Skip to main content

Posts

Showing posts from February, 2014

17 Feb.2014

अभिरुची घडवावी लागते पन्नासच्या दशकात मी कुमारवयात होतो. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा परिणाम माझ्या विचारांवर होण्याचे ते वय! समाजातील प्रश्न जरी आताइतके जटिल वाटत नसले तरी प्रत्येक घटनेवर माझ्या कुवतीनुसार `हे असे का व्हावे?' इतपत विचार होत होता. महात्मा गांधी हत्येनंतर झालेल्या दंगलींनी मनात एक भीती व संशय येऊन अस्थिरतेची भावना मूळ धरू लागल्याचे स्मरते. ग्रामीण भागात झाले तितके भयप्रद वातावरण शहरात नव्हते पण सर्व काही सुरक्षित आहे या समजुतीला धक्का बसला. नंतरच्या वर्षात समाजातील दुही, तेढ आणि क्रौर्य आपल्या आसपासच नाही तर, सर्व जगभर वाढत गेले व वाढत आहे. कायद्याच्या कवचाचे संरक्षण किती तकलुपी असते याचे प्रत्यंतर येत गेले व येतच राहिले. संवेदनक्षम मन हळूहळू निगरगट्ट बनत गेले आणि आज अनेक गोष्टींबाबत पूर्वीची संवेदनक्षमता तितकी राहिली नाही. त्या कुमारवयातील वाचनाची गोडी मात्र अजून टिकून असल्याने, व तीही चांगले संस्कार घडवणाऱ्या वाचण्याने, वर्तमानपत्रे अथवा प्रसारमाध्यमांमधून `ओतल्या' जाणाऱ्या घटना व त्यातील संभाव्य अतिशयोक्ती ओळखायला येऊ लागली आहे. ज्या दोन पुस्तकांनी माझ्य

35th Anniversary Edition of Apale Jag

प्रांजळ प्रामाणिक रस्त्यावरची वाटचाल खूप फायद्याची, सोयीची असते.  कारण तिथे गर्दी नसते, ट्न्ॅिफक जाम वगैरे नाही, सिग्नल-अडथळाही नसतो. अवकाश अथांग आहे; आपण पायाशी पाहावे! दैनिकेतर नियतकालिकांच्या जगात ३५ वर्षांची कारकीर्द तशी खूप मोठी समजली जाते. शहरी वलयांकित व्यक्तींचे कार्य कोणत्या मोजपट्टीने मोजले जाते हा प्रश्नच असतो. पण साहित्यिक असो, कलावंत असो, पुढारी असो, की सामाजिक संस्थेचा कार्यकर्ता असो; त्याच्या या वलयाची प्रभा मूळ ज्योतितत्वापेक्षा अंमळ जास्तच पसरवण्याची सोय एखाद्या क्षेत्रस्थानी होत असेल. पंढरपुरातले कित्येकजण भाळी टिळा लेवून `रामकृष्णहरी' म्हणत असतात, त्यांना संतत्व दिले जाते. त्यायोगे आलेले किंवा येणारे मोठेपण जपण्याची साधने अन् व्यासपीठे उपलब्ध असणे किंवा त्यांवर चढून बसणेही तिथे सहजी साधत असेल. त्यातून ते वलय टिकवून ठेवण्याचेच कार्य पुढच्या काळासाठी तशा लब्धप्रतिष्ठितांस शिल्लक उरते. इतरत्र कुठे कुणी नेटाचे काम करीत असेल तर त्याबद्दल बेदखल राहणे, दखलच घेतली तर बाष्कळ सूचना करून स्वत:चे दुढ्ढाचार्यत्व जपणे इतकेच तिथून संभवनीय असते. अशा अनेक परींचा अनुभव घेत

26Jan.2014

स्वदेशी आणि स्वराज्य स्वराज्य हे जवळजवळ पूर्णपणे स्वदेशीच्या मार्गाने हस्तगत करण्यासारखे आहे. जर आपल्याला आपापल्या भाषांविषयी प्रेम नसेल, आपल्याला आपले कपडे आवडत नसतील, आपले अन्न जर आपल्याला बेचव वाटत असेल, आपल्या इथली हवा फारशी चांगली वाटत नसेल, आपले लोक बेढब आणि आपल्या संगतीला नालायक वाटत असतील; म्हणजेच जे काही देशी असेल ते सर्व वाईट आणि परदेशी ते सर्व चांगले वाटत असेल तर आपण आपल्या राज्याची काय किंमत करतो? आपल्याला बराच काळपर्यंत परकियांच्या पालकत्वाखाली राहणे अशक्य होईल. परकीय संस्कृती सर्वसामान्य जनसमुदायात अजून भिनलेली नाही. मला असे दिसते की, स्वराज्याची कदर करण्यापूर्वी आपल्याला स्वत:च्या देशाविषयी नुसते प्रेमच नव्हे तर अक्षरश: वेड असले पाहिजे. आमच्या प्रत्येक कृतीवर स्वदेशीचा ठसा उमटला पाहिजे. जे जे म्हणून या देशाचे आहे, त्यातील बहुतेक गोष्टी एकंदरीत पाहता निकोप आहेत अशा समजुतीच्या आधारावर स्वराज्याची बांधणी करणे शक्य असते. ज्या देशाने स्वराज्याची चळवळ चालविली त्यांनी स्वत:च्या देशाचा, स्वदेशी भावनेचा पूर्णपणे पुरस्कार केला पाहिजे. दोष जतन करून ठेवावेत, असा त्याचा अर्थ नाही.

20Jan.2014

वाद आपल्या नित्य घरगुती व्यवहारांत काही गोष्टी करण्याबाबतची बंधने परंपरेने चालू आहेत. त्याला काही विज्ञानाचा आधार आहे, की केवळ रूढ परंपरेचा, असा प्रश्न पडतो. असे काही (अ)व्यवहार, त्याविषयी माहितगारांनी खुलासा करावा. * अमावास्येला शुभ कामाची सुरुवात करत नाहीत. * बांगडी फुटली म्हणायचं नाही, वाढवली म्हणायचं. * मंगळसूत्र तुटलं म्हणायचं नाही, वाढलं म्हणायचं. * जुन्या केरसुण्या, खराटे जाळायचे नाहीत. * महिलांनी नारळ फोडू (वाढवू) नये. *`नारळ फोडणे' याला `वाढवणे' म्हणतात. * महिलांनी तुळस तोडू नये. * सोमवारी तूप कढवत नाहीत * शनिवारी फुटाणे खायचे नाहीत. * सोमवारी शिवण-टिपण करत नाहीत. या प्रकारे कित्येक प्रघात असतात. ते स्थल व कालानुसार बदलतही असतात. त्यांना फारसा शास्त्रार्थ नसतो. `शास्त्रात् रूढिर्बलीयसि ।' असे म्हणतात. कधीतरी कुणालातरी काहीतरी अनुभव येतो, त्यावरून ठोकताळा बसतो, आख्यायिका बनते, दृढ होते. संतोषी माता या चित्रपटास खूप यश मिळाले, ती आपल्याकडे स्थिर झाली. मार्गशीर्षातले गुरुवार अलीकडे सुरू झाले. त्यामागे कारणे शोधत बसलो तर काय हाती लागणार? स्त्रियांनी