Skip to main content

Posts

Showing posts from August, 2016

22 august 2016

संपादकीय आवाज बंद करावा गरजेपेक्षा कोणतीही गोष्ट जास्त झाली की त्याचेे प्रदूषण होते. आजकाल पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल बराच आरडाओरडा होतो. तो गैर नाहीच, पण त्यात मुख्यत: हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण लक्षात घेतले जाते. त्या मानाने प्रकाश आणि ध्वनीचे प्रदूषण फारसे मनावर घेतले जात नाही. परंतु तेही तितकेच हानीकारक आहे. ते रोखण्यासाठी पुरेसे कायदे आहेत, पण आपल्याकडे कायदे हे पाळण्यासाठी असतात, हे मुळी कोणी मानतच नाही. येत्या अुत्सवांच्या काळात ध्वनीप्रदूषणाचा जो बेफाम अत्याचार चालतो, त्याच्या विरोधात अुच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आहे. तरीही त्याचा अंमल होत नसेल तर मग पोलीस आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे स्वयंघोषित पुढारी यांना ताब्यात घेण्यासाठी लष्कराचा वापर करण्याशिवाय पर्याय राहात नाही. आितके अराजक आहे असे अजून तरी म्हणवत नाही, पण त्या दिशेने वाटचाल आहे. ती थांबायला हवी अशी अपेक्षा आहे. ध्वनीवर्धकाचा शेाध लागला, आणि त्याचा अुपयोग  योग्य कारणासाठी होत होता, तोवर ती सोय ठरली. परंतु सध्याच्या काळात या साधनाने शब्दश: अुच्छाद मांडला आहे. कारणपरत्वेे काही मंगल वाद्यांचे सूर माणसाला आन

15 august 2016

लोकशाही यशस्वी कशी होआील ?                                                                       -डॉ. बाबासाहेब आंबेडकर               माझ्या मताप्रमाणे लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाची पहिली शर्त म्हणजे समाजामध्ये भयानक विषमता असता कामा नये, पिळलेला वर्ग असता कामा नये, दडपलेला वर्ग असता कामा नये. अेकीकडे ज्याला सर्व विशेषाधिकार आहेत, आणि दुसरीकडे जो केवळ ओझ्याचा बैल आहे असे वर्ग समाजात असता कामा नयेत. त्या व्यवस्थेत, पद्धतीत व विभाजनात समाजाच्या रक्तरंजित क्रांतीची बीजे असतात. ते दुखणे नाहीसे करणे लोकशाहीला अशक्य होआील. वर्गावर्गात खोलवर रुजलेली फाटाफूट हाच लोकशाहीच्या यशातील सर्वांत मोठा अडथळा आहे.     लोकशाहीत नेमके काय घडते?  दबलेल्यांना, पिळलेल्यांना व मानवी हक्कांपासून वंचित केलेल्यांना, जे ओझ्याचे बैल आहेत त्यांना; विशेषाधिकारी लोकांसारखाच मतदानाचा अधिकार असतो. विशेषाधिकारी लोेक, ज्यांना विशेषाधिकार नसतो अशा लोकांपेक्षा संख्येने कमी असतात. लोकशाहीत बहुसंख्याकांचा कायदा हाच निर्णायक मानला जातो. त्यामुळे अल्पसंख्याक विशेषाधिकारी लोकांनी जर त्यांच्या खास हक्कांंचा स्वेच्छेने व राजी

8 august 2016

इंग्रज येण्यापूर्वी भारतातील शिक्षण -वा. ना. उत्पात     आपल्या देशात आज जी शिक्षण पद्धती आहे, ती सर्व इंग्रजांनी लादलेली आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, अभियांत्रिकी, वाणिज्य, कला, वैद्यकीय पदव्यांची नावे, ही सगळी रचना ब्रिटीशांनी केलेली आहे. इंग्रज येण्यापूर्वी या देशात काही शिक्षण व्यवस्था होती का? की आम्ही जंगलात राहत होतेा? झाडाच्या साली पांघरत होतो? आम्हाला रामायण महाभारतातील गुरुकुले, नालंदा, तक्षशीला विद्यापीठे माहीत आहेत, पण इंग्रज येण्यापूर्वी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था काय होती? काही इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या नोंदी केल्या आहेत. त्यातील अॅडम फर्ग्युसन, विल्यम रॉबर्टसन, जॉन फ्लेफेर, ए मॅनोशी हे काही विद्वान आहेत. पुष्कळ राजकारणी, धूर्त इंग्रज विद्वान हे भारतीय संस्कृतीचे विकृत चित्रण करीत होते. त्यातून भारतीय संस्कृतीला शिव्या देणारी, इंग्रजाळलेली पिढी निर्माण झाली. तथापि काही ज्ञानपिपासू इंग्रज विद्वान येथील सर्व व्यवस्था, विद्या यांचा अभ्यास करीत होते. एका इंग्रजाने फर्ग्युसनला विचारले `याचा उपयोग काय?' त्यावर फर्ग्युसन म्हणाला, `भारतातील सामान्य व्यक्तीदेखील युर

2 august 2016

ज्ञातीचे संघटन ज्ञातीअंतासाठी कोणत्याही सामाजिक विषयाची चर्चा सुरू झाली की  ती आपल्या जाती-व्यवस्थेशी येते. त्या मुद्द्यावर ती पेटू लागते. आणि जो तो आपापल्या जातीची बाजू घेअून आितरांच्या जातीवर तुटून पडतो. शिक्षण, सांस्कृतक संबंध, व्यवसाय, आचार विचार अशा बाबतींत जातींचा विचार होतोच; पण राजकारण हे तर अशा विचारांच्या आधारानेच वाढत असते. जातीचा विचार करावा की नको, असा मुद्दाच नाही. जातीभेद पाळू नये हे तर निश्चितच आहे. तसा तो  न पाळणारे जे जातीसमूह किंवा कुटुंबे आहेत त्यांनाही आितरांकडून त्याच भेदांचे विदारक अनुभव येतात. पूर्वीच्या गावगाड्यात ब्राह्मण समाजाने काही व्रताचरण सांभाळूनही जातीभेद नाहीसा करण्याचे, न पाळण्याचेच धोरण ठेवलेे होते; तरीही त्याला गेल्या अर्धशतकात बरेच भोगावे आणि सोसावेही लागले आहे. जातीअंतासाठी म्हणून जे कोणी प्रयत्न करत असतील, त्यांचे स्वागत केलेच पाहिजे, पण ते प्रयत्न निर्लेप मनाने न होता त्यातही पुष्कळदा जातीभेदातून अुद्भवणारा दंभ असतो हेे सहज ओळखू येते. आंतरजातीय विवाहांचा स्वीकार आजकाल ज्या समाजाने सर्वाधिक केलेला आहे,  त्याचाही गैरअर्थ काढून, त्यांना हल्ली आ

25July 2016

आपले जग अंकातील मजकूर तुम्हांस आवडेलच  तो इतरानांही पाठवावा. जनतेवरचे अत्याचार थांबवा नगर जिल्ह्याच्या अेका खेड्यातील मुलीवर अतिप्रसंग झाला, आणि तिला क्रूरपणे मारून टाकले. हे सगळे अघोरी, अमानवी घडले. त्या आरोपींना अशी शिक्षा व्हायला हवी की, त्यामुळे कोणतेही लहानमोठे गैरकृत्य कुणाकडूनही कधी घडूच नये. ती शिक्षा काय असावी हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयाला असतो. कोणतीही कठोर शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालय त्या प्रकरणाचा सांगोपांग विचार करेल. त्या साऱ्या व्यवस्था-प्रक्रियेवर प्रत्येकाचा  ठाम  विश्वास असलाच पाहिजे. ती प्रक्रिया पार पाडायची तरी व्यवस्थेची काही पथ्ये पाळावी लागतात. अुगीच कुणी तरी विखे पाटील किंवा राणे म्हणतात, किंवा कुणी मोर्चा काढून मागणी करतात म्हणून धरला आरोपी  -की चढव फासावर; असे होत नसते. त्याच दीर्घकालीन  -पण अटळ न्यायिक प्रक्रियेचा गैरफायदा हीच आक्रस्ताळी राजकारणी माणसे स्वत:साठी घेतही असतात; अन्यथा त्यांच्या भ्रष्टाचारांच्या आरोेपांवरून लोकांच्या न्यायाने कधीचीच जोडामारी झाली असती. कायदा सुव्यवस्था ठीक नांदते आहे, म्हणून ते अजूनी घडत नाही, हे त्यांनाही पटेल. पोलिस