Skip to main content

Posts

Showing posts from February, 2012

Maza Column in 14 NOV.2011

फराळाचा शिल्लक चुरा दसरा किंवा पाडव्याला श्रीखंड करायची रीत होती, तशी पंचमी-होळीला पुरणपोळी असायची. आताही ती असते परंतु दोन दिवस आधीपासून त्याची तयारी करावी लागत नाही. दूध साठवून ते तीनतीनदा तापवायचं, विरजून दही लावायचं, पातळ फडक्यात ते ओतून त्याचं चुमडं बांधून खुंटीला चार-सहा तास टांगायचं, पाणी पूर्ण निथळलं की तो मऊशार चक्का फेसून घेत साखर मुरवायची.... इतकं काही आता करावं लागत नाही. परवा आमचा एक मित्र जेवायला आला. पंगत सुरू झाल्यावर श्रीखंड चाखत म्हणाला, ``वा! श्रीखंड मस्तच झालंय...!! कसं किलो मिळालं?'' कुठलाही पदार्थ कुणाही घरी आयता तयार विकत आणलेला असणार हे आता लपविण्याइतकं नवीन राहिलं नाही. पुरणपोळी, कुरड्या-पापड, लोणची-मसाले, पिठं-भाजण्या-पिठी-रवा-मेतकूट.... वाट्टेल ते. घरी कुठं करता! आता तर हे जिन्नस विकत आणून घरी पाहुणचार करणं हेसुद्धा जिकीरीचं आहे. कुणी घरी यायचं म्हणजे नाही म्हटलं तरी आवरासावर करावी लागते. फुलदाणीतले गेंद प्लॅस्टिकचेच असले तरी ते स्वच्छ करावे लागतात. पलंगपोस बदलावे लागतात, बेसीन धुवावे लागते. शिवाय नंतर खरकट्या भांड्यांचा ढीग पडतो, अन्न उरून बसतं!

Lekh on Gangadhar Divakar Gharpure in 14 NOV.2011

`गं. दि.'- हाच रामबाण उपाय कोणत्याही निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या, व मतपत्रिकेवर दिसणाऱ्या सर्वच्या सर्व उमेदवारांना नाकारण्याचा एक पर्याय मतदारांना द्यावा; त्यामुळे नव्या अधिक पात्र उमेदवारांस संधी मिळू शकेल अशी एक मागणी सध्या चर्चेत आहे. त्याचप्रमाणे अकार्यक्षम वा नापसंत प्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार (राईट टू रिकॉल) लोकांना असावा असेही म्हटले जाते. निवडणूक आयोगाने या मागण्यांना विरोध करून, अधिक पात्र उमेदवार देणे व त्यांना निवडून संधी देणे ही नागरिकांचीच जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले आहे. मतपत्रिकेवरचे सर्व उमेदवार नाकारणे किंवा प्रतिनिधीला परत बोलावणे यांमुळे पुन्हा (पुन्हा) निवडणुका घ्याव्या लागण्याचा धोका असून त्यातून लोकशाहीचे गांभीर्य कमी होईल असेही म्हटले आहे. अपात्र किंवा काही वेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी व तशाच कार्यपद्धतीच्या लोकांनी आपली लोकशाही यंत्रणा व समाजव्यवस्था कुरतडून टाकली आहे हे तर खरेच आहे पण त्याचे मूळ कारण `चांगले लोक' आत्मकेंद्री बनून सामुदायिक क्षेत्रांकडे फिरकणेच बंद झाले आहे. सध्याची शिक्षणव्यवस्था भीषण आहे, पण आपल्या आधीच्या दोन पिढ्यांन

Lekh on Ambabai Navratri Sangeet Mahostav, Miraj

श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव, मिरज - श्रीकांत येडूरकर मिरजेचे ग्रामदैवत असलेली अंबाबाई. या मंदिराचा इतिहास सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा आहे. मिरजेतील चंदूरकर-देशपांडे घराण्यातील पूर्वजांना तुळजापूरची भवानी दर्शन देण्यासाठी मिरजेत आली अशी आख्यायिका आहे. देवीची मूर्ती तुळजापूरच्या भवानीमातेची प्रतिकृती आहे. चैत्र प्रतिपदा ते शुद्ध नवमी या काळात देवीच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडतात. नित्य पूजेसाठी गुरवाची नियुक्ती आहे. ती मंडळी अत्यंत भक्तीभावाने देवीची सेवा करतात. आश्विन शुद्ध १ ते १० नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. नऊ दिवस महापूजा, अभिषेक असतो. शिवाय दरमहा दुर्गाष्टमीस स्थानिक कलाकार देवीची संगीतसेवा करतात. प्राचीन काळात नायकिणी व कलावंतिणी गान/नृत्यातून मिरजेतील अंबाबाईची सेवा करीत असत. यातून नवरात्रात संगीत सेवेची कल्पना पुढे आली असावी. मिरज नगरीच्या उत्तर दिशेस जुन्या मालगाव वेशीत अंबाबाईचे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम इ.स.१६०० मध्ये केले. जीर्णोद्धार १९८२ मध्ये झाला. सन २००८ मध्ये शिखर बांधकाम झाले. मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. मिरजेत पूर्वी सरस्वतीबाई सानी (कागवाडकर),

Sampadkiya in 24 OCT.2011

गेल्या पन्नास शंभर वर्षांतील भारताची प्रतिमा गरीब देश म्हणून आहे. याच काळात युरोप-अमेरिकेतील श्रीमंती कुणाच्याही नजरेत भरणारी होती. कैक वर्षांमागे भारतभूमीत सोन्याचा धूर निघत होता म्हणतात, त्या काळी तिकडील वस्ती आदिम अवस्थेच्या वल्कलांत वावरत होती. काळाचा फेर चक्रमेनिक्रमेण वरखाली होत असेल तर येता काळ पुन्हा भारताचा असू शकेल कारण अमेरिका-युरोपात शब्दश: यादवीला आणि आर्थिक वर्गसंघर्षाला प्रारंभ झाल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. अर्थात् त्याचा प्रत्यक्ष परिणाम लगेचच तिथे दिसू लागेल असे नव्हे आणि भारताला केवळ कालगतीनेच संपन्नता येईल असाही भ्रम नाही. `अर्थस्य पुरुषो दास:' याचा चिरंतन प्रत्यय येत असला तरी निव्वळ स्वत:च्या बुडाखाली संपत्ती साठवत नेण्याचा अढळ परिणाम पुन्हा कफल्लक होण्यातच असतो हेही वारंवार अधोरेखित होत आलेले आहे. संपत्तीची देवता लक्ष्मी ही चंचल असते म्हणतात, ते त्याच अर्थाने असावे. म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या सणाला दीपज्योतींचा सन्मान करण्याला महत्त्व आहे. पूर्वपरंपरेने पिढीजात चालत आलेला चांदीचा खणखणीत रुपाया देवघरात ठेवून, त्याचे पूजन होते. तो त्या दिवशीचा मान नोटांच्या थप्

Sampadkiya in 3 OCT. 2011

प्रकाशदिशा अनेक व्यक्ती व संस्था आपापल्या परीने काम करत असतात. त्यांच्या आधारावरच समाज उभा असतो भावी काळासाठी काही मूल्येही जोपासली जात असतात. अशी कोणी व्यक्ती, संस्था, प्रसंग यावरती भाष्य करण्यासाठी आजवर या स्थलाचा वापर फार पिचत् केला गेला असेल, त्याउलट एखाद्या विचाराचा किंवा कृतीचा अथवा प्रसंगाचा मागोवा घेऊन त्यामागील तत्त्वविचारांचा परामर्श घेण्याची प्रथा सांभाळली गेली होती. प्रस्तुत अंकात तसा अपवाद करावा असे वाटले याचे कारण एक व्यक्ती किंवा तिने उभा केलेला पैसा अर्पण करण्याचा सोहळा एवढेच निमित्त नाही तर त्यामागील अंत:करणाची बैठक आणि सर्व समाजापुढे नव्या बीजाची पेरणी करण्याची असोशी ही त्यामध्ये महत्त्वाची वाटते आजच्या काळात सामाजिक कामे होत नाहीत असे कोणी म्हणणार नाही. गांधीजींनी ज्या काळी महाराष्ट्नला कार्यकर्त्यांचे मोहोळ असे म्हटले त्या काळात सामाजिक कार्याला किंवा ते करणाऱ्या कार्यकर्त्याला खूप चांगले दिवस होते अशातला भाग नाही. देशासाठी, धर्मासाठी अथवा समाजरूपी देवासाठी प्रपंचावर निखारे ठेवून आयुष्य झोकून देणारे अनेकजण असतात. अशा संस्थांचा प्रतिपाळ करणे हेही समाजाचेच कर्त

Lekh on Lulla Trust in 3 OCT. 2011

दान सोपं, त्याचा भाव जागवावा! - विनिता तेलंग, सांगली सिंधूच्या तीरावर मुळं असलेल्या व कृष्णेच्या पाण्यावर भरणपोषण झालेल्या लुल्ला परिवाराने अर्घ्यदानाचा एक अभिनव कार्यक्रम गतवर्षी केला. त्या संस्कार सोहळयाचे हे दुसरे वर्ष. आपल्या सांपत्तिक उत्कर्षाच्या काळात, निव्वळ वैयक्तिक वा कौटुंबिक हौस-मौजेत व्यय न करता, ज्या समाजामुळे आपल्याला उत्कर्ष साधता आला, त्या समाजाच्या ऋणातून अंशत: मुक्त होण्याची संधी त्यांनी अर्घ्यदानाच्या रूपाने निर्माण केली. श्री. किशोर लुल्ला यांचे वडील श्री.तोतारामजी लुल्ला यांच्या मनात हा संकल्प होताच. त्यांच्या निधनानंतर त्यास मूर्त रूप देण्याचे श्री.किशोर व त्यांच्या कुटुंबियांनी ठरविले व त्यातून हा कार्यक्रम साकार झाला. गेल्या वर्षी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने केलेला कार्यक्रम निव्वळ नैमित्तिक, तात्कालिक उमाळयातून आलेला नव्हता; तर स्वत:ला व आपल्या परिवाराला अशा प्रकारच्या समर्पण संस्काराची एक सवय, शिस्त ते लावू पाहात आहेत. स्वत:बरोबरच समाजातही हा विचार पुन:पुन्हा रुजवू पहात आहेत, म्हणूनच गेल्यावर्षीचा एक उत्कट सोहळा चालू वर्षी एका सुंदर-

Sampadkiya in 26 Sept.2011

नवे सीमोल्लंघन हवे... हवामान खात्याकडून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पावसाळा संपल्याची लक्षणे दिसत आहेत. महाराष्ट्नतील दोन-तीन जिल्हे वगळले तर कोकण आणि विदर्भात भरपूर पाऊस पडला. तरीही एकंदरीत चित्र नियमित पावसाचे नाही. जिथे पडला तो महाप्रचंड पडला आणि मानवी जीवनात त्याने खूप गोंधळ निर्माण केला. तर काही जिल्ह्यात हवा कोरडी नसली तरी रोगट होती. पण पुरेसा पाऊस नाही. या सगळयाचा अर्थ एकच होतो की पाऊसकाळ नियमित झालेला नाही. शास्त्रीय आकडेवारी सांगण्यासाठी त्याने सरासरी गाठली असे म्हणता येईल. आठवड्याभराचे अन्न एकाच दिवशी खाल्ल्यासारखा तो प्रकार झाला आहे. तरीसुद्धा महागाई आणि चलनवाढीचे आकडे सांगताना पावसाचे निमित्त पुरेसे ठरण्यासारखे आहे. पाऊसकाळ चांगला झाला किंवा वाईट झाला ते माणसाच्या कर्तबगारीवरही ठरते. दुष्काळ पडला हे निमित्त सरकारने वास्तविक कधीच सांगू नये. तर दुष्काळ निवारणासाठी जे प्रयत्न आवश्यक असतात ते तडफदारीने केले पाहिजेत. अचानक कोसळणारी दरड वाहतुकीत व्यत्यय आणते हे खरे आहे. परंतु त्याचे निवारण कसे होते हे सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आणि त्याही पुढे जाऊन पुन्हा अशी आपत्ती

Krishichi Apeksha by Abhay Bhandari, Vita

कृषीची अपेक्षा - अभय भंडारी, विटे आपल्या प्रगतीशील महाराष्ट्नत लक्षावधी एकर जमिनी सध्या, शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे पडीक आहेत. या जमिनीवर आपण `ऑक्सिजन पार्क' अर्थात प्राणवायू उद्याने उभी करू शकतो. सांगली जिल्ह्यात विट्याजवळ गार्डी येथे या प्रकारचा एक छोटासा पथदर्शी प्रकल्प साडेतीन एकरात २३०० झाडे लावून (८० ते ९० प्रकारची) निर्माण केला आहे. त्यास २००३ च्या दुष्काळात प्रारंभ करताना त्या शेकडो एकर पसरलेल्या माळरानावर जिवंतपणाचे कसलेच लक्षण नव्हते. आम्ही सुरुवातीला अर्धा एकर क्षेत्रात कडुनिंब, चिंच, शेवगा, सीताफळ, गुळभेंडी या प्रजातींची रोपे लावली. त्या ४५० रोपांना रोज अवघे ५० लि. पाणी नेऊन सलाईनच्या बाटल्या बांबूवर टांगून त्यातून थेंबाथेंबाने दिले. रोज अवघे ५० लिटर पाणी त्या माळरानावर २००३ च्या भयंकर दुष्काळातही ४५० रोपांना पुरले. सारी रोपे हिरवीगार असायची. आता २०१० पर्यंत क्षेत्र वाढवून साडेतीन एकर क्षेत्रामध्ये २३०० झाडे आहेत. यासाठी ५ हजार लिटर पाणी टँकरने घेऊन ते साठविता येईल अशा सिमेंटच्या टाक्या जमिनीवरील उंचवट्यावर ठेवल्या. पाईपने सर्वत्र पाणी उताराने फिरवून नैसर्गिक दाब

Sampadkiya in 19 Sept.2011

स्वस्ति प्रजाभ्य: परिपालयन्ताम् न्याय्येन मार्गेण महीं महीशा: । (सर्व प्रजाजन आनंदी राहोत. राज्यकर्त्यांनी प्रजेचा प्रतिपाळ समुचित रीतीनेच करावा.) धर्मनिरपेक्षता नव्हे, अधर्म स्व.राजीव गांधी यांच्या हत्येसाठी फाशीची शिक्षा वास्तविक सौम्यच म्हणता येईल. अशा कांडातील गुन्हेगार पकडल्यानंतर तातडीने न्यायप्रक्रिया होऊन आरोप सिद्ध होत असेल तर त्यास चौकात उलटे टांगून..... परंतु हे केवळ अविवेकी चीड व्यक्त करणारे शब्द आहेत. ते प्रत्यक्षात येणे इथल्या सुसंस्कृत सभ्यतेला पेलणार नाहीत. म्हणून राज्यघटनेनुसार भारतीय कायद्यातील कठोरता फाशीपुरती मर्यादा गाठते. गुन्ह्यानंतर प्रदीर्घ काळ उलटल्यावर सुनावलेली फाशी अंमलात येण्याची गरज आहे. अशा वेळी तामीळनाडूतील विधानसभेने ठराव करून या फाशीच्या निर्णयास अडथळा आणला. गुन्हेगारांचे `तामीळत्त्व' आणि एलटीटीईशी लागेबांधे एवढ्यातून विधानसभेने हा ठराव केला आणि फाशीच्या अंमलबजावणीस स्थगिती आली. देव करो आणि तसे काही न होवो; - परंतु कसाबच्या फाशीला कश्मिरी मुस्लिम बहुल विधानसभेने किंवा ईशान्येच्या कोणा िख्र्चाश्न गुन्हेगारास नागा-मिझो विधानसभेने अभय मागितले

Lekh of Shri. Anil Kakodkar in 19 Sept.2011

शिकागो येथे बृहन्महाराष्ट्न् मंडळाचे पंधरावे अधिवेशन जुलै २०११ मध्ये झाले. त्यानिमित्त श्री.अनिल काकोडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण संक्षेपाने... शिक्षण, कौशल्य व अनुभव यांचा मेळ हवा...    आजचे आपल्यापुढील चित्र वेगाने घडणाऱ्या स्थित्यंतरांचे आहे. एका बाजूला तंत्रज्ञानात विलक्षण वेगाने होणारे बदल व त्याचा समाजावर प्रभाव, तर दुसऱ्या बाजूला नैसर्गिक साधनसामग्रीचा सतत वाढणारा वापर व त्यामुळे मानवाचा व निसर्गाचा समतोल ढळण्याच्या चिंतादायक परिस्थितीकडे वाटचाल. विशेषत: तरुण पिढीला या परिस्थितीतून पुढे जायचे आहे. भारतात आज प्रचंड युवासंख्या व आर्थिक उदारीकरण या दुहेरी कारणास्तव चांगलीच आर्थिक वाढ आपण अनुभवतो आहोत. शिक्षित, कार्यक्षम व कुशल युवा मंडळींस आज अनेक संधी देशात व देशाबाहेरही उपलब्ध होत आहेत. माहिती मिळण्याची व संपर्काची साधने व त्यांचा सततचा वाढत जाणारा वापर यामुळे तरुण मंडळींच्या आकांक्षा व अपेक्षा उंचावल्या आहेत. नवीन संधींशी गुणात्मक, तसेच संख्यात्मक अपेक्षांचा मेळ बसवणे हे मोठे आव्हान आहे. भारत मानवी संसाधनाबाबत जरी समृद्ध असला, तरी नैसर्गिक साधनसामग्रीबाबत परिस्थिती

Maza Cloumn

दया आणि षौक प्राणी छळ-प्रतिबंधक कायदा १९६० मध्ये आला. त्यानंतर सर्कशींवर गंडांतर आले. हत्तीला स्टुलावर बसविण्यात किंवा आसूडाच्या भीतीखाली सिंहाने शेळीच्या ताटामध्ये जेवण्यात त्या प्राण्यांचा छळ होतो असे कायद्याला वाटते. वास्तविक त्याच निकषावर माकडाला सुंदर कपडे घालून रिंगमास्तरच्या खांद्यावर मिरविणे याला सन्मान समजले पाहिजे; परंतु कायद्याला तेही मान्य होत नाही. अस्वल, माकड, वाघ, सिंह यांचे खेळ दाखवायला बंदी आहे. मनेका गांधींपासून कित्येक जीवनदयावादी प्राणीमित्र काही वर्षांपूर्वी बराच दंगा करीत असत. हल्ली तो फारसा ऐकू येत नाही. सर्कशीतल्या प्राण्यांना ऐतखाऊपणाची सवय लागते इतके ते माणसाच्या वृत्तीचे बनतात, त्यालाही `प्राण्यांचा छळ' मानता येईल. काहीजण कुत्र्यांचे इतके लाड करतात की, आपल्याला हेवा वाटावा. माझ्या पाहण्यात एक बाई आहेत, त्या तव्यावरची गरमागरम पोळी तूप लावून तुकडे करून त्यांच्या कुत्र्याला भरवतात. त्या कुत्र्याचा आकार असा की, रेडकूसुद्धा खाऊ शकेल. झिपरी केसाळ कुत्री अंथरुणात घेऊन बसणारे प्राणी तुमच्याही पाहण्यात असतील. याउलट आमच्या शेजारी दोन गावठी कुत्री बाळगणारे एकजण

Shraddha - Nahi anokha Shraddhadin

काही  वर्षांपूर्वी एक आगळावेगळा कार्यक्रम वाचनात आला होता. `चतुरंग' या संस्थेतर्फे `श्रद्धादिनाचा' कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय पंचागानुसार भाद्रपद कृ.१ ते भाद्रपद अमावास्येपर्यंतचा पंधरवडा हा `पितृ पंधरवडा' म्हणून पाळला जातो. आपल्या कुटुंबातील, घराण्यातील मृत व्यक्तींचे श्राद्ध करण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. मृत व्यक्तीला सद्गती लाभावी व त्यांच्या वारसदारांनी त्यांचे स्मरण करून या निमित्ताने काही धार्मिक कृत्ये, दानधर्म करावा असे अपेक्षित आहे. बदलत्या काळानुसार माणसाच्या वेळेला खूपच मर्यादा आल्या. समाजाच्या धार्मिक विषयातल्या संकल्पनाही बदलत गेल्या व हळूहळू श्राद्ध -पक्ष हे विधी कालबाह्य ठरत गेले. काळानुसार त्यातला कर्मठपणा तर गेलाच, हळूहळू त्यात सुटसुटीतपणा आणला गेला. `चतुरंग'ने काय केले, तर यातील मूळ कल्पना `आपल्या कुटुंबाच्या उभारणीत ज्यांचे योगदान आहे त्यांचे स्मरण व त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करणे' अशी आहे, असे म्हणून त्याच कल्पनेचा थोडा विस्तार केला व समाजाच्या, देशाच्या जडणघडणीसाठी ज्यांनी काही भरीव योगदान दिले आहे अशा काही व्यक्तित्त्वांचे स्मरण करण