त्याचेे प्रदूषण होते. आजकाल पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल बराच आरडाओरडा होतो. तो गैर नाहीच, पण त्यात मुख्यत: हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण लक्षात घेतले जाते. त्या मानाने प्रकाश आणि ध्वनीचे प्रदूषण फारसे मनावर घेतले जात नाही. परंतु तेही तितकेच हानीकारक आहे. ते रोखण्यासाठी पुरेसे कायदे आहेत, पण आपल्याकडे कायदे हे पाळण्यासाठी असतात, हे मुळी कोणी मानतच नाही. येत्या अुत्सवांच्या काळात ध्वनीप्रदूषणाचा जो बेफाम अत्याचार चालतो, त्याच्या विरोधात अुच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आहे. तरीही त्याचा अंमल होत नसेल तर मग पोलीस आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे स्वयंघोषित पुढारी यांना ताब्यात घेण्यासाठी लष्कराचा वापर करण्याशिवाय पर्याय राहात नाही. आितके अराजक आहे असे अजून तरी म्हणवत नाही, पण त्या दिशेने वाटचाल आहे. ती थांबायला हवी अशी अपेक्षा आहे. ध्वनीवर्धकाचा शेाध लागला, आणि त्याचा अुपयोग  योग्य कारणासाठी होत होता, तोवर ती सोय ठरली. परंतु सध्याच्या काळात या साधनाने शब्दश: अुच्छाद मांडला आहे. कारणपरत्वेे काही मंगल वाद्यांचे सूर माणसाला आन

15 august 2016

लोकशाही यशस्वी कशी होआील ?                                                                       -डॉ. बाबासाहेब आंबेडकर               माझ्या मताप्रमाणे लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाची पहिली शर्त म्हणजे समाजामध्ये भयानक विषमता असता कामा नये, पिळलेला वर्ग असता कामा नये, दडपलेला वर्ग असता कामा नये. अेकीकडे ज्याला सर्व विशेषाधिकार आहेत, आणि दुसरीकडे जो केवळ ओझ्याचा बैल आहे असे वर्ग समाजात असता कामा नयेत. त्या व्यवस्थेत, पद्धतीत व विभाजनात समाजाच्या रक्तरंजित क्रांतीची बीजे असतात. ते दुखणे नाहीसे करणे लोकशाहीला अशक्य होआील. वर्गावर्गात खोलवर रुजलेली फाटाफूट हाच लोकशाहीच्या यशातील सर्वांत मोठा अडथळा आहे.     लोकशाहीत नेमके काय घडते?  दबलेल्यांना, पिळलेल्यांना व मानवी हक्कांपासून वंचित केलेल्यांना, जे ओझ्याचे बैल आहेत त्यांना; विशेषाधिकारी लोकांसारखाच मतदानाचा अधिकार असतो. विशेषाधिकारी लोेक, ज्यांना विशेषाधिकार नसतो अशा लोकांपेक्षा संख्येने कमी असतात. लोकशाहीत बहुसंख्याकांचा कायदा हाच निर्णायक मानला जातो. त्यामुळे अल्पसंख्याक विशेषाधिकारी लोकांनी जर त्यांच्या खास हक्कांंचा स्वेच्छेने व राजी