Skip to main content

Lekh in 5 nov.2012


 ग्यारन्टी
१९९४ मध्ये मला जीवघेणा अपघात झाला. त्यामधून मी वाचलो, जीवनाची दोरी आणखी लांब होती. हॉस्पिटलमध्ये एकूण पन्नास-साठ दिवस काढले. तीन शस्त्रक्रिया झाल्या आणि उजव्या पायाला जास्त त्रास झाला. त्या बिचाऱ्याने दीड वर्ष सहन केले व तो पूर्ववत उभा राहिला. नंतर सध्याच्या वाक्प्रचाराप्रमाणे `त्याने मागे वळून पाहिले नाही.' दोन वर्षांमागे या पायाच्या ताकदीवर मी चार धाम यात्रा केली, केदारनाथाचा १४ किमीचा ट्न्ेक येताजाता पायी केला. समवयस्क साथीदार होता, बाकी कोणीही (वीसजण) तो ट्न्ेक चालले नाहीत. हे मी थोडे कौतुकाने सांगतो आणि माझ्या अधू पायावर मूठभर मांस चढते.
या अपघातानंतर स्वानुभव आणि इतर सर्व मार्गांनी हे ध्यानात आले की तथाकथित आधुनिक वैद्यकशास्त्र (अॅलोपथी) काही कामाची नाही. खडीवाले वैद्य यांचा एक वर्षभराचा आयुर्वेद अभ्यासवर्ग पार पाडला. त्याच्या थोडे आधीच मला उत्सुकता निर्माण झालेले गांधीजींचे पुस्तक `हिंद स्वराज्य' हे एका क्षणी अवचित माझ्या हाती लागले. ते वाचल्यावर तर माझा `शाकुंतल-गटे सिंड्नेम' झाला आणि डॉक्टर मंडळी वकीलाप्रमाणेच समाजाला नको आहेत, असे मला वाटले. मी तो साक्षात्कार समजतो. शिरीष पटवर्धन हे पण `पैसा कशासाठी मिळवायचा? डॉक्टरला द्यायला' असा काही एकपात्री प्रयोग करतात असे वाचले होेते. त्याचवेळी माझ्या हाती एक पुस्तक दैवयोगाने लागले. ते होते `तुमच्या घरी धन्वंतरी' लेखक भा.के.गर्दे नामक इलेक्ट्नीकल इंजिनिअर. हे सद्गृहस्थ वयाची ८५ वर्षे पुरी करून दिवंगत झाले. शेवटपर्यंत आपल्या बंगल्यात राहून ते लोकांना औषधोपचार मोफत करीत असत, असे मी ऐकले आहे. हे पुस्तक म्हणजे खरे पाहता आपला जुना `आजीचा बटवा', पण अद्ययावत् व उपयुक्त पद्धतीने सादर केलेला आहे. त्याला डॉ.पां.ह.कुळकर्णी यांच्यासारख्या आयुर्वेदाचार्यांची प्रस्तावना आहेे. तेव्हापासून मी हे पुस्तक किमान २०० मित्रांना दिले आहे. मी स्वत: अभिमानाने सांगतो की तेव्हापासून मी कुठल्याही डॉक्टरकडे गेलो नाही व अॅलोपथीचे कोणतेच उपचार (गोळी, मलम इ.) केले नाहीत. माझी प्रकृती आज सत्तर वर्षे पूर्ण केल्यावर ठणठणीत आहे. कोणतीही शारीरिक तक्रार, तिची अल्पमुदत पुरी झाल्यावर मला त्रास देत नाही .
डॉक्टर व डॉक्टरी पेशाने माजवलेला धुमाकूळ व त्यातून सुशिक्षित व अशिक्षित समाजाचे झालेले परिवर्तन पाहून वाईट वाटते. उघड्या डोळयाने बुद्धिवान म्हणवणारा भारतीय माणूस या आसुरी शास्त्राच्या मागे धावतोय याचा विलक्षण खेद होतो. हे गेल्या साठ वर्षांत वाढते आहे, फोफावते आहे. त्यास आरोग्यप्रगति असे `शहाणे' लोक समजतात. उघड उघड तो आरोग्याचा व्यापार आहे. त्यामुळे रोग वाढत आहेत. रोगी वाढत आहे. डॉक्टर आणि औषधे, महागडे उपचार वाढत आहेत. तशीच हॉस्पीटल्सही वाढत आहेत.
खोलवर विचार केला तर आरोग्याची प्रगती शून्य आहे. कडक, जहाल रासायनिक विषारी औषधातून रोग निर्माण झाले आहेत, होणार आहेत. उदा.क्रॅन्सर, एचआयव्ही, सर्व प्राणीफ्ल्यू, आज बर्डफ्ल्यू, उद्या डुकरी फ्ल्यू! एकीकडे यांचे प्रवक्ते अथवा `अज्ञजन' म्हणतात की अॅलोपॅथीने मानवाचे सरासरी आयुर्मान वाढले. हा भ्रामक व फसवा समज आहे. आज स्त्रीपुरुष कोणत्या ना कोणत्या व्याधीचे बळी आहेत, अथवा व्याधीच्या भयात आहेत. ही मंडळी औषधे खाऊन शरीर टिकत असल्याचा आविर्भाव आणतात. जगणे असेल कदाचित परंतु त्या जगण्यात जीव नाही. विचार करायला माणसाला आज वेळ नाही. त्याला पैसा मिळवायला वेळ कमी पडतो आहे, मिळवलेला पैसा ही औषधे खरेदी करून `त्यांच्या गुलामीत' जगायला कमी पडतो आहे. उत्तम आरोग्य ही संकल्पनाच दिवसेंदिवस स्वप्नमय बनत चालली आहे.
या सर्व गोष्टींचे चिंतन मनुष्याने स्वार्थासाठी तरी करावयास नको का? पैशामागे धावत आपले आरोग्य नासवायचे आणि ते धावणे संपले की तो पैसा खऱ्याखोट्या आरोग्यासाठी खर्च करायचा! हे दुष्कचक्र माणसाने भेदण्याची आवश्यकता आहे.
उरफोड करून माणसाला पैशामागे धावायला ही `आक्काबाई संस्कृती' लावतेय. (लक्ष्मी चंचल असते, तिच्यामागे तुम्ही धावलात व तिला पकडून ठेवायचा प्रयत्न केलात तर ती आक्काबाई बनून सर्वनाश करते अशी जुनी कथा आहे.) मला मिडास आठवतो. अन्नाचा घास घेता येईना कारण त्याला वरदानाप्रमाणे हात लावील त्या गोष्टीचे सोने होऊ लागले. मग तो शुद्धीवर आला. आपल्या पुराणकथांप्रमाणे त्याला उ:शाप मिळून त्याला सोन्यातला, पैशातला, लक्ष्मीतला वैय्यर्थ ध्यानात आला. दुसरी टॉलस्टॉयच्या माणसाला किती जमिनीची आवश्यकता आहे ही कथा. हव्यासापोटी माणूस दिवसभर पळत सुटला आणि अखेर रक्त ओकून पडल्यावर समजते की त्याला साडेतीन हात जागा पुरेशी होती.
न जातु काम: कामानामुपभोगेन शाम्यते!
हाविषा कृष्णवत्मेव भूप एवा%भिवर्धते ।
(वासनेच्या यज्ञात उपभोगाच्या आहुत्या दिल्या तर तो अग्नी तुपाचे हवन दिल्याप्रमाणे भडकतो.) महात्माजींनी म्हटले होते की, 'घशशि र्ूेीी पशशवी ाळपर्ळाीा. ढहळी शरीींह लरप र्षीश्रषळश्र र्ेीी िीेर्ळींवशी षेी रश्रश्र र्ूेीी पशशव र्लीीं पेीं षेी र्ूेीी सीशशव.' हे सर्व शाश्वत सत्य आहे.
आजकाल जसे बाजारातल्या प्रत्येक मालाच्या ग्यारंटीची चौकशी होते. (यात ग्यानबाची मेख अशी आहे की, या प्रगत तंत्रज्ञानात, उद्योगात जो नवनवीन माल बनतोय त्याचा ग्यारंटी पिरीअड कमी कमी होत चालला आहे. पूर्वी चपलेची ग्यारंटी ४-५ वर्षे असायची. पण आता सहा महिन्यांच्या पुढे नसते.) सुपरमार्केट, मॉल यांनी १५०० ते २००० रु.चे जोडे चपला, सेलमध्ये रु.६०० वा कमी किंमतीला द्याव्यात या जाहिराती वाचून मती गुंग होते. अर्थशास्त्र ही फॅकल्टी आहे की हा सगळाच मायाबाजार आहे?
देवाने, त्या सर्वशक्तिमान परमेश्वराने माणूस जन्माला घातला. तेव्हा त्याच्या पाठीवर शिक्का होता `गॅरन्टीड फॉर वन हंड्न्ेड इयर्स' या कलियुगात १२५ वर्षे मानवी शरीराचे आयुष्य म्हटले जाते. पण कदाचित २० टक्के `सेफ्टी फॅक्टर' म्हणून देवाने शंभर वर्षांचीच खात्री दिली होती. पण मंडळी तर इतकी वर्षे जगताना पिचत दिसतात. जास्तीकरून लवकर जातात. याचे कारण काय? सहज एकदा मी नवा गीझर नीट पाहिला तेव्हा त्याच्यावर एक चिठ्ठी चिकटवली होती, `धीस गॅरंटी इज इनवॅलिड इफ इपीपमेंट इज हॅन्डेड बाय अनऑथराईज्ड पर्सन.' आणि माझ्या लक्षात आले की, नेकटायवाले, सुटाबुटातले डॉक्टर माझ्या मायभूमीवर राज्य करू लागले व आरोग्यखाते आम्ही त्यांच्या ताब्यात दिले. त्यातून हा उत्पात घडला. मग देवानेही नवजात बालकाच्या पाठीवर ग्यारंटीच्या खाली एक अदृश्य चिठ्ठी लिहिली, `इफ नॉट हँडेड ओव्हर टू द डॉक्टर.' आज असा कोण आहे की तो डॉक्टरकडे जात नाही? एखादा माझ्यासारखा वेडा.
असे वेडे आपल्याकडेच नाहीत तर अॅलोपॅथीच्या जन्मभूमीत भरपूर तयार होताहेत, अगदी सुरुवातीपासून आहेत, हे पाहून मलाही सुखद आश्चर्य वाटले. त्यांच्याकडे डॉक्टरमध्ये अशीही चळवळ सुरू आहे की जीमध्ये सोपी व स्वस्त औषधेच मान्य आहेत. डॉक्टरी उपचारांचे राजकारण, पूर्णत: व्यापारीकरण, त्यांनाही मान्य नाही. प्रचंड औषध उद्योग (फार्मसी सेंटर), डॉक्टर्स, एफडीए+एसएसए ही अमेरिकन सरकारी खाती आणि विमा कंपन्यांनी (या चौघांनी) आपली मनमानी चालवलेली आहे. त्यातूनच ओबामांचे नवे आरोग्य विमा विधेयक आलेले आहे व त्याला या सर्वांचा, पैसेवाल्यांचा, धंदेवाल्यांचा साहजिकच विरोध आहे. या लढ्याचाच एक भाग म्हणजे बायपास ऑपरेशनपेक्षा लाभदायक व एक दशांश खर्चात होणाऱ्या किलेशन थेरपीला चारी स्तंभांचा विरोध. अतिशय स्वार्थी व गटबाजीने हे सर्व क्षेत्र बुजबुजलेले दिसते.
हे अमेरिकेचे झाले. आपण आपलीच थेरपी वा शास्त्र आयुर्वेद `आयुष्याचे शास्त्र' सोडून या नव्या चकाकणाऱ्या, खोट्या उपचारपद्धतीच्या मागे लागलो. आरोग्याचा राजमार्ग म्हणून आपण अॅलोपॅथीला मान्यता दिली. कारण प्रगत जगात त्याचीच वट आहे. सर्व आरोग्य बाजार त्यांच्या ताब्यात आहे. म्हणून मोठ्या मुष्किलीने आम्ही आयुर्वेदशास्त्राला पर्यायी स्थान दिले. होमिओपॅथी, निसर्गोपचार, बाराक्षार, युनानी इ. सच्च्या निसर्गातील शास्त्रांची तीच गत आहे. विदेशातसुद्धा आयुर्वेदाला पर्यायी पॅथी म्हणून मान्यता मिळाली तर आम्हाला धन्यता वाटते. आमचे भारतीय सांस्कृतिक बाहु फुरफुरू लागतात. पण दुसरीकडे खोकला आला तर आम्ही प्रथम पळणार अॅलोपॅथीच्या डॉक्टरांकडे. विशेषज्ञ व स्पेशालिस्ट या प्रकारांतून तर हे शास्त्र फारच बिघडले. शरीराचे सर्व अवयव समजून घ्यायचे हे झाले योग्य ज्ञान. पण ते एकत्र येऊन इंटीग्रेड शरीर बनते हे लक्षात येणे हे मूलभूत असले पाहिजे. आरोग्य व रोग शरीरापासून वेगळे काढले जाऊ शकत नाहीत.
आपले मूळ, आपले तत्त्वज्ञान `अनेकातून एकता' पाहते. अनेकता म्हणजे विषमता व विभाजन नव्हे की ज्यांचा स्वतंत्र व वेगळा विचार करायला हवा. एकता हे तत्त्व आपल्या सर्व शास्त्रांच्या मुळाशी आहे. म्हणून तुकड्यानी विचार करण्याच्या (विखंडीत) पद्धती आम्ही सर्व शास्त्रातच घेऊ लागलो असल्यामुळे, आयुर्वेद दुय्यम व अॅलोपॅथी मुख्य! तसेच आता समाजशास्त्राचे पण होते. जेवढे भेद पाडता येतील तेवढे हवेत. मग जातीभेद, पंथभेद या संस्कृतीत गृहितच आहेत असे धरून ते भेद दृढ करत, समाज विभागत, प्रेमाने समाज जोडण्याऐवजी भेदाने, आरक्षण, लालूच, सवलती इ. गोष्टींमुळे समाज फोडायचे, भांडत ठेवायचे असा आधुनिक लोकशाहीचा कार्यक्रम ठरलेला आहे.
आयुर्वेदाच्या या पुष्टीकरणातून आणि अस्सल भारतीय विद्येच्या तुष्टीकरणातून मी तरी स्वत:च्या बाबतीत देवाच्या मदतीने ९० वर्षांची ग्यारंटी बुक केली आहे. माझ्यात व देवात झालेला सेफ्टी फॅक्टरचा करार १० वर्षांचा म्हणा. (म्हणून शंभर वर्षे नाहीत) कारण इतक्या झपाट्याने आपण सृष्टी आणि शरीर बिघडवायला घेतले आहे की आपला ताबा आहे किंवा राहील अशा गोष्टी कमी कमी होत चालल्या आहेत. देव सुद्धा ग्यारंटी देत होता ती आध्यात्मिक व्याधीपाूसून शरीराला धोका नाही याची. आधिभौतिक व आधिदैविक ग्यारंटी तोही देऊ शकत नाही. कारण ते सृष्टिचक्रावर अवलंबून आहे. ते चक्र चांगल्या व आरोग्यपूर्ण रीतीने चालू करून माणसाच्या हातात दिले आहे. पण माणसाने आपल्या विचार शक्तीचा, विवेकाचा उपयोग (भारतीय दृष्टी सोडल्यामुळे) पाश्चात्य दृष्टीने निसर्गावर मात करायची, सृष्टीची लूट करायची, भोगाची कमाल गाठायची, या मूर्ख कल्पनांनी पत्करलेला दिसतो. त्यामुळे शहाण्या माणसाच्या हातात हळहळण्यावाचून काही राहिलेले नाही. अमर्यादित भोगवादाचा हा पाश्चात्य विज्ञानाचा रस्ता आहे. तो मन, शरीर व सृष्टी या सगळयाची धुळधाण उडवणार हे स्पष्ट दिसते आहे. मी आपल्या शरीराला ९० वर्षांची ग्यारंटी दिली आहे. समष्टी, सृष्टी व परमेष्टीने यात मला मदत करावी ही प्रार्थना.
- ग. दि. आपटे,
रामबाग कॉलनी, पुणे ४११०३८
मोबा.९९८७९९८५४९

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन