Skip to main content

Posts

Showing posts from May, 2013

Mukundrao Kirloskar Special Ank

श्री.मुकुंदराव किर्लोस्कर यांचे वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. महाराष्ट्नतील ख्यातनाम मासिके `किर्लोस्कर' `स्त्री' `मनोहर' यांच्या संपादकपदी त्यांची कारकीर्द विशेष पुरोगामित्वाने गाजली. नवे विषय निवडून त्यांनी घेतलेला भविष्याचा वेध आज विचार करायला लावतो. त्या व्यतिरिक्त एक वत्सल विचाराचा आणि सकारात्मक आचरणाचा मित्र म्हणून श्री.मुकुंदराव हे साऱ्या महाराष्ट्नला परिचित झाले.  त्यांचे जाणे अकाली नव्हते तरी, सर्व ऋणानुबंधीयांना चटका लावून गेले. त्यांच्या मासिक स्मृतिदिनानिमित्त (फाल्गुन कृ.३) हा अंक.... एक(च) दर्शन शहर - पुणे.... दि. १६ फेब्रुवारी २०१३, वेळ ५ ची. स्थळ - महाराष्ट्न् साहित्य परिषदेचे सभागृह. निवडक संपादकांच्या विचारसभेचा दिवसभराचा समृद्ध अनुभव समाप्तीकडे वाटचाल करू लागलेला..... शेवटचे चर्चासत्र. कृती कार्यक्रमासंबंधी विचारविमर्श सुरू असताना संयोजक वसंत आपटे हे समारोप सत्रासाठी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सरांना आणण्यासाठी गेले. आता चर्चासत्र थांबवून समारोप सभेसाठी बैठक रचना लावायला हवी, अशा विचारात आम्ही असतानाच कुणीतरी कुजबुजलं...`मुकुंदर

Balbhim Parivar

बलभीम परिवार सांगलीतील कृष्णा नदीकडेची बलभीम व्यायामशाळा ही ९५ वर्षे पूर्ण करीत असून तिच्या स्थापनेत व वाटचालीत कै.दत्त आणि कै.विनायक नारायण आपटे या बंधूंचा सिंहाचा वाटा होता. त्या मोठ्या गोतावळयाचा या व्यायामसंस्थेशी पिढ्यांनी संबंध आहे. हनुमानजयंतीस (२५/०४/१३) खास कार्यक्रम तेथे आयोजित केला होता. नव्या आधुनिक व्यायामसाधनांचे उद्घाटन, तेथील आमदार पै.संभाजी पवार यांच्या हस्ते आणि क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या नामवंतांचा सत्कार होईल. गेली साठ वर्षे संस्थेच्या कार्यात व्यतीत केलेले व काही काळ अध्यक्षपदी असणारे श्री.अरविंद विनायक आपटे यांचा ७५ वर्षपूर्ती सत्कार  होत आहे. याशिवाय मल्लखांब, दोरी मल्लखांब व अन्य प्रात्यक्षिके, हनुमान जन्मकाळ, मंत्रजागर व तीर्थप्रसाद इ. कार्यक्रम होत आहेत. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री.शरद दत्त आपटे हे आहेत.(फोन - ९८९०३८४४००) - बलभीम व्यायाम शाळा, ८३२, गावभाग, सांगली ४१६४१६

Sampadkiya in 29 April 2013

पैसा, पैसा आणि पैसा पाणी - हवा - निसर्ग - प्राणी - भूमी इत्यादी गोष्टींचा विचार केवळ एका विधिपुरता म्हणजे बोलण्यापुरता करायचा असतो असा समज हल्ली सार्वत्रिक आहे. स्वत: व्यक्ती, व्यक्तिसमूह अथवा समाज मात्र तसल्या जुनाट-गावंढळ कृतीसाठी किंचित्मात्र राजी नाही. व्यक्तिकेंद्री व्यवहार हेच केवळ आजच्या जगण्याचे मध्यवर्ती सूत्र आहे. घाटरस्त्यात वाहतूक तुंबली तर त्याचे कारण, त्यावरती उपाय अथवा कोणा संकटग्रस्तास मदत असल्या गोष्टींकडे ढुंकून न पाहता दोन्ही बाजूंनी वाहने मुंगीवाट काढत पुढे घुसतात, आणि तुंबा पार पडला की सुसाट घर गाठतात. हीच तऱ्हा प्रत्येक बाबतीत आहे. त्यामुळे हवा-पाणी-प्राणी यांचा स्वच्छंद उपभोग घेत ही घडी ओलांडत जावी; आणि अर्थातच त्या जीवनशैलीसाठी म्हणून आपल्या स्वत:च्याच नियंत्रणाचा एक चिमटा सतत उघडा लावून त्यात चिमटेल तितका पैसा खेचावा. या प्रकारास ग्रामीण, दुर्बल, शिक्षित, पुढारी, बलुतेदार कुणी कुणीही अपवाद नाही. भीषण पाणीटंचाईच्या एका तालुक्यात उजाड गावकऱ्यांसाठी पाणगाडी (टँकर)च्या खेपा सुरू होत्या. कधीतरी एखादी पाणगाडी भर उन्हात यायची, त्यावर झुंबड उडायची. म्हणून गावातले

Anandibai Joshi

आनंदीबाई जोशी (०१/०३/१८६५ - २६/०२/१८८७) या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. तरुणपणातच क्षयरोग जडलेल्या डॉ.आनंदीबाई जोशी यांच्यावर पुण्यातील तत्कालीन नामांकित वैद्यांनी उपचार करण्यास नकार दिला. कारण आनंदीबाइंर्नी परदेशगमन केल्याच्या कारणावरून, ज्ञानी देशी वैद्यराज आपली विद्या बाटविण्यास तयार नव्हते. परिणामी खडतर परिश्रम आणि तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर एम.डी.पदवी संपादन करणारी केवळ २२ वर्षांची ही बुद्धिमान विवाहित स्त्री मृत्यूमुखी पडली. याच आनंदीबाइंर्नी एम.डी.परीक्षेसाठी `आर्यहिंदूंचे सूतिकाशास्त्र' हा प्रबंध लिहिला होता. सन १८८३ मध्ये आनंदीबाइंर्ना त्यांच्या आवडीनिवडी आणि एकंदरच जीवनाविषयी विचारणा केली असता त्यांनी दिलेली उत्तरे - इतिहासातील आवडती व्यक्ती - राजा रिचर्ड शेवटपर्यंत कोणता ग्रंथ बाळगाल, बायबल सोडून - ए हिस्टरी ऑफ द वर्ल्ड व्यवसाय - सर्वसामान्यांच्या हिताचा नावडता दुर्गुण - अप्रामाणिकपणा आणि व्याभिचार तुम्ही सोडून दुसरे कोण होणे आवडेल - कुणीच नाही. तुमची सुखाची कल्पना - परमेश्वरावर विश्वास दु:खाची कल्पना - मनमानी वागणे तुमचा जगावेगळा गुणधर्म - अजून सापडला न

Pustak Parichay

जुन्यातले सोने वैदिक संस्कृतीचे पैलू लेखक  -चिंतामणी गणेश काशीकर (टिळक महाराष्ट्न् विद्यापीठ सुवर्णमहोत्सव ग्रंथ ७) (पुणे -३०, १९७२, किंमत रु.८/-) या पुस्तकात वेदकाळ, चारही वेदांबद्दल विस्तृत माहिती, वेदकालीन देवता, तऱ्हेतऱ्हेचे यज्ञयाग व ते कसे करावेत त्याची पद्धती, लागणारे साहित्य वगैरेची खूप विस्तृत व वाचनीय माहिती अधिकारवाणीने दिली आहे. त्यावेळचा समाज, त्याची मानसिकता, तत्कालीन चालीरिती, त्यांचे ज्ञान, विश्वाचे कोडे उकलण्याबाबत त्यांची तळमळ हे सारे विषय या ग्रंथात आले आहेत. तसेच आजही आपल्याला देवप्रिय `सोमरस' याबद्दल कुतुहल आहे. ती माहिती थोडक्यात पुढे देत आहे. सोमरसासाठी सोमवनस्पती `मूनवत' या पर्वतावरून आणली जात असे. `मूनवत' हे हिमालयातील एखादे पर्वत शिखर असावे. पश्चिमेकडील कुरुपंचाल हा देश संस्कृतीचे माहेर होता. कुरुक्षेत्रापासून उत्तर प्रदेशातील बरेलीपर्यंतच्या भागाला `कुरुपंचाल' म्हणत. याआधीची आर्यांची वस्ती सप्तसिंधू व पंजाब येथे होती. त्याही आधी अफगाणीस्तान हा प्रदेश होता. `मूनवत' पर्वताचा उल्लेख वेदांत येतो. शर्यणावत् नावाचे एक सरोवर कुरुक्षे

Samp. in 22April2013

ब्रह्म-क्षात्र प्रकट व्हावे चिपळूणच्या साहित्यसंमेलन प्रसंगी अनेक सामाजिक वाद उफाळले. त्यापैकी एक तर साहित्याशी संबंधितच होता, तो हमीद दलवाई यांच्या घरापासून ग्रंथदिंडी काढण्याचा. पुरोगामी विचारांचा तो दिवंगत साहित्यिक, साहित्यबाह्य कर्मठ धार्मिक वादात अकारण अडकला. दुसरा वाद मुळातच साहित्याशी थेट संबंधित नव्हता, पण कोकणभूमीच्या आणि भूमिपुत्रांच्या अस्मितेशी निगडित होता. श्री परशुरामाशी कोकणातल्या भावना गुंतलेल्या असल्या तरी ती प्रतिमा हटविण्याचे मान्य करून संयोजकांनी वेळीच मुरड घालून कार्यसिद्धी केली ही आजच्या परिस्थितीत योग्य अशीच बाब. प्रश्न केवळ साहित्यबाह्यतेशीच असता तर कोकणातल्या खेड्याचे चित्रपटी नेपथ्य उभे करण्याचा उद्देश तर कोणावर दौलतजादा होण्याचाही असेल. परशुराम-प्रतिमा हटविण्याचे नाटक उरकून त्या रंगमंचावर आता पडदा टाकला तरी चिपळूणच्या महेंद्रगडावर चिरंजीवति अशा परशुरामांचे वास्तव्य असते ही कोकणची नव्हे तर साऱ्या भारतवर्षाची श्रद्धाही चिरंजीव आहे; ती दुखावली जाणार नाही. परशुरामांचे विश्वभ्रमण, सामर्थ्य, दरारा हा सर्व इतिहास मानायचा, पुराण मानायचे, कल्पित मानायचे की काहीच

Lekh in 22 April 2013

भोग उपभोगण्याचं सुख - विनिता तेलंग बेळगावस्थित आमच्या आत्या व काका ही जोडी म्हणजे मूर्तिमंत उत्साह. सत्तरी पार वयात दोघे अत्यंत क्रियाशील. हे दोघेही एका वृद्धाश्रमाशी जोडलेले. त्यांच्या परिश्रमातून उभी राहिलेली वृद्धाश्रमाची नवीन सुसज्ज वास्तू. मी प्रथमच असा `वृद्धाश्रम' नीटपणे पाहणार होते. २५ महिला व केवळ २ पुरुष ही सदस्यसंख्या. तिथे केवळ महिला राज. आमटीच्या वासानं किचन दरवळलं होतं. एकेका खोलीत सात-आठ कॉट. स्वतंत्र कपाट. प्रत्येकीचं स्वतंत्र जगच ते. एक आजी एम.एस्सी.झालेल्या. बेंगलोरच्या संस्थेत संशोधनाचं काम २५ वर्षे करून निवृत्त झालेल्या. दुसऱ्या आजींच्या चेहऱ्यावरचं नवखेपण लपत नव्हतं. खिडकीशेजारील कॉटवाल्या आज्ज्यांच्या चेहऱ्यावर बंगलेवाले फ्लॅटवाल्यांकडे पाहतात तसे भाव. कुणी नातवानं दिलेली साडी नेसून बसलेल्या. एक-दोघी खूपच आजारी - हैराण. कुणी कुणाला आग्रहानं चहा-बिस्किट भरवत होतं. एक आजी खूपच प्रसन्न, संुदर हसल्या, त्यांना ऐकू येत नाही. एका परिचितांच्या सासूबाई होत्या, त्यांच्याच बंगल्यात मी एकदा या बाइंर्ना भेटलेही होते. त्यांनी पट्टा सुरू केला... नामस्मरणाचं महत्त्व!