Skip to main content

Posts

Showing posts from September, 2014

aug.2014

धर्म कालानुरूप हवा - प्रसाद भावे मी हिंदू आहे. मला त्याचा अभिमान आहे. कोणतीची गोष्ट चांगली-वाईट ठरवताना माझ्या मनाला विचार करण्याची सवय लागली आहे. माझ्याप्रमाणेच खूप लोकांस खूप गोष्टी खटकतात. पण त्यात बदल करावा अशी धारणा होत नाही. कसे बदल करता येतील, याबाबत पंडीत व विचारवंतांनी जरूर विचार करावा. मार्गदर्शन करावे, स्वत: आदर्श घालून द्यावेत. म्हणजे इतरेजनांस त्या बदलांचे अनुकरण करण्यात संकोच वाटणार नाही. हिंदू हा धर्म नसून ती संस्कृती आहे असे म्हटले जाते. पण सरकार दरबारी किंवा व्यवहारातही तो धर्म म्हणूनच आचरण्यात येतो. याबद्दल असणारा संभ्रम दूर कसा होणार? कारण मुळातच आपण कोणा एका धर्मगुरूचे मानत नाही. धार्मिक नेता म्हणून हिंदू धर्मात कोणास संबोधता येईल? त्याचा निर्णय अंतीम मानला जाईल? भारतात आद्य शंकराचार्यांना धर्मगुरू म्हणून बरेच लोक मानतात. त्यांची सर्वत्र पीठे आहेत. पण प्रत्येक पीठाचे प्रमुख फक्त स्वत:लाच श्रेष्ठ मानतात. प्रत्येकाची तोंडे वेगवेगळया दिशेला. कोणाचा शब्द अंतीम मानायचा? साहजिकच प्रत्येकाला सोयीस्कर असेल ते त्यांचा आदेश मानतात. मग धर्माची एकसंधता नाहीशी होते. यासाठी

july ank

देवाचे एकदा ठरवाच शिर्डीच्या साईबाबास `भगवान' म्हणजे देव म्हणायचे, की नाही हा चमत्कारिक वाद काही काळ चघळला गेला. वास्तविक त्याचा निर्णय काय झाला तो कळलाच नाही. कारण तो निर्णय व्हावा अशी कुणाला उत्सुकताही नव्हती, आणि तसा निर्णय करणे कुणाच्या देवालाही शक्य नव्हते. `वादे वादे जायते कंठशोष:' अशातला तो प्रकार होता. त्या निमित्ताने अंधश्रद्धावाले कुठे `चमकले' नाहीत, ही एक रुखरुख राहिली. विद्रोहीसुद्धा पुढे आले नाहीत. पण गेला बाजार पुरोगामी, अब्राह्मण्यवादी वगैरेंनी त्या वादात तोंडे का बंद ठेवली होती हे कोडेच आहे. त्यामुळे त्या वादात तसा रंग भरला नाही. देव आहे की नाही हाच घोळ अजूनी मिटलेला नाही. कुसुमाग्रज म्हणायचे की, `देव असावा असे मानणाऱ्यांसाठी तो आहे, आणि तो नको म्हणणाऱ्यांसाठी तो नाही-' इतकी सोपी गोष्ट असताना वाद कुठे येतो? धर्मगुरूंनी धर्म सांगावा, भक्तांनी भक्ती करावी. देवत्वाबद्दल मते दिली की ती धर्मात ढवळाढवळ कशी काय होते? देव एकच आहे असे सगळे धर्म म्हणतात, परंतु सगळे धर्म एकच नाहीत. धर्म म्हणजे आचरण; धर्म म्हणजे कर्तव्य वगैरे सांगणारे सगळे मार्तंण्ड, वाद-मोर्चे-