Skip to main content

Posts

Showing posts from September, 2012

sampadkiya in 01oct.2012

ईशकृपे घट अमुचा भरभरुनी पाझरतो, त्या कृपेस तुम्हापास, मी केवळ पोचवितो । ईर्षा नको, आनंद घेऊ ईश्वरकृपेने, समाजाच्या सहकार्याने भरून गेलेल्या आपल्या समृद्धीच्या घटातील एक आेंजळ पुन्हा समाजाप्रती अर्पावी या इच्छेतून `लुल्ला ट्न्स्ट'च्या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. यावर्षी `कला व कलाकार' असा विषय घेऊन लुल्ला ट्न्स्टने `कलाविष्कार २०१२' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एकूणच `कला' या विषयावर काही चिंतनाची प्रक्रिया आपल्या मनात सुरू व्हावी हाही त्यात एक हेतू! कला ही केवळ भरल्यापोटी, सुस्थापित झाल्यानंतर करण्याची गोष्ट नाही, ती माणसाची अगदी मूलभूत-सहज प्रेरणा आहे. आदिम काळातल्या मानवसंस्कृतीच्या ज्या खुणा सापडल्या त्यावरून ते सिद्ध होते. मानवी संस्कृती जशी बहरत गेली तसे कलेला नवनवे पैलू मिळत गेले. दारातल्या रांगोळया, जात्यावरच्या ओव्या, कल्पक उखाणे, कलात्मक पाक पद्धती, ताटातले वाढप... एका खोलीच्या घरात किंवा झोपडीतही स्वच्छ भांड्यांची नेटकी मांडणी  जीवनातील कलाविष्कार दाखविते. संगीत, नृत्य, वादन, चित्र, शिल्प, हस्तकौशल्य इ. कलाप्रकारांची खूप प्राचीन व समृद्

About Lulla Charitable Trust, Sangli

लुल्ला चॅरिटेबल ट्न्स्ट स्वातंत्र्याआधीच्या सिंध भूमीतील लुल्ला कुटुंब फाळणीनंतर भारतात आले. त्यापैकी श्री.तोताराम भोजराज (टीबी) लुल्ला हे परिस्थितीपरत्वे सांगलीत स्थायिक झाले. करसल्लागार पेशातून त्यांनी प्रपंच सावरला, कुटुंबाला चांगले दिवस आले. त्यांचा मुलगा श्री.किशोर यांनी त्या व्यवसायात प्रगती केली आणि इतर अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय आणि समरस होऊन भागही घेतला. त्यातूनच एकंदर सामाजिक स्थितीचे आकलन त्यांना होऊ शकले. कौटुंबिक पार्श्वभूमी आणि स्नेही कार्यकर्त्यांशी सातत्याने होणारे विचारमंथन यातून वेगळया दिशेने चालण्याची ऊर्मी निर्माण झाली. त्यांच्याही पुढची पिढी आता व्यवसायात आल्यानंतर मिळालेल्या संपत्तीचा विनियोग करण्यासाठी कुटुंबाचा न्यास (ट्न्स्ट) स्थापन झाला. श्री.टी.बी.लुल्ला यांचे निधन झाले. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी श्रद्धादिन म्हणून समाजाप्रती रु.२५ लाखाची अर्घ्यदानाची आेंजळ अर्पण करण्यात आली. सर्वांच्या सहमतीने ती ओतत राहावी ही इच्छा व्यक्त करताना लुल्ला परिवार पुढे  म्हणतो - `आम्हा कुटुंबियांच्या मनातील कृतज्ञता भाव जाणून घेऊन आपण अर्घ्यदानाची पहिली आेंजळ समाज

About Nayaran Apte

प्रा.नारायण आपटे यांची उल्लेखनीय कामगिरी बंगळूर येथे झालेल्या `एम.सी.यू.डिझाइन कॉन्टेस्ट' या राष्ट्नीय स्तरावरील स्पर्धेत सांगलीच्या वालचंद महाविद्यालयाचे प्रा.नारायण आपटे यांनी अंतिम फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली. टेक्सास इन्स्ट्रुमेंटस या अमेरिकी कंपनीने अखिल भारतीय स्तरावर स्पर्धा आयोजित केली होती. संशोधकांना प्रोत्साहन व त्यांच्या सृजनशीलतेला आवाहन करून त्याचा उपयोग इलेक्ट्नॅनिक्स तंत्रज्ञानात व्हावा याकरिता ही स्पर्धा होती. पहिल्या फेरीसाठी देशभरातून १२०० स्पर्धक समूह होते. त्यातील १२० स्पर्धकांची निवड झाली. अंतिम फेरीत बारा स्पर्धकांमध्ये प्रा.आपटे व प्रा.माने यांच्या उपक्रमाची निवड करण्यात आली. बेंगलोर येथे १२ स्पर्धक समूहांची स्पर्धा व प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रा.आपटे व प्रा.माने यांच्या उपक्रमास ७०० अमेरिकी डॉलरचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले. अंतीम फेरीमधील बहुसंख्य स्पर्धक महाराष्ट्नतील होते. प्रा.आपटे व प्रा.माने यांनी `बॅलन्सिंग मशीन'साठी अत्याधुनिक डिजिटल प्रणाली सादर केली होती. सदर संशोधनाचे पेटंट घेण्याचा त्यांचा मानस आहे. प्रा.आपटे पंधरा वर्षे वालचंद

vaad-samvad

वाद - संवाद आपले वृत्तपत्र डागाळू नये मागच्या एका अंकात एका प्रतिष्ठित गृहस्थाचा परिचय छापला आहे. त्यास मटण आवडते व त्यावर माझी मर्जी आहे असेही त्याचे म्हणणे, आम्हास आवडलेले नाही. एखादा सुशिक्षित (सुसंस्कृत नव्हे) म्हणेल `गोमांस, मद्यपान, जुगार हे सर्व चांगले असून ते मी करतो' ती व्यक्ती चांगली प्रसिद्ध, श्रीमंत, महंत असली तरी असल्या लिखाणास प्रसिद्धी देऊ नये. त्यामुळे आपले पवित्र साप्ताहिक डागाळेल. असे आचरण करूच नये, ते लिहू तरी नये; निदान `आपले जग'ने छापू तरी नये. `आम्हास आवडेल तेच आम्ही करणार' असे असेल तर देवाला आवडेल ते देव करील! - शंकर आ. आपटे, आदर्श कॉलनी, ठाणे (पूर्व) संवाद मांसाहार करावा की न करावा हा (चिरंतन) वादाचा मुद्दा आहे. पत्रलेखक म्हणतो त्याप्रमाणे ज्याला जे रुचेल-पटेल ते तो करतच असतो, देव त्याच्याकडे कसा पाहील तो त्याचा प्रश्न आहे! असो. एखाद्याचा परिचय देताना त्याच्या आवडीनिवडी उघड झाल्याने `शांतंपापम्' म्हणण्याचे काय कारण? त्याचे परिश्रम, प्रतिष्ठा, विचारदिशा या उत्तम बाजू पाहाव्यात. मुळात जगात असलेली कोणतीही गोष्ट निषिध्द नाही असेही एक तत्त्व

Lekh of Mukund apte

अमेरिकेत जाऊन पैसे मिळवायचे आहेत? भारतातील तरुणांना अमेरिकेचे मोठे आकर्षण आहे. तेथील जीवनाचे दिसणारे स्वरूप तेथे येण्यास आकर्षित करीत होते. स्वातंत्र्यानंतर भारतात गुणवान मंडळींना स्थान असेल किंवा कसे याचीच शंका होती. त्यामुळे सहाव्या दशकात अमेरिकेने आपले दरवाजे उघडले तसे बरीच मंडळी उच्च शिक्षण, पैसे कमावण्यास नोकरी असा विचार करूनच भारताचा किनारा सोडती झाली. आता तेथील भारतीयांची संख्या जवळजवळ २० लाखांवर गेली आहे. सारे चांगले उत्पन्न कमावतात. पैसे सांभाळून असतात. अमेरिका हा देश चांगलाच मोठा आहे. लोकसंख्या फारच थोडी. लोकांना चैनीची चांगलीच सवय लागली. जेथून शास्त्रज्ञ मिळतील तेथून जमा करून उपयुक्त शोध लावून माणसाचे जीवन समृद्ध बनवले. मग त्यात इतरांना काही त्रास होतो की नाही याचीही त्यांनी पर्वा केली नाही. त्याचा उपयोग इतरांना करून देण्यासाठी रॉयल्टीसाठी पेटंट ही व्यवस्था त्यांनी सुरू केल्यामुळे खूप पैसा मिळू लागला. युद्धस्थळापासून फार दूर असल्यामुळे शांतताही मिळू लागली. विजेची मुळीच कमतरता नाही. सर्व पैशाचा कारभार असल्यामुळे माणसांपेक्षा कंपन्यांचे फायदे जास्त महत्त्वाचे मानतात असेच

Sampadkiya in 17 Sept.2012

लोकभावनांचे ढोल गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. प्रसारमाध्यमे आणि दळणवळण यांच्या प्रसारामुळे कोणताही सणसमारंभ सर्वत्र फैलावतो. मुंबईतील दहिहंडी, पुण्याचा गणपती, कलकत्त्याची दुर्गा, दिल्लीची होळी, अमदावादचा गरबा, जयपूरची राखी हल्ली तेवढ्या क्षेत्रापुरती मर्यादित राहिली नाही. वर्षभर श्रमणाऱ्या व्यवसायी जीवांना कधीतरी उल्हासाच्या अनुभवांतून चैतन्यक्षण लाभावेत यासाठी त्या त्या प्रदेशातील परिस्थिती, गरज व ऋतुमान यानुसार उत्सव करण्याची प्रथा आली. परंतु आजकाल असा जल्लोष करणे हीच व्यावसायिक गरज असणाऱ्यांनी श्रमणाऱ्यांपेक्षा मोकाटगिरीला महत्त्व आणले आहे. त्यामुळे वर्षभरात कधीतरी येणारा एखादा उत्सव आजचे दैनंदिन जीवन व्यापून राहात आहे. मनाच्या उत्फुल्लतेतून येणाऱ्या नृत्य-संगीताऐवजी कायदा-व्यवस्था, वाहतूक-प्रदूषण यांचे वाद उभे राहू लागले. दहीहंडीतील नोटांचे थर आणि राखीच्या जरतारीची किंमत वाढत चालली. गणपतीच्या निमित्ताने ध्वनिवर्धक व ढोलताशे रात्री किती वाजेपर्यंत सैल सोडावेत यावरती सध्या गावोगावी  बैठक-चर्चा होत आहेत. एरवी समान नागरी कायद्याची अपेक

ganesh upasana

मला उमजलेली गणेशउपासना अधिक मास असल्याने गणपतीचे आगमन जरा लांबणार हे ठाऊक नसलेल्या तेरड्याच्या फुलांनी अन् आघाड्याच्या रोपट्यांनी यावर्षीही बाग केव्हाच रंगीबेरंगी करून टाकली. दुष्काळाचा फारसा बाऊ न करता बाजारपेठ सजली. ठाण मांडणाऱ्या गणेश मंडळांमुळे रस्ते लहान झाले. वाहतूक तुंबू लागली. आधी पूजेसाठी गुरुजींचे व मग मूर्तीचे बुकिंग झाले. सजावटीसाठी घराघरात कल्पकता पणाला लागली आणि आयाबाया पंचखाद्य, मोदकाच्या तयारीला लागल्या. (आता २१ मोदकांचं पॅक केवढ्याला मिळतंय कोण जाणे - की चेंज म्हणून यावर्षी घरी करूयात...?) क्रॅसेट-सीडीज्चे मार्केट आयटेम साँग्जच्या (अ)सुरावटींवर गणपतीची `मंगल'गीते माथी मारण्यासाठी सज्ज झाले. होशियार%% म्हणून `अभिजन' कानात बोळे घालायच्या तयारीत बसले. `गणेशोत्सव पर्यावरणीय कसा कराल', `घरच्या घरी गणपती कसा बसवाल', `गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व्हायला हवा' अशा वृत्तपत्री लाटेवर आरूढ होऊन बाप्पा आलेसुद्धा! गणेशोत्सवात - विशेषत: सार्वजनिक उत्सवात शिरलेले अमांगल्य ढळढळीत दिसतेच आहे. त्यावर यथाशक्ती, यथागती उपाय सुरू आहेत. गणपती हा आदिदेव - वेदप्रतिपाद्या -

Lekh in 3 sept.2012

जिंदगी के बाद भी..... माध्यमांनी जीवनावर आक्रमण केल्यापासून टीव्हीवरील कार्यक्रमांपेक्षाही जाहिराती लक्षात राहतात. खूपदा चांगल्या  सृजनशील कल्पनांचा वापरही होताना दिसतो. आयुर्विमा या तशा रुक्ष आणि कोरड्या व्यवहारी विषयांनाही तरल भावनिक ओलावा देणारी आयुर्विम्याची (क्रॅच लाईन) आहे. `जिंदगी के साथ भी... जिंदगी के बाद भी' इतर प्राण्यांपेक्षा माणसाला वेगळं करणारी  एक महत्त्वाची गोष्ट - चिंता! आजची - उद्याची, आपण असतानाची - नसतानाची, जगताना - मरताना - मेल्यानंतरसुद्धा! या सर्व चिंतांवर उत्तरं शोधण्यातच आपला जन्म सरतो. आजचं जगणं मेटाकुटीला आणतं. तरीही उद्याची तरतूद करावीच लागते. माणसातील एका चतुर गटाने हीच गोष्ट जाहिरातीतून बिंबविली. तुमच्यानंतर तुमचं कुटुंब उघड्यावर पडू नये.... तर मग आजच  पैसे गुंतवा. महिलासुद्धा हल्ली घराबाहेर पडतात, प्रवास करतात. त्यांना कुठं अपघात झाला तर? मग त्यांच्याही नावानं गुंतवा. मुलं मोठी होतायंत, त्यांची शिक्षणं, परदेशी जाणं, लग्न.... पैसा लागेल ना सगळयाला - मग आजच पैसा गुंतवा. अकस्मात - आजारपणामुळं - वयोमानामुळं.... कसंही गेलात तरी मागे उरलेल्यांच्या हा

Lok kaya boltat in sept.03

संकट ही संधी गेल्या जून जुलै महिन्यातील पावसाळी गारवा अल्पायुषी ठरला आणि पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच संपला. तात्पर्य असे की, आपल्या भागात चालू वर्षी दुष्काळ स्पष्ट दिसतो आहे. पाऊस अवेळी, अति किंवा अपुरा पडण्याचा संबंध पर्यावरणाच्या असमतोलाशी, जागतिक तापमान-वाढीशी आणि रासायनिक अतिक्रमणाशी  आहे ही गोष्ट तर आता जगजाहीर आहे. पूर्वकाळीही कधीतरी दुष्काळ पडत होते, पण एकाच वर्षी भूमीतील पाणीपातळी पाताळापर्यंत खोल गेली असे घडत नव्हते. पाऊस नियमित होणे हा नियम होता; दुष्काळ अपवाद होता. अवेळी पाऊस हा तर चमत्कारच म्हणत. गेल्या काही वर्षात कधीही कुठेही केव्हाही पाऊस पडतो. पूर्वी चार महिन्यात विखरून पडणारा जिरवणीचा पाऊस हल्ली कधीतरी आठवडाभरात एकदम कोसळतो. आपण मात्र `सरासरीइतका पाऊस यंदा पडला' अशी आपलीच समजूत काढतो. हे म्हणजे आठवड्याची बेगमी म्हणून एकाच जेवणात वीस भाकरी खाण्यासारखे झाले; यामुळे असमतोल घातक होणारच. एकंदरीत आपल्या सर्वांना निसर्गाचा अनैसर्गिक परिणाम जाणवू  लागला आहे यात शंका नाही. आज वैज्ञानिक साधने व दळणवळण वाढल्यामुळे धान्य वाहतूक वगैरे होईल, भूकबळीची शक्यता नाही पण इतर अन

Sampadkiya in 3 Sept.2012

धार्मिक भेदाचे राजकारण मुंबईच्या आझाद मैदानावर काही मुस्लिम संघटनांनी अनाहूत मोर्चा काढला त्यात रझा अकादमी नावाची नवीनच कोणी संघटना उजेडात आली. त्यांनी ठरवून धुडगूस घातला आणि त्यातून पुन्हा जातीयतेने मने कलुषित करण्याचा उद्योग बऱ्याचजणांनी करून पाहिला. आश्चर्याची गोष्ट अशी की वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्वार्थी राजकीय नेते यांच्या अगोचरपणाचे दर्शनही त्यातून झाले. अमर जवान चे स्मारक विध्वंस करणारे हात आणि महिला पोलिसांवर अन्याय करणारी डोकी जाग्यावरच फोडणे हे पोलीस दलाकडून जनता अपेक्षित करते. परंतु याबाबतीत मात्र पोलीसांनी इतकी बोटचेपी आणि नेभळी भूमिका घेतली की प्रत्यक्ष अन्याय करणाऱ्यांनाही ती अपेक्षित नसेल. जनतेच्या मनात या घटनेमुळे - म्हणजे रझा अकादमीच्या मोर्चापेक्षाही पोलीसांच्या भूमिकेमुळे जो सात्विक संताप निर्माण झाला त्याला राज ठाकरे यांनी उघडपणे वाचा फोडली आणि त्यांनी भव्य मोर्चा आणि सभा घडवून दाखवली. ती घडताच आमच्या गृहमंत्र्यांनी नेहमीच्या भाषेसाठी तोंड उघडले की, `मोर्चा बेकायदेशीर होता आणि त्याच्यावर कारवाई होईल' अर्थात अशा कारवाईची भीती राज ठाकरेंनाही नाही आणि जनतेला

Lekh in 3 Sept.2012

अनैसर्गिक विदेश क्रॅनडात आल्यापासून इथल्या गोठविणाऱ्या थंडीची आणि बर्फाची गरमागरम वर्णनं आणि चर्चा मी ऐकत होतो. पहिले काही दिवस मी अगदी उत्सुकतेनं ऐकायचो. कधी एकदा बर्फ पाहायला मिळतंय असं व्हायचं. कौतुकानं मी ऐकणारा श्रोता मिळाल्यामुळं सांगणारेही थोडी-थोडी `ढील' देत होते. `अरे मागच्या वर्षी तर.... कमरेएवढं बर्फ.', `अरे माहितेय का एकदा तर.....' असे खरे-खोटे किस्से फोडणी देऊन मला ऐकवत होते. `आता होईल दोन-चार दिवसात सुरुवात. तुझे बूट चालायचे नाहीत. एवढासा कोट काय पुरतोय? गारठून तुला एक पाऊलही टाकता यायचं नाही.' असा उगाचच बागुलबुवा निर्माण केला होता. मित्र डॉमिनिक तर `दरवर्षी इथं येणाऱ्या भारतीयांपैकी १०% लोक बर्फात गायब होतात आणि एप्रिल-मे मध्ये परत सापडतात... तेव्हा तू आत्ताच व्हिसा काढून ठेव' म्हणून जाता-येता चिडवायचा. पण तो बर्फ काही पडायचं नाव घेत नव्हता. खरं तर बर्फाचे दिवस इथल्या लोकांसाठी पूर्वी कष्टप्रदच होते. उणे ३० पर्यंत जाणारा हिवाळा जीवघेणाच की! हिवाळयाचे चार महिने बटाट्याशिवाय दुसरं काही खाल्लेलं आठवत नाही असं इथले जुने लोक सांगतात. सलग दोन-दोन आठवड