Skip to main content

Posts

Showing posts from July, 2016

11 July 2016

संपादकीय मंत्र्यांना कामी लावावे केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार आणि खातेपालट झाला आणि राज्यातही तो विधी अेकदाचा पार पडला. पंतप्रधान मोदींनी लगेचच नव्या मंत्र्यांना जबाबदारीचे भान दिले, आणि संसदेचे सत्र तोंंडावर असल्याने त्याची परिपूर्ण तयारी करावी असेही सांगितले, शिवाय १५ऑगस्टपर्यंत आपापल्या गावाकडे जाण्याची तत्परता दाखवू नका, हेही सुनावले. राज्य स्तरावरही त्याच सूचनांचा अंमल व्हायला हवा, पण प्रत्यक्ष तसे कोणकोण वागले हे आपण जाणतोच आहोेत. मंत्रीपद घेअून गावच्या गल्लीत मिरवायचे असते, अेवढेच ज्यांना माहीत आहेे, त्यांचीच आपणा जनतेलाही सवय झाली आहे. फार तर त्या मंत्र्यापुढे आापल्या शेपट्या हलवत अुभारावे, आणि त्याचा कृपाकटाक्ष घडला तर धन्य व्हावे, अशी आजवरची रीत बनली आहे. आपल्या पोराला नोकरी किंवा काहीतरी तत्सम लाभाचे काम असेल तर मधल्या चमच्याला,  त्या मंत्र्यांचा जावआी-पुतण्या अशा कोणाला तरी गाठण्याशिवाय  पर्याय नव्हता. अशा रराज्यकारभाराचा कितीही अुबग आला तरी तो सहन करण्यातच आधीच्या पिढीची हयात सरली. सत्ताबदलाचे परिणाम असोत, तरुण जनता क्रियाशील झाल्यामुळे असो, किंवा माहिती तंत्रज्ञान

20 June 2016

'Aple Jag' ankatil sampadakiy, anya Majkur tumhala avdlyas etarana pathavava. संपादकीय सद्रत्नहार मणि ताइत बाहुदंडी कीं स्नान चंदनफुले आणि लांब शेंडी यांनी खरी घडतसे पुरुषा न शोभा वाणीच भूषण सु-शिक्षित-शब्दगर्भा ।।-वामनपंडित (भर्तृहरीचे नीतीशतक) अपात्रतेचे बोलणे भारतीय रीझर्र्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे लवकरच पदावरून दूर होत आहेत. शासकीय नोकरी किंवा पद, त्याच्या विहित मुदतीनंतर संपवून खुर्ची खाली  करावी लागते. छोट्या-मोठ्या  संस्था व आस्थापनांमध्ये जेव्हा संचालक मंडळ बदलते, तेव्हा प्रशासकीय यंत्रणेतील माणसे बदलली किंवा गरजेनुसार कमीही केली जातात. यात काही गैर मानायचे नसते. आपल्या धोरणानुसार चालणारे प्रशासन असावे, यासाठीच तर लोकशाही मार्गाने सत्ताबदल करायचा असतो. जुनीच धोरणे, जुनीच पद्धत, जुनेच अधिकारी असे ठेवायचे असेल तर आटापिटा करून सत्ताबदल करायचाच कशाला, हा सरळ साधा व्यवहार आहे. पण आपल्या माध्यमांची रीत अशी की, नव्या मुख्यमंत्र्याने आपला सचिव बदलला तरी ती मनमानी असल्याचा कांंगावा होतो; शिवाय तीे बाजूला गेलेेली व्यक्ती किती कर्तबगार होती, याचे पाढे वाचले जाऊन अशा क

20 June 2016

संपादकीय उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करूं नको बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्री नको ।-अनंत फंदी भूक पोटाची अन् डोक्याची  गेल्या पंधरवड्यात साधारण अेकाच वेळी अेकाच राजकीय पक्षाच्या संदर्भात दोन बातम्या प्रसिध्द झाल्या. राष्ट्न्वादी काँग्रेस पक्षाने १६वर्षे ओलांडली त्या निमित्ताने श्री.शरदराव पवार यांचे मनोगत व्यक्त झाले आहे, आणि त्याचवेळी त्यांच्या पक्षाच्या सांगलीतील मेळाव्यात जेवणाच्या नियोजित वेळेअैवजी असह्य अुशीर झाल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांची झुंबड अुडून खुर्च्यांची फेकाफेक झाली, त्यात काही गंभीर जखमी झाले, अशीही बातमी आहे. श्री.पवार यांनी सोेळा वर्षांपूर्वी सोनिया गांधींशी फारकत घेअून वेगळी चूल मांडली, पण त्या चुलीवर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही पाकसिध्दी न होता केवळ धूर  महाराष्ट्नत  कोंदटून गेला हे तर सगळयांनाच कळून चुकले आहे.  तरीही त्यांच्याअेवढी राजकीय स्थितीची जाण आणि लोकांची नस माहीत असलेला नेता महाराष्ट्नत तुरळकच असेल ही त्यांची प्रतिमा आहे. पण त्यांच्या पक्षाचे नाव भ्रष्टाचाराच्या संदर्भात अुच्च स्थानी आहे हे त्यांनीही आडवळणाने मान्य केल्याचे

13 June 2016

रंगसंगतीशी चवसंगती घरात मंगलकार्य चालू आहे. जेवणाच्या पंगती उठत आहेत. सुग्रास अन्नपदार्थांच्या दरवळाबरोबरच रांगोळया सनईचे स्वर आणि उदबत्तीचा सुवास यांचा परिमळ वातावरणात आहे. पाहुणे या सगळयाचा आस्वाद घेत आहेत आणि तृप्तीची ढेकर देत आहेत! पण रांगोळया, सनईचे स्वर आणि उदबत्तीचा दरवळ यांना पंगतीतून वजा केले तर पाहुणे जेवणाचा तेवढाच आस्वाद घेऊ शकतील का? जेवणाची चव तीच आणि बेत तोच असला तरी, पाहुण्यांच्या तृप्तीची पावती तीच असेल का? नाही! पंगतीतील या गोष्टी वगळल्या तर तेच जेवण नीरस आणि बेचव होऊन जाईल! अन्नाला पूर्णब्रम्हाची उपमा दिलेली आहे. अन्नाचा सर्वांगाने आस्वाद घेतला तरच क्षुधाशांती होते असे म्हणतात. जेवणातील आस्वाद पदार्थांच्या केवळ चवीवर अवलंबून नसतो, तर त्यामध्ये आजूबाजूचे घटक मोलाची भर घालत असतात. पूर्वजांनी ही गोष्ट जाणली असावी. आपल्या स्वादावर असा बाकी गोष्टींचा परिणाम का होत असावा याचे विश्लेषण त्यांनी केले असेल किंवा नसेलही: पण अलीकडच्या काळात काही परदेशी संशोधकांना मात्र या गोष्टीने बुचकळयात टाकले आहे. आपण खात असलेल्या पदार्थांचा स्वाद हा खाण्यासाठी निवडलेल्या भांड्यांपासून त