Skip to main content

Posts

Showing posts from 2017

11 December 2017

वैद्यकीय व्यवसायाच्या प्रकृतीची काळजी आजच्या काळात हॉटेल टाकण्यासाठी आपण आचारी असण्याची गरज नसते; त्याचप्रमाणे कुणाला रुग्णालय सुरू करायचे असेल तर त्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही. साधारण लोकांना हे माहिती नसेल पण, मोठ्या उद्योगपतींना पक्के ठाऊक आहे. म्हणून तर अशा काही बड्या मंडळींनी टोलेजंग हॉस्पीटल सुरू केली, आणि रुग्णसेवेचा `मनी मेकिंग बिझनेस' बनविला. त्या रुग्णालयातून यापूर्वीही उच्च श्रीमंत वर्ग जात होताच, पण अलीकडे उदयास आलेला नव मध्यमवर्ग या मंडळींनी पकडला आहे. जागतिकीकरणामुळे आणि नव्या युगामुळे सगळयांचाच आर्थिक स्तर वाढला आहे. त्यातही नवश्रीमंत मध्यमवर्गाकडे भरपूर पैसा येत आहे. शिवाय क्रॅशलेस मेडीक्लेम कंपन्यांनी त्यांच्याभोवती जाळे गुंफायला पद्धतशीर सुरुवात केली. नवे नवे आजार आणि मरणाच्या भीतीचे मार्केटिंग सुरू झाले. साधारणत: १९९२ पासून असल्या आरोग्यविषयक बाबतीत अनारोग्याचे वातावरण येत गेले आहे. मोठ्या कार्पोरेट हॉस्पिटलचा डोलारा सांभाळायचा तर त्याची काटेकोर देखभाल करावी लागते, त्याचा प्रचंड खर्च येतो. त्यासाठी कर्मचाऱ्यांना सोयीसवलती आणि चांगला पगार द्यावा लागतो. संड

4 December 2017

`आम्ही कुलीनांच्या कन्या....चाफेकळया पानाआड'... ``तुझं माहेरचं आडनाव काय गं?'' मला या वयातही हा प्रश्न कुणी विचारला की झर्रकन डोळयासमोर कितीतरी शब्दचित्रं येतात. आम्ही बायका खरं म्हणजे कितीतरी विषयात सतत गुंतलेल्या असतो. अनंत व्यवधाने सांभाळत स्वत:ला व घरातल्या इतरांना पुढे नेत असतो. जोडीला सारे सांगाती असतातच. अशातच वरचा प्रश्न कुणी विचारला की मागे मागे जायला होते. `आपटे' कुटुंबामध्ये येणाऱ्या सासुरवाशणी, आपट्यांच्या माहेरवाशणी... स्त्रीमन इथूनतिथून सारखंच, माहेर सासर या बाबतीत हं! २४-२५ वर्षांचा आपला बाडबिस्तरा गुंडाळून नवीन घरी स्थिरावायला जायचं, यात सगळया बाजूने केवढीतरी `स्थित्यंतरे' येतात. पण शेवटी तिचं `माझे घर' असतं. बरोबर आणलेलं काही `स्थावर' सोडून... काही स्वत:चं पण त्यापेक्षा जास्त आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू... यांच्याकडून झालेल्या संस्काराचं असतं. आमच्या जमान्यात तरी कुटुंब एकत्र होती. ती सोबत घेऊन आम्ही येत होतो. आता मुली लग्नाबरोबर `इंटरनेट'चे संस्कारही घेऊन येत असतील. सासर-माहेर या दोन घराण्यांमध्ये फरक असणारच. माणसं, चालीरीती,

27 November 2017

गगन आणि गिरी या गुणांचा महात्मा स्वामी गगनगिरी विश्वगौरव गगनगिरी महाराज यांचा जन्मदिवस ३० नोव्हेंबर(१९०६)   त्यानिमित्ताने महायोगी सत्पुरुषाचे हे स्मरण- भारतात लोकप्रिय असलेले गगनगिरी महाराज भक्तिभावाने पूजिले जातात. इतिहासप्रसिद्ध चुलकी चालुक्य सम्राट पुलकेशी (बदामी-कर्नाटक) राजवंशातील सरदार पाटणकर घराण्यात मंदुरे या गावी श्रीक्षेत्र जांभुळवन, कोयना खोरे, ता-पाटण, जि-सातारा, प.पू. गगनगिरींचा दि.३० नोव्हेंबर १९०६ दत्तजयंतीच्या दिनी जन्म झाला. गगनगिरी महाराज ऊर्फ श्रीमंत श्रीपत(राजे) गणपत(राजे) पाटणकर हुजूरवाडेकर (फर्स्ट क्लास सरदार अॅण्ड जहागीरदार डेक्कन व कोल्हापूर) हे वागोजीबाजी हुजूरवाड्याच्या (हुजूर सीनीयर) शाखेचे १४वे वंशज होत. ते गहिनी गगनगड गादीचे वंशपारंपरिक जायदादी वतनदार म्हणून प्रसिद्ध होते. बालवयातच श्रीपतीवरील माता-पित्यांचे छत्र हरपले. वारकरी संप्रदायातील सखुआजी व नारायण आजोबांच्या (इतिहास प्रसिद्ध माने या मातुल घराण्यातील चरेगांव-उंब्रज, ता-कराड) सान्निध्यात त्यांना भक्तिमार्गाची ओढ व गोडी वाटू लागली. वयाच्या ७व्या वर्षी  जन्मजात राजपदाचा त्याग करून नवनाथी झुंडीत

20 Nov. 2017

धर्म-अधर्म हे व्यवहार्य असावे आपली उपनिषदे, त्यांचे सार असलेली ब्रह्मसूत्रे आणि गीता या तीन ग्रंथांना `प्रस्थान-त्रयी म्हणतात. मनुष्याला मोक्षाप्रत नेणारे अक्षरवाङ्मय म्हणून प्रस्थानत्रयी परंपरेने प्रतिष्ठित आहे. त्यात गीतेचा समावेश आहे म्हणून, तिचे विवरण व आकलन अध्यात्मप्रवणतेने करण्याचा अेक प्रघात आहे. तरीही गीतेचे पारलौकिकत्व मांडताना गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय बाजूला ठेवता येत नाही. महाभारताच्या युध्दासाठी अर्जुनाला प्रवृत्त बनविणे हा गीतेचा उद्देश आहेच. युध्द म्हटले की हिंसा आली; मग हिंसेचे प्रतिपादन वगळून परमार्थपर गीता कशी स्वीकारायची? शिवाय युध्दाच्या पृष्ठभूमीवर गीतेसारख्या तत्वज्ञानपर प्रबंधाचे प्रयोजनच काय? गांधीजींची श्रध्दा गीतेवर होती, आणि ते तर अहिंसेचे उपासक. तथापि `गीतागत उपदेश मानवी मनोव्यापारातील सुष्ट आणि दुष्ट या उभय प्रवृत्ती- दरम्यानच्या द्वंद्वावर मात करण्याचा मार्ग दाखवितो' असे म्हणून सुटका करून घ्यावी लागते. कृष्ण हा दैवी अवतार आहे हे गृहीत धरले जाते. गीतेच्या निर्मितीसाठी सांगितलेले निमित्त काहीवेळी अप्रस्तुत ठरविले जाते किंवा त्याकडे दुर्लक्ष केल

13 Nov. 2017

नवी दिशा देणारे नगरनियोजन विसाव्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर आिमारतींच्या रचनेत खूप बदल झाले. मुख्यत: सिमेंट, पोलाद, व मोठ्या आकाराच्या काचेचा वापर वाढला. वेगळया आिमारत-साहित्याची निर्मिती झाली, व त्यातही बदल, सुधारणा होत चालले आहेत. त्यापूर्वी भिंतींच्या जाडीमुळे आिमारतींच्या अुंचीवर बंधन पडत असे. पोलाद व कांॅक्रीटच्या संयोगाने आिमारतींचे वजन भिंतींवर देण्याअैवजी ते -तुलनेने नाजूक भासणाऱ्या - कॉंक्रीटच्या खांबांवर दिले. भिंतींची वजन पेलण्याची क्षमता खांबांकडे सोपविण्याने आिमारती बांधण्याच्या तंत्रात खूप बदल आणि विकासही झाला.  संपूर्ण बहुमजली आिमारत जमिनीपासून अुंचीवर - खांबावर तोलून बांधलेली, आिमारतीखाली वाहने ठेवायला किंवा मुलांना खेळायला मोकळी जागा राखलेली, अशा आिमारती आपल्याला आता सर्वत्र दिसतात. जमिनीपासून अलग करून  अुंच अंतराळी आिमारत बांधण्याची ही कल्पना `ल कार्बूझिअे' या वास्तुकाराची आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून शहरीकरण वाढत चालले. शहराच्या आजूबाजूच्या लोकवसतीला अुपजीविकेचे साधन राहिले नाही. नोकऱ्या शहरांत अुपलब्ध होत्या, त्यामुळे शहरांंत स्थलांतर वाढत गेले