Skip to main content

Posts

Showing posts from November, 2017

27 November 2017

गगन आणि गिरी या गुणांचा महात्मा स्वामी गगनगिरी विश्वगौरव गगनगिरी महाराज यांचा जन्मदिवस ३० नोव्हेंबर(१९०६)   त्यानिमित्ताने महायोगी सत्पुरुषाचे हे स्मरण- भारतात लोकप्रिय असलेले गगनगिरी महाराज भक्तिभावाने पूजिले जातात. इतिहासप्रसिद्ध चुलकी चालुक्य सम्राट पुलकेशी (बदामी-कर्नाटक) राजवंशातील सरदार पाटणकर घराण्यात मंदुरे या गावी श्रीक्षेत्र जांभुळवन, कोयना खोरे, ता-पाटण, जि-सातारा, प.पू. गगनगिरींचा दि.३० नोव्हेंबर १९०६ दत्तजयंतीच्या दिनी जन्म झाला. गगनगिरी महाराज ऊर्फ श्रीमंत श्रीपत(राजे) गणपत(राजे) पाटणकर हुजूरवाडेकर (फर्स्ट क्लास सरदार अॅण्ड जहागीरदार डेक्कन व कोल्हापूर) हे वागोजीबाजी हुजूरवाड्याच्या (हुजूर सीनीयर) शाखेचे १४वे वंशज होत. ते गहिनी गगनगड गादीचे वंशपारंपरिक जायदादी वतनदार म्हणून प्रसिद्ध होते. बालवयातच श्रीपतीवरील माता-पित्यांचे छत्र हरपले. वारकरी संप्रदायातील सखुआजी व नारायण आजोबांच्या (इतिहास प्रसिद्ध माने या मातुल घराण्यातील चरेगांव-उंब्रज, ता-कराड) सान्निध्यात त्यांना भक्तिमार्गाची ओढ व गोडी वाटू लागली. वयाच्या ७व्या वर्षी  जन्मजात राजपदाचा त्याग करून नवनाथी झुंडीत

20 Nov. 2017

धर्म-अधर्म हे व्यवहार्य असावे आपली उपनिषदे, त्यांचे सार असलेली ब्रह्मसूत्रे आणि गीता या तीन ग्रंथांना `प्रस्थान-त्रयी म्हणतात. मनुष्याला मोक्षाप्रत नेणारे अक्षरवाङ्मय म्हणून प्रस्थानत्रयी परंपरेने प्रतिष्ठित आहे. त्यात गीतेचा समावेश आहे म्हणून, तिचे विवरण व आकलन अध्यात्मप्रवणतेने करण्याचा अेक प्रघात आहे. तरीही गीतेचे पारलौकिकत्व मांडताना गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय बाजूला ठेवता येत नाही. महाभारताच्या युध्दासाठी अर्जुनाला प्रवृत्त बनविणे हा गीतेचा उद्देश आहेच. युध्द म्हटले की हिंसा आली; मग हिंसेचे प्रतिपादन वगळून परमार्थपर गीता कशी स्वीकारायची? शिवाय युध्दाच्या पृष्ठभूमीवर गीतेसारख्या तत्वज्ञानपर प्रबंधाचे प्रयोजनच काय? गांधीजींची श्रध्दा गीतेवर होती, आणि ते तर अहिंसेचे उपासक. तथापि `गीतागत उपदेश मानवी मनोव्यापारातील सुष्ट आणि दुष्ट या उभय प्रवृत्ती- दरम्यानच्या द्वंद्वावर मात करण्याचा मार्ग दाखवितो' असे म्हणून सुटका करून घ्यावी लागते. कृष्ण हा दैवी अवतार आहे हे गृहीत धरले जाते. गीतेच्या निर्मितीसाठी सांगितलेले निमित्त काहीवेळी अप्रस्तुत ठरविले जाते किंवा त्याकडे दुर्लक्ष केल

13 Nov. 2017

नवी दिशा देणारे नगरनियोजन विसाव्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर आिमारतींच्या रचनेत खूप बदल झाले. मुख्यत: सिमेंट, पोलाद, व मोठ्या आकाराच्या काचेचा वापर वाढला. वेगळया आिमारत-साहित्याची निर्मिती झाली, व त्यातही बदल, सुधारणा होत चालले आहेत. त्यापूर्वी भिंतींच्या जाडीमुळे आिमारतींच्या अुंचीवर बंधन पडत असे. पोलाद व कांॅक्रीटच्या संयोगाने आिमारतींचे वजन भिंतींवर देण्याअैवजी ते -तुलनेने नाजूक भासणाऱ्या - कॉंक्रीटच्या खांबांवर दिले. भिंतींची वजन पेलण्याची क्षमता खांबांकडे सोपविण्याने आिमारती बांधण्याच्या तंत्रात खूप बदल आणि विकासही झाला.  संपूर्ण बहुमजली आिमारत जमिनीपासून अुंचीवर - खांबावर तोलून बांधलेली, आिमारतीखाली वाहने ठेवायला किंवा मुलांना खेळायला मोकळी जागा राखलेली, अशा आिमारती आपल्याला आता सर्वत्र दिसतात. जमिनीपासून अलग करून  अुंच अंतराळी आिमारत बांधण्याची ही कल्पना `ल कार्बूझिअे' या वास्तुकाराची आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून शहरीकरण वाढत चालले. शहराच्या आजूबाजूच्या लोकवसतीला अुपजीविकेचे साधन राहिले नाही. नोकऱ्या शहरांत अुपलब्ध होत्या, त्यामुळे शहरांंत स्थलांतर वाढत गेले

6 Nov. 2017

शोधिला पाहिजे विचार । यथातथ्य ।। भारतातली एक प्रसिद्ध कामगार संघटना (ट्न्ेड युनियन) सिटू ने जालना येथे श्रमिक साहित्य संमेलन आयोजित केले होते, ते गेल्या १०-११ सप्टेंबरला पार पडले. त्या संमेलनाचे उद्घाटक नागनाथ कोत्तापल्ले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले,- ``एकदा विवेक हरवला की माणूस स्वत: होऊनच गुलाम होतो. त्याचे स्वातंत्र्य गेले की नवा विचार करण्याची शक्तीच तो हरवून बसतो. त्यातही माणूस जातीसंस्थेचा गुलाम झाला की, त्या जातीच्या रिंगणातच तो गरगरत राहतो. त्याचे सारे अवकाशच मर्यादित होते. नंतर सर्वच जातींचे भ्रष्ट लोक -उद्योगपती, राजकारणी, धर्माभिमानी सगळेच -आपले हितसंबंध, स्वार्थ जपण्यासाठी जातव्यवस्थेची भलावण करतात. परिणामी कुठल्याही जातीत जे पीडित-शोषित-श्रमिक असतात, ते एकत्र येऊ शकत नाहीत. दुर्बलांच्या लढ्यातील एकतेचा सर्वांत मोठा अडथळा म्हणजे ही जातीय मानसिकता असते. भारतीय माणूस आज दुहेरी कात्रीत सापडला आहे. एका बाजूला जागतिकीकरणातून आलेल्या निर्दयी भांडवलदारांकडून होणारे शोषण; आणि दुसरीकडे या निर्दयी व्यवस्थेशी संघर्ष करू शकणाऱ्या एकतेचे जातींमध्ये विखुरलेपण. ``लेखक, कलावंत,

30 Oct. 2017

समशेर बहाद्दर आपटे - सरदार नारो विष्णू वेंगुर्ले तालुक्याजवळ अदमासे ९ मैलावर `आजगाव' या नावाचे एक खेडेगाव आहे. या गावच्या मुख्य ग्रामदेवता श्रीवेताळ व श्रीरवळनाथ. शिवाय श्रीसर्वेश्वर, श्रीभार्गवराम, श्रीआदित्यनाथ, श्रीदेव-नारायण, श्रीशांतादुर्गा व श्रीरामेश्वर ही देवालये निरनिराळे लोकांकडून बांधली गेली. श्रीवेताळ व श्रीरवळनाथ, ही देवस्थाने फार जुनी आहेत. श्रीसर्वेश्वराचे देवालय, लष्कर-ग्वाल्हेर येथे गेलेले कै.श्री.सरदार नारो विष्णु आपटे यांनी बांधिले. कै.विष्णुभट आपटे हे आजगावहून आदमासे शके १७००ला मिरज येथे आले. यांस दोन पुत्र, बाळकृष्ण व नारायण. बाळकृष्ण यांस वेदशाळेत व नारायण यांस धुळाक्षराच्या शिक्षणशाळेत घालण्यात आले. नारो विष्णु हे धूर्त, चाणाक्ष व शूर होते, म्हणून स्वत:चे हिमतीवर पुढे आले. आपल्या बरोबरीची काही काही हुशार मंडळी जमवून मोठ्या सावधगिरीने व युक्तीने इतर पुंड मंडळी हाताशी घेऊन, रात्रौ कर्नाटकात लूटमार करावी आणि दिवसा पहावे तो नोकरीवर हजर! याप्रमाणे काही दिवस जसे गेले तसे हे प्रस्थ वाढतच चालले. एके दिवशी रात्री सुमारे दोन हजार सशस्त्र लोकांनिशी बेळगाव नजिक त