Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

24 February 2020

शिवाजी महाराजांची पूर्वपीठिका कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे भूतपूर्व प्राचार्य डॉ.बालकृष्ण हे हिंदू संस्कृतीचे अभ्यासक, आर्य समाजाचे विचारवंत होते. `शिवाजी - द ग्रेट' हे त्यांनी लिहिलेले चार खंडात्मक इंग्रजी चरित्र, शिवाजी विद्यापीठाने १९३९ साली प्रथम प्रकाशित केले.   शाहू संशोधन केंद्राचे संचालक डॉ.जयसिंगराव पवार यांच्या सौजन्याने, त्या ग्रंथातील काही पृष्ठांचे हे मराठी रूपांतर; शिवजयंतीच्या निमित्ताने... उपलब्ध वंशावळीतील त्रुटी शिवाजीराजांच्या जीवन चरित्रासंबंधी लिहिताना, मराठी इतिहासकार वा बखरकार हे शिवाजीच्या आधीच्या मोजक्या पिढ्यांचा इतिहास आणि आजवर परंपरेने माहीत झालेल्या आख्यायिका एवढ्यांवरच विसंबून, तितक्यावरच खूश असतात. त्या घराण्याचे मूळ कुठवर मागे आहे, याविषयी त्यांना काही माहिती नसते. या महाप्रतापी शिवनृपतीचे वंशज असणारे साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी, त्यांच्या वाडवडिलांसह समस्त वंशवृक्ष नीट मांडणी करण्याचा १८२८ साली कसोशीने प्रयत्न केला. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मुन्शी माधवराव यांनी तशी वंशावळ तयार केली; ती वंशावळ मूळ स्वरूपात साताऱ्याच्या इतिहासप्रस