Skip to main content

13 June 2016

रंगसंगतीशी चवसंगती
घरात मंगलकार्य चालू आहे. जेवणाच्या पंगती उठत आहेत. सुग्रास अन्नपदार्थांच्या दरवळाबरोबरच रांगोळया सनईचे स्वर आणि उदबत्तीचा सुवास यांचा परिमळ वातावरणात आहे. पाहुणे या सगळयाचा आस्वाद घेत आहेत आणि तृप्तीची ढेकर देत आहेत! पण रांगोळया, सनईचे स्वर आणि उदबत्तीचा दरवळ यांना पंगतीतून वजा केले तर पाहुणे जेवणाचा तेवढाच आस्वाद घेऊ शकतील का? जेवणाची चव तीच आणि बेत तोच असला तरी, पाहुण्यांच्या तृप्तीची पावती तीच असेल का? नाही! पंगतीतील या गोष्टी वगळल्या तर तेच जेवण नीरस आणि बेचव होऊन जाईल!
अन्नाला पूर्णब्रम्हाची उपमा दिलेली आहे. अन्नाचा सर्वांगाने आस्वाद घेतला तरच क्षुधाशांती होते असे म्हणतात. जेवणातील आस्वाद पदार्थांच्या केवळ चवीवर अवलंबून नसतो, तर त्यामध्ये आजूबाजूचे घटक मोलाची भर घालत असतात. पूर्वजांनी ही गोष्ट जाणली असावी. आपल्या स्वादावर असा बाकी गोष्टींचा परिणाम का होत असावा याचे विश्लेषण त्यांनी केले असेल किंवा नसेलही: पण अलीकडच्या काळात काही परदेशी संशोधकांना मात्र या गोष्टीने बुचकळयात टाकले आहे. आपण खात असलेल्या पदार्थांचा स्वाद हा खाण्यासाठी निवडलेल्या भांड्यांपासून ते उदरभरण करत असताना कोणते संगीत ऐकता इथंपर्यंत बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. एखादा पदार्थ किती आवडला, किंवा आवडला का नाही हे देखील बाह्य घटकांवर अवलंबून असते. त्यामुळेच आजचे हॉटेल व्यवसायिक या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांचा व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करतात.एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील फ्रेंच पाककलातज्ज्ञ जेन अँथेम ब्रिलॅट-सवरिन(गशरप अपींहशश्राश इीळश्रश्ररीं-डर्रींरीळप) यांनी म्हटले आहे की, `दरवळ आणि चव ही वास्तवात एकच संवेदना असते.'(ीाशश्रश्र रपव ींरीींश रीश ळप षरलीं र्लीीं र ीळपसश्रश ीशपीश, ुहेीश श्ररलेीरींेीू ळी ळप ींहश र्ोीींह रपव ुहेीश लहळापशू ळी ळप ींहश पेीश.) वेगवेगळया संवेदनांचा एकत्रित परिणाम आपल्या आस्वादावर होतो.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ स्पेन्स यांच्या मते पदार्थाचा रंग आणि चव यांचा थेट संबंध आपल्या स्वादाशी असतो. आपणच प्रत्येक रंगाला विशिष्ट चव बहाल केलेली असते. उदाहरणार्थ  म्हणूनच विक्रेते फळांचे ढीग गिऱ्हाईकांसमोर ओतण्याऐवजी त्यांची आकर्षक मांडणी करण्यावर भर देतात. स्पेन्स यांनी एक प्रयोग केला. एकच स्ट्नॅबेरी मूस(साय व अंडी घालून केलेला फळांचा एक पदार्थ) पांढऱ्या आणि काळया अशा दोन वेगळया रंगाच्या थाळीमध्ये घालून खाण्यासाठी दिला. आश्चर्य म्हणजे पांढऱ्या थाळीतून खाणाऱ्यांना, काळया थाळीतून खाणाऱ्यांपेक्षा तो जास्त गोड आणि चवदार लागला.
मूसचा रंग आणि पांढरा रंग यांच्यातील रंगाच्या विरोधाभासामुळे मूसचा मूळचा लाल रंग अधिक उठावदार बनला. पाहुणचार करताना पाहुण्यांवर आपल्या पाककलेची छाप टाकायची असेल तर पांढऱ्या रंगाच्या भांड्यांचा वापर डेझर्टसाठी किंवा इतर पेयपानासाठी करायला हरकत नाही. पांढऱ्या रंगाबरोबरच डोळयांना सुखावणाऱ्या, थंडावा देणाऱ्या रंगांचा वापरही त्यातील पदार्थांची गोडी वाढवत असावा. २००३ मध्ये फ्रान्समधील सदर्न ब्रिटनी (र्डेीींहशीप इीळींींरपू) विद्यापीठातील निकोलस गुईग्यून यांच्या निरीक्षणातून, त्यांनी निळया रंगासारख्या सौम्य रंगाच्या ग्लासमधून दिलेले पेय त्यांच्या विद्यार्थ्यांना, पिवळया रंगाच्या ग्लासमधून दिलेल्या पेयापेक्षा जास्त उत्साहवर्धक आणि तहान शमवणारे वाटले.
अन्नसेवन करताना आपल्या सर्व संवेदनांना जागवणारे आणि तृप्त करणारे घटक महत्वाची भूमिका बजावतात का, असा प्रश्न आहे. स्पेन्स म्हणतात की, इलिनॉसिस येथील नॉर्दम्टन विद्यापीठातील डेव्हिड गाल यांना असे दिसून आले की, पदार्थाची चव सर्वप्रथम चाखणारे जे `टेस्टर्स' असतात, त्यांना टोकदार आकारातील चीजच्या तुकड्यांची चव जास्त झणझणीत वाटते. ताऱ्यासारखा आकार असलेल्या थाळीतून पेश केलेले पदार्थ त्यांना गोल थाळीतील पदार्थांपेक्षा कडू लागतात.
त्यांचे सहकारी बेटिना पिक्रॅरस फित्समन(इशींळपर ळििंर्शीीरी ऋळीूारप) यांनीही काही गंमतीशीर निरीक्षणे नोंदविली आहेत. थाळीतून अगर अन्य पसरट भांड्यांतून योगर्ट खाण्यापेक्षा वाटीसारख्या खोलगट भांड्यांतून खाल्ले तर ते जास्त दाट मधूर लागते. त्यातही ती वाटी जास्त जड आणि महागडी असेल तर ते आणखी दाट वाटते. जड वाटीमुळे आतील योगर्टचेही वजन अधिक असल्याची भावना निर्माण होते आणि त्या भावनेनेच पोट भरते. याउलट प्लॅस्टिकच्या पेल्यामधून पाणी प्यायल्याने तहान भागत नाही. मचूळ लागते. भांड्यांचा आकार आणि रंग यांच्यापेक्षाही जास्त आपल्या संवेदनांना जागे करणारी गोष्ट म्हणजे ध्वनी. आवाजाचे आपल्या संवेदनांवर कसे परिणाम होतात या संदर्भात स्पेन्स यांनी २००४ सालापासून  प्रयोग सुरू केले. त्यांनी लोकांना बटाट्याचे २०० वेफर खाण्यासाठी दिले, आणि प्रत्येक वेफरचा कुरकुरीतपणा आणि ताजेपणा याविषयी टिप्पणी घेतली. हे वेफर खाताना त्यांच्याच आवाजात रेकॉर्ड केलेली ध्वनीफीत त्यांना ऐकविण्यात आली. या ध्वनीफितीमध्ये त्यांच्या खाण्याच्या आवाजाची तीव्रता बदलून ती कमी-अधिक करण्यात आली. आवाजाची तीव्रता जास्त असताना जे वेफर मंडळींनी खाल्ले, ते त्यांना इतर वेफरच्या मानाने जास्त कुरकुरीत वाटले.
या निष्कर्षांमुळे स्पेन्स हे ब्रिटनमधील ब्रे येथील प्रसिद्ध हॉटेलात नामांकित शेफ हेस्टन ब्लूमेंथाल यांच्याबरोबर काम करू लागले. एका प्रयोगात त्यांनी दोन शिंपले चवीसाठी दिले. एका शिंपल्याची चव बघताना लोकांना समुद्राच्या गाजेचा आवाज ऐकविला तर दुसऱ्याची चव बघताना घराच्या अंगणातील काही आवाज ऐकविले. समुद्राची गाज ऐकत खाल्लेले शिंपले या प्रतिनिधींना जास्त रुचकर आणि चविष्ट लागले. त्यातून `साऊंड ऑफ द सी' या `सिग्नेचर डिश' चा जन्म झाला. सागरी खाद्याची ही थाळी परोसताना ग्राहकांना समुद्राचा संथ गंभीर आवाज ऐकविला जातो. कधी लाटांचा खळखळाट तर कधी समुद्री पक्ष्यांचा किलबिलाट असतो. हा पदार्थ खाताना ग्राहकांचा हेडफोन आयपॉडला जोडलेला असतो आणि ते आयपॉड समुद्री शिंपल्यात खोवलेले असते. या डिशची चव चाखताना आणि जोडीने हा आवाज ऐकताना बरेच जण भावूक होतात. काहींच्या डोळयांतून पाणी तरळते. या भावनिक प्रक्रियेमुळेच मूळ पदार्थाची लज्जत कित्येक पटीने वाढते. या डिशची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
घरगुती आनंद मेळाव्यांत आपण असा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? अर्थात, चारचौघांमध्ये हेडफोन वापरणे सोयीचे नसले तरी, काही वेगळया तंत्रज्ञानाचा वापर करून संगीताच्या साथीने पदार्थांचा आस्वाद घेण्याची कल्पना भन्नाट आहे. मसाले जसे लज्जत वाढवितात, तसेच संगीतही पदार्थाची चव वाढवते. ``येणाऱ्या पाहुण्यांची संस्कृती वेगवेगळी असली तरी, संगीताला मिळणारा त्यांचा प्रतिसाद मात्र एकसारखाच आहे.'' एका प्रयोगात त्यांनी वेगवेगळया चवींसाठी त्यांच्या जातकुळीला साजेल अशा वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यास संगीतकारांना सांगितले. या संगीतकारांनी आंबट चवीसाठी वरच्या पट्टीतील काहीसा बदसूर, आणि गोड चवीसाठी सौम्य, कडूसाठी खालच्या पट्टीतील आणि खारट चवीसाठी काहीसे विस्कळीत स्वर असलेली संगीतरचना केली. या संगीत रचनांच्या श्रवणाने त्या त्या चवीच्या पदार्थाचा आस्वाद घेण्याच्या पद्धतीत काही बदल होतात का, हे अजमावून पाहायचे होते. बऱ्याचदा त्याच उपाहारगृहातील काही खानसाम्यांनी सिंडर टॅाफी (उळपवशी ढेषषशश)नावाचा एक नवीन पदार्थ खायला देताना गोड चवीसाठी व्हायोलीन तर कडू चवीसाठी `ट्नॅम्बोन' या वाद्याची धून ऐकविली. व्हायोलीन वाजविले तेव्हा पाहुण्यांना टॉफीची चव अधिक गोड तर ट्नॅम्बोन च्या वेळी टॉफीची चव कडू वाटली.
     काळाच्या ओघात आता जिव्हातृप्तीची संकल्पना बदलते आहे. रंग-रूप-रस-गंध यांच्याबरोबरच श्रवण संवेदनांनी परिपूर्ण अशा पूर्णब्रम्ह अन्नाने पाहुण्यांची स्वादतृप्ती करणे हे आधुनिक बल्लवाचार्यांपुढील आव्हान आहे. पाककला हे शास्त्र आहे, आलेल्या पाहुण्यांचा जठराग्नी चेतवण्यासाठी या अन्नपदार्थांना आकर्षक रीतीने मांडणे, ही कलात्मकता आहे. पण इथून पुढच्या काळात मात्र पदार्थांची अशी वैशिष्ट्यपूर्ण सजावट, ते पदार्थ वाढण्यासाठीच्या भांड्यांचा वैशिष्ट्यपूर्ण आकार आणि रंग यांचा विचार, एक शास्त्र म्हणूनच पुढे येईल.
हा लेख वाचल्यानंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांना पाहुण्यांना घरी बोलावून त्यांच्यावर आपल्या पाककौशल्याची छाप पाडण्याची तीव्र इच्छा होईल. पण त्या आधी एक गोष्ट आवर्जून करा. पाहुण्यांच्या हाती हा लेख लागणार नाही याची खबरदारी घ्या. नाहीतर तुमच्या या पाककलेचे गुपित त्यांच्यापुढे उघड होईल.
-(संदर्भ- भारतीय अर्थविज्ञानवर्धिनीची अर्थबोधपत्रिका)

संपादकीय
 राजा चाले तेथे वैभव सांगते
हे काय लागतें सांगावे त्या ।।    -तुकाराम
फुकटनीतीला विरोेध
माणसांना काम हवे आणि कामाला माणसे हवीत, ही स्थिती वास्तवात सदैव असतेच. कारण जशी वनस्पतीची अेकही मुळी औैषधी दृष्ट्या निरुपयोगी नसते (ना मूलं अनौषधम्); तसेच अेकही माणूस निरुपयोगी नसतो. मात्र तसे नियोजन आणि त्याचा अंमल करणारे दुर्मीळ असतात (योजकस्तत्र दुर्लभ:)
आपल्याकडे सध्या कामाला योग्य माणसे मिळत नाहीत, आणि चारी बाजूला बेकारी बेकारी म्हणून ओरड चालू आहे. दुकानदारीला, शेतीला, घरकामाला, साध्या सोप्या कामाला माणूस मिळणे कठीण बनले आहे. दहावी बारावीचा निकाल नव्वद टक्क्यांवर गेल्यामुळे त्या सगळयांच्या अपेक्षा अुंचावल्या आहेत. त्यापुढे पदवीचे शिक्षण झाल्यावर तर हात गगनाला टेकतात, पण ज्यांच्याकडे काम मिळण्यासारखे आहे, त्यांना त्या पदवीधरांचा काडीमात्र अुपयोग होण्यासारखा नसतो. या बाष्कळपणामुळे  सुशिक्षित बेकार नव्हेत, तर कामाच्या दृष्टीने बेकार शिक्षितांची फौज मोकाट आहे. समाजाच्या चिंतेचा हा विषय व्हायला हवा.

या परिस्थितीमुळे लोकांची मने सैरभैर होतात, त्यांच्या मन:स्थितीचा फायदा घेणारेही असतात,  त्यांना विद्रोही करणे सोपे ठरते. मग त्यांना त्यांच्या अकारण वाढत्या अपेक्षांच्या भांडवलावर संघटित करण्याचे प्रयत्न चालतात. आंदोलने सुरू होतात. आम्हाला अनुदान द्या, सवलती द्या, आरक्षण द्या, फुकटचे काय असेल ते द्या... अशा मागण्या चालू होतात. कुणा अेका गटाची मागणी योग्य म्हणून ती मान्य करावी तर दुसरे अुठून अुभे राहतात. `त्यांना दिले, तर मग आम्हाला का नाही' असा त्यांचा प्रश्न असतो. आजकाल  तर शेतकरी, अुद्योजक, विद्यार्थी, बालके, ज्येष्ठ नागरिक, महिला... सगळेच्या सगळे या मागामागीत पुढे घुसू पाहात आहेत. देणारा कोणीच नाही, आणि अुपलब्धही फारसे काही नाही.

ज्याच्याकडे भरपूर आहे, तोही मागायला कमी पडत नाही. त्याला समाधान कधी कसे मिळणार हे समजत नाही. तरीही आपला देश `असेल त्यात समाधान मानावे' असे मानणारा आध्यात्मिक वृत्तीचा आहे, असा अेक गोड गैरसमज आपण मनाशी कुरवाळलेला आहे.  या पार्श्वभूमीवर स्विट्झर्लंड मध्ये ज्या मुद्द्यावर सार्वमत घेण्यात आले, त्याच्याकडे आपल्या माध्यमांनी फारसे लक्ष दिलेले नाही. तिथे लोकांकडे महामूर पैसा आहे, सर्व सुखसाधने आहेत, शिवाय चांगले नागरिकत्व जपण्यामुळे सार्वजनिक जीवन खूपच स्वस्थ आहे. सुखी समाधानी मनांच्या निकषांवर जी जागतिक पाहणी झाली, त्याच्या क्रमवारीत त्या देशाचे नाव अुंच टोकावर आहे, त्या मानाने  आपल्या भारताचे नामांकन लांब खाली कुुठेतरी असेल हे सांगायलाच हवे असेल तर तो क्रमांक  १३५वा आहे. ते देश असे फुकटासाठी मागामागी करत नाहीत. त्याचे प्रत्यंतर त्या सार्वमतांतून आले आहे.

पश्चिमेच्या देशांत अेकूणच अुद्योजकता फार अधिक आहे. स्विट्झर्लंड हा देश निसर्गाने प्रेक्षणीय आहे. लोेकसंख्या बेताची आहे. लोक  परस्पर पूरक नागरिकत्व सांभाळतात. अेकमेकांचा विचार करतात. त्याचे दरडोआी अुत्पन्न भरपूर आहे. तरीही तिथे लोकांना आता पुरेसे काम नाही. यांत्रिकीकरण जास्त आहे, त्या मानाने शेतीसारखा मनुष्यबळ खपविणारा धंदा समृध्द नाही. हवामान जमीन पाअूस या गोष्टी आपल्याआितक्या अनुकूल नाहीत, त्यामुळे अुद्योग व पर्र्यटन ही अुत्पन्नाची साधने ते लोक कसोशीने वापरून घेतात. त्यामुळेच तिथे लोकांना संपन्नता आहे, आपल्यासारखे कर्मदारिद्र्य नाही. काम करून पैसा कमवावा यात नैतिकता सांभाळता येते हे त्यांचे खुले तत्त्व आहे. त्यामुळे पैसा कमावण्यात त्यांचे अध्यात्म वा धार्मिकता आडवी येत नाही.

असे असल्यामुळे त्या देशात ज्यांना काम नाही, त्यांना बेकारभत्ता स्वरूपाची काही आर्थिक मदत द्यावी काय असा प्रश्ण देशापुढे होता. ज्येष्ठ नागरिक किंवा सुशिक्षित बेकार किंवा तत्सम काही घटक,  - ज्यांना पैसा कमावता येत नाही  -अशांना कायमचा पैसा देत राहावे असा प्रस्ताव होता. देशाच्या तिजोरीत आणि लोकांकडेही भरपूर पैसे असल्यामुळे तसा फुकट, बिनकामाचा पैसा गरजूंना देण्यात काही अडचण तिथे नाहीच. असे फुकटचे पैसे वाटावेत असा ठराव संसदेनेही पारित केला, पण त्या प्रस्तावावर सार्वमत घेण्याचे ठरले. त्यासाठी मतदान झाले. लोकांनी अुत्तम मतदान करून या राष्ट्नीय प्रश्नावर आपला अभिप्राय नोंदविला.आपल्याकडच्या  परिस्थितीला आश्चर्यकारक असा त्या मतदानाचा निकाल लागला. तो म्हणजे तेथील ७७ टक्के लोकांनी, असा फुकटचा पैसा वाटण्याला स्पष्ट विरोध केला आहे. ज्या लोकांनी आपल्या कष्टाने वा चतुराआीने भरपूर पैसे मिळविले आहेत, आणि सरासरीने सर्वांच्याकडेच पैसे आहेत, त्या समाजाने कोणत्याही कारणाने असे फुकटचे पैसे वाटायला स्पष्ट बहुमताने साफ नकार दिला आहे.

पुरेपूर प्रयत्न करूनही काही जीवांना आपली गुजराण करता येत नाही, त्याचप्रमाणे ज्यांनी समाजासाठी, देशासाठी   -खरोखरीच  काही योगदान दिले, पण आता त्यांना चांगले जगण्यासाठी काही सुविधांची गरज आहे; अशांना सरकार नावाच्या व्यवस्थेने मदत केलीच पाहिजे. पण त्याचे प्रमाण काय असावे, किती असावे, कुणासाठी असावे याचा काहीतरी विचार महत्वाचा ठरतो. ज्यांना काम नाही, त्यांना फुकट पैसे देण्याची प्रथा आज क्रॅनडा, आिटली, फ्रान्स अशा काही देशांत आहे, किंवा येअू घातली आहेे. स्विट्झर्लंड हा तर त्यांच्या तुलनेत जास्तच आर्थिक संपन्न देश आहे. पण त्या देशातल्या नागरिकांनी फुकटचा पैसा वाटण्याला नकार दिला आहे.

त्याची कारणे दोन देण्यात येत आहेत. अेक म्हणजे त्यामुळे काही न करता बसून खाण्याची वृत्ती वाढेल व लवकरच देशाची अर्थव्यवस्था ढासळेल. आणि दुसरे म्हणजे असल्या सोयीमुळे बाहेरच्या देशांतून लोकांंचे  लोंढे आपल्या देशात येतील. आपल्या देशाची प्रतिमा `कामांतून संपन्न झालेला देश' अशी आहे, ती लयाला जाआील, आणि `फुकट खाअू घालणारा देश' अशी होआील, तसे होता कामा नये! बाहेरच्या जगात जे संपन्न म्हणविलेे  जाणारे समाज आहेत, ते कोणत्या प्रकारची काळजी घेतात हे आपण यांतून पाहण्यासारखेे आहे.

या संदर्भात अेक गोष्ट आठवते. अेक फिरता व्यापारी दूरच्या गावाला बाजारासाठी चालला होता, वाटेतल्या वनातून तो जात असताना त्याला सिंहाची गर्जना अैकू आली. तो घाबरला, मालाचे बोचके झाडाखाली टाकून तो घाआीगडबडीने झाडावर चढला. वरून त्याने पाहिले, तर जवळच्या अंतरावर कोल्ह्याचे अेक मरतुकडे अधू पिलू कुंआीकुंआी करत पडले होते. या माणसाच्या लक्षात आले की डरकाळत येणारा सिंह या पिलाला खाअून टाकणार! सिंह जवळ आला, पण त्याच्या तोंडात अगोदरच मारलेले अेक जनावर होते. ते घेअून सिंह आला, त्याने त्यातले बरेचसे खाल्ले आणि शिल्लक राहिलेला भाग ओढत त्या कोल्ह्याच्या पिलापुढे आणून टाकला. सिंह बाजूला गेला मग त्या भुकेल्या पिलाने ते खाल्ले. झाडावरून हे सर्व पाहात असलेल्या व्यापाऱ्याच्या मनात आले, `परमेश्वर तरी किती दयाळू आहे. तो सगळया सजीवांची काळजी घेतो. मग मी तरी कशाला हा सारा अुपद्व्याप करावा? माझे पोट भरण्यासाठी तोही बसल्याजागी देआीलच की..! आहेच जर हरी, तर देआील  खाटल्यावरी...' व्यापाऱ्याने आपल्या मालाचे बोचके अुचलले, आणि तो त्याच पावली माघारी वळला. निवांत घरी येअून बसला. काम करायचे बंदच केले. परमेश्वरच आपल्याला देणार हे तो पक्के समजून चालला. पुढे काय होणार? पुंजी संपली, फाके पडू लागले. बायको-पोरं ओरडू लागली. हा ढिम्म. अेके मध्यरात्री परमेश्वरापुढे जाअून म्हणाला, `देवा, हा काय न्याय झाला ? त्या मरत्या कोल्ह्याच्या पोराला तू खायला आणून देतोस, आणि मी आिथं अुपाशी मरतोय ते तुला कळत नाही का?' परमेश्वर त्याच्या स्वप्नांत आला आणि म्हणाला, `तू म्हणतोस ते खरच आहे. दुबळयाला खाअू घालण्याची मी सोय करतो. पण तुझ्याकडं मी त्या सिंहाची भूमिका दिली होती, दुर्बळ कोल्ह्याची नव्हे ! तू काम करून गरजूंना खाअूू घालायला हवंस.'

आपल्याला या साऱ्यातून बरेच काही शिकायला हवे !


हेल्मेटची अजब सक्ती
           मे महिन्यातील एका अंकात, दुचाकीवाल्यांस हेलमेट सक्तीविषयी मजकूर आहे. आपल्या शहरांतील वाहनांचा सरासरी वेग २०किमी असतो. हेल्मेट चालकाची दृष्टी (व्हिजन) साधारण ४५ अंश आितकी मर्यादित होते, जर त्या हेल्मेटला वाआिजर असेल तर व्हिजन चा अँगल आणखी कमी होतो. बाजूने जाणाऱ्या आितर वाहनांची कळत- न कळत होणारी जाणीव खूपच कमी होते. शिवाय हेल्मेटचे आडमापी धूड सतत हाती वागवावे, किंवा कुलुपबंद करावे ही कटकट. हेल्मेटमुळे केसांत घाम फार येतो, त्यामुळे अनेकांचे केस गळतात, त्यांची केशरचना विस्कटते. माझे निरीक्षण असे आहे की, हेल्मेट डोक्यावर घातले की दुचाकी गाडी जास्त वेगाने रेटण्याची उबळ वाढते. हेल्मेटसाठी पैशाचा भुर्दंड आणि कान नाक डोके यांस मोकळी हवा न मिळाल्याने अुबल्यासारखे होते, ते वेगळेच! आपल्यासारख्या कूर्मगती देशात हेल्मेट व सीटबेल्ट यांची काही गरज नाही.  त्यातूनही ज्यांना ते घालायचे असेल त्यांना कोणी अडविलेले नाही. सक्ती करण्यामागे कारखानदार व राज्यकर्ते यांचे साटेलोटे असणार ही शंका येते
                         
श्लोकपूर्ती
     मे अंकात श्री दांडेकर यांनी एक श्लोकार्ध दिला होता मी त्याबद्दल शेाध घेतला, खालील माहिती मिळाली.
लुब्धमर्थ प्रदानेन श्लाघ्यमञ्जलिकर्मणा ।
मूर्ख छन्दानुवृत्त्या च याथातथ्येन पण्डितम् ।।७ ।।
 हा श्लोक पुढील संकेतस्थळावर मिळाला......
हींींि://ुुु.वीललिेक्षीशलीं.ेीस/लरपेप
मूळ ग्रंथ नीतिशास्त्र (संगणीकृतम बौद्धसंस्कृतत्रिपिटीकम्) यातील तिसऱ्या अध्यायातील सातवा श्लोक.
-रवींद्र हरि अभ्यंकर, २०६५ सदाशिव पेठ, पुणे-३०
आभार-
    वरीलप्रमाणे शोध घेऊन या श्लोकाची माहिती मला श्री.रवींद्र अभ्यंकर यांनी स्वत: माझ्या घरी आणून दिली. त्यानिमित्ताने त्यांच्याशी परिचय झाला. त्यांनी तसदी घेऊन माझी जिज्ञासापूर्ती केली, त्यांचे मोल किती व कसे मानावे? याबाबतीत `आपले जग' ची भूमिकाही महत्वाची, त्यांचा वाचक असा व्यासंगी आहे हे कळून आले. त्याबद्दल आभार. -र.ग.दांडेकर, पुणे ५१

प्रतिक्रिया
``मी तो हमाल! भारवाही!''.....आपले जग  

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन