Skip to main content

Posts

Showing posts from May, 2012

sampadkiya in 28May2012

समानीव आकूति: । समाना हृदयानि व: । समानमस्तु वो मनो । यथावस्सुसहासति ।। संकटातील धर्म ग्रीष्माच्या झळा सर्वस्पर्शी पोळत आहेत. तळपत्या सूर्यामुळे मनातला झाकोळ गडद होत आहे. पुष्कळशा भागात पाणी दुर्मीळ झाले आहे. वीजटंचाई ही तर आता अंगवळणी पडली आहे. एखाद्याच्या पायाला बरे न होणारे इसब घेऊन त्याला हिंडा फिरावे लागते, तशी स्थिती वीजप्रश्नाची आहे. त्याविषयी विव्हळले तरी आजार अटळ आहे याची सर्वांना कल्पना येऊन चुकली आहे. जलसंपदा हे भारदस्त नावाचे खाते खातेरे बनले असल्याचे जाणवते. चित्रपट महोत्सव आणि आयपीएल् ची झगमगती दुनिया दुष्काळ नावाच्या अस्वस्थतेशी संबंधित नाही, ते अपेक्षितही नाही. पण भाजीभाकरी आणि रोजची आंघोळ ज्यांना शक्य आहे तो तथाकथित बुद्धिजीवी मध्यमवर्ग सध्या त्या भीषणतेकडे डोळेझाक करून झगमगाशी नाते जोडू पाहात आहे याचे आश्चर्य मानावे, की समाधान मानावे, की कालगत न्याय म्हणावे? बंगालमधल्या महाभयंकर दुष्काळात टिळकांनी मोठा निधी उभारला, त्यास शतक उलटले. १९७२ ला महाराष्ट्नत मोठा दुष्काळ पडला तेव्हा महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्था, संकटनिवारणासाठी पुढे आल्या होत्या. विविध राजकीय व

lekh on Rajasthan Tour

रॉयल राजस्थान ऑन व्हील्स - विनायक आपटे यावर्षी मार्च मधील आठ दिवस पत्नीने आणि मी एखाद्या संस्थानिकासारखे काढले. मोजकेच दिवस का असेनात पण एक स्वप्न पुरे झाल्याचे समाधान वाटले. आजपर्यंत आम्ही पर्यटनाचा खूप आनंद लुटला.  कुठं पर्यटन करावं अशा विचारात असताना `रॉयल राजस्थान ऑन व्हील्स' बद्दल कुणीतरी सुचविलं. राजस्थान टुरिस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन (आरटीडीसी) ची इंटरनेटवरून माहिती घेतली. प्रकर्षानं जाणवलं की ही ट्नीप खर्चाची आहे, पण ठरविले की या प्रवासाचा अनुभव आणि आनंद लुटायचाच. राजस्थान हे भारतातील अविश्वसनीय, विशिष्ट ढंगाचे आणि संपन्न राज्य आहे. वर्षानुवर्षे चालत आलेला सांस्कृतिक समाज, प्रगतीच्या दिशेने निघालेली शहरे आणि खेडी, राजवाडे आणि किल्ले, मानवनिर्मित तलाव आणि प्रचंड वाळू असे हे राज्य. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रवाशांना राजस्थानने मोहीत केले आहे.  प्रवाशांना महाराजासारखे वाटावे या उद्देशाने आरटीडीसीने `रॉयल राजस्थान ऑन व्हील्स' ही योजना अंमलात आणली. निसर्गसौंदर्य, विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम, चवदार अन्न आणि मैत्रीचा हात पुढे करण्याची स्थानिक लोकांची इच्छा

sampadkiya in 17-23May2012

काय करू आता धरुनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजविले । नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण । सार्थक लाजून नव्हे हित ।। - तुकाराम व्यंगाचे सौंदर्य समजले पाहिर्जे नर्म विनोदापासून लागट झोंबऱ्या कुचेष्टेपर्यंत कोणतीही टीका जेवढी सहन करता येईल तेवढी ती व्यक्ती किंवा तो समाज प्रगल्भ झाला असे म्हणता येते. तितकी प्रगल्भता वाढत जाते तसतसे माणसाचे वागणे-बोलणे-लिहिणे या सर्वांमध्ये एक नजाकत येते आणि जगणे अलंकृत होते. भाषेच्या माध्यमात म्हणूनच वक्रोक्ती, व्याजोक्ती, अतिशयोक्ती, उपहास, उपरोध, दृष्टांत अशा अनेक खुब्या वापरल्या जातात. जसे आहे अगदी तस्सेच फक्त बोलायचे तर स्वभावोक्ती एवढीच भाषेची किंवा अभिव्यक्तीची मर्यादा राहील. एखाद्या स्त्रीने लग्न झाल्याचे चिन्ह म्हणून केवळ काळी पोत बांधावी, तसे करणे कुणालाच पटत नाही. तिला स्वत:ला आणि कोणत्याही भावनेतून तिच्याकडे पाहणाऱ्यांना तिचे अलंकार मानसिक आनंद देतात. परंतु एखादी सर किंवा मणी तिच्या अंगावर वेगळा दिसला की तिच्यावर नस्ते संशय घेऊन तिला बुकलून काढणारा नवरा भेटला तर काय करावे? डॉ.आंबेडकरांच्या व्यंगचित्रावरून ज्यांनी गदारोळ चालविला आहे त्यांच्

maza column in 14 May2012

घाईघाईत जाशी कुठं ज्यांच्यामागे वाघ लागलेला असतो, ती माणसं कुत्र्यासारखी धावत असतात म्हणे. ही स्थिती केवळ शहरी जीवनातच असते असा समज आहे. मुंबईची धावती राहणी हा सगळयांच्या आवडीचा विषय असतो. लोकल रेल्वेगाडीतून निवांत तब्येतीत उतरून स्वस्थ चालीत घराकडं परतणारा मुंबईकर, ही कल्पना कोणी करू शकत नाही. पुष्कळ मुंबईवाले तर अंथरुणावरही हलक्या अंगानं लवंडत नाहीत. भदाक्कन उताणं पडायचं, आणि हातानं खेचलेलं पांघरूणसुद्धा तंगड्या झिंजाडत अंगावरती पसरायचं ही त्यांची घाईपद्धत. तितकाही वेळ त्यांना नाही म्हणून पांघरूण घ्यावे न लागणारी उकाडी हवा तिथं देवानं दिलेली असते. अशा घाईबद्दल आजच्या आयुष्याला किंवा शहरी लोकांना उगीच नावं ठेवण्याची एक पद्धत पडली आहे. प्रत्येक माणूस प्रत्येक काळात अधिक वेगानं `लौक्कर' आटपण्यासाठी मनानं, कृतीनं धावतो आहे हे स्पष्ट दिसतं. लहान पोरांटोरांपासून सगळयांमागे `आटपा भरभर..'चा धोशा लागलेला असतो. पूर्वीच्या घरची म्हातारी माणसं, `आंघोळपाणी सक्काळी भराभर एकदाची आवरली की झालं'' या काळजीनं रात्रभर झोपायची नाहीत. पूजा, संध्या, बाराखडी.... या सगळयांच्या मागे `आवर

sampadkiya in 12-19 March 2012

रामराज्य आपल्या हाती... मंथरा सखीच्या कानभरणीमुळे कैकयी महाराणीने दशरथाला जे दोन वर मागितले, ते ऐकून दशरथ विव्हळ झाला. राम भेटीला आल्यानंतर सर्व हकीकत दशरथाने सांगितली आणि रामाला एक पर्याय सांगितला तो असा की, `कैकयीला दिलेल्या वचनाप्रमाणे वनवासाला जाण्याची आज्ञा करणे माझ्यावर बंधनकारक आहे. परंतु त्यानुसार वनात जाण्याचे वचन रामाने कैकयीला दिलेले नाही त्यामुळे ते मानलेच पाहिजे असे नव्हे.' हा `क्ल्यू' देऊनसुद्धा रामाने राज्याभिषेक करून घेण्यास नकार दिला आणि क्षत्रिय म्हणून राज्यकर्त्याने दिलेले वचन पाळण्यासाठी वनात जाण्याचा निर्णय जाहीर केला. रामजन्माच्या पर्वकालात या प्रसंगाची आठवण येण्याचे कारण असे की भारतातील पाच-सहा राज्ये व महाराष्ट्नतील जिल्हा परिषदा व महापालिका यांची सत्ता घेण्यासाठी गेल्या महिन्याभरात ज्या प्रकारचे राजकारण इथल्या जनतेला अनुभवावे लागले आहे त्याचे मूल्य लक्षात यावे. राजा रामाची तुलना आजच्या सत्तालोलुप पुढाऱ्यांशी करता येणार नाही हे तर उघड आहे, परंतु रामराज्याची जी कल्पना आपण वारंवार उच्चारत असतो त्या दिशेने निदान आपण पाऊलभर तरी पुढे जात आहोत का; एवढे जा

sampadkiya in 16 April 2012

भक्ताचा देव, सोन्याची चोरी कोकणातल्या श्रीवर्धनजवळ दिवेआगर हे पोफळीबागांनी मढलेले हिरवेकंच गाव आहे. तिथे एका शेतात सापडलेला चोख सोन्याचा महाकाय गणपती अलीकडच्या दशकभरात  भरात आला होता. हल्ली कुठल्याही जुन्या-नव्या देवस्थानी तथाकथित भगतगणांची चिरंतन रीघ असते, तशी ती याही ठिकाणी लागून राहिली होती. कुठून कुठून माणसे यायची. त्यामुळे सोन्याचा गणपती आणखी श्रीमंत होऊ लागला, हळूहळू श्रद्धाळू डोळयांवर तुस्तीची झापड येऊ लागते. दृष्टी मंद होत जाते. चाचपडणे सुरू होते आणि मग अंध कर्कश श्रद्धाळू कार्यकर्त्यांना सामाजिक पोलिसगिरी करण्याचा निर्मूलन-उद्योगही मिळतो. त्या सुवर्णार्णव वक्रतुंडाने सगळयांना याप्रकारे समृद्धीची पायवाट दाखविली खरी; पण तो मात्र स्वत: कुणा दरोडेखोरांच्या टोळीतून पसार झाला. दिवेआगरचा सुवर्णगणपती चोरीला गेला. अनंतकोटि ब्रह्माण्डानी व्यापलेले हे विश्वरूप माणसाच्या पंचेन्द्रियांना पेलण्याजोगे नाही, आणि तशी त्यांस प्रतिभाही नाही. म्हणून मग त्या कल्पनातीत अमूर्ताचे चिंतन करणेही अशक्य दिसल्यावर या डोकेबाज माणसानेच त्याला आपापल्या जाणिवेप्रमाणे मूर्तीरूपाने साकार मूर्त बनविले. परन्

Sampadkiya in 7-13 April

अद्वैत श्रद्धेने चिरंजीव कार्य श्री परशुराम आणि श्री शंकराचार्य या भारतवर्षातील दोन विभूतींचे पुण्यस्मरण-दिवस साधारण एकाच सुमारास आहेत. त्या निमित्ताने पुष्कळ ठिकाणी कार्यक्रम होत असतात. भारतभूमीत इतक्या संख्येने नररत्ने होऊन गेली की, त्या सर्वांचे केवळ स्मरणच करायचे म्हटले तरी आज आपल्यासाठी काही कृती करण्यास दिवसच काय, पण क्षणभरही मोकळा मिळायचा नाही.! पाच-दहा हजार वर्षांच्या प्रदीर्घ ऐतिहासिक भूमीच्या नित्यनूतन, सनातन, परिवर्तनशील संस्कृतीमध्ये विविध पैलूंचे मोठेपण लाभलेली अनेक माणसे झालेली असणारच. त्यांना कुणी अवतार म्हणोत कुणी विभूती म्हणोत, देवत्त्व देवोत किंवा दैवी मानोत. अशा थोर स्त्री-पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वांचे क्षणकाल पूजन करीत असताना त्यांच्या गुणगौरवाला महत्त्व असते. त्यायोगे त्यांच्यातील मनुष्यत्त्वाच्या मर्यादा पुसून जातात, सामान्य व्यवहारांना अतर्क्य चमत्कारी रूप येते अथवा असामान्य कर्तबगारीवर अतिशयोक्त अमानुषी तेजाचे अनुलेपन चढते. अशा लोकोत्तर व्यक्तींच्या जीवनकार्याचे आकलन होण्यासाठीही वेगळी शक्ती अंगी असावी लागते; ती नसेल तर मग शिवछत्रपतींना अवतार म्हणावे, गांधी