Skip to main content

matter in 18 june 2012


माणूस महाग झाला
महागाई आणि दरवाढ सगळया बाबतीत लागू झालीच आहे. त्यासाठी जगाच्या पाठीवरची आकलन न होणारी कारणे दिली जात असतात. मनुष्यबळ आणि रोजंदारीचे दर वाढण्यास काही कारणे असतील पण कामाल माणसे मिळत नाहीत हेसुद्धा मजुरीवाढ होण्याचे कारण आहे.
स्वयंपाकाचा गॅस वाढला यारा आंतरराष्ट्नीय कारणे असतील पण गॅस मोटरकारसाठी, वेल्डिंगसाठी वापर करणारे आपण आहोत. हे प्रकार लक्षात येऊनसुद्धा त्याकडे आपणही डोळेझाक करतोच. घरगुती सिलिंडर ४०० रु.तर हॉटेल्ससाठी १५६५ रु.एवढी किंमत असते. काही ग्राहक आपली गॅसटाकी ४०० ला घेऊन ७-८ शे रुपयांत हॉटेलला विकतात. एकूणच अवाढव्य व्यवहारांत हे प्रमाण फार मोठे नसेल पण टंचाई म्हणायला ते पुरेसे ठरते. मुंबईत पाईप गॅस जोडणी ५.४७ लाखपैकी ३.९३ लाख ग्राहकांनी आपले रिकामे सिलिंडर परत केले नाहीत. शिवाय सीएनजी साठी दिलेले सिलिंडर परत आले नाहीत. त्यामुळे पुन्हा भरणीसाठी सिलिंडर उपलब्ध नाहीत. त्यामुळे टंचाई वाढते.
मुंबईत गॅसवितरकांकडे काम करायला माणसे मिळत नाहीत! गॅसवाल्यांकडे संध्याकाळी कर्मचारी कामाला तयार नसतात. ६ नंतर सिलिंडर भरून मालमोटार आली तरी उतरवून घेता येत नाही. घरपोच करण्यासाठी तगडे कर्मचारी हवेत, ते मिळत नाहीत. वितरकाकडून ग्राहकाने सिलिंडर  नेला तर ८ रु. कमी केले जातात. प्रत्यक्ष रिक्षा वगैरे वाहनातून सिलिंडर नेण्याआणण्यास ५०-७० रु. खर्च येतो. सायकलवरून हे काम काही परप्रांतीय मुले ३०रु. घेऊन करतात. आपली तरूण मुले घरचा सिलिंडर नेत-आणत नाहीत; बाहेरून येणारी मुले हे काम करून दिवसात तीन-चारशे रुपये मिळवतात.
प्रश्नातून - उत्तर - पुन्हा त्यातून प्रश्न - त्यावर पर्याय - नवा प्रश्न! असा हा व्यवहार. सिलिंडर ४०० रुपये झाला की महाग, त्यावरती हे ३० रुपये जादा जातात ते विशेष नाही!!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन