Skip to main content

8 august 2016

इंग्रज येण्यापूर्वी भारतातील शिक्षण
-वा. ना. उत्पात
    आपल्या देशात आज जी शिक्षण पद्धती आहे, ती सर्व इंग्रजांनी लादलेली आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, अभियांत्रिकी, वाणिज्य, कला, वैद्यकीय पदव्यांची नावे, ही सगळी रचना ब्रिटीशांनी केलेली आहे. इंग्रज येण्यापूर्वी या देशात काही शिक्षण व्यवस्था होती का? की आम्ही जंगलात राहत होतेा? झाडाच्या साली पांघरत होतो? आम्हाला रामायण महाभारतातील गुरुकुले, नालंदा, तक्षशीला विद्यापीठे माहीत आहेत, पण इंग्रज येण्यापूर्वी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था काय होती? काही इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या नोंदी केल्या आहेत. त्यातील अॅडम फर्ग्युसन, विल्यम रॉबर्टसन, जॉन फ्लेफेर, ए मॅनोशी हे काही विद्वान आहेत. पुष्कळ राजकारणी, धूर्त इंग्रज विद्वान हे भारतीय संस्कृतीचे विकृत चित्रण करीत होते. त्यातून भारतीय संस्कृतीला शिव्या देणारी, इंग्रजाळलेली पिढी निर्माण झाली. तथापि काही ज्ञानपिपासू इंग्रज विद्वान येथील सर्व व्यवस्था, विद्या यांचा अभ्यास करीत होते. एका इंग्रजाने फर्ग्युसनला विचारले `याचा उपयोग काय?' त्यावर फर्ग्युसन म्हणाला, `भारतातील सामान्य व्यक्तीदेखील युरोपात ज्ञानाचा प्रकाश पसरवू शकेल.' (इ.स.१७८३)
    इ.स. १७८८ मध्ये ए मॅनोशी आपल्या अधिकाऱ्यांना `गंगेच्या खोऱ्यात जावे, तेथे शक्य तेवढे प्राचीन भारतीय ग्रंथ मिळवावेत, त्यांचे भाषांतर करण्यासाठी आवश्यक ते सर्व कष्ट करावेत, प्राचीन हिंदू परंपरा, हिंदू बोधकथा, इतिहास आणि साहित्यामुळे जगाच्या प्राचीन इतिहासावर फार मोठा प्रकाश पडणार आहे' असे सांगतो. बहुतांशी सर्वच विद्यांचे केंद्र वाराणशी आहे. तेथे सर्व शास्त्रांचे शिक्षण मिळत होते. खगोलशास्त्रावरचे प्राचीन ग्रंथ आजही तेथे उपलब्ध आहेत.
    भारतात शिक्षण व्यवस्था कशी आहे, याची ब्रिटीश अधिकाऱ्यांनी जिल्ह्याजिल्ह्यातून माहिती संकलित केली आहे. विल्यम अॅडम याच्या  सर्वेक्षणानुसार १८३० ते १८४० या कालावधीत बंगाल व बिहारमध्ये एक लाख शाळा होत्या. टॉमस मन्रो लिहितो, `चेन्नई प्रांतात प्रत्येक गावी शाळा  होती. प्रेन्डरगास्ट लिहितो, `मुंबई गावात शाळा नाही असे एकही गाव नाही. गाव कितीही लहान असू दे पण शाळा ही तिथे असतेच. मोठ्या गावात तर एकापेक्षा अधिक शाळा आहेत.' भारतातील शैक्षणिक संरचना, आजच्या संभ्रमितांचा विश्वास बसू नये इतकी विलक्षण होती. भारतातील शाळांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या, अभ्यासक्रमातील विविधता आणि सखोलता, या गोष्टी विलक्षण आणि अविश्वसनीय वाटतील. या सर्वेक्षणावरून इ.स. १८०० साली भारतात शाळा होत्या; विद्यार्थ्यांची संख्या इंग्लंडमधील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त होती.
    ब्रिटीशांनी लादलेल्या गुलामगिरीमुळे भारत नि:सत्व आणि कंगाल होऊ लागला होता, तरीही भारतीय शिक्षणपद्धतीची गुणवत्ता, तिचा प्रसार, श्रेष्ठ अभ्यासक्रम हे सगळे पैलू उजवे व सकस होते. परिस्थिती प्रतिकूल असूनही भारतात विद्यार्थीवृंद संख्येने जास्त होता. भारतीय शाळांमधील वातावरण अधिक आल्हाददायक, प्रसन्न, नैसर्गिक होते. भारतीय शिक्षक अधिक आत्मीयतेने आणि निष्ठेने अध्यापन करीत असत. पण शाळांमधून मुलींची संख्या नव्हतीच; असल्यास नगण्य होती. कारण मुलींचे शिक्षण घरीच होत होते.
    तथाकथित समाजसुधारक व पुरोगामी सतत डांगोरा पिटतात की शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राम्हणालाच होता. पण त्या अन्वेषणात अशी माहिती आहे की, `चेन्नई, बिहार प्रांतातील शाळांतून शूद्र जातींच्या विद्यार्थ्यांची संख्या सवर्ण मुलांपेक्षा जास्त होती.' चेन्नई प्रांतात ब्राम्हण विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होते. आकोट जिल्ह्यात शाळेत ब्राम्हण विद्यार्थी १३ टक्के होते. सेलम जिल्ह्यात शूद्र व इतर जातींच्या विद्यार्थ्यांची संख्या ७० टक्के होती, तिन्नेवल्ली जिल्ह्यात ८० टक्के होती; अशी प्र्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी आहे. ब्राम्हणेतर व दलित विद्यार्थी मोठया प्रमाणावर शिकत होते हे स्पष्ट आहे. ब्राम्हणांनी सर्व जातींना शिक्षणापासून वंचित ठेवले हा दावा पोकळ व असत्य आहे हे यावरून स्पष्ट होईल. हे दिलेले आकडे ब्रिटीश अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून दिले आहेत.
    शाळा सकाळी ६ ते १० व दुपारी २ ते ८ अशा चालत. शाळांतून लेखन, वाचन, अंकगणित हे विषय प्रामुख्याने शिकविले जात. याशिवाय रामायण, भागवत वगैरे पन्नास ग्रंथांची यादी आहे. दक्षिणेत कलेक्टरांच्या अहवालाप्रमाणे १०९४ महाविद्यालये होती. एकट्या राजमुंद्री जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २७९ महविद्यालये होती. वैद्यक व खगोल शास्त्राचे शिक्षण घेणारे ८०८ विद्यार्थी होते. त्यापैकी ३१ विद्यार्थी ब्राम्हण होते. बाकीचे इतर जातीचे होते. ५ विद्यार्थी शूद्र होते. न्हावी समाजातील लोक शस्त्रक्रियेत निपुण होते. धर्मशास्त्र, न्याय, खगोलशास्त्र अशा विषयांचे अध्यापन ब्राम्हण नि:शुल्क करीत. ब्राम्हणांना पूर्वी ज्या जमिनी दान मिळाल्या त्यातून ते हा खर्च करीत. त्यांना सरकारी साह्य नव्हते. अनेक विद्यार्थ्यांना घरच्या घरी शिक्षण मिळत होते. खाजगी शिक्षकही नेमले जात होते. प्रत्येक जिल्ह्यात आयुर्वेदाचे शिक्षण दिले जात होते.
    शाळांतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा खासगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाचपट होती. त्यात ५० टक्के ब्राम्हण व वैश्य आहेत. तर शूद्र विद्यार्थ्यांची संख्या २८ टक्के आहे. त्याकाळी शाळांतून मुलींची संख्या अल्प होती हे इंग्रजांनी त्यांच्या सर्वेक्षणात नोंदले आहे. विशाखापट्टणच्या जयपूर विभागात शिकणाऱ्या मुलींचे प्रमाण २९ टक्के होते. त्यात ब्राम्हण मुली ३७ टक्के होत्या. शिकणाऱ्या मुलींतसुद्धा शूद्र मुलींचे प्रमाण २६.७ टक्के होते. मुस्लिम मुलीसुद्धा शाळेत जात होत्या, पण त्यांचे प्रमाण अत्यल्प होते.
    अॅडमने १८०० सालात बंगाल बिहार प्रांतात जे सर्वेक्षण केले त्याचे निष्कर्ष असे आहेत. `प्रत्येक गावात किमान एक शाळा तरी होती. या प्रांतात १,५०,७४८  शाळा आहेत. बंगालमध्ये उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था प्रत्येक जिल्ह्यात आहेत. अठरा जिल्ह्यात १८०० संस्था आहेत. त्यात १०८०० विद्यार्थी शिकतात. प्रत्येक  उच्चविद्यालयाची किमान ७-८ खोल्यांची इमारत आहे. वाचनालय आहे. त्यांचा खर्च गावाकडून होतो. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची निवास भोजन व्यवस्था नि:शुल्क होती'. अॅडमच्या सर्वेक्षणाचा एक महत्वाचा निष्कर्ष म्हणजे सर्व जातीच्या व सर्व वर्गाच्या मुलांना शिक्षण उपलब्ध होते. शिक्षक प्रामुख्याने ब्राम्हण, कायस्थ सद्गोप जातीचे होते. चांडाळ जातीचे सहा शिक्षक होते. शिक्षणाचा लाभ मिळत नाही अशी एकही जात समाजात शिल्लक नाही. ब्राम्हणेतर जातीच्या विद्यार्थ्यांची संख्या ब्राम्हण मुलांपेक्षा जास्त होती. बर्दवान जिल्ह्यात ६१ विद्यार्थी डोम जातीचे होते. तर ६१ विद्यार्थी चांडाळ जातीचे होते. मिशनरी शाळांतून ८६ ब्राम्हणेतर मुले होती तर भारतीय शाळांतून ही संख्या ६७४ होती. प्रत्येक जिल्ह्यात पुस्तके वेगवेगळी होती, पण भारतीय हिशोब पद्धतीचा समावेश प्रत्येक अभ्यासक्रमात होता.
    बंगाल बिहारमध्ये ३५३ संस्कृत पाठशाळा होत्या. त्यात शिकविणारे बहुसंख्य शिक्षक ब्राम्हण होते. पाच शिक्षक न्हावी जातीचे होते. त्यात तर्क, न्याय, साहित्य, पुराण, ज्योतिष, शब्दशास्त्र, वक्तृत्व, वेदान्त, तंत्र, मीमांसा, आयुर्वेद, सांख्य इ. विषय शिकविले जात. अॅडमनंतर ४५ वर्षानंतर डॉ. लिटनर यांनी पंजाबमध्ये सर्वेक्षण केले. त्यांनी लिहिले की, पंजाब ब्रिटीशांच्या ताब्यात येण्यापूर्वी तेथील शिक्षण संस्थांतून तीन लाख तीस हजार विद्यार्थी शिकत होते. अठराव्या शतकात भारतात सर्वत्र शिक्षण व्यवस्था होती. त्यात धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, तर्कशास्त्र, तत्वचिंतन, आयुर्वेद, ज्योतिष, खगोलशास्त्र इ. विषय शिकविले जात होेते.
    १८११ च्या एप्रिल महिन्यात इंग्लंडला पाठविलेल्या निवेदनात प्रेन्डरगेस्ट लिहितो, `या प्रांतात शाळा नाही असे एकही गाव नाही. मोठ्या शहरांत प्रत्येक भागात शाळा आहेत. प्रत्येक शाळेतून, लेखन, वाचन, गणित, शिकविले जाते. ही व्यवस्था स्वस्तदेखील आहे. आर्थिक परिस्थितीप्रमाणे थोडेसे धान्य किंवा एखादा रुपाया शिक्षकाला देऊन तो आपल्या मुलाला शिकवू शकतो. ही शिक्षण पद्धती एवढी सुबोध व परिणामकारक आहे की, सामान्य शेतकरी किंवा लहान दुकानदारसुद्धा त्यांच्या व्यवहाराची व्यवस्थित नोंद

रूप:ंआतलं अन् बाहेरचं
    नुकतीच माझ्या भावाला मुलगी झाली. घरात गोड परीचं आगमन झालं. त्या इवल्याशा बाळाचे प्रत्येक जण वर्णन करू लागला. `अगदी आई सारखीच', `अगदी बाबावर गेलीय' `जिवणी बघ काय नाजुक, अगदी माझ्यासारखी'! कुणी घारे डोळे स्वत:सारखे म्हटले. पाळण्यात झोपलेल्या त्या बाहुलीला यातलं काही समजत नव्हतं.
    प्रत्येकाला `स्वत:चं' रूप असतं आणि ते प्रत्येकाला प्रिय असतं. नाक, डोळे, जिवणी, उंची, बांधा, केस, रंग किती प्रकारे रूपाचं वर्णन! त्याला काही ठोकताळे नाहीत. `गोरा, घारा, अगदी देखणा', `गोरा आहे पण चेहरा बावळट', `काळा आणि काहीतरीच'..
`काळा असेना का पण स्मार्ट आहे'... नक्की चांगलं काय, आणि वाईट काय?
    हे झालं बाह्य रूप! प्रत्येकाला आंतरिक रूप असतं. त्याला स्वभाव म्हणावे, वृत्ती म्हणावे, मन म्हणावे. `स्वभावाने सरळ आहे, तो वाकडाच विचार करतो, तिचं मन निर्मळ आहे किंवा लबाड आहे'..वगैरे! म्हणजे बाह्यरूपा इतकं आंततिक रूपाला पण महत्व देतो. वर्णन करताना ते खरं असेल असं नाही. कधी जवळची व्यक्ती म्हणून, कधी गरज म्हणून, राजकारण म्हणून वेगवेगळी वर्णन केली जातात. मूल कसंही असलं तरी त्याच्या आईला ते रूप राजबिंड दिसतं. आणि जावई भला असला तरी `लेकीचं नशीब' असा शेरा दिला जातो.
    जगातलं प्रत्येक व्यक्तिमत्व आपलं आंतरबाह्य रूप साजरं करत असतं. इतक्या मनुष्य जातीत किती प्रकारचे स्वभाव आणि रूपं सामावली आहेत. प्रत्येक व्यक्तीवरून कुटुंब, गाव, देश असं विभाजन होतं. नेपाळी, चिनी, जपानी युरोपियन अशी वर्गवारी होते. ही विविधता देवाने तरी कशी निर्माण केली असेल? हे बाह्यरूप त्याने निर्माण केलेलं असलं तरी अंतरंग `आपण' निर्माण करतो. पालक, कुटुंब, समाज, सभोवतीचे वातावरण यांच्यामुळे होणारे संस्कार आपल्याला घडवत असतात. त्यातून मग सज्जन-आणि दुर्जन असा बदल होतो. राजबिंडं रूप असलेला गुन्हेगार होऊ शकतो, आणि कुणी एखादा विद्रूपही संतपद भूषवितो.
    समाजही बाह्यरूपांपेक्षा अंतरंगालाच महत्व देतो. ज्याचा स्वभाव चांगला, मन, वृत्ती निर्मळ त्यालाच लोक जवळ करतात. हॉटेलच्या देखण्या अन्नापेक्षा आईच्या हातच्या साध्या वरणभाताने समाधान होतं, कारण त्यात वात्सल्य प्रेम भरलेलं असतं. ही भावना मनामनांत असली, वाढली तर समाजात आदर्श निर्माण होऊ शकतात. प्रत्येकाने `आरशात' न पाहाता खिडकीतून बाहेरच्या जगाकडे पाहिले पाहिजे. म्हणजे त्या जगाचं सौंदर्य वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
    हे जग हा समाज सुजलाम् सुफलाम् बनेल ही कवीकल्पना असली तरी मन निर्मळ असेल तरच ती समजू शकेल; आणि कदाचित प्रत्यक्षातसुद्धा येईल. ती प्रत्यक्षात येईलच असं म्हणून चाललं तर पाळण्यातल्या त्या चिमणीचं रूप आणखी छान भासू लागतं.
  आदित्य आपटे- सोलापूर,
  मो. नं. ८८८८६७६५५८ 

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन