Skip to main content

Posts

Showing posts from March, 2016

28march

विनिमयाचे हितकर व्यवहार गोष्ट तशी जुनीच आहे, ग्रामीण भागातल्या कोणत्याही दवाखान्यात घडणारी! एका रुग्णाईत वृध्देला तपासल्यावर औषध घ्यायला सांगितले, पण ते घेण्यासाठी तिच्याकडं पैसे नव्हते. मग मीच तिला काही पैसे देऊ केले, पण ती तेही घेण्यास तयार होईना. आपल्या म्हातारपणाचा उल्लेख करत ती म्हणाली, ``आता देणा शिल्लक रवतां नये. मी मेलंय तं तुमचा देणा फेडतलो कोण?'' तिच्या प्रांजळपणामुळं मलाही ते पटण्याजोगं होतं. प्रश्न पन्नास-शंभर रुपयांचा नव्हता, पण कोणाची उधारी करणं, उपकाराच्या ओझ्याखाली राहणं त्या खेडूतांना तर नको असतं ना!  मी तिचा चरितार्थ कसा चालतो ते विचारलं, तेव्हा कळलं की नारळीच्या झावळयांचे हीर काढून ती केरसुण्या वळून देण्याचे काम करते. बसल्या जागी तिला हे काम होऊ शकतं. आपलं औषधपाणी सुध्दा सन्मानानं खरेदी करता यावं यासाठी धडपडणारी ती आजी पाहून मला मोठीच प्रेरणा मिळाली.यापूर्वी मी स्वदेशी जागरण मंचाचे राजीव दीक्षित यांची व्याख्याने, सीडीज् ऐकलेले होते. प्राचीन काळी वस्तूविनिमय पध्दतीने व्यवहार चालत असत त्याचे  समाजधारणेतील मोल मला एकदम त्यावेळी आठवले. आपापले श्रम अथवा उत्प

14 march 2016

बेने इस्त्रायल - नोेहा मस्सील इसवी सनाच्या पूर्व ५८६मध्ये बाबिलोनच्या राजाने जेरुसलेमवर स्वारी केली, आणि ज्यूंची धर्मस्थळे उध्वस्त केली. पुढे इराणच्या शहाने जेरूसलेम जिंकून घेतले व ज्यूंना पुन्हा प्रार्थनामंदिरे बांधण्याची परवानगी दिली. त्याच्या राज्यात ज्यू समाज सुखाने नांदला. काही शतकांनंतर टायटस या रोमन सरदाराने जेरुसलेम पुन्हा जिंकले, त्याने ज्यूंची मोठ्या प्रमाणात कत्तल केली. त्यातून जीव वाचविण्यासाठी असंख्य ज्यू वाट फुटेल तिकडे पळत राहिले. काही युरोपमध्ये गेले, काही मध्यपूर्वेला पळाले. काही ज्यूंना त्यांच्या दर्यावर्दी पेशामुळे व व्यापारामुुळे भारत माहीत होता. असे लोक छोट्या मोठ्या गलबतांत बसून भारताकडे निघाले. तथापि हे त्यांचे भारताकडे निघणे ठरवून होते की समुद्रातील प्रवाहांमुळे घडले, याबाबत आज कसे कोण सांंगू शकणार?      त्यांचा प्रवास महाखडतर असणार हे तर नक्कीच आहे. त्यात अनेकांची गलबते फुटली, कित्ेकांना जलसमाधी मिळाली.जे कोणी वाचले किंवा अर्धमेले  झाले होते, ते भारताच्या पश्चिम किनारी कोकणातील अलीबागजवळ  चौल (नौगाव) बंदराशी लागले.  सुदैवाने जिवानिशी वाचलेल्या त्या लोकांत

7 march 2016

कूळकायद्याचे तीन तेरा महाराष्ट्नत १९५६ साली कूळकायदा लागू झाला. हा कूळकायदा येणार म्हणून जमीन मालकांनी काही कायदेशीर फेरफार करून, जमीनीच्या वाटण्या करून, कूळकायद्यापासून बचाव केला, पण ज्यांनी असे केले नाही, कुळांनी दिलेल्या शब्दावर विसंबून राहून त्याच्याकडून नोकरनामा लिहून घेऊन भरवश्यावर राहिले, ते तिथेच फसले. कारण ती जुन्या वळणाची माणसं, शब्द दिल्यावर विश्वास ठेवणारी! जे कूळ त्यांच्या वाडवडिलांपासून जमीन कसत होते त्यांनी शब्द दिला.पण त्या कुळास आजूबाजूच्या जमीन मालकांनी फिरवले, त्यांना पुढाऱ्यांनी सांगितले की `सरकार तुमच्याकरता कायदे करीत असताना तुम्ही त्याचा फायदा घ्या.' त्यांनी दिलेला शब्द फिरवण्यास वारंवार सांगून भाग पाडले. मग कुळे कायदेशीर जमीनमालक झाली. कित्येक  मूळ मालकांनी त्यावेळी साठी गाठली होती. हातची जमीन गेली याचा धक्का बसून काही विकलांग झाले, काही मालक खलास झाले. त्यावेळची त्यांची स्थिती फार हलाखीची होती. घरात धान्य नाही, आयुष्य शेतीवर अवलंबून असल्यामुळे नोकरी केली नाही, त्यांना कोर्टात जाणेसुद्धा जमले नाही! इकडे कुळे मालक झाली. एकदोन वर्षे कशीतरी शेती केली. पुढे

29 Feb.2016

महिलांच्या समस्या आणि त्यांच्या शिक्षणाच्या कार्यासंदर्भात, प्रचारकी पद्धतींतून आजकाल काही समज रूढ झालेले आहेत. पण पूर्वीपासून कितीतरी लोक या विषयांत प्रयत्न करीत होते हे लक्षात येऊ शकेल. ब्रिटिश साम्राज्यातही महिला पदवीधर होण्याचा प्रथम मान भारतात आहे हेही विशेष वाटेल. महिला दिनाच्या निमित्ताने... भारतीय स्त्रीशिक्षणाच्या इतिहासातला एक संस्मरणीय दिवस म्हणजे १० मार्च १८८३. कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभास त्या दिवशी कधी नव्हे एवढी तोबा गर्दी उसळली होती. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच दोन महिलांना बी.ए.ची पदवी मिळाली त्या दिवशी. इंग्रजी शिक्षणाच्या सुरुवातीच्या जमान्यात `ग्रॅज्युएट दिसतो तरी कसा' हे पाहायला लोक जमा होत. त्या दिवशी `ग्रॅज्युएट बाई' दिसते कशी हेच नवल होतं! या पहिल्या पदवीधर स्त्रियांची नावं होती कादंबिनी बसू आणि चंद्रमुखी बसू. उच्चशिक्षणाची पताका फडकावणाऱ्या त्या अग्रणी महिला असल्या, तरी स्त्रीशिक्षणाची तोवरची एकूण वाटचाल अतिशय खडतर नि झगडून झालेली होती. त्या दिवशीच्या कौतुकाला आधीच्या जवळपास पंचाहत्तर वर्षांची पूर्वपीठिका होती. राजा राममोहन राय (१७७

22 Feb.2016

२६ फेब्रुवारी २०१६ला सावरकराना जाऊन ५० वर्षे होतात, त्यानिमित्ताने... अनादि मी, अवध्य मी मृत्यूला सहज सामोरे जाऊन राष्ट्नसाठी अमर झालेल्या स्वातंत्र्यवीराचा अंतकाळ फाल्गुन शुद्ध षष्ठीला (२६ फेब्रुवारी १९६६) त्यागवीर सावरकरांनी देहत्याग गेला. दोनच दिवस आधी आपले कार्यवाह श्री.बाळाराव यांना नमस्कार करून ते म्हणाले, `आम्ही जातो अमुच्या गावा । अमुचा रामराम घ्यावा.' ज्याला `आमचे गाव' म्हटले, त्याची त्यांना माहिती होती. ते गाव `अदृष्ट' होते. तरी तिथले `सुरम्य सदन' त्यांनी धर्म-कर्माचा `विसार' भरून आधीच राखून ठेवले होते. सावरकर जराजीर्ण नि बहुधा घरी पडूनच असत. आकाशवाणी ऐकणे, वृत्तपत्रे वाचणे यात खंड पडला नव्हता. २० ऑक्टोबर १९६२ला चीनने आक्रमण केले. शांतताखोर काँग्रेसवाले आत्तापर्यंत सावरकरांना `युद्धखोर' म्हणून हिणवीत असत. परंतु स्वप्नाळू धोरणामुळेच भारताचा पराभव झाला. त्याचे दु:ख सावरकरांना इतके असह्य झाले की १४ नोव्हेंबर १९६२ला ते तासभर ढसाढसा रडले. तेव्हापासून त्यांना वारंवार वाटे की, आता जगायचे तरी कशासाठी? १९६४मध्ये ते कार्यवाहांनाच एकदा म्हणाले की, `माझे या