Skip to main content

Posts

Showing posts from June, 2012

aathvanche saathav in 25 June 2012

आठवांचे  साठव..... तिघांचे जाणे मला आठवते तेव्हापासून ज्यांना पाहात आलो, अशा तीन व्यक्ती गेल्या आठदहा दिवसात काळाआड गेल्या. त्यांनी आपापल्या परीनं सुखी संसार केला, आणि त्यासाठी मन:पूर्वक प्रामाणिक खस्ता खाल्ल्या. त्यामुळं गावात ती भली माणसं म्हणून ओळखली गेली, त्यांच्या जाण्याची हळहळ ठेवून गेली. ८५-९० च्या वयातील त्यांंचं जाणं तसं धक्कादायक किंवा अकाली नव्हे, पण स्थिरचित्तानं आपली खेळी करून चांगला `स्कोअर' उभारणारा खेळाडू आऊट झाल्यावर एक रुखरुख वाटायची ती वाटतेच. सदाशिव कृष्ण कुलकर्णी हे जवळच्या पलूस गावचे जमीनदार घरातले होते. त्या काळच्या अजस्त्र कुटुंबाची निर्वाह चिंता आणि परिस्थिती यांच्या विचारातून पांगापांग झाली. किर्लोस्करवाडीच्या कारखान्यात नोकरी पत्करून ते वाडीजवळ राहायला आले, त्यांच्या तिशीपासून ते `एस.के.तात्या' म्हणूनच ओळखले जाऊ लागले. आमच्या मळयात त्यांचे बिऱ्हाड राहिले, प्रपंच-पाणी-नोकरी एवढ्या व्यापात अडकलेले ते दिसत. नाटक हा त्यावेळी पुष्कळांचा छंद होता. तात्यांनी ऐतिहासिक नाटकात कामे केली. सरदार बाजी घोरपडे यांच्या तरवारधारी वेशातला त्यांचा फोटो आमच्या घरी

Lok kaya boltat in 25 June 2012

ग्रंथाचा प्रसार आवश्यक,  ग्रंथपालाचा नको आपल्या ४ जूनमधील अंकात ग्रंथालय पडताळणी याविषयी मजकूर आहे. ग्रंथालय ही गरज आहे याचा विसर पडला आहे. शाळा कितीतरी वाढल्या पण त्यांनाही ग्रंथालय हा विषय गौण वाटतो. ज्या गावात हायस्कूल आहे तेथे वास्तविक वेगळया ग्रंथालयाची गरज नाही. शाळांसाठी ग्रंथालय अनुदान काल-परवापर्यंत दिले जाई. वेगळे ग्रंथालय, त्याची व्यवस्था, कर्मचारी यासाठी पुन्हा पैसे वाटण्यापेक्षा माध्यमिक शाळांना त्या सुविधा द्याव्यात आणि नागरिकांसाठी तेथील पुस्तके ठराविक वेळेत उपलब्ध करून द्यावीत. एखाद्या छोट्या खेड्यात वेगळे वाचनालय असायला हरकत नाही, पण त्यासाठी सरकारने इतके पैसे खर्चू नयेत. किमान ज्या गावात हायस्कूल आहे, त्याच गावात सरकारी मदतीचे वाचनालय-ग्रंथालय आवश्यक आहे. आणि ती गरज शाळेमार्फत भागू शकते. जिथे एकापेक्षा जास्त माध्यमिक शाळा असतील अशा गावांत मोठमोठे ग्रंथ, कोश, सीडी असे मूल्यवान साहित्य विभागून खरेदी करून उपलब्ध ठेवावे. अमूक ग्रंथ गावातील कोणत्या शाळेच्या ग्रंथालयात आहे ते सांगणारी सूची करता येईल. प्रत्येक शाळेत हल्ली संगणक आहेत. त्याचा वापर त्यासाठी व्हावा. `कर

Sampadkiya in 25 June 2012

खंडणीखर्चास मान्यता आपल्या मिळकतीवर कर भरावा लागतो. मिळकत होण्यासाठी करावा लागणारा खर्च मान्य करून निव्वळ नफा करपात्र असतो. खर्चाच्या बाजूला प्रवास, पाहुणचार, जाहिरात, बुडीत किंवा वसूलीसाठी नाइलाजाने होणारा खर्च.... वगैरे रक्कमा वजावट मिळतात. पण हल्लीच्या काळात व्यवसाय करताना काही खर्च असे असू शकतात की ते कायदेशीर नसतात, पण करावेच लागतात. लाच द्यावी लागते हे वास्तव आहे परंतु ती देणाराही दोषी मानला गेल्यामुळे तो खर्च संमत होत नाही. नागरिकांचे संरक्षण हीसुद्धा शासनाची जबाबदारी आहे तरीही ती शासनाला पार पाडता येत नाही, म्हणून खाजगी सुरक्षा-दळे तैनात करावी लागतात. हा सुरक्षेचा खर्च शासकीय करनिर्धारण अधिकारी मान्यच करतात. म्हणजे एका अर्थी शासन नागरिकांचे संरक्षण करण्यात आपली असमर्थताच स्पष्ट स्वीकारते. यापुढचा टप्पा  अपहरणाचा आहे. मध्य प्रदेशातील एक बिडी उत्पादक, तेंदूची पाने खरेदीसाठी गेले असता त्यांना एका टोळीने पळवून नेले व सुटकेसाठी खंडणी मागितली. २२ दिवस भीतीग्रस्त वाटाघाटी केल्यावर ५.५ लाख रुपये खंडणी देऊन त्यांनी सुटका करून घेतली. आयकर पत्रके भरताना त्यांना `सर्वसाधारण खर्च'

lekh of Dr.Sanjeev Sharangpani

`अ'सत्यमेव जयते...? आमीर खान नावाच्या मनस्वी माणसाने `सत्यमेव जयते'च्या पहिल्या तीन विषयांना हात घातला. त्यापैकी दोन विषयांचे `कूळ' सामाजिक असले तरी `मूळ' वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. `स्त्री भ्रूण हत्या' आणि `वैद्यकीय क्षेत्रातील गुन्हेगारी' या दोन विषयांबाबतची वस्तुस्थिती विषण्ण करणारी आहे. हे घृणास्पद गुन्हे आहेत याचा विसर आपल्या देशातील संपूर्ण समाजाला आणि विशेषत्त्वाने वैद्यकीय व्यवसायिकांना पडला आहे. `मुलगा हवा - मुलगी नको' या मलीन मान्यतेपायी बाजारी प्रवृत्तीने गल्लोगल्ली, गावोगावी हैदोस घातला आहे. आजदेखील हा बाजार तेजीत सुरू आहे. या बाजाराला थोपवण्याची प्राथमिक जबाबदारी वैद्यकीय व्यावसायिकांची आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) सन २००८ राष्ट्नीय अध्यक्ष डॉ.अशोक आढाव (नागपूर) यांनी SAVE THE GIRL CHILD - LET GIRLS BE BORN  या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ सन २००५ साली रोवली. आजसुद्धा आय.एम.ए.च्या माध्यमातून डॉक्टरांना सजग आणि सुजाण करण्याचा कार्यक्रम राबवला जातो, तसेच जनजागृती केली जाते. डॉक्टर्स आणि औषधनिर्मिती कंपन्यांचे साटेलोटे याबाबत रास्त

matter in 18 june 2012

माणूस महाग झाला महागाई आणि दरवाढ सगळया बाबतीत लागू झालीच आहे. त्यासाठी जगाच्या पाठीवरची आकलन न होणारी कारणे दिली जात असतात. मनुष्यबळ आणि रोजंदारीचे दर वाढण्यास काही कारणे असतील पण कामाल माणसे मिळत नाहीत हेसुद्धा मजुरीवाढ होण्याचे कारण आहे. स्वयंपाकाचा गॅस वाढला यारा आंतरराष्ट्नीय कारणे असतील पण गॅस मोटरकारसाठी, वेल्डिंगसाठी वापर करणारे आपण आहोत. हे प्रकार लक्षात येऊनसुद्धा त्याकडे आपणही डोळेझाक करतोच. घरगुती सिलिंडर ४०० रु.तर हॉटेल्ससाठी १५६५ रु.एवढी किंमत असते. काही ग्राहक आपली गॅसटाकी ४०० ला घेऊन ७-८ शे रुपयांत हॉटेलला विकतात. एकूणच अवाढव्य व्यवहारांत हे प्रमाण फार मोठे नसेल पण टंचाई म्हणायला ते पुरेसे ठरते. मुंबईत पाईप गॅस जोडणी ५.४७ लाखपैकी ३.९३ लाख ग्राहकांनी आपले रिकामे सिलिंडर परत केले नाहीत. शिवाय सीएनजी साठी दिलेले सिलिंडर परत आले नाहीत. त्यामुळे पुन्हा भरणीसाठी सिलिंडर उपलब्ध नाहीत. त्यामुळे टंचाई वाढते. मुंबईत गॅसवितरकांकडे काम करायला माणसे मिळत नाहीत! गॅसवाल्यांकडे संध्याकाळी कर्मचारी कामाला तयार नसतात. ६ नंतर सिलिंडर भरून मालमोटार आली तरी उतरवून घेता येत नाही. घरपो

sampadkiya in 18 June 2012

मुक्त  बंदी पुन्हा एकदा  गुटखा बंदी जाहीर करून सरकार स्वत:चे हसे करून घेत आहे. आजवर अनेक गैर गोष्टींना बंदी घालून त्याच गोष्टी राजरोस चालविणाऱ्यांकडून पैसे कमावण्याची सोय करण्यात आली. त्यामुळे `गुटख्यावर बंदी' या शासकीय निर्णयाचा संबंध लोकहिताशी नाही हे आजच्या व्यवहारी पिढीतील गावठी इंग्लिश मीडीयमचे पोरही सांगू शकेल. गुटखा लॉबीने संंबंधित खुर्चीसमोरच्या दानपेटीत मागणीइतका स्वेच्छा निधी अर्पण केला नसेल असाही संशय उघडपणी व्यक्त होण्याइतकी अविश्वासू पद्धत सरकारने रूढ केली आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर बंदी, याचा अर्थ त्यात गोळा होणाऱ्या गाठोड्याला आणखी मोठे भोक पाडणे असा घेतला जाईल; गुटखा खरोखरीच बंद होण्याची शक्यता नाही. या सरकारी कायद्यांनी ज्या ज्या गोष्टींवर बंदी घातलेली आहे, आणि बंदी आजही लागू आहे अशांची यादी कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यासही ठाऊक नसते, तिथेे गैरप्रकार सर्रास करत राहिलेल्या जनसामान्यास कसे ठाऊक तरी असणार? मिरवणूक-वरातीपुढचा कर्कश्श बेंडबाजा ऐकत दुतर्फा पोलीस मंडळी रात्रभर बंदोबस्त करत असतात. त्याचा फारच कंटाळा आला तर स्वत: कोणत्या खोक्याशी थांबून एक पुडी घशात

Lekh on Education by Atul Gavade

शिक्षणचालकांची बांधिलकी - अतुल गावडे पावसाळा आला आणि शाळा सुरू झाल्या. कोपऱ्या-कोपऱ्यावर शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवाहन करणारे डिजिटल बोर्ड लागले. त्यातील मोहक चित्रे पाहिली की ती किती उथळ आहेत हे लक्षात येतेच. शिक्षणसंस्थांचा सध्या सुकाळ झाला आहे त्याचे कारण शिक्षणप्रसार हे नाही. कशासाठी स्थापन होते ही शिक्षणसंस्था किंवा शाळा? तुमची दूरदृष्टी (व्हिजन) काय आहे, उद्दिष्टे (ऑब्जेक्टिव्हज्) काय आहेत आणि ती साध्य करण्याकरिता तुमच्याकडे काय कार्यपद्धती (मिशन) आहे असे प्रश्न जर आपण या संस्थांना विचारले तर?  उदात्त हेतूने, द्रष्टेपणाने या क्षेत्रात उतरले असणाऱ्यांची संख्याही आहेच. जे संस्थाचालक उदात्त हेतूने या क्षेत्रात उतरले आहेत त्यांच्या सद्बुद्धीचा मान राखून शिक्षणक्षेत्राचा  विचार व्हावा . कोणतीही शिक्षणसंस्था चालवताना आपल्याला कोणत्या प्रकारचे विद्यार्थी घडवायचे आहेत याविषयी निश्चित कल्पना संस्थेतील कर्त्या माणसांना असली पाहिजे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी साधनसामग्री, वातावरण, सोयी-सुविधा निर्माण केल्या पाहिजेत आणि त्यासाठी कार्यपद्धती ठरवणे ही पहिली बांधीलकी आहे. एका विद्याप

Nivedan

श्री रामायण : निवेदन आदिकवी वाल्मिकींनी गायिलेल्या रामायणाच्या मूळ गीर्वाण काव्याचे इंग्रजी रूपांतर चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी केले, त्याचा संक्षिप्त स्वैर अनुवाद प्रसिद्ध करण्याचे योजिले असून तो प्रकल्प खर्चिक आहे. सुमारे ३५० पृष्ठांचा हा ग्रंथ कमीत कमी किंमतीत देता यावा यासाठी आर्थिक साहाय्य अपेक्षित आहे. त्या मदतीवरच प्रतींची संख्या आणि छापील किंमत ठरविण्यात येईल. ग्रंथ ऑगस्ट सुमारास प्रकाशित होईल. सर्व रामभक्तांना, तसेच साक्षेपी वाचकांना आवाहन आहे की, त्यांनी सढळ हस्ते या प्रकल्पास आर्थिक साहाय्य करावे. ग्रंथाचे प्रकाशन वा वितरण यासाठी कोणा व्यक्ती / संस्थेला स्वारस्य असेल तर कृपया लिहावे. - विठ्ठल राजाराम जोगळेकर मदतीचा चेक/रोख `वि.रा.जोगळेकर' या नावाने पाठवावा. पत्ता : द्वारा - दिलीप जोगळेकर, `रामसीता', पोस्टाजवळ, तासगाव (जि.सांगली)  फोन : ९५० ३४११ ५२०

Lekh on Narayan Kelkar

...... समर्थ पायाचा नारायण ...... जे व्हायला हवे होते, ते सांगलीच्या विसावा चौकातील कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन केले. शिवोत्सवाचे निमित्त साधून त्यांनी श्री.नारायण गणेश केळकर या असामान्य माणसाचा हृद्य सत्कार केला. बऱ्याच वेळा, बऱ्याचजणांनी, बऱ्याच जणांकडे यापूर्वी तसे बोलून दाखविले असेल पण सबब कोणतीही असो नारबा केळकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सामुदायिक किंवा जाहीर योग जमून आला नव्हता, ती कर्तृत्त्व नोंद आता झाली याचे मोठेच समाधान आहे. गावभाग सांगलीतील साऱ्या जुन्या नागरिकांना नारायण गणेश केळकर ही व्यक्ती ठाऊक आहे. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९५३ चा म्हणजे आज त्यांना ६० वे वर्ष चालू आहे. १९६०-७०च्या दशकात हा आठ-दहा वर्षांचा मुलगा त्याच्या वयाला न शोभणारी कुबडी आपटत एका पायावर पळापळी करत असताना दिसायचा. बालपणी समई अंगावर पडून पाठीवर भाजल्याचा मोठा प्रशस्त व्रण, आणि कधीतरी उंबऱ्यात अडखळून पाय मोडल्याचे दुखणे पोळत हे पोरगं जवळपासच्या सगळया घरांतून वावरायचं. आई धुणी-भांडी करून पोट चालवायची. दारिद्र्याचा कधी उच्चारही न करता साऱ्या सभोवतालचा हा `नाऱ्या' हे चटके कसे सोसत होता, याच

Lok Kaya Boltat

अमेरिकेला जरा दाखवून द्यावे  आपल्या रुपयाची घसरण सध्या चालू आहे त्यावर अर्थक्षेत्रात चिंता व्यक्त होते. ग्रीस, स्पेन, इटली वगैरे देशातील गुंता मला नीटसा कळलेला नाही परंतु काही महिन्यांपूर्वी हिलरी क्लिंटन भारतात येऊन गेल्या, त्यांची चाल लक्षात येते. इराणकडून भारताला होणारा तेलपुरवठा बंद व्हावा हा त्यांचा उद्देश स्पष्ट झाला, त्यांस अपयश आले. त्या परत गेल्यावर डॉलरच्या तुलनेत रुपाया घसरू लागला. ही घसरण नैसर्गिक नसून `मेड इन यूएसए' आहे असे वाटते. फार काळ ते नाटक चालणार नाही. अमेरिकेला धुडकावून त्याची जागा दाखवून देण्याची ही संधी चालून आली आहे. कारण इराण हा जगात एकमेव देश आहे, तो भारताशी देवाणघेवाण रुपयात करतो. इराणकडून तेल व गॅस आयात कमी करण्याऐवजी दुप्पट करणे आपल्या हिताचे आहे. कारण तेलाच्या किंमतीपोटी त्यांना मिळणाऱ्या भारतीय रुपायातील ८०% भाग इराण भारतीय उत्पादनांच्या खरेदीसाठी वापरतो. आपल्या सर्व व्यवहारांत रुपायावरच भर द्यायला हवा. १. सध्या आयपीएल क्रिकेट सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. या उल्लूपणाची चलती चालेल तेवढी चालवावी, पण विदेशी खेळाडूंना त्यांचे मानधन (टेबलावरून वा

Sampadkiya in 11 June 2012

भरल्या पोटीची उदासीनता देशाला परचक्रापासून जेवढा धोका असतो त्यापेक्षा अधिक धोका शहाणे म्हणविणाऱ्या उदासीन नागरिकांकडून असतो असे म्हटले जाते. भारतात महाबिकट वाटणाऱ्या ज्या समस्या सध्या ग्रासून राहिल्या आहेत, त्यातल्या अधिकांश समस्या, नागरिकांनी - त्यातही शहाण्या पांढरपेशांच्या पांढरपेशींनी निर्माण केल्या आहेत. शरीरातील पांढरपेशी कृतिशून्य झाल्या की प्रतिकारशक्ती संपते व रोगांना संधी मिळते. त्याचप्रमाणे समाजातील हे पांढरपेशी, सामाजिक दृष्ट्या कृतिशून्य उदासीनतेने समस्यांमध्ये भर घालतात किंवा त्या जंजाळातून पळ काढतात. ही कृतिशीलता कोणा टिळक-आगरकर किंवा शाहू-आंंबेडकरांची पाहिजे अशातला भाग नाही. स्वत:च्या घरची किंवा आपल्याच गोतावळयाची साधी, सोपी ,स्वस्त कामे हा वर्ग करेनासा झाला आहे. अशा वर्गातील एकेकाळचे दारिद्र्य आता खूपच कमी झाले, सामाजिक उद्वेग देणाऱ्या घटनांचे प्रमाण घटले, शारीरिक व कौटुंबिक स्वास्थ वाढले अशी सारी अनुकूलता येऊनसुद्धा त्याचा परिणाम जर कृतिशून्यतेत होत असेल तर ती स्थिती गंभीर म्हणायला हवी. माणूस अर्धपोटी असेल तरच तो समाजासाठी काही करतो हे सत्य आपल्याकडून सिद्ध करून

lekh of Sandip Vasalekar

विकासाच्या दिशेचा शोध - संदीप वासलेकर  `सध्याचा काळ हा केवळ बाजारपेठेच्याच भाषेत बोलतो हे जरी खरे असले तरी मग आपण जी किंमत मोजतो तशीच वस्तू मिळेल हे निर्विवाद आहे. आपला देश - आपला समाज आपल्याला सुंदर हवा, संपन्न हवा असेल तर त्यासाठी आपण कोणती किंमत देतो याचा विचार करायला नको का? लोकशाही प्रणाली आणि राजकीय हितसंबंध किंवा साध्या शब्दात म्हणजे आजचे राजकारण थोडे बाजूला ठेवले तरी सध्या जे कोणी नेते आहेत, त्यांच्या मागे लागून जेवढ्या मागण्या केल्या जातात, त्यापैकी १० टक्के मान्य होतात असे म्हटले तर आपण आपल्या मागण्या घेऊन या नेत्यांकडे किती वेळा जातो, हा प्रश्न स्वत:शी विचारून बघावा.' असे आवाहन करून श्री.संदीप वासलेकर यांनी श्रोत्यांना अंतर्मुख केले. आपले मनोगत मांडताना ते म्हणाले की, भारतात गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाचा विस्तार झाला आहे ही गोष्ट खरी, परंतु तरीही आपण सगळे समाधानी - सुखी - स्वस्थ असे नाही. साधारणत: २००१ पासून आपली आर्थिक स्थिती ठीक सुधारत आहे असे जगात म्हटले जाते. सकल राष्ट्नीय उत्पन्न ५, ६, ७ कधी ९ टक्क्यांनी वाढले. साधारणत: ८ टक्के वाढ धरली तरी ते प्रमाण वास्

Aathvanche Sathav

आठवांचे  साठव..... - वसंत आपटे सभोवतीचा राखोडा १९५७ साली घराला आग लागली होती तो प्रसंग गेल्या महिन्याच्या एका अंकात नमूद केला. त्याच अनुषंगाने काही गंमती मनात घर करून आहेत. त्यावेळी वीज वगैरे प्रश्नच नव्हता. परगावी गेलेले वडील तीन्हीसांज झाल्यावर रेल्वेगाडीने परत आले. स्नेहीमित्रांचा घोळका त्यांच्या वाटेवरच सांत्त्वनासाठी, त्यांच्या भेटीसाठी रेंगाळत होता, तो सगळा त्यांच्यासोबत आला. पुन्हा दुपारच्या घटनेची उजळणी झाली. `काही लागलं सवरलं तर सांगा. चिंता करू नका...' असं म्हणत सगळेजण हळूहळू पांगले. आई, वडील आणि आम्ही तीन भावंडे घरी होतो. काही अंतरावर रामायणे म्हणून एक बिऱ्हाडकरू होते, त्यांच्या घरी आम्ही मुले भात-पिठलं खाऊन आलो. आम्ही कुणीच रडत-भेकत नव्हतो; उलट मर्यादित चहाटळपणा करून खिदळतही होतो. रात्र पडली. सभोवार काळोख. हाय लागलेलं लिंबाचं मोठं झाड, त्याला बांधलेल्या झोपाळयाचा दोर जळाला होता. श्रावण पंचमीला बांधलेला हा झोपाळा चैत्रापर्यंत झाडाला होता. (गेल्या श्रावणात बांधलेल्या आजच्या चिंचवृक्षाचा झोपाळा आज ज्येष्ठातही झुलतो आहे - ) तिथं काका (आमचे वडील) बसलेले, आम्ही सगळ

Aathvanche Sathav

आठवांचे  साठव..... - वसंत आपटे अग्नीपरीक्षा परवाच्या २५ मार्चला ५५ वर्षं झाली. मला तर ती आठवण झालीच, पण माझ्या आधीच्या दोघी बहिणींनाही हटकून तो प्रसंग आठवलाच असणार! आमच्या आपटे मळयातील एकांडं घर. घरात बेतास बात सामान, पण धान्यधुन्य भरलेलं. तावणाऱ्या उन्हाची रखरखीत दुपारची वेळ. वडील कामासाठी कऱ्हाडजवळ ओगलेवाडीस गेले होते. घरापुढल्या कडब्याच्या मांडवात माचावर आई लवंडली होती. या दोघी बहिणी काहीतरी अभ्यास-गृहपाठ करत होत्या. मी आठ-नऊ वर्षांचा होतो. दिनकर गं.केळकर (अज्ञातवासी) यांची कविता - `मोहरा इरेला पडला' ही चिमाजीआप्पाच्या आवेशात मोठमोठ्याने म्हणत होतो. एकदम घरामागल्या बाजूनी धुराचा लोळ उठला आणि कोपऱ्याशी जाळही दिसला. `अरे अरे, काय पेटलं-' असं ओरडत आम्ही बाहेर त्या बाजूला पळालो. आईनं बाहेरच्या मोरीत भरून ठेवलेलं पाणी बादलीतून पळवत आणलं. तोवर जाळ मोठा झाला होता. तिनं ती बादली एकाच वेळी जाळावर फेकली. तसा भप्कन तो जाळ आणखीच भडकला. एव्हाना त्याची व्याप्ती वाढली. ऐन उन्हाळयाचे दिवस. घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या उकीरड्याच्या सभोवती पालापाचोळा साठलेला, गवत वाळलेलं, पेंड

Aathvanche Sathav

आठवांचे  साठव..... - वसंत आपटे जन्मशताब्दीच्या निमित्ताने या अंकानं ३३ वर्षे पूर्ण केली. या काळात काय साधलं याचं हिशेबवह्यांत मिळणारं उत्तर उत्साहवर्धक नाही, पण स्मरणीय संपर्काचे जे अनमोल संचित तयार झाले त्याचा मात्र स्वत:लाही हेवा वाटावा. अशा भेटीगाठींत कै.यशवंतरावांकडे जाण्याचा योग साधला तो १९७९ च्या १२ जानेवारीचा प्रसंग - `उद्या-परवा दिल्लीला जातोय' असे म्हटल्यावर रामानंदनगर कॉलेजचे प्राचार्य विलासराव घाटे यांनी विद्यापीठ अनुदान मंडळातील त्यांच्या कॉलेजचे एक छोटे काम माझ्याकडे दिले. दिल्लीत त्या कार्यालयात जाऊन मी त्यांच्याकडून `हां हो जायेगा, भेज देंगे' एवढं आश्वासन घेऊन बाहेर पडलो, तरी वेगळी एक कल्पना डोक्यात चमकून गेली. कॉलेजच्या मातृस्थानी असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.यशवंतराव चव्हाण होते. म्हणून त्यांच्या कानावर हे प्रकरण घालावे असे वाटले. त्यावेळी चव्हाणसाहेब भारताच्या आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष. दिल्लीतील एक महानुभाव. मी हे काम घेऊन त्यांच्याकडे जाणे म्हणजे काहीच्या बाही कल्पना! पण मला त्या कामापेक्षा साहेबांच्या घरात शिरण्याचा `चानस' अनु

Aathvanche Sathav

आठवांचे  साठव..... - वसंत आपटे रुग्णसेवा साधारण १९५३-५४ चा काळ असेल. त्यापूर्वीपासून खेड्यांमध्ये नारू या रोगाचे प्रमाण बरेच होते. पाणवठ्याच्या दूषित जागा आणि अस्वच्छ पाणी यांमुळे पुष्कळ खेडुतांना नारू व्हायचा. पायाच्या घोट्याजवळ फोड येऊन पाय सुजायचा. जखमेला `तोंड' पडले की त्यातून दोऱ्यासारखा लांब जंतू - किंवा अळी बाहेर यायची. तिथले नासके रक्त यायचे. त्याच्या असह्य वेदना, शिवाय ताप वगैरेंमुळे माणूस पार घाईला यायचा. आमच्या शेतामळयातल्या वसतीवर बरीच वर्दळ असे, त्या सर्वांना शुद्ध पाणी वापरण्याच्या शिकवणुकीचे `डोस' माझ्या आई-वडिलांकडून दिले जायचे. परंतु सभोवतीच्या चार-पाच कोस अंतरात बरेच रुग्ण नारूमुळे हैराण होत. आश्रमीय राहणीच्या आमच्या घरी या रोगावरचा उपाय शिकून घेतला गेला. नारूची साथ आली की आमच्या `घरा'पुढचा मांडव म्हणजे रुग्णालयाचा नारू-वॉर्ड झाल्याचे मला आठवते. टाकणखार नावाचा पदार्थ बाजारात मिळतो. माझी चूक होत नसेल तर पापड तयार करताना त्याचा वापर होतो. एक-दोन आण्यांचा हा टाकणखार तापल्या तव्यावर भाजून त्याची लाही करायची आणि नंतर त्यात शुद्ध जुना गूळ घालून त्याचा

Aathavanche sathav

आठवांचे  साठव..... - वसंत आपटे माझी सर्वात मोठी बहीण अनुसया, तिला आमच्या घरी सया म्हणत. माझा जन्म होण्याआधीच ती लग्न होऊन सासरी गेली होती. तिचे सासर बेळगावला लेले घरात. १९५० च्या सुमारास बेळगाव पूर्णत: मराठी होते. हे लेले घराणे अनेक वर्षे बेळगावात राहिले तरी त्यांना कानडीचा गंधही नव्हता. परंतु कर्नाटकच्या साहचर्यामुळे बायकांचा पेहेराव, नाकातली चमकी, पुरुषांचे गंध, आणि मराठी भाषेला कानडी हेल हे सगळे जाणवायचे. पुढच्या चार-सहा वर्षात भाषिक वातावरण तापत गेले. हे लेले कुटुंब मारुती गल्लीतून खडेबाजारातील विठ्ठल मंदिरासमोर राहायला आले, आता तो `संयुक्त महाराष्ट्न् चौक' म्हणविला जातो. माझ्या या बहिणीकडे आम्हा कुटुंबाचे जाणे होई. थोरला भाऊ तिथे लिंगराज कॉलेजात राहिला. तर या बेळगावच्या वळणामुळे अक्कामार्फत आमच्या घरी इडली अवतरली. आमच्याकडे रोजच्या जेवणात ज्वारीची आणि पौषात बाजरीची भाकरी असायची. पण भाताचे प्रस्थही मोठे होते. रोजच्या भाताला एकच एक रूप नसायचे. कधी मऊ भात, कधी गुरगुट्या, कधी तांदूळ भाजून सोजी, सणासुदीला काळा भात असे प्रकार होत. तूप-मेतकूट हे अनिवार्यच. याशिवाय तांदुळाचे अन

Lekh on mathematics

अवघड गणितावर उपाय - प्रा. प्रशांत देशपांडे शाळेत जाणाऱ्या जाणत्या बालकांपासून पालकांपर्यंत आणि शिक्षक चालकांपासून `मालकां'पर्यंत सर्वांचे एका बाबतीत एकमत असते की, गणित हा विषय अवघड असतो. त्या मानानी मराठी, इतिहास-भूगोल- अगदी विज्ञानही तसे सोपे असते, ही समजूत दृढ आहे. वार्षिक परीक्षेच्या काळात गणिताचा पेपर होईपर्यंत अगदी तणाव असतो; तो झाला की परीक्षा म्हणून संपल्यासारखीच! सामाजिकशास्त्रे, चित्रकला वगैरे पुढचे पेपर हे अगदीच किरकोळ वाटतात. तिसरी-चौथीपासून गणिताची स्पेशल शिकवणी, वेगळी तयारी, वेगळया अपेक्षा, प्रचंड ताणतणाव! हे असे का होते? मूल जेव्हा पहिल्या वर्गात प्रवेश करते, त्यावेळी त्यास गणित म्हणजे काय, अन् मराठी काय! त्यातले काहीच ठाऊक नसते. त्याला गणित व मराठी वा परिसर अभ्यास (बापरे!) सगळे सारखेच सोपे; किंवा सारखेच अवघड असणार. मग हे गणित अवघड झालं कधी? केलं कुणी? त्याच्या डोक्यात `अवघड'चे गणित कसे रुजले? त्याचे कारण व संगती स्पष्ट आहे की, पालक आणि शिक्षकांनी मुलांवर हा समज ठोकून बसविला आहे. गणित हा विषय रुक्ष, क्लिष्ट, किचकट म्हणून तो सर्वसामान्य जनांच्या नावडीचा, आवा