Skip to main content

10 oct 2016

राजकारणी मोर्चेबांधणी
गेल्या दोन तीन महिन्यांत महाराष्ट्न्भरात मराठा समाजाचे  महामोर्चे सुरू झाले ते साऱ्या जिल्ह्यांतून फिरून झाल्यानंतर बहुधा  मुंबआीतील मोहिमेने त्यांची सांगता होआील. आजपर्यंत कुठल्याही संघटनेचा मोर्चा म्हटले की साऱ्या नागरी जीवनाला धसका बसत असे; पण तो वेगळया अर्थाने! वाटेत कुणी आला तर त्याला तुडवतच जाण्याची आजवरची रीत होती. हे मोर्चे मात्र त्यास आजवर तरी सन्माननीय अपवाद ठरले आहेत. संख्येने फार मोठे असूनही ते शांततेने पार पडले आहेत. त्याचा काही अनिष्ट परिणाम झाला हेही नाकारण्यात अर्थ नाही.  कोणत्याही कारणाने आितकी माणसे रस्यावर अुतरायची म्हटल्यावर दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होणारच, तसा तो झालाही. त्या मोर्चावेळी सारे साऱ्यांचे व्यवहार सुरळीतच चालले असते तर आणखी कौतुक करता आले असते. शाळा चालू राहूनही कोणत्याही बालकास त्रास न होता घरी परतता आले असते तर मोर्चांची शान वाढली असती. पण काही ठिकाणी `दुकाने बंद राहतील, जी अुघडी राहतील त्यांच्या दुकानांत पुन्हा कुणी जाणार नाहीत' या आशयाच्या सूचना देण्यात आल्या असतील तर, अेवढ्या चांगल्या मोहिमेला परिपूर्ण श्रेय देता येआील काय ?  पण असे अपवाद म्हणूनच सोडून देण्यास हरकत नाही, अेवढे बाकीचे नियोजन चांगले होते. मोर्चे  म्हणून ही मोहीम  अेकंदरीने चांगली पार पडली. कदाचित यात खरेच कुणी राजकीय पुढारी नसतील तर त्यांनी या सामान्य जनतेकडूनच काही शिकायला हवे !

पुढचा मुद्दा अधिक महत्वाचा आहे, तो असा की त्या खटाटोेपाच्या मोहिमेने साधले काय ? मोर्चा काढण्यामागे मराठा समाजाची काही खदखद असणार हे तर खरेच आहे. जी खदखद अुघडपणे सांगितली गेली ती तितकी खरी होती का हे मोर्चेकऱ्यांनाही ठाअूकच आहे. मराठवाड्यात ही मोहीम सुरू झाली, तिथे प्रारंभकाळात जे विषय मांडले गेले, त्यात तीन प्रमुख होते. अेक म्हणजे कोपर्डीत ज्याने तरुणीवर अत्याचार केला त्यास फाशी द्यावे; दुसरे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आणि तिसरे असे की,जातीवरून होणाऱ्या अवमानाविरोधी कायदा रद्द करावा. कोणाही जाणकाराला हे माहीत असेल की हे तीनही विषय सहजी मान्य होअून मार्गी लागण्याजोगे नाहीत. कोपर्डीतील कृत्य अधमच  आहेे, पण फाशी देणे आितके सोपे नाही. अजमल कसाब या अतिरेक्यासही आठ दहा वर्षे संरक्षण देअून सांभाळावे लागते, त्याचे कृत्य भीषण असले तरीही आिथे न्यायाची काही प्रक्रिया असते ती कायद्यानुसार पाळावीच लागते. छत्रपतींनी रांझेकर पाटलाचे त्याच अधमपणाबद्दल जाग्यावरच हातपाय छाटले, ते कितीही न्याय्य आणि प्रेरक वाटले तरी, तसे आपल्या राज्यपध्दतीत आज होअू शकत नाही. जाट, पटेल, धनगर अशा अन्य समाजांच्या आरक्षणाच्या मागण्या होत आहेत, त्या आरक्षणांस न्यायालय परवानगी देअू शकत नाही. मराठ्यांची ही मागणी तरी घटनेतील  निकषांवर कशी टिकणार आहे ? कारण आजच आरक्षण ५०टक्क्यांच्या पुढे गेले आहे. तिसरे जातीवाचक कायद्याबद्दल. कायद्याचा दुरुपयोग होतो हे सार्वकालीन सत्य आहे. `कसेल त्याची जमीन' या कायद्याचा दुरुपयोग होतो. कारण कित्येक जमीनदार आज शेती सोडून दुसरेच काही,  -राजकारणाचाही व्यवसाय करतात. त्यांची शेती दुसरेच कोणीतरी कसते आहे. तसेच जातीवाचक कायद्याचेही होते. जे आज सुस्थित, चांगल्या पदावर आहेत, त्यांनाही सवलती देत राहणे दु:खितांच्या डोळयावर येते. पण दुरुपयोग होतो  म्हणून तो कायदाच रद्द करण्याचा निर्णय कसा होणार ? 

जे कोणी या मोर्चांच्या मागे सूत्रधार असतील, त्यांचे संघटन कौशल्य मान्य करावे लागेल, त्यांची ताकतही मान्य करता येआील,  तथापि हे निर्णय होअू शकणारच नाहीत हे त्यांना माहीत नसेल असे म्हणता येणार नाही. मग ही सामाजिक अुचकाअुचक करण्यात हेतू काय असणार? 

मराठवाड्यातील पहिला मोर्चा निघाला त्यावेळी त्याचे गांभिर्य सर्वांना जाणवले होते. मराठवाड्यातल्या दुष्काळाने गेल्या साली बहुजनांचेच नव्हे, तर नागर समाजाचेही कंबरडे मोडायची वेळ आली होती. त्यातच तथाकथित विकासाच्या वाटेवर धावणाऱ्या अुच्चभ्रू शहरी समाजाला या परवडीची जाण नाही याचाही अनुभव येत होता. अशा बेफिकीरीमध्ये उच्च मराठा जातीचाही मुळीच अपवाद नव्हता. पण तसे दु:ख व्यक्त करण्यासाठी कोपर्डी हे तात्कालिक निमित्त भेटले, आणि त्या दु:खाचा अुद्रेक झाला. तरीसुध्दा तो अुद्रेक शांतपणे मूकपणे व्यक्त झाला, हे आजच्या काळात आश्चर्याचे आणि कौतुकाचेही आहे. अशी काही सुसंघटित झालेली सुखे किंवा दु:खे आपल्या हातातून दूर राहू देतील, तर ते पुढारी कसले ? ते अलगदपणे साळसूदपणे त्या मोर्च्यावर आरूढ झाले असावेत हा सामान्य तर्क आहे. मागणी योग्य की अयोग्य याच्याशी त्यांना कर्तव्यच नसते. अेरवी  अंधश्रध्देच्या विरोधी सामील होणारी ही मंडळी कुणा बाबा बापूच्या अुत्सवांतही आघाडीवर असतात; तशाच प्रकारे  ती या आयत्या शिजलेल्या आंदोलनांवर स्वार झाली. 

मौज म्हणजे त्या मोर्चांत आमदार खासदार सहभागी झाले. कायदेमंडळात काम करणाऱ्या त्यांनाच या मागण्यांमधील  घटनात्मक अडचणी माहीत नसतील तर काय म्हणणार ?  नुकतेच तर त्यांच्या `जाणत्या' नेत्याने म्हटले होते की, `पूर्वी छत्रपती फडणीस नेमत, आता  फडणवीस छत्रपतींची नेमणूक करतात'. या मोर्चांत तर छत्रपतीच सामील झाले, मग त्यांनी मागणी कुणाकडे केली ? मागणी करण्यासाठी त्यांना या नेत्यांनी आिरेला घातले असे म्हणावे काय ? ज्यांच्याबद्दल समाजाच्या मनांत आजही कमालीच्या आदराचे स्थान आहे, अशा छत्रपतींनी  लोकांसमवेत असे मोर्चे वगैरे करावेत का असाही अेक  दुखरा प्रश्न  येतो. छत्रपती मराठी राज्याचे आहेत, मराठा जातीचे कसे म्हणायचे ?

काही ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी या गंभीर विषयाचाही `आिव्हेंट' मानला असावा. मोर्चाची पूर्वतयारी म्हणून  तरुण  लेकीबाळी पल्लेदार लुगडी नेसून, नथी लेअून, हाती तलवार अुभवत रणरागिणीचा  मराठा संचार झाल्याप्रमाणे  दूरदर्शनवर दिसले. त्यांना अन्यायग्रस्त तरी कसे म्हणावे असा प्रश्न पडावा. मोर्चा काढण्यासाठीही या प्रकारे वातावरण तापवावे लागते हे ज्यांना माहीत आहे, त्यांनी  त्यामागची सद्भावना समजून घ्यायला हवी, असे फारतर म्हणता येआील.

प्रामुख्याने शेतकरी असणाऱ्या मराठा समाजाच्या दु:खांविषयी प्रत्येकाला सहानुभूती असायला हवी. पण तो कळवळा समाजातल्या प्रत्येक दुबळया घटकाबद्दल असायला हवा. शेतकरी म्हणून त्यांचे प्रश्न सरकारने आणि समाजानेही समजून घेतलेच पाहिजेत,  -मराठा म्हणून नव्हे ! सामाजिक व आर्थिक कोंडी भयावह असते, ती फोडण्याचे प्रयत्न हवेत. ती कोंडी केवळ अेका कोण्या  जातीची नसतेच नसते. समाज म्हणून ते अन्याय होत असतात, त्यांचा विचारही समाज म्हणूनच करायचा असतो.  हे भान न ठेवता अशा दु:खांचे प्रगटीकरण होत असेल तर, त्याला योग्य ती वाट करून देणे, घटनात्मक रीतीनेच त्यावर अुपाय करणे, आणि तोवर या दु:खितांची समजूत घालणे हे त्यांच्या नेत्यांचे काम होते. त्याअैवजी, जमलेल्या गर्दीत आपलेही रडगाणे मिसळून देण्याने त्या नेत्यांचा खरा प्रश्न अुजेडात आला. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे दु:ख हे साऱ्या शेतकऱ्यांचे दु:ख आहे. तथापि नंतर नंतर मोर्चात सामील होणाऱ्या, किंवा त्यांस रसद पुरविणाऱ्या नेत्यांचे दुखणे वेगळे आहे. त्यांचा आक्रोश खरा असेल पण त्याचे कारण सर्वजण जाणतात. ते जर त्याचा अुच्चार जाहीरपणे करत नाहीत तर आितरांनी तरी तो कशास करावा ?


                                                      
समाज यावर विचार करेल?
दि. ११ जुलै श्री. सुरेश पाचोरे यांचा, एअरफोर्स मधला सुपुत्र चि.रोहित आणि चि.सौ.कां. नयन यांच्या विवाहाप्रीत्यर्थ स्वागतसमारंभ संस्मरणीय होऊन गेला.
     स्वागत समारंभाचे औचित्य साधून तिथे चक्क रक्तदान शिबीर घेण्यात आले. साडे दहापर्यंत चाळीसजणांनी रक्तदान केले होते आणि सव्वाशेजणांनी रक्तदानासाठी नाव नोंदविले होते. वेळेअभावी शिबीर थांबवून ते नंतर घेण्याचे ठरविण्यात आले. रिसेप्शनच्या झगमगाटी धामधूमीत हा उपक्रम उमेद वाढवून गेला. 
    घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे कितीतरी सामाजिक कार्यकर्ते पाचोरे कुटुंबियांना दुवा देतील ! रिसेप्शन हॉलमध्ये साधी पण डोळयात भरणारी  अर्कचित्रांची सजावट होती. निसर्गाशी मिळती-जुळती रचना, कुठेही झगमगाट नव्हते. आपुलकीचे वातावरण भरून नि भारून राहिले होते. मंद गीताची छानशी धून वाजत होती. हे अगदी वेगळेच काहीतरी होते ! ही सारी किमया होती आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांची ! 
     तांदळाच्या अक्षता नाहीत. पारंपारिक आहेराला फाटा देऊन झाडांची रोपेच आहेर म्हणून दिली. लग्नातली आहेराची झाडे भविष्यात कित्येकांना सावली देतील. जमा झालेले रक्त अनेकांना नवे जीवन देईल 
    `प्रकाशबीजे रुजवीत चाललो 
वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो.'
-डॉ. महावीर अक्कोळे,
                   जयसिंगपूर

मोबाईल व रडणारं मूल !
     अगदी तान्ह्या मुलांना भीम कोण हेही माहित नाही. समोर `छोट्या भीम'चा व्हिडीयो धरला की ती मुलं शांत बसतात. पालकांना जादूची कांडी गवसल्याचा शोध लागतो. मग काय, मूल जेवत नाही, मिकी माऊस लावा. मूल ऐकत नाही. `कार्टून डिलीट करीन हं' अशी धमकी. मुलांना `आई-बाबा' बोलता येत नसतं, पण `डिलीट' चा अर्थ लगेच कळतो.
     मूल जसजसं मोठं होऊ लागतं, तशी त्या मोबाईलमधली गेम्सची दुनिया त्याच्यापुढं उलगडू लागते. गेम्सची चटक लागली की तासन्तास पोर खेळत बसतं. आईच्या स्वयंपाकात व्यत्यय येत नाही, त्यामुळे आई खूश असते. बाबांना मोठं कौतुक असतं-जो मोबाईल शिकायला आपल्याला कित्येक दिवस लागले, तो आपला मुलगा/मुलगी इतक्या पटापट बटणं दाबून हवं ते करतो, ज्या गोष्टी फोनमध्ये आहेत हेही आपल्याला माहीत नव्हतं, त्या तो वापरतो. म्हणजे ही पिढी किती हुशार? आपल्यापेक्षा जीनीयस!
     पण ही वस्तुस्थिती आहे का? तुम्ही लहान असताना तुमचे बाबा व आजोबा तुम्हाला असचं जीनियस समजत होते! याचं कारण असं आहे की मागच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीला सामान्यज्ञानाचं भांडार मोठं मिळत जातं. मागची पिढी जे चाळीशीत शिकली, ते पुढची पिढी बालपणात शिकते याचं कौतुक हवचं, त्या हुशारीची पुढच्या चाळीस वर्षात उपयुक्तता कमी होणार, नवीन गोष्टी आपल्याप्रमाणे पुढच्या पिढीलाही शिकाव्या लागणार, शिकत राहाव्या लागणार. 
     मोबाईल व कॉम्प्यूटर मुलं हाताळू लागली, हे जरी खरं असलं तरी त्याचा ते काय उपगोग करताहेत? गेम्स खेळणं, कार्टुन पाहणं, सिनेमे पाहणं या व्यसनात गुंतताहेत की त्यांना उपयुक्त असं काही करताहेत? अभ्यास, इंटरनेटवरील ज्ञान व कोर्सेस, या नावाखाली घेतलेला कॉम्प्यूटर वा आधुनिक मोबाईल, मुख्यत: गेम्स, सिनेमे, फेसबुक, व्हॅाट्सअॅप या व्यसनांसाठीच वापरला जातो. या दुष्परिणामांबद्दल चिंतन करूया.
-डॉ. घनश्याम वैद्य, घटप्रभा (बेळगाव)    फो. नं. ०८३२३-२८७१०२, 

आगळया निग्रहाची नवी मळवाट
अलीकडच्या काळात शहरी सांैदर्यसाधनेत केशकर्तन व केशरचना महिला करतात, पण आपल्या गावगाड्यात पुरुषांसाठी महिलांनी हा व्यवसाय करणे हे अप्रूप !
     कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज येथील शांताबाई यादव यांनी आपल्या स्वर्गवासी नवऱ्याचा केशकर्तनकार-कामाचा उद्योग उपजीविकेसाठी पत्करला असून, त्या भारतातल्या पहिल्या महिला केशकर्तनकार बनल्या असाव्यात. 
     पती पश्चात चार मुलींचे कुटुंब पोसणे महाबिकट होते. शांताबाइंर्च्या पुढे ते अव्हान होते. सर्वसामान्य परंपराप्रिय ग्रामीण स्त्री असणाऱ्या शांताबाईनी हे आव्हान पेलले. चार मुलींसकट चरितार्थ चालविण्यासाठी मोलमजूरीत कसे भागणार म्हणून कामाचा वस्तरा हाती धरणे एवढाच पर्याय हाती होता. `मी वस्तरा हाती धरला आणि स्वाभिमानाने जगण्याचे स्वीकारले' ७० वर्षीय शांताबाई सांगतात. सकाळपासून पुरुषमंडळी घरासमोर लाईन लावून उभी असतात. या महिलेने आयुष्यात केवळ खस्ता खात अडचणींवर मात केली आहे. शांताबाई यादवांची ख्याती आहे व्यावसायिक कौशल्यासाठी ! गेली तीस वर्षे शांताबाई वस्तऱ्याच्या करामतीसाठी लोकप्रिय आहेत. 
     बारा वर्षांच्या असताना शांताबाइंर्चे लग्न झाले. त्यांते पती केशकर्तन करून उपजीविका चालवायचे. शांताबाई तीशीत असतानाच १९८४ साली श्रीपती यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. पदरी चार मुली. मोठी मुलगी आठ वर्षांची आणि सगळयात धाकटी मुलगी एक वर्षांची होती. त्यांच्या तीन एकर जमिनीचा दिरांनी कबजा घेतला. आता उदरनिर्वाहासाठी दिरांवर अवलंबून राहावे? की पतीचा मागे राहिलेला वस्तरा उचलून, कष्ट करत स्वाभिमानाने जगावे?-की मुलींसह...?                                                                     ``मला कुणाचाही भार होऊन जगायचे नव्हते'' शांताबाई सांगतात, ``मी शेतमजूरी ची कामं करू लागले. त्या काळी दिवसाचे फक्त पन्नास पैसे मिळत एवढ्या कमाईत पाच पोटं कशी भरावी? संध्याकाळी रिकामा वेळ असायचा. असलं रडत कुढत आयुष्य घालविण्यापेक्षा आपला व्यवसाय करून पहावा. जरा भीड वाटली, पण वस्तरा चालवणं बहुधा माझ्या रक्तातच असावं. आणि परिस्थती अशी होती की मला या कामात तरबेज व्हावेच लागले.'' 
     हळूहळू शांताबाइंर्नी फारसा गाजावाजा न होईल अशा बेतानं लोकांना सांगायला सुरु केली. आधीआधी त्या ओळखीच्या कुटुंबानांच नाभिकसेवा देत असत. शेतावरून घरी आल्या की वस्तऱ्याचे काम चालू ! पुुरुषांच्या कठोर जगात हे अजिबात सोपे नव्हते.गावातले लोक नावे ठेवू लागले. कधी आडून, तर कधी समोर चेष्टा, कुचाळकी करू लागले. एका तरुण विधवा बाईने असे कमालीचे वेगळे काम केले की बदनामी झालीच म्हणून समजावे. पण शंताबाई बधणाऱ्या नव्हत्या! त्यांना ताठ मानेनं जगायचं होतं, मुलींना वाढवायचं होतं. 
     एके दिवशी मात्र परिस्थितीला कलाटणी मिळाली. `गावातील एक सुप्रतिष्ठित गृहस्थ हरिभाऊ कडुकर यांनी शांताबाइंर्ना चौकात बोलावले आणि त्यांनी स्वत:ची दाढी करावयाची विनंती केली. दाढी होताच त्यांनी सर्वांना जाहीरपणे दटावले ``या बाई स्वत:चा चरितार्थ चालविण्यासाठी हा व्यवसाय करीत आहेत. यापुढे कुणी या महिलेबद्दल काही पसरवलेलं मी खपवून घेणार नाही'' अशा जाहीर पाठिंब्यानंतर मात्र लोकांची तोंडे बंद झाली. 
     काही काळानंतर शांताबाइंर्नी शेतमजुरीचे काम थांबवले व त्या पूर्णवेळ नाभिक व्यवसाय करू लागल्या. तेव्हा केस कापण्यासाठी शंाताबाई १रुपया घेत असत. आपल्या लहान मुलींना शेजाऱ्यांकडे ठेवून शांताबाई आसपासच्या गावातही पायपीट करायच्या, आणि पैसे कमवून घरी परतायच्या. त्यांची लोकप्रियता वाढीला लागली. गावातील पुरुषमंडळी त्यांच्याकडेच दाढीसाठी येऊ लागली. 
     `थोडे लोक रोख पैसे, तर बहुतांशी लोक कामाचा मोबदला म्हणून अन्नधान्य देत. ही बलुत्याची पद्धत सोयीची ठरली. वर्षाच्या कामासाठी प्रत्येक गिऱ्हाईक साधारण १० किलो धान्य देई. पोटाचा प्रश्न सुटत असे. कुणी नवीन गिऱ्हाईक आलं की त्याला बसायला पाट द्यायचा, त्याच्या हातात आरसा द्यायचा, आणि दाढीची तयारी करायची. हा शिरस्ता. 
     कामाचा व्याप वाढला. त्या इतर कामाच्या जबाबदाऱ्या घेऊ लागल्या. उदाहरणार्थ, शेतावरील म्हशींची निगराणी करणे(भादरणे), वसतिगृहातील मुलांची हेअरकट करणे, वगैरे. म्हशींसाठी वेगळा ब्लेड असतो, त्यांचीही स्वच्छता ठेवावी लागते. आजकाल तरुणांच्या हेअरकटसाठी त्या ५० रुपये घेतात. या व्यवसायाने मुलींची लग्नं करायला मदत झाली; आता नातवंडं आहेत, जावई घरी बोलावत असतात. जोपर्यंत हातून काम होतंय तोपर्यंत कुणावर अवलंबलून राहायची गरज नाही. वस्तरा म्हणजे स्वयंसिद्धतेचं प्रतीकच !
     गेल्या काही वर्षांत या आगळया धाडसाबद्दल पुरस्कार व सन्मान ही मिळाले. साध्याशा कच्च्या घरात लोखंडी कॉट आणि टीव्ही आहे. आजकाल वयामुळे बाहेरगावी फिरता येत नाही. म्हणून गिऱ्हाईकांना घरबसल्या दाढी, हेअरकट वगैरे करून देतात. सत्तरीतल्या शांताबाई म्हणतात, ` ``माझ्या या पेशाने मला आणि माझ्या पोटच्या पोरींना जीवनदान दिले आणि सन्मानाने, ताठ मानेने जगायची संधी दिली. जोपर्यंत माझ्या डोळयांनी पाहू शकते, आणि माझा हा वस्तरा नीट पकडून माझे काम करू शकते तोपर्यंत... मी माझे काम करणार आहे!'' शांताबाई यादव या सामान्य भारतीय स्त्रीच्या असामान्य कर्तृत्ववान लढाईस मानाचा मुजरा.!
-डॉ. स्मिता घैसास
(बातमी सौजन्य- द गोल्डन स्परो 
आणि गुगल)     


Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन