Skip to main content

Posts

Showing posts from December, 2015

Dec.2015

शांत जगावर ताबा हवा असतो दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि जपान या अघोरी देशांचा पाडाव झाला हे खरेच, पण ज्या दोस्तराष्ट्नंचा विजय झाला ते रशिया, इंग्लंड हे देश कमी अघोरी नव्हते. आधीची शेदीडशे वर्षे भारतावर अमानुष गुलामी लादून त्याचे अखंड शोषण व अनेक अत्याचारही करणाऱ्या इंग्लंडने युद्धानंतर साळसूदपणा करत धार्मिक तेढ वाढवून भारताची फाळणी करण्यातही पुढाकार घेतला. रशियन राजवट तर क्रूरतेबद्दल प्रसिद्ध झाली, तिथे सरकार किंवा साम्यवादी पक्षाबद्दल ब्र काढता येत नव्हता म्हणून अनेक विचारवंत लेखक तो देश सोडून गेले. जगात जपान-जर्मनीने थैमान घातले, म्हणून सामर्थ्यसंपन्न अमेरिका त्यावेळच्या युद्धात उतरली असे नव्हे; तर त्यांच्यावरच हल्ले सुरू झाले तेव्हा प्रेसिडेंट रूझवेल्ट हे जमिनीवर आले.  तरीही त्यांची सोदेगिरी अशी की, दोस्तसैन्याचे नेतृत्त्व आयसेनहॉवर या अमेरिकन सेनापतीकडेच देण्यात आले. युद्धानंतर `शांतता-शांतता' असा जप करत, संयुक्त राष्ट्न्संघ(यूनो)संस्था स्थापन करण्यात आली तरी त्या संस्थेचे कार्यालय न्यूयॉर्कमध्ये राहिले, आणि गेल्या सत्तर वर्षांत अमेरिकेचा स्पष्ट वरचष्मा त्या संस्थेवर राहिला.

Nov.3

`भाऊच्या धक्क्या'ची कहाणी मुंबईच्या आर्थिक विकासाला चालना देणारा `भाऊचा धक्का' १७५ वर्षांचा होईल.  बंदराशी संबंधित हा परिसर `भाऊचा धक्का' म्हणून समाजमनावर ठसला आहे. मुंबई बंदर उभारणारे प्रख्यात बांधकामतज्ज्ञ भाऊ लक्ष्मण अजिंक्य यांचे ते नाव. पाठारे प्रभू ज्ञातीतील लक्ष्मण हरिश्चंद्रजी अजिंक्य उर्फ भाऊ रसूल यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण नजीकच्या करंजा या गावी १७८९साली झाला. भाऊ अजिंक्य यांनी मुंबईत कुलाबा येथील गनक्रॅरिएज कारखान्यात अव्वल कारकून म्हणून जम बसवला. या कंपनीत क्रॅप्टन रसेल या ब्रिटिश अधिकाऱ्याचा भाऊंच्या काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास होता. कारखान्यातील कामगारवर्गात भाऊंची वट-पत वधारली. कंपनीत त्यांना `भाऊ' नावाने ओळखायला लागले. क्रॅप्टन रसेलचा लोभ असल्याने त्यांना भाऊ रसूल म्हणूनही ओळख लाभली. भाऊ अजिंक्य यांच्या नोकरीच्या काळात मुंबईला ग्रामीण बाज होता. माहीम, माटुंगा, वरळी, परळ, माजगाव, धाकटा कुलाबा आणि मोठा कुलाबा या सात बेटांत मुंबई विभागलेली होती. कारखान्यात सात बेटांवरून कामगार येत असल्याने त्यांच्या जेवणाखाण्याचे हाल होत. दुपारच्या भोजनाची

November 2

...... चालत्या बोलत्या वेधशाळा...... एक मे चा दिवस होता. दक्षिण गोव्यातील नेत्रावली गावाजवळ सायजणी येथे आमच्या संस्थेचे या वर्षीचे निसर्ग शिबीर होते. ५०-५५ जणांना लागणारा भाजीपाला किराणा नेत्रावली गावातून खरेदी करणे भाग होते. पुढे २३ कि.मी.मध्ये कांही मिळण्याची सोय नव्हती. कामानिमित्त तेथील लोक पणजी, मुंबई भागात असतात. शेती हा स्थानिक मुख्य व्यवसाय.गावापर्यंत डांबरी सडक नुकतीच झाली आहे. गावातील ४ थी पर्यंतची शाळा हे आमच्या कँपचे निवासस्थान. नेत्रावली अभयारण्याच्या मधोमध गाव. रावण्या डोंगराच्या कुशीत. गावाच्या सभोवताली हिरवे घनदाट जंगल,डोंगर. खळाळत बारमाही वाहणारे झरे. गावात शेताच्या बांधावर आंबा, फणसाची झाडे. फणस पिकून कोण उतरवते का याची वाट पहात गळून पडू पहात होते.भाताची काढणी चालू होती. त्यामुळे शिवारात एकच धांदल होती. शिधा सामान घेऊन २३ कि.मी. घाट पार करीत अंधेरून येण्याचे आत आम्हाला सायजणी गाठायचे होते. टेंपोत सामान भरले, आता निघायचे, इतक्यात टेंपोवर ताडपत्री नसल्याचे लक्षात आले.आकाश काळया ढगांनी ओथंबले होते. रावण्या डोंगराच्या बाजूने विजाही होत होत्या. मी दुकानदाराला म्हणाल

Nov.2015

राजकारणी विचारवंत गेल्या दहावीस वर्षांत पुरस्कार वितरणांचे जरा अतीच झाले होते. कुणी कुणाला कशासाठी पुरस्कार द्यायचा हा त्या देणाऱ्या व घेणाऱ्यांचा प्रश्न असतो. इतरांनी त्यात बोलण्याजोगे काही नाही. जे पुरस्कार प्रतिष्ठेचे-सन्मानाचे-सत्कारार्ह असे जनसामान्यांना मनाच्या खोल कप्प्यातून जाणवत राहते, ते फार फार वेगळे असतात. उदाहरणार्थ एपीजे कलाम, आपल्याकडचे जयंत नारळीकर यांना कोणते कसले पुरस्कार दिले गेले आहेत याबद्दल ठोस काही सांगता यायचे नाही. सी व्ही रामन, रवींद्रनाथ यांना नोबेल पुरस्कार मिळाला तरी नोबेल ही भानगड काय, हे सामान्यांस ठाऊक नसेल, पण रवींद्र-रामन-जगदीशचंद्र ही नावे तरी ठाऊक आहेत व ती हृदयांतरी वसली आहेत. कालपरवा ज्यांना सरकारने पद्मश्री वगैरे दिल्या, तेही कुणाला फारसे ठाऊक नव्हते; मग इतर कुठल्या पुरस्कारांची काय कथा! बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्न्भूषण पुरस्कार त्यावरून उसळलेल्या जातीय वादांमुळेच जास्त गाजला. पण त्या शासकीय पुरस्काराला व पुरस्कृतांना काही उच्च स्थान आहे. एरवी अशा सरकारी पुरस्कारांना, मानसन्मानांना किंवा पदे-बिरुदांना राजकीय वास येतच नाही असे कोण