Skip to main content

Posts

Showing posts from December, 2012

mangal karyalaya in Miraj

मंगल  कार्यातील तीन व्यक्ती  पन्नास-साठ वर्षांपूर्वीच ी मिरजेतील गोष्ट.  तीन माणसे  आमच्या घरी एक दिवस आली. आमच्या वडिलांना सांगू लागली, ``काका, भिक्षुकीवर आता पोट भरत नाही. वाडवडिलांची शेती नाही. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे आता आम्हाला लाकडाच्या वखारीत जाऊनमण-दोन मण लाकडे फोडून पैसे मिळवावे लागतील. तर आमचा चरितार्थ चालेल!'' हे त्यांचे बोलणे मी ऐकत होतो. आमच्याही घरी भिक्षुकी होती. माझे थोरले भाऊ लष्करात नोकरीला असल्याने बाहेरून थोडे पैसे येत असत. पण त्या तीन माणसांची मुले लहान असल्याने भिक्षुकीखेरीज दुसरे उत्पन्नाचे साधन त्यांच्याकडे नव्हते.  एका प्रसंगाने त्या तीन मंडळींनी आमच्याच गल्लीतील एका गरीब ब्राह्मण मुलाचे लग्नाचे  कार्य आपल्या हाती घेतले. अंगावर सर्व जबाबदारी घेऊन ते पार पाडले आणि काय आश्चर्य! ह्या गरीब मुलाच्या रुपयांचा फायदा झाला! यातूनच त्यलग्नाचे लग्नाच्या कार्यामधून तिघांना पन्नास मंगल कार्यालय काढण्याची कल्पना सुचली. नंतर लवकरच आमच्या गल्लीतील कृष्णेश्वराच् या मंदिरात हे कार्यालय चालू झाले. त्या कार्यालयाचे नाव `गजानन मंगल कार्यालय' त्या

Lekh in 22 Oct.2012

झाडाचेही प्राक्तन असते? नेहमीच्या वेळेला निघाले. रस्त्याबाजूला एक एक शेत `प्लॉट'मध्ये रूपांतरित होताना पाहून मी हळहळते. पण आज एकदम दचकलेच. रस्त्याकडेच्या प्लॉटवरचं एक झाड दर्शनी बाजूला मध्येच येतं म्हणून त्याला जिवंत जाळलं जात होतं. लांबून वाटलं काही पालाबिला पेटवलाय. जवळ आल्यावर पाहिलं तर सगळे उन्हाळे मुकाट पोटात ठेवून निबर झालेल्या खोडाला, टोकाशी पोपटी तेजस्वी लसलसती पालवी फुटलेली, ती पालवी अजून वाऱ्यावर हलत होती, पक्षांना बोलवत होती, आभाळाला निरखत होती.... तिच्या त्या उन्मुक्त, फुललेल्या जीवनेच्छेचा आधार मात्र पायातळी जळत होता. ही कुठली रीत? राहावेना, - थांबून तिथल्या माणसाला विचारलं. तो उत्तरला, ``बांधकामात आडवं येतंया न्हवं का - म्हून काडतोय''      ``अहो पण मग सरळ तोडून का टाकलं नाही?'' माझा भाबडा प्रश्न. ``अवं, याची मुळं लई घट असतेत. कितीबी तोडा, मूळ हाय तवर फुटतयाच बगा. येकदा का मुळातनंच जळालं का पुन्यांदा न्हाई डोकं वर काढत..'' त्यानं सहजपणे त्यामागचं `तत्त्वज्ञान' ऐकवलं. मी मुकाट्यानं पुढे चालू पडले. कुणी अॅसीड टाकतं; कुणी जाळतं; कुणी काह

sampadkiya in 10Sept.21012

वास्तवाशी फारकत कवी म्हणजे चंद्रताऱ्यात झुरणारे वा हस्तिदंती मनोऱ्यात बसून प्रेमाची गाणी गाणारे, अशी सर्वमान्य कल्पना असण्याचा एक काळ होता. वास्तवाच्या धगधगत्या निखाऱ्यांना आपल्या आेंजळीत घेऊन सर्वसामान्यांपर्यंत ती दाहकता पोचवण्याचे कामही त्या काळातील कवींनी केले. त्यातील अग्रणी नाव कुसुमाग्रजांचे. ते समाजापासून कधीच लांब राहिले नाहीत. अनेक लोकचळवळीत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग दिला. ७०-७१ सालच्या दुष्काळावेळी कुसुमाग्रजांनी दुष्काळाने होरपळलेली ग्रामीण जनता प्रत्यक्ष पाहिली. अन्न, पाणी, चारा, रोजगार या अभावी त्रासलेले लोक पाहून ते अस्वस्थ झाले. आटलेल्या विहिरी, कोरडे नाले आणि सरकारी मदतीसाठी आवश्यक वशिल्याविना तळमळणारी गावे त्याही वेळी होती. लोकांना मदतीबरोबरच धीर अन् दिलासा हवा होता, तेवढा तरी देऊ म्हणून ते स्वत:हूनच बाहेर पडले. त्या प्रवासाचे वर्णन ते करतात - `क्षितिजापर्यंत रिकामी आणि जळालेली जमीन दिसली. वाटेत एक नदी लागली. आसवे गाळण्याइतकेही पाणी तिच्यात शिल्लक नव्हते. माणसांजवळ जगण्याची जिद्द होती पण संकटसमयी आपल्याला वाऱ्यावर सोडले आहे ही खंत होती. त्या जनतेचे पोरकेपण मी अनुभव

sampadkiya in 16 Dec.2012

अन्नसेवन : यज्ञकर्म की मस्ती? अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. तीही न भागविता येणारी कित्येक माणसे आहेत, पण त्याचवेळी अन्नाची नासाडी  करणारीही आपल्यासारखी कित्येक माणसे आहेत. लोकांना जेवू-खाऊ घालण्यात एक आनंद असतो; एकत्र जेवण्यातही आनंद असतो; आणि आग्रह करण्यात वा करून घेण्यातही आनंद असतो. अशा आनंदासाठी अन्नाचे चार घास वापरात आले तरी काही हरकत नाही. अगदी गरजेपुरतेच खावे हे तर वैज्ञानिकदृष्ट्या खरेच आहे परंतु परस्पर भावनांसही आयुष्यात स्थान असते. आपल्याकडे कोणी आले तर त्याचा पाहुणचार करण्यासाठी चहा देणे ही एक रीत आहे; गरज नक्कीच नाही. म्हणजे असा केवळ भावनिक चहाच्या कपाचा विचार केला तरी दररोज दर माणशी एक कप चहा `ज्यादा' होतो. त्या हिशेबाने देशात १०० कोटि कप म्हणजे पाचशे कोटि रुपयांचा चहा अनावश्यक होतो. पण तो `वाया' गेला असे मानले जात नाही कारण तसा चहा देण्या-घेण्यातला आनंद हीसुद्धा एक गरज आहेच. प्रश्न आहे तो चक्क वाया जाणाऱ्या म्हणजे फेकून देणाऱ्या अन्नाचा. लग्न-मुंज हे पूर्वी पिचत होणारे भव्य समारंभ. त्यातही अगदी निकटच्या अंतरावरून येण्याचे घडत असे. दळणवळण कमी. फारतर पंचक्रोश

about book of Shripad Mate

परशुरामचरित्र व पंचमानव हिंदू समाज हे १९३७ सालचे पुस्तक मी नुकतेच वाचले. त्या काळानुसार १८४ पृष्ठांच्या पुस्तकाची किंमत दीड रुपाया आहे.  लेखक - श्रीपाद महादेव माटे, प्रकाशक - वि.ग.ताम्हणकर, १२ बुधवार पेठ, पुणे कै. माट्यांचे हे पुस्तक त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे प्रसिद्धी पावले नाही व त्यातील तर्कशुद्ध विचारांकडे  इतिहास संशोधकांचे, समाजधुरिणांचे व समाज सुधारकांचे जावे तितके लक्ष गेले नाही. माझ्या दृष्टीने त्याचे कारण म्हणजे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर `परशुरामचरित्र' असे छापले आहे. पुस्तकाच्या प्रास्ताविकात माटे म्हणतात की, `हे परशुरामचरित्र  असले तरी पुस्तकाचे सबंध नाव `परशुरामचरित्र व पंचमानव हिंदूसमाज' असे आहे. त्या पूर्ण नावाकडे लोकांचे दुर्लक्ष झाले असावे असे मला वाटते. श्री.माटे यांनी हे चरित्र लिहिताना महादेवाचा अभ्यास केला होता; अनेक वर्षांच्या चिंतनातून त्यांची सांगड हिंदू समाजाच्या जडणघडणीत कशी झाली हे त्यांनी दाखविण्याचा कसोशीने प्रयत्न केला व `पंचमानव हिंदूसमाज' ही संकल्पना या पुस्तकात मांडली. श्री.माटे परशुरामाचा काळ ६ ते ७ हजार वर्षांपूूर्वीचा मानता

sampadkiya in 26 Nov.2012

श्रद्धा आणि कर्तव्य शिवसेनेचे संस्थापक आणि प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेस जमलेला अलोट गर्दीचा सागर अलीकडच्या काळातील एक अप्रूप म्हणावे लागेल. त्या आधाराने शिवसेनेची लोकप्रियता अजमावता येईल का हा चर्चाविषय आहे. परंतु त्याच्या पश्चात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना उत्तरे शोधण्याचे उत्तरदायित्त्व सर्व संबंधितांना घ्यावेच लागेल. शिवसेनाप्रमुखांना शासकीय इतमामात निरोप द्यावा हा महाराष्ट्न् सरकारचा निर्णय त्यांच्याविषयीच्या सद्भावनांपोटी घेतला गेला असेलही, पण त्याविषयी काही स्पष्ट नियम कायद्याच्या राज्यात असणार; असलेच पाहिजेत. ते काय आहेत, याबद्दलची विचारणा उत्तर प्रदेशातून माहितीच्या अधिकाराखाली केली गेली आहे. कुणाच्या तरी मर्जीखातर किंवा लोकानुनय सांभाळण्यासाठी असा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. ते नियमबाह्य असूनही `खास बाब' म्हणून सन्मानाने जरी घडले असेल तरी यापुढील काळात `खास बाब' हाच नियम होण्याचा धोका असतो. पद्मपुरस्कार किंवा भारतरत्न हा सन्मान कुणाकुणाला द्यावा यासाठी अशा प्रकारच्या मागण्या होत असतात. स्वातंत्र्यसैनिक म्हणून सन्मानपेन्शन देण्याच्या घटना स्वातंत्र

about post office

रजिस्टर्ड पत्रांचा पत्ता शोधण्याची जबाबदारी पोस्टाची चेक न वटता बँकेतून परत आल्यास संबंधितांना नोटिस पाठविणे कायद्याने बंधनकारक आहे. नोटिशीच्या पाकीटावर संपूर्ण व व्यवस्थित पत्ता लिहिल्यावर ही नोटीस पाठविण्याची कायदेशीर जबाबदारी संपुष्टात येते. अशी नोटीस रजिस्टर्ड पोस्टानेच पाठवावी. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात `रजिस्टर्ड पत्र पोहोचविण्याबाबत सर्व प्रकारचे प्रयत्न संबंधित पोस्टमनने केलेच पाहिजेत' असे नमूद केले आहे. नुसते `पत्ता अपुरा, पत्ता सापडत नाही', `संबंधिताने पत्र स्वीकारण्यास नकार दिला', `घर सोडून गेले' अशा शेऱ्यांसह पोस्टमनला पत्र परत करता येणार नाही. त्याने शेजाऱ्यांकडे संबंधित व्यक्तीच्या नवीन पत्त्यासंबंधात चौकशी करून त्याचा नवीन पत्ता शोधून हे रजिस्टर पत्र त्याच्या नवीन पत्त्यावर दिले पाहिजे. सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही संबंधिताचा नवीन पत्ता न सापडल्यास त्या पोस्टमनने कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न केले याचा लेखी तपशील पोस्टमास्तरांना देणे न्यायालयाने बंधनकारक केले आहे.  असे प्रयत्न न केल्यास संबंधित पोस्टमनला जबाबदार धरून त्याच्या विरूद्

RAMAYAN BOOK

आदिकवी वाल्मीकींनी गायिलेले श्रीरामायण मूळ गीर्वाण काव्याचे इंग्रजी रूपांतर चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी केले,  त्याचा मराठी संक्षिप्त अनुवाद  वि. रा. जोगळेकर यांनी केला. प्रस्तावना : डॉ. शंकर अभ्यंकर या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा तासगाव येथे दि.१४ नोव्हेंबर २०१२. संपर्क : दिलीप जोगळेकर (फोन : ०२३४६-२४०५३१, ९४२१२५२२२२) साडेतीनशे पृष्ठांच्या या सर्वांगसुंदर ग्रंथाची छापील किंमत मुळातच अल्प म्हणजे २०० रुपये आहे. उदार  आश्रयदात्यांच्या साहाय्याने हा ग्रंथ विशेष सवलतीत देण्यात येईल.

about pressure cooker

प्रेशर कुकरचा योग्य वापर इंधन (गॅस) आणि वेळ वाचवून अन्न चांगले शिजविण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात. पहिली व पुढील प्रत्येक शिटी होण्याच्या वेळी कुकरमध्ये दाबाखाली असलेल्या वाफेचे तापमान साधारणपणे ११५ अंश सेल्सियस असते. हे तापमान अन्न चांगले आणि कमी वेळात शिजण्यास मदत करते. ज्यावेळी आपण मुद्दाम शिटी किंवा शिट्ट्या करून इतक्या तापमानाची गरम वाफ बाहेर घालवितो, त्या प्रत्येक वेळी ही वाफ तयार करण्यास लागलेला गॅस आपण फुकट जाळत असतो. म्हणजेच तीन शिट्ट्या करावयास समजा दोन मिनिटे लागत असतील तर दिवसातून दोन वेळा म्हणजे चार मिनिटे म्हणजे महिन्याची १२० मिनिटे, म्हणजेच दोन तास कारण नसताना गॅस जळत असतो. कुकरवरील शिटी होण्याची सुविधा ही शिट्या `करण्यासाठी' नसून आपत्काळात त्या `होण्यासाठी'आहे याची नोंद घेणे आवश्यक आहे. प्रेशर कुकरचे कार्यतत्त्वच मुळी `दाबाखाली असलेल्या वाफेच्या वाढीव तापमानाचा उपयोग करणे हा आहे' ज्यावेळी आपण शिट्या करून दाबाखालील गरम वाफ (ज्यामुळे अन्न लवकर शिजणार आहे) बाहेर घालवितो त्यावेळी आपण प्रेशर कुकरच्या कार्यतत्त्वाविरुद्ध (स्टीम अंडर प्रेशर) आणि `प्रेशर  

Sampadkiya in 12 Nov.2012

अस्मितेचे अतिक्रमण भाषावार प्रांतरचना किंवा राज्यांचे विभाजन, मतदारसंघांची फेरआखणी, रस्त्यांचे रुंदीकरण-नव्या पेठांची स्थापना इत्यादि धोरणात्मक निर्णय प्रशासनाच्या सोयीसाठी घ्यावे लागतात. त्यात काही हितसंबंधी अन्याय होऊ शकतो त्याचप्रमाणे अस्मितेच्या गंडामुळे घोडचुकाही होऊ शकतात. परंतु त्याविषयीची सल जपत का असेना नव्या बदलास सामोरे जाण्यातच व्यवहार असतो, भविष्यकालीन हित असते. कधीकाळीच्या प्राचीन भारतवर्षात आजच्या अफगाणपासून म्यानमारपर्यंतची भूमी समाविष्ट होती. त्याचे लचके तुटत गेले. तथापि `आमचे पेशावर, आमचे रंगून, आमचे सिंहलद्वीप' - असे म्हणत आज कुणी संतापाची बोटे मोडत किंवा आवेशाने तिथे आक्रमण करत असेल तर त्यास शहाणपणा कोण म्हणेल? अखंडत्त्वातून झालेल्या विस्थापनेचे शल्य बाळगून त्याची अटळ दाहकता कमी करण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे. भारताच्या फाळणीचा इतिहास फार दूरचा नव्हे, त्याही अलीकडे चीनने आपल्या प्रदेशाची बळकावणी केलेली सर्वांना डाचत असते. परंतु त्यापायी आज इथल्या पाकिस्तानी-चिनी वकीलाती किंवा व्यापारकेंद्रे यांना आपल्या दगडफेकीचे लक्ष्य करता येत नाही, करूही नये. उलट आजच्य

sampadkiya in 5 nov.2012

धार्मिकतेची रूढी देवळात जाताना घंटा वाजवणे, अधिक मासात जावयाला वाण देणे, देवीची ओटी भरणे वगैरे धार्मिक रूढी अथवा परंपरा मानल्या जातात. वास्तविक त्या धार्मिक नसून शुद्ध सामाजिक असतात. समाज एकरस, एकजीव अशी धारणा निर्माण करणारी, व ती धारणा तोलून धरणारी जीवनपद्धती म्हणजे धर्म. धर्माला मानवतेची तत्वे आधारभूत असतात, पण आचरण मात्र सामाजिक, सामुदायिक असते. अर्थातच समाज ही संकल्पना स्थल-काल सापेक्ष असते. त्यामुळे त्यातील आचरणही स्थल-कालावरच अवलंबून असते. मानवी समाजाचे ध्रुवीकरण काही हेतूंनी किंवा भावभावनांनी गरजेपोटी होत जाते, गरज संपली की विस्कळीतपणा येतो. परंतु नव्या गरजांपोटी नवे ध्रुवीकरण होते. ध्रुवीकरणासाठी समानतेचा कोणताही धागा पुरतो. एका घरात, एका ज्ञातीत, एका गावात जन्मलेली माणसे त्यांच्यातील स्वाभाविक समानतेमुळे एकत्रित राहू इच्छितात. पूर्वीच्या व्यवहारांची गती, स्थलांतराची कारणे फारशी प्रभावी नव्हती. त्या काळाला वेग नव्हता असे म्हटले जाते. तो वेग हळूहळू वाढत गेला. त्यामुळे एकत्र येण्याची आणि विखुरण्याची गतीही वाढली. कधीकाळी एका गावात राहणारी किंवा एका सोसायटीत राहणारी माणसे विखर

Lekh in 5 nov.2012

 ग्यारन्टी १९९४ मध्ये मला जीवघेणा अपघात झाला. त्यामधून मी वाचलो, जीवनाची दोरी आणखी लांब होती. हॉस्पिटलमध्ये एकूण पन्नास-साठ दिवस काढले. तीन शस्त्रक्रिया झाल्या आणि उजव्या पायाला जास्त त्रास झाला. त्या बिचाऱ्याने दीड वर्ष सहन केले व तो पूर्ववत उभा राहिला. नंतर सध्याच्या वाक्प्रचाराप्रमाणे `त्याने मागे वळून पाहिले नाही.' दोन वर्षांमागे या पायाच्या ताकदीवर मी चार धाम यात्रा केली, केदारनाथाचा १४ किमीचा ट्न्ेक येताजाता पायी केला. समवयस्क साथीदार होता, बाकी कोणीही (वीसजण) तो ट्न्ेक चालले नाहीत. हे मी थोडे कौतुकाने सांगतो आणि माझ्या अधू पायावर मूठभर मांस चढते. या अपघातानंतर स्वानुभव आणि इतर सर्व मार्गांनी हे ध्यानात आले की तथाकथित आधुनिक वैद्यकशास्त्र (अॅलोपथी) काही कामाची नाही. खडीवाले वैद्य यांचा एक वर्षभराचा आयुर्वेद अभ्यासवर्ग पार पाडला. त्याच्या थोडे आधीच मला उत्सुकता निर्माण झालेले गांधीजींचे पुस्तक `हिंद स्वराज्य' हे एका क्षणी अवचित माझ्या हाती लागले. ते वाचल्यावर तर माझा `शाकुंतल-गटे सिंड्नेम' झाला आणि डॉक्टर मंडळी वकीलाप्रमाणेच समाजाला नको आहेत, असे मला वाटले. मी तो

Lekh in 29 Oct.2012

 घरकाम : मूल्यांकन आणि मान्यता केंद्रीय महिला बाल विकास मंत्री कृष्णा तीरथ यांनी ऑगस्ट महिन्यात विशेष घोषणा केली. ``गृहिणींना घर सांभाळणे, स्वयंपाक,बाल संगोपन, घरखर्च व्यवस्थापन आणि हिशोब इत्यादी ठेवण्याचे काम पूर्णवेळ करावे लागते. त्यामुळे त्यंाना मासिक पगार मिळाला पाहिजे व आवश्यकता पडल्यास त्यासाठी विशेष कायदा केला जाईल.'' आपल्याकडे आज ९०% कामकरी स्त्रिया आणि पुरुष असंघटित क्षेत्रात काम करतात. त्यांच्या श्रमाचे नीट मोजमाप होत नाही आणि त्यांना पुरेसे वेतन मिळत नाही. अशा परिस्थितीत ज्यांचे काम ``अदृश्य'' असून मुळातूनच श्रम म्हणून मानायची प्रथा नाही, अशा ``गृहिणींना'' पगार देण्याची घोषणा धाडसाची म्हणावी लागेल! परंतु या निमित्ताने घरकामाच्या मूल्यांकनाची सार्वजनिक  चर्चा होणार त्याचे स्वागतच केले पाहिजे. अर्थशास्त्राच्या दृष्टीने घरकामाच्या मूल्यांकनाची चर्चा नवीन नाही. एखाद्या देशाचे राष्ट्नीय उत्पादन आणि उत्पन्न कसे मोजावे याच्या भोवती अर्थतज्ञांमध्ये जो वाद-विवाद झाला, त्यातून घरकामाच्या मूल्यांकनाचा मुद्दा पुढे आला. आर्थर पिंगु ह्या इंग्रज अर्थतज्ञांचे ए

Samp. in 29 Oct.2012

सकारात्मक, स्वावलंबी दृष्टिकोनाची गरज नुकताच जागतिक अंध दिवस झाला. अंध लोकांविषयी डोळसांची दृष्टी जागृत करणं हा हेतू. परंतु कोणतीही समस्या खूप चांगली समजायची असेल तर त्या समस्येचा स्वत: अनुभव घेणं आवश्यक ठरत असावं. या अंध-दिवसाचा कार्यक्रम पाहून मला पूर्वीचं ते `अनुभूती शिबीर' आठवलं. आयुष्यात एखादे व्यंग सोबत घेऊन जगणाऱ्यांची वेदना समजून घेता येते का, यासाठी ते शिबीर होते. सर्व आखणी बाकीच्या शिबिराप्रमाणेच होती पण या शिबीराच्या सत्रात बोलायचे नाही. एका सत्रात एकच हात वापरायचा, एकदा एका पायानेच चालायचे असे प्रयोग होते. वाचताना हे खूप वरवरचे, दिखाऊ वा उथळ वाटू शकेल पण सहभागी मंडळी बऱ्यापैकी संवेदनशील होती व तात्कालिक अपंगत्वाच्या अनुभवाबद्दल भरभरून बोलत होती. रात्रीचे सत्र. सर्वांच्या डोळयाला पट्ट्या, सर्व दिवेही विझवलेले. अंधत्त्वाचे सत्र हे जेवणाचे होते. खूप गोंधळ झाले. प्रत्येक अनुभवानंतर `बाकी काही चालेल पण हे अधूपण अवघड...' अशा प्रतिक्रिया येत. अंधत्व सर्वानुमते जास्त असुरक्षित वाटायला लावणारे होते. नंतर पट्ट्या सोडल्या. दिवसभरातल्या जाणीव जागृतीबद्दल बोलूनही झालं. अंधा

Samp. in 15 Oct.

गोळीबार की भुसनळे? महाराष्ट्नतील मंत्र्यांवर एकाचढ एक आरोप करत पाचपंचवीस वर्षांपूर्वी श्री. आण्णा हजारे मोठे झाले, पण त्या आरोपांतून निष्पन्न काही झाले नाही. त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जन आंदोलन या नावाच्या रामभरोसे वादग्रस्त कार्यकर्त्यांच्या समित्या स्थापन केल्या, त्यांची कुवत जगजाहीर असल्यामुळे स्थापनेपासूनच त्या  ठरल्या आणि त्यांना कुणीही विरोध न करताच त्या विरून गेल्या. उगीचच हवेत झाडलेल्या फैरींनी गोंधळ वा पळापळ माजते पण शिकार साधत नाही. श्री. आण्णा हजारे यांचेच चेले श्री. अरविंद  केजरीवाल हे भारतीय प्रशासन सेवेची (आयएएस) पदवी घेतलेले उच्चस्तरीय अधिकारी आहेत. ते ज्या प्रकारे प्रसार माध्यमांतून सर्वपक्षीय नेत्यांवर आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप करीत सुटले आहेत, ती कोणत्या प्रशासनाची रीत म्हणावी ते कळनासे झाले आहे. त्यांनी एकेका नेत्यावर  जी संशयास्पद व्यवहारंाची  चिखलफेक केली आहे, ते तर कुणीही करू शकतो. एकाही पक्षाचा नेता किंवा शिपाई स्तराचा प्रशासकीय नोकर आज स्वच्छतेची ग्वाही देऊ शकत नाही.    स्वत: आण्णा हजारे, किरण बेदी व केजरीवाल यांच्यावरही त्याच गैर व्यवहारांचे  आरोप

lekh in 15 Oct.2012

झाडाचेही प्राक्तन असते? नेहमीच्या वेळेला निघाले. रस्त्याबाजूला एक एक शेत `प्लॉट'मध्ये रूपांतरित होताना पाहून मी हळहळते. पण आज एकदम दचकलेच. रस्त्याकडेच्या प्लॉटवरचं एक झाड दर्शनी बाजूला मध्येच येतं म्हणून त्याला जिवंत जाळलं जात होतं. लांबून वाटलं काही पालाबिला पेटवलाय. जवळ आल्यावर पाहिलं तर सगळे उन्हाळे मुकाट पोटात ठेवून निबर झालेल्या खोडाला, टोकाशी पोपटी तेजस्वी लसलसती पालवी फुटलेली, ती पालवी अजून वाऱ्यावर हलत होती, पक्षांना बोलवत होती, आभाळाला निरखत होती.... तिच्या त्या उन्मुक्त, फुललेल्या जीवनेच्छेचा आधार मात्र पायातळी जळत होता. ही कुठली रीत? राहावेना, - थांबून तिथल्या माणसाला विचारलं. तो उत्तरला, ``बांधकामात आडवं येतंया न्हवं का - म्हून काडतोय''      ``अहो पण मग सरळ तोडून का टाकलं नाही?'' माझा भाबडा प्रश्न. ``अवं, याची मुळं लई घट असतेत. कितीबी तोडा, मूळ हाय तवर फुटतयाच बगा. येकदा का मुळातनंच जळालं का पुन्यांदा न्हाई डोकं वर काढत..'' त्यानं सहजपणे त्यामागचं `तत्त्वज्ञान' ऐकवलं. मी मुकाट्यानं पुढे चालू पडले. कुणी अॅसीड टाकतं; कुणी जाळतं; कुणी का