Skip to main content

30 Oct. 2017

समशेर बहाद्दर आपटे - सरदार नारो विष्णू
वेंगुर्ले तालुक्याजवळ अदमासे ९ मैलावर `आजगाव' या नावाचे एक खेडेगाव आहे. या गावच्या मुख्य ग्रामदेवता श्रीवेताळ व श्रीरवळनाथ. शिवाय श्रीसर्वेश्वर, श्रीभार्गवराम, श्रीआदित्यनाथ, श्रीदेव-नारायण, श्रीशांतादुर्गा व श्रीरामेश्वर ही देवालये निरनिराळे लोकांकडून बांधली गेली. श्रीवेताळ व श्रीरवळनाथ, ही देवस्थाने फार जुनी आहेत. श्रीसर्वेश्वराचे देवालय, लष्कर-ग्वाल्हेर येथे गेलेले कै.श्री.सरदार नारो विष्णु आपटे यांनी बांधिले.
कै.विष्णुभट आपटे हे आजगावहून आदमासे शके १७००ला मिरज येथे आले. यांस दोन पुत्र, बाळकृष्ण व नारायण. बाळकृष्ण यांस वेदशाळेत व नारायण यांस धुळाक्षराच्या शिक्षणशाळेत घालण्यात आले. नारो विष्णु हे धूर्त, चाणाक्ष व शूर होते, म्हणून स्वत:चे हिमतीवर पुढे आले. आपल्या बरोबरीची काही काही हुशार मंडळी जमवून मोठ्या सावधगिरीने व युक्तीने इतर पुंड मंडळी हाताशी घेऊन, रात्रौ कर्नाटकात लूटमार करावी आणि दिवसा पहावे तो नोकरीवर हजर! याप्रमाणे काही दिवस जसे गेले तसे हे प्रस्थ वाढतच चालले.
एके दिवशी रात्री सुमारे दोन हजार सशस्त्र लोकांनिशी बेळगाव नजिक तळ देऊन, नारोपंत आपणाबरोबर ३-४ लोक हुशार घेऊन वेशांतर करून बेळगावच्या किल्ल्यात शिरले आणि बुरुजांतील गोलंदाज ठार करून, तोफेला पागोटे बांधून किल्ल्याबाहेर खंदकात उतरले. खंदकातील पाण्यातून पोहून आपल्या तळ दिलेल्या ठिकाणी गेले व सर्व सैन्यास बरोबर घेऊन रात्री किल्ल्यावर हल्ला करून किल्ला सर केला.
शेवटचे बाजीराव पेशवे यांची नारो विष्णु यांना पुणे मुक्कामी येऊन भेटण्याबद्दल पत्रे गेली. नारो विष्णु आपल्या सर्व लोकांस सावध राहण्याचा इशारा देऊन पुण्यास आले. आणि श्रीमंताचे भेटीकरिता `शनिवारवाड्यात' गेले. रा.नारो विष्णु आपटे हे शरीराने मजबूत, देखणे, गोरे व तेज:पुंज होते. श्रीमंत बाजीरावांनी नारो विष्णु यांना पाहताच, या आपटे! बसा!! असे म्हणून, तुम्ही कर्नाटकात कोणाचे मुलखात काय चालविले आहे? तुम्ही अशी पुंडाई न करिता आमचे पदरी राहावे, अशी आमची फार इच्छा आहे. हे शब्द ऐकताच, नारो विष्णु म्हणाले, श्रीमंतांनी आश्रय दिल्यास मी राहाण्यास तयार आहे. श्रीमंतांनी ताबडतोब बाराशे स्वारांची सरदारी देऊन, खास हुजुरात असावे, असे फर्माविले.
नारो विष्णु यांनी आपल्या सर्व साथीदारांस श्रीमंताचे पदरी सैन्यात ठेऊन आपण सरदार झाले. नारो विष्णु यांच्या ताब्यात इ.स.१८१७ ला पंधरा हजार फौज होती. पेशवाई बुडण्याचे शेवटचे धामधुमीत श्रीमंत बाजीराव ब्रम्हावर्तास जाऊन राहिले. नारो विष्णु हे श्रीमंताजवळ ब्रम्हावर्त येथेच होते. श्रीमंतानी आपणास आता फौजफाट्याची काही गरज नसल्यामुळे तुमचीही व्यवस्था तुमच्या इतमामाप्रमाणे लवकरच करितो, असे ते म्हणाले. दौलतराव शिंदे यांस पत्र लिहिेले. त्यांचा शब्द मोडला नाही. शिंदे यांनी उत्तर लिहिले, ``श्रीमंताचे हुकूमाप्रमाणे, सरदार नारो विष्णु यांची व्यवस्था , त्यांचे इभ्रतीस साजेल अशीच माझ्याकडून राहील!'' नारो विष्णु हे लष्करात आल्याचे समजताच डंका, नौबत व निशाण सामोरे पाठवून त्यांचे स्वागत केले.
शके १७३९ (सन१८१७) नारो विष्णु यांना पेशवाईतील हुद्यासह बावन पागेवरचे मुख्य अधिकारी नेमण्यात आले. पुढे सरदार दौलतराव शिंदे वारले; बायजाबाई शिंदे व जनकोजीराव शिंदे या दोघांमध्ये गादीचे मालकीसंबंधी लढा सुरू झाला. जनकेाजीराव यांच्या पक्षाचे सरदार नारो विष्णु आपटे होते. इकडे लवकरच जनकोजीराव शिंदे यांना गादी मिळाली. आपल्याकरिता सरदार नारो विष्णु यांना फार त्रास झाला होता ही गोष्ट न विसरता, गादी मिळताच रा.रामजीपंत केळकर यांचे बरोबर शंभर स्वार व डंका निशाण देऊन, सरदार आपटे यांना घेऊन येण्याचा हुकूम झाला.
चिटणीस गोटात राहण्यास जागा दिली. याच जागेवर नारो विष्णु यांनी विस्तीर्ण वाडा बांधला तो अद्यापि कायम आहे. यांना घोडे बांधण्याकरिता म्हणून जी जागा देण्यात आली होती त्या जागेवर हल्ली उत्तम बगीचा आहे. महाराज दौलतराव शिंदे यांनी शके १७३९ला सरदार नारो विष्णु यांस तैनातजाप्ता करून दिला त्याचा तपशील -जासूद दोन, उंट चार, भालदार एक, घोडे रास तीन, शिपाई अकरा आणि पेशवाईपासून चालत आलेला सुरजमुखी हलकारा, पालखी व अबदागिरीमय छत्री चालू केली.
महाराज जनकोजीराव ंशिंदे यांच्या कारकीर्दीत सरदार नारो विष्णु हे माळवा प्रांताचे सुभायतीवर होते. सुभायतीवर असता, सोंदे नावाच्या अडदांड लोकांचा चांगला खातरजमा होऊन महाराज जनकोजीराव शिंदे यांनी, सरदार नारो विष्णु यांना दिवाणगिरीचे कामावर नेमिले. शके १७५५ ला ``राव राजे समशेर बहादर'' हा किताब देऊन दरबारात उजवे बाजूचा मान व पुरी ताजीम, पाच पार्च्याची वस्त्रे व काठी शिरपेच येणेप्रमाणे बहुमान केला. पुढे शके १७६३ ला प्रांत जिल्हे अहमदनगर पैकी मौजे लिंपणगाव व देहगाव हे दोन गाव जहागीर देऊन वंशपरंपरेची सनद करून दिली. पुढे काही दिवस इंदौर दरबारतर्फे नारो विष्णु हे वकील होते. हे शूर असून मोठे मुत्सद्दी होते. शिंदे सरकारचे दरबारी इमाने इतबारे उत्तम कामगिरी करून त्यांनी जहागीर व किताब मिळविला. शके १७६५ ला सरदार नारो विष्णु आपटे राव राजे समशेर बहाद्दर हे इंदौर येथे कैलासवासी झाले.
(१९१४ साली पहिला कुलवृत्तांत आपटे घराण्याचा प्रकाशित झाला. त्यातील प्रकरण संक्षेपाने)


प्रज्वालितो प्रदीप: ।
८ऑक्टोबर हा भारतीय वायुसेना दिवस, त्यानिमित्त फ्लाआीट लेफ्टनंट प्रदीप आपटे यांच्या पराक्रमाची कथा
 लेफ्टनंट कर्नल(निवृत्त) वि श्री अभ्यंकर यांनी `सकाळ' वृत्तपत्रात लिहिली आहे -
प्रदीप विनायक आपटे हे साताऱ्याजवळच्या लिंब गोव्याच्या आपटे घराण्यापैकी. त्यांचे वडील विनायक रामचंद्र हे पुण्यात असत. हिंदुस्थान लीव्हर कंपनीत ते चीफ केमिस्ट होते. शेती मालाच्या किंमती हा त्यांचा व्यासंगाचा विषय होता, त्यावर त्यांनी लेखनही केले. त्यांच्या पत्नी माहेरच्या सुमती साठ्ये. त्यांना प्रकाश व प्रदीप हे दोघे मुलगे. प्रकाश हे सी अे झाले.प्रदीपचा जन्म २७ ऑगस्ट १९४५चा. त्यांचे शालीय शिक्षण युगांडात झाले, कारण त्यावेळी वडील तिथे होते. पुढचे शिक्षण शिवाजी प्रीपरेटरी मिलीटरी स्कूल आणि पुण्याच्या संरक्षण प्रबोधिनीत झाले. अलाहाबाद जोधपूर, हैद्राबाद येथे त्याने प्रशिक्षण घेतले. क्रिकेट, पोहणे, स्प्ॅश, घोडेस्वारी आणि मुष्टीयुध्द हे त्याचे आवडते खेळ होते. त्यांचा प्रेमविवाह १०-१०-१९७०ला झाला होता. वर्षभरातच त्याने हौतात्म्य पत्करले.
या प्रसंगाला ४५ वर्षे झाली.
भारत पाक युध्दाला १९७१ साली तोंड फुटले होते. पश्चिम सीमेवरच्या बरिमर सेक्टरमधील अेअरफोर्स स्टेशनला रात्रीच्या वेळी पुकारा सुरू झाला. `युध्द सुरू झाले आहे; तयार रहा!' क्षणाचा विलंब  न  लावता त्या काळोख्या रात्री वीस आकाशयोध्दे (अेअर वॉरिअर्स) आपला गणवेश घालून `रनवे'वरती धावत निघाले. त्यांचे स्पड्न्न आिन चार्ज विंग कमांडर दिवाण त्यांना म्हणाले,``मला पाच पायलट्सची गरज आहे. बाकीच्यांनी माघारी चला, आणि माझ्या पुढच्या आदेशाची वाट पाहा''  परंतु अेकही पायलट मागे फिरला नाही. त्यातला अेकजण म्हणाला, ``मला लढायला मिळालेच पाहिजे,, नाहीतर मग माझ्या प्रशिक्षणाचा अुपयोग काय?'' दिवाण पुढे म्हणाले, ``प्रदीप, तू तर सर्वांत लहान आहेस. तुला अजून पुरेसा अनुभव नाही.'' प्रदीप म्हणाला,``-तर मग मी काय शेलारमामा होआीपर्यंत थांबायचं काय?'' दिवाणांनी अर्थातच ते न मानता म्हटलं
``-माझा निर्णय आहे, प्रदीप मागे फिरा..'' परंतु कोणीच पायलट मागे फिरला नाही, सारे धावपट्टीवर पळत राहिले.
थोडे अंतर गेल्यावर प्रदीप अजीजीने म्हणाला, ``सर, कोणत्या पाचजणांनी मोहिमेवर जायचं ते आपण आपल्या आद्याक्षरांप्रमाणं  ठरवूया. ते मान्य करून विंग कमांडर दिवाण, फ्लाआिट लेफ्टनंट आपटे, बलबीरसिंग, फझल मोहंमद, रॉबर्ट डिक्रूज् यांनी त्या अंधारात भरारी घेतली. अस्मानी समरांगणात ते झेपावले.
मिळालेल्या आदेशाप्रमाणे पाकिस्तानच्या सेबरजेट विमानांचा  वेध त्यांनी घेतला, आणि सात विमाने अचूक टिपली. मोहीम तर फत्ते झाली.  फ्लाआीट लेफ्ट प्रदीपने  सहज खाली नजर टाकली. शस्त्रास्त्रांनी भरलेली अेक पाकिस्तानी आगगाडी राजस्तानच्या दिशेने चालली होती. प्रदीपने आपले मिग२१ विमान वळवले, आणि तो थेट पाकिस्तानच्या हद्दीत घुसला. त्याला हुकूम झाला, ``मोहीम संपली आहे, मागे फीर'' प्रदीप आवेशात अुत्तरला, `ती ट्न्ेन अुध्वस्त केल्याशिवाय मागे कसा फिरू? राजस्तानमधल्या माझ्या भावाबहिणींचं रक्षण कोण करणार?'' क्षणार्धात त्याने ती पाकिस्तानी ट्न्ेन अुडवून दिली, आणि तो झपाट्यात मागे वळला. त्याचे चार सहकारी अेव्हाना जमिनीवर अुतरले होते.
तेवढ्यात पाकिस्तानच्या तीन सेबरजेटनी प्रदीपच्या मिग ला घेरले, आणि ते टिपले. त्या स्थितीतही  न  डगमगता प्रदीपने त्या पेटत्या अेअरक्राफ्टला सलाम ठोकून खाली अुडी घेतली. तो पाकिस्तानी हद्दीत पडला. स्थानिक नागरिक त्याला मारू लागले, पण त्यांच्यावर पिस्तूलचे बार काढत त्याने जरब दिली, ``मी तुमचा युध्दबंदी आहे, जीनिव्हा कराराप्रमाणे मला सन्मानाने वागवले पाहिजे.'' पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी प्रदीपला ताब्यात घेतले, कराचीच्या लष्करी तुरुंगात घातले.
अर्थातच तेथे त्याचे हाल सुरू झाले. त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती  झाली. `भारतीय फौजांचे पुढील धोरण काय?' हे खोदून विचारले जाअू लागले. तो आकाशयोध्दा डगमगला नाही, खचला नाही. त्याने यमयातना सहन केल्या, पण पाकिस्तान्यांपुढे तोंड अुघडले नाही. युध्दसमाप्ती झाल्यानंतर शेवटी १६ जानेवारी १९७२ रोजी फ्लाआीट लेफ्टनंट प्रदीपचा मृतदेह पाकिस्तानने परत केला.
त्यापुढचा प्रसंग.
२६ जानेवारी(१९७२)ला दिल्लीचा सेंट्न्ल हॉल तुडुंब भरला होता. धीरगंभीर वातावरणात आपले राष्ट्न्पती शूरवीरांना शौर्यपदके प्रदान करत होतेे. पुकारा झाला, `फ्लाआीट लेफ्टनंट प्रदीप आपटे -मरणोत्तर महावीरचक्र...' प्रदीपच्या आआी सुशीलाबाआी  संथपणे पण अभिमानाने पुढे गेल्या. राष्ट्न्पतींकडून त्यांनी पदक स्वीकारले. ते हाती घेअून त्यावर नजर फिरविली, आणि खिन्न मनाने त्या मागे वळल्या. धीरोदात्त या शब्दाला त्यांच्या प्रदीपच्या पराक्रमाने आज वेगळा तेजस्वी अर्थ दिला होता.
आितक्यात त्या समुदायातून अेक महिला सुशीलाबाआींजवळ आली. म्हणाली, ``सुशीलाताआी, मी पुण्यात राहिलेली आहे. तानाजी, बाजीप्रभू, मुरारबाजी, बाजीराव यांच्या शौर्यगाथा मी अैकल्यात; पण त्यावेळी मला त्या दंतकथा किंवा आख्यायिका वाटायच्या. परंतु या १९७१च्या युध्दात तुमचा प्रदीप, किशोर भडभडे, जया दडकर, राजा कुलकर्णी, मकरंद घाणेकर या बहाद्दरांचे पराक्रम अैकल्यावर मला पटले त्या मराठी मातीतच शिवाजी, तानाजी, संभाजी, बाजी जन्माला आलेले आहेत. माझा तुम्हाला सलाम.''
अेका वीरमातेला सलाम करणारी ही दुसरी माता होती, खुद्द आिंदिरा गांधी!
(आिंदिरा गांधी यांचा जन्म १९-११-१९१७चा. येत्या महिन्यात त्यांची जन्मशताब्दी आहे, त्यांचेही ७१च्या युध्दातील योगदान मोठे. या साऱ्या वीरांना आणि वीरमातांना सादर वंदन.)

 संपादकीय
माणसाला त्याचे सहजीवन सुखमय व्हावे यासाठी धर्माची तत्वे घालून दिलेली असतात. मूलतत्वे बदलत नाहीत, पण त्यानुसार होणारे आचरण स्थल काल स्थितीप्रमाणे बदलत असतात, बदलावीच लागतात. सत्य सदा बोलावे, हे धर्मतत्व असले तरी त्यास परिस्थितीनुसार बगल द्यावी लागते. त्यावेळी त्यास मूलतत्वांची नव्हे, तर व्यवहार-नीतीची बंधने लागू करावी लागतात. गरीब दुभत्या गायीच्या मागे कसाआी जर सुरा घेअून लागला आणि त्याने आपल्याला गायीचा माग विचारला तर, ज्या दिशेला गाय गेली त्याच्या विरुध्द दिशेला बोट दाखवून गाय वाचवावी ही मनूची व्यवहारनीती आहे. त्यावेळी सत्यधर्माचरण झाले नाही तरी चालते, कारण त्यात लोकहित आहे, सार्वत्रिक हित आहे. धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे आचरणपध्दती, धर्म म्हणजे मानवता. हे अेकदा मनाशी नक्की केले की मग बाकीची कर्मकांडे कधी पाळायची, किती पाळायची,याचा निर्णय प्रत्येकजण आपापल्या मनाशी घेअू शकतो. त्या धर्मास नाव कोणतेही दिले म्हणून बिघडत नाही.

पण आजकाल त्या तत्वांवर आचरण बेतण्यापेक्षा आपल्या बेताल आचरणानुसार धर्माचे अवडंबर माजविण्याची पध्दत आली आहे.. फटाके अुडविणे हे आपल्या धर्मात कधी कोणत्या ऋषिमुनीनी सांगितले नाही. नळे चंद्रज्योतीची  आतषबाजी करत मिरवणूक काढण्याची वर्णने आितिहासात असतील. कोणता  तरी कसला तरी आनंद प्रगट करण्यासाठी त्याचा वापर कधी काळी केला जात असेलही; पण जेव्हा केव्हा प्रागैतिहासिक काळात नरकासुराचा वध झाला, तेव्हा फटाके नक्कीच नव्हते. मग त्यांचा वापर दिवाळीत करणे ही धार्मिक रूढी कशी काय झाली? दिवाळीचा संबंध जर निसर्गातील आनंदऋतूंशी आहे, आणि त्याचा सहजस्फूर्त आविष्कार म्हणून मानवी अुत्फुल्लतेशी आहे; तर मग त्यात धर्मरूढींच्या कारणांवरून पेटविले जाणारे वाद कुठून आले?

परंतु आजकाल माणसांचे धर्म समन्वय, समरसता आणि समावेशकता यांच्यापासूनच दूर चालले आहेत. फटाके फोडणे हे आजच्या काळाला योग्य आहे की नाही, याचे अुत्तर नेमकेपणाने द्यायचे तर त्याला काल जन्मलेली बालबुध्दीही पुरेशी समर्थ आहेे. पण `फटाके च नसले तर ती कसली दिवाळी?' - हा आजच्या प्रौढांचा त्यांच्या बालवयातील प्रश्न त्यांचे वय अजूनही तितकेच लहान आहे, हे दर्शविणारा आहे. अन्यथा आजच्या फटाक्यांच्या धुमधडाक्याचे समर्थन कोणत्याही सहजीवनाचे  धर्माचरण ठरणार नाही. फटाक्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायाालयाने आदेश द्यावा लागतो, हाच खरे तर आपल्या धर्माचा पराभव आहे. पण तितका स्पष्ट बंदीआदेश अैकल्यावर हा केवळ आमच्याच धर्मावर अन्याय आहे असे म्हणणाऱ्या धर्ममार्तंडाना काय म्हणणार? - आपल्याला धर्म कळत नाही, आितकेच म्हणायचे.

या बाबतीत आिस्लामीयांनाही नव्या काळाशी जुळवून घेण्यासाठी काही धाडस दाखवावे लागणार आहे. आजकाल बुरखाधारी महिलांचे प्रमाण वाढले आहे हे तर स्पष्ट दिसते आहे. ती पोशाख-रीत जर त्या महिलांना आवडत रुचत असेल तर कुणाचा आक्षेप असण्याचे कारणच नाही. शहरांतच नाही तर खेडोपाड्यांतही हल्ली पोरीबाळी आपले मुस्कट बांधून फिरत असतात, त्याला कोणी काही म्हणत नाही. त्या गमच्याबांधणीचा अुपयोग काही पोरी घरच्यांची दिशाभूल करून रोमिओगिरीसाठी करीत असल्याचे बोलले जाते; पण तो विषय ज्यांचा त्यांच्यापुरता आहे. मुस्लीमांनी जर महिलांना त्यासाठी धर्माचा बाअू दाखविण्याचे असेल तर ते योग्य नाही. मुस्लीमांना त्या केाण्या प्रेषित काळाशी आपले आजचे नाते जोडण्याचा सराव पडलेला असतो. त्यांचा धर्मग्रंंथ ज्या काळी लिहिला-सांगितला गेला, त्या कालानुसार त्याचे यमधर्मनियम योग्य असतातच. पण ते सदा सर्वकाळ सर्वांसाठी लागू करायचे म्हटले तर अनर्थ होआील. प्रार्थना करण्यासाठी बोलाविण्याचा प्रघातअुत्तमच आहे, पण अल्लातालाच्या स्तुतिपर अजान देताना ती ध्वनिवर्धकावरून द्यावी असे कुरानच्या कोणत्या आवृत्तीत लिहिलेले नाही; अुलट पहाटेची अजान अैकू आल्यानंतर अंथरुणात झोपून राहणे पाप मानले आहे. नमाजला मशीदीत जाताना अेका रस्त्याने जावे आणि दुसऱ्या रस्त्याने, - तेही  न  बोलता, परत यावे - जेणे करून गावातल्या स्थितीचे निरीक्षण करावे; आणि त्यानुसार दिवसभरातील कर्मे आखून घ्यावीत हे मात्र लिहिले आहे, तो त्या काळी लिहून दिलेला धर्म कितीजण आचरतात हा प्रश्न करण्यात अर्थ नाही. पण सर्वोच्च न्यायाालयाने आपल्या राष्ट्नीय घटनेप्रमाणे तोंडी तलाकवर बंदी घातली की यांना आपल्या धर्मावर ते अतिक्रमण वाटते, हे सारेच अजब आणि तर्कदुष्ट आहे.

या किंवा अशा वादविवादांत सगळया धर्मांतून अेक मुद्दा हिरीरीने पुढे केला जातो की, `त्यांनी अमूक तमूक केलेले चालते, मग सगळी  बंधने आमच्याच धर्माला का?' हे म्हणणे वरकरणी तर्काला धरून वाटते, पण ज्यांना काही हिताहित कळते, स्वत:चे कर्तव्य कळते, समाज कळतो, देश कळतो, मानवता कळते.... अशांनी निदान त्या म्हणण्याचा आश्रय घेअू नये. `त्यांचे' म्हणणे-वागणेे चूक असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत; पण ते करण्यापेक्षा त्यांच्या चुकांचीच बरोबरी करणे, -किंवा चुकण्यातच वरचढ ठरणे यात धर्म नाही, तो निखालस अधर्मच आहे. त्या अधर्माचरणात श्रेष्ठत्व कशाला मिरवावे? ध्वनिवधकांवरून अजान देणे किंवा ढोल बडवत जाणे यांत कोणते अधिक चांगले? कोणाचे कोणते हित त्यात आहे हे विचारून पाहण्यात अर्थ नाही. `मंगल वाद्य' म्हणून जर साठसत्तर ढोल बडविणे योग्य असले तर मग फटाकेही धार्मिक सणांचा भागच होआील, आणि पुरुषांनी दोनतीन  बायका करून त्यांनाही अष्टपुत्रा करून त्याचे देव्हारे माजविण्यात धर्मपरंपरा म्हणता येआील.

असल्या आचरट विचारांशी धर्माचा काडीमात्र संबंध नाही. गायीचे मांस सापडले म्हणून कुठेतरी दंगेधोपे करणे  हे धर्मबाह्य आहे, आणि त्याच प्रकारे परधर्मीयांना काफर मानून अतिरेकी विचार आचार जोपासणे हेही धर्मबाह्यच आहे. धारयते आिति धर्म: - जो (समाज)धारण करतो, समाज समतोलाने तोलून धरतो, तो धर्म. आिथे जर निसर्गाचा, मानवी जीवनाचा असमतोलच वाढत असेल तर ती रूढी कोणतीही असो, -अधार्मिकच मानली पाहिजे. आपले राष्ट्न् सर्व धर्मांना घटनेनुसार निरपेक्ष भावनेने सन्मान देते. ते राज्य निधर्मी नाही, अधर्मी तर नाहीच नाही! माणूस नावाचा धर्म पाळला जावा यासाठी शेंडी ठेवली काय अन् दाढी राखली काय. फटाके फोडायचे का नाही हे धर्म ठरवत नाही, पोलीसांनी ठरवायचे असते. त्यासाठी योग्यायोग्यतेचा विचार कायद्याने प्रस्थापित करायचा असतो. ते भान नसेल तर मात्र आपण अधर्मी अराजकाकडेच जाअू. तो धोका निदान शहाण्यांनी ओळखून प्रसारित केला पाहिजे. माणूस टिकला तर त्याच्या धर्माची चर्चा करायची, प्रदूषण किंवा अनैसर्गिक वागण्यातून जर जीवच संंपला तर ढोलफटाक्यांचा किंवा घटस्फोटांचा धर्म तरी कोणी कोणाला सांगावा?

आठवांचे साठव
नाव बदलून घ्यावे?
१९७२ला मी `वाल्मिकी प्रिंटर्स' म्हणून छापखाना सुरू केला, त्यावेळेपासून कामे मिळविण्याचे प्रयत्न यशस्वी होत होते. त्यावेळेच्या पध्दतीप्रमाणे खिळे जोडून (कंपोजिंग) मजकूर तयार करावा लागे. नंतर १९८१च्या प्रारंभी ऑफसेट मशीन आणले, त्यावेळी हे तंत्र पुण्याच्यानंतर केवळ आमच्याकडेच आले होते. सांगली कोल्हापुरातही ते नव्हते. त्यामुळे अेक स्प्रिंग किंवा नटबोल्ट लागला तरी पुण्याला पळावे लागायचे. शिवाय त्या तंत्रासाठी निगेटिव्ह पॉझिटिव्ह, प्रोसेसिंग वगैरे आिकडे कुठे शोधणार? त्यांतच आमचे अनेक प्रयोग सुरू असत. कधी हाताने अॅल्यूमिनियमच्या पत्र्यावर लिहून ती प्लेट मशीनला लावायची, कधी त्यावर झेरॉक्स मारून पाहायचे, कधी मार्किंग शाआीने त्यावर चित्रे काढून पाहायचे. यात बराच वेळ जायचा, पैसे जायचे. पण जिंकलो की सगळया कर्मचाऱ्यांना भज्यांची पार्टी द्यायची. -म्हणजे आणखी खर्चच!

सांगली वसाहतीतील अेका मोठ्या अुद्योजकाचे अेक काम मी आणले. त्यांच्या अुत्पादनांचा क्रॅटलॉग त्यांना करून हवा होता. तो छापण्यासाठी वास्तविक त्यांनी पूर्वीच्या रीतीने ब्लॉक्स केलेले होते. पण आम्हालाच ऑफसेटची हौस -म्हणून `त्या पध्दतीने अुत्तम काम होते...' वगैरे सांगून त्यांना आम्ही भरीला घातले. प्रथमपासून सगळी जमवाजमव करून ते काम पूर्ण करण्यात खूप दिवस खर्ची पडले. त्यांना त्यांच्या मार्केटिंगसाठी ते क्रॅटलॉग लवकर पाहिजे होते; आणि वक्तशीर काम करण्यात आम्ही शड्डू मारत असल्यामुळे त्यांनी ते आमच्यावर सोपविले होते. त्यांच्याकडून तगादे आणि आमच्याकडून खरोखरीचीच कारणे सांगत बराच काळ गेला. त्यांची चिडाचीड सुरू झाली. आमचा तर काही आिलाज चालत नव्हता. आमचे प्रयत्न अगदी प्रामाणिकपणे चालू होते. पैशाचा आणि परवडण्याचा विचार न करता लढत होतो, पण आमच्या प्रयोगांचे त्यांनी काय करायचे?

शेवटी अेकदाचे काम छापून झाले. आता आम्ही त्यांना त्या छपाआीवर वॉर्निशिंग करून घ्यावे असे सुचविले. ते काय करायचे ते करा म्हणाले. वॉर्निशिंग मशीन जवळ कुठे अुपलब्ध नाहीत. मग आमचा नवा प्रयोग! -आमच्याकडे कागदावर रेघा मारण्याचे(रूलिंग) मशीन -आम्हीच तयार केलेले होते. त्यावर अेक हीटर टांगला आणि त्याखालून वॉर्निश ऑआील फासलेलेेे कागद सरकवत सगळी छपाआी चकाचक केली. जॉबवर आम्ही खूश झालो. त्या कागदांचे स्टिचिंग वगैरे करून क्रॅटलॉग मस्त तयार झाले. ते नीट पॅकिंग करून बांधले. रात्री अुशीरा हे सारे तय्यार करून सकाळी अुजाडता मोटरसायकलने सुटलो; आणि सांगलीच्या त्या अुद्योजकाकडे गठ्ठा पोच केला. आितक्या लवकर मला दारात पाहून त्यानेही मला चहापाणी केले. गठ्ठा ठेवून घेतला.

परत ४० किमी गाडी चालवत आलो, आणि दारातच निरोप मिळाला, म्हणून त्या कारखानदारास फोन केला. तो खूश झाला असणार म्हणून कौतुक अैकण्याच्या तयारीत राहिलो, तर त्याने मला `असाल तसे या' अेवढेच म्हटले. काय करणार? पुन्हा गाडी दामटली. त्याने तो साऱ्या छपाआीचा गठ्ठा माझ्यापुढे अुघडून  ठेवला. त्याचा अेक अखंड ठोकळा बनला होता. त्या वॉर्निशमुळे सगळे अेकत्र बांधलेले कागद अेकमेकाला जाम चिकटले होते, आणि त्याची अेकसंध वीट बनली होती. मी हताशपणी परत निघालो, संताप विसरून तोही मला हसत होता.
परत आल्यावर मी अंमळ सावरलो. बचेंगे तो और भी लडेंगे, असे म्हणून त्याला माफीचे अेक छान पत्र लिहिले. आम्ही नवीन असलो तरी प्रयत्नांत कसूर नाही, असे म्हणून पुन्हा काम असेल त्यावेळी कळवा असेही नम्रपणे लिहिले. त्याचे चार दिवसांनी अुत्तर आले, ``....आपण आपटे नसून गोडबोले आहात -'' तो सद्गृहस्थ आता नाही. तो कारखाना आजही त्याची पुढची पिढी चालवते, पण त्या गल्लीतून जाण्याचे मला आजही धाडस होत नाही.
-वसंत आपटे, किर्लोस्करवाडी फो.नं. ९५६१३९०८९०

गोठणे हे गाव `देवाचे' कसे झाले?

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबआी-गोवा महामार्गावर राजापूर आहे. त्या अैतिहासिक गावात आिंग्रजांच्या आीस्ट आिंडिया कंपणीची मोठी वखार होती. त्या तालुक्यात  राजापुराच्या थेट पश्चिमेला गोठणे आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत  गावाला जाण्यासाठी रस्ता नव्हता. राजापुरापासून रा प म बसने जैतापुरास जायचे आणि तिथून तरीतून खाडी ओलांडून पुढे गोठण्याला जायचे असा प्रवास होता. आता तिथे पूल झाल्यामुळे थेट गावापर्यंत रस्त्याने जाता येते. समुद्रापासून गाव थोडेसे आत आहे. गावाला पूर्व-पश्चिम नदी आहे, तिचे नाव काजवी. त्या नदीतून भरतीचे पाणी खाडीतून गावालगत येते.तिथे खोत आपटे यांचे शेत आहे. आपटे बरेच असल्यामुळे त्या भागात त्यांच्याकडे असणाऱ्या वृत्ती(कामे -कर्तव्ये)वरून त्यांना ओळखण्याची रीत आहे. ज्या आपट्यांकडे काही शेतजमिनींची खोती असे, ते खोत आपटे. काहींकडे गावचे कुलकर्णीपण असे  ते कुलकर्णी आपटे. आपटे कार्यसमितीच्या कामात १९९९ पासून काही काल मुंबआीच्या गिरगावात राहणारे -मूळचे गोठण्याचे  कुलकर्णी, केशव पुरुषोत्तम आपटे होते.
गावाच्या लगत तीन बाजूंनी डोंगर आहे. गावात शंकराचे मंदीर आहे, त्याला गोवर्धनेश्वर म्हणतात.श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी भार्गवरामाची मूर्ती आणून ती १७६५ सुमारास तिथे आणली आणि गोवर्धनेश्वराच्या मंदीराजवळच दुसरे मंदीर अुभारून तिथे बसविली. देव भार्गवराम या गावात आल्यावर त्यास देवाचे गोठणे म्हणू लागले. शासकीय नकाशात जैतापुराच्या दुसऱ्या बाजूला आणखी अेक गोठणे आहे. पण हे भार्गवरामाचे गोठणे `देवाचे' म्हणतात.
आपटे कुलातील तिसऱ्या पिढीत मूळच्या आजगावाहून स्थलांतर केलेल्या दोन बंधूंनी (महादेवभट आणि पिलंभट) देवाचे गोठण्ेा येथे वास्तव्य केले.त्यांचा पुढे मोठा वंशविस्तार झालेला आहे. आज पुष्कळ आपटे मंडळी आपले मूळ गाव देवाचे गोठणे असल्याचे मानतात.

Comments

  1. प्रदीप आपटे यांंची कथा चुकिची लिहिली आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन