Skip to main content

Posts

Showing posts from 2019

23 December 2019

अन्न नासाडी भारतात शेतीच्या बाबतीत मोठेच बदल घडून आले आहेत. लोकसंख्या वाढत चालली आहे, तरीही त्या साऱ्यांना पुरेल इतके अन्नधान्य आपल्याकडे पिकते. उत्पादन चांगले वाढले. परंतु जगातील काही महत्वाच्या अर्थसंस्थांच्या सर्वेक्षणांवरून असे दिसते की, भारतात भुकेल्या माणसांची संख्या फारच जास्त आहे. भुकेलेल्या लोकांचे प्रमाण देशात किती आहे, या बाबतीत जागतिक पातळीवर आढावा घेतला जातो. त्याला `जागतिक भूक निर्देशांक'(ग्लोबल हंगर इंडेक्स) म्हणतात. ११९ इतक्या विकसनशील देशांच्या एकूण क्रमवारीत भारताचा क्रमांक शंभरावा आहे. या यादीत बांगला देश आणि नेपाळ या छोट्या देशांचा क्रमांक आपल्यापेक्षा वरती आहे. `जागतिक अन्न  धोरण-विषयक संशोधन संस्था (इंटरनॅशनल फूड पॉलिसी रीसर्च इन्स्टीट्यूट)' या संस्थेचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला, त्यात नमूद केलेल्या काही गोष्टी आपल्याला दहादा विचार करायला लावतील अशा आहेत. विकसनशील देशांत नागरिकांना किती आणि कसे अन्न मिळते, याचा आढावा सर्वेक्षणात घेतला जातो. त्यानुसार दोन वेळेला पुरेसे जेवण न मिळालेली, भुकेली माणसे आणि कुपोषित बालके यांचे प्रमाण भारतात जास्त आहे. या स

25 Nonember 2019

स्वामीनिष्ठ सेवेची ती कथा कोकणभूमी निसर्ग संपत्तीने समृद्ध असली तरी गेल्या तीनचारशे वर्षांत तिथे दारिद्र्य आणि खडतर जीवन यांस तोंड द्यावे लागत होते. त्यास कंटाळून आपले नशीब काढण्यासाठी महत्वाकांक्षी लोक स्थलांतर करीत. १८व्या शतकात अनेक ब्राह्मण कुटुंबे देशावर आली, आणि पुणे मुंबआी, सातारा वाआी, सांगली कोल्हापूर अशा ठिकाणी स्थायिक झाली. रत्नागिरीजवळच्या सोमेश्वर येथील रघुनाथ केळकर हे अशांपैकी अेक. ते वाआीला आले. त्यांचा मुलगा बाळकृष्ण हुशार होता. अैन अुगवत्या वयात त्याच्या हुशारीची ख्याती, सातारचे (शेवटचे) छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या कानी पडली. त्यांनी बाळकोबास बोलावून घेतले. त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांत लवकरच तो सामील झाला. हिंदुस्थानात ब्रिटिश अंमल स्थिरावला होता. संस्थाने खालसा करून त्यांची खाजगी मालमत्ता, थोडाबहुत तनखा, आणि अगदी मोजके सैन्य पदरी ठेवण्याची मुभा होती. १८५७ सालचा स्वातंत्र्यसंग्राम आितिहासात गाजला; परंतु त्याआधीही ब्रिटिश राजवटीविरुद्ध अुठाव करण्याची कारस्थाने चालू झालेलीच होती. सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी बाळकोबा केळकरामार्फत अुत्तरेच्या होळकर-गायकवाड-श

22 October Ank

शांबरिक खरोलिका `शांबरिक खरोलिका' हे नाव त्याच्या वैचित्र्यानं लक्षात होतं. हे नाव एका अद्भूत ऐतिहासिक महत्वाच्या ठेव्याचं आहे. सिनेमा जगताची झगमग आज डोळे दिपवत आहे त्याची ही सुरुवात होती. चित्रपटसृष्टीने व इतिहासाने या प्रयत्नांची दखल घेतली पाहिजे. कित्येक वर्षे पटवर्धन कुटुंबात एकमेवाद्वितीय अशी कलाकृती ६ मोठमोठ्या पेट्यांमध्ये माळयावर ठेवली होती. दिवाळीला वा गणपतीला त्यांतल्या काही स्लाइड्स काढून घरगुती सिनेमा दाखवला जाई.  शे-सव्वाशे वर्षांपूर्वी एका मराठी माणसानं जगातील पहिला चलत् चित्रपट व तोही २ ।। तासांचा तयार केला होता. या गोष्टीचे ऐतिहासिक अपूर्वत्व जाणून `ग्रंथाली'तर्फे या खरोलिकाच्या स्लाइड्स पडद्यावर दाखवल्या गेल्या. तरुण पिढीनंही  आश्चर्यानं या प्रकाराकडे पाहिलं. १० फूट बाय १० फूट रंगीत चित्र व त्यात हालचाली निर्माण करण्याचा तो यशस्वी प्रयोग अनेकांनी पाहिला. केवळ एकाच लँटर्नवर हा शो झाला. `शांबरिक खरोलिका' हा शब्द मॅजिक लँटर्न या शब्दाला पर्याय म्हणून पटवर्धनांनी तयार केला. शांबरिक हा जादू जाणणारा राक्षस व खरोलिक म्हणजे दिवा. हा १९व्या शतकातला सिनेमा होत