Skip to main content

Posts

Showing posts from December, 2014

29 Dec.2014

शिकू आनंदे २०१४ लुल्ला चॅरिटेबल ट्न्स्टचा `शिकू आनंदे' हा कार्यक्रम २ ते १३ डिसेंबर या कालात राबविला गेला. त्याचा सांगता समारंभ १४ डिसेंबर २०१४ रोजी उत्साहात पार पडला. १४ तारखेला सकाळी ११ वाजता सुरू झालेला कार्यक्रम संध्याकाळी संपला. `शिकू आनंदे'ची टीम शंभरपेक्षा जास्त शाळांमध्ये हा विषय पोचवण्यासाठी आधीचे १३ दिवस दररोज शाळाशाळांमध्ये जाऊन कार्यक्रम घेत होती. खरं तर तो त्याही आधी काही महिने सुरू झाला होता जेव्हा ज्ञानप्रबोधिनीच्या श्री.पोंक्षे सरांशी चर्चा होऊन आनंददायी शिक्षण हा विषय लुल्ला चॅरिटेबल ट्न्स्टने या वर्षीसाठी निवडला. मग त्याची संकल्पना मनात स्पष्ट होणं, या विषयातली शिक्षक, पालक, विद्यार्थी प्रत्येकाची भूमिका नक्की होणं, त्याचा सविस्तर अभ्यासक्रम म्हणता येईल अशी टिपणं तयार होणं, १०७ शाळांमध्ये वक्ते म्हणून काम करू शकतील अशी मंडळी शोधणं, त्यांची प्रशिक्षणं, त्यासाठी साहित्य, शाळांची निश्चिती, वेळापत्रक, प्रवासाची रचना अशी शेकडो कामं तयारीच्या दिवसात मार्गी लागली. १४ तारखेचा समापनाचा कार्यक्रम सर्वांसाठी एकत्रित पण तीन वेगळया सत्रांमध्ये योजिला होता. त्यासाठी त्या

22 Dec.2014

अ नु ग्र ह तालुक्याला तासाभराचे काम होते. बसमधून उतरलो. तहसील कचेरीतून एक सही-शिक्का घ्यायचा आणि मिळेल त्या एसटी-बसने परतायचे असे नियोजन होते. बसस्टँडच्या बाहेर आलो, तो निदान शंभरभर भाविकांचा समूह घोळका करून उभा होता. कोणाच्या हाती पुष्पगुच्छ होते, कोणाच्या हाती फुलांच्या माळा. सगळयांच्या चेहऱ्यावर लीन भक्तीभाव-आतुरता, विनम्रता. कानावर होते की आज कोणातरी साधु महाराजांचे आगमन होणार. गर्दीतून माझ्या दिशेने शिवराम मुळीक झेपावला. कमरेत किंचित वाकून त्याने अभिवादन केले. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. माझा हात हाती घेत शिवराम उत्स्फूर्तपणे म्हणाला, ``या या साहेब! बघा कसे नेमक्या वेळेत, देवासारखे आलात. तुम्ही हो-नाही करत होतात, पण बघा बरं, गुरुरायांनी तुम्हाला नेमके कसे भाग पाडले? अहो त्यांची करणी अगाध आहे. तुम्ही कितीही टाळले तरी गुरुरायाचा आदेशच तो....'' शिवराम काय बोलतो आहे याचा मला काहीही अर्थबोध होईना. ओझरतं आठवलं की काही दिवसांपूर्वी तो म्हणाला होता, ``दादा, सोमवारचा दिवस राखून ठेवा. गुरुरायाचे आगमन होणार आहे. आपल्याला दर्शनाला जायचं आहे.'' नुसत्या गुरुर

15Dec.2014

पुढची चौकस पिढी रामायण आणि महाभारताविषयी इतकं लिहिलं-बोललं गेलंय की त्याची थोरवी नव्यानं काय सांगणार? भारतवर्षातल्या कित्येक पिढ्यांचा सांस्कृतिक परिपोष ह्या दोन ग्रंथांवर झालाय. वैयक्तिक, कौटुंबिक, सामजिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रातील न्याय-नीति-नियम, ह्या ग्रंथातील दाखल्यांवरून ठरवले जातात. `व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।' आणि `वन्दे वाल्मीकि कोकिलम् ।'वगैरे..वगैरे! बालकांवर संस्कार होण्यासाठी त्यांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगाव्यात असा आमच्यावर संस्कार आहे. आपल्या महान संस्कृतीचा परिपाक असणाऱ्या त्या महान ग्रंथपरंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे पालकांचं परमकर्तव्य! विशेषत: परदेशात राहात असताना आम्हा `नव पालकांत' तशा चर्चा होत असतात. एका चर्चेनंतर मी घरी यायला आणि चिंगीने `बाबा गोष्ट' अशी मागणी करायला गाठ पडली. मुलांच्या शंका-प्रश्नांना उत्तर देणं अवघड व्हावं, अशा बऱ्याच गोष्टी महाभारतात असल्यामुळं मी रामायणाला हात घातला. ``बस, रेल्वे, कार असं काही नव्हतं पूर्वी, पण मग श्रावणबाळाने निदान रथ, बैलगाडीसुद्धा न नेता कावड का न्यायची?''-याचं उत्तर जुळवून

8 Dec.2014

माणुसकीनं वागणारा माणूस - विश्वास दांडेकर     मी सौराष्ट्नत अनेक वर्षे होतो. टाटा केमिकल्स ही सोडा अॅश बनवणारी भारतातली त्या वेळची सर्वात मोठी कंपनी. त्या कंपनीशी आमचे व्यवहार होते, अधून-मधून जावे लागे. तिथले एक कर्मचारी कामानिमित्त ओळखीचे झाले. त्यांना आम्ही पंडितजी म्हणायचो. मध्यम वय, उमदे-हसरे व्यक्तिमत्त्व. त्यांना फार मोठे, जबाबदारीचे, किचकट काम नसावे. भेटायला गेलो, कार्यालयीन काम संपले की - ते सहजपणे दोन-तीन तास आमच्यासोबत काढत. एकदा त्यांना छेडले, तेव्हा त्यांनी खुलासा केला : नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप वा दुष्काळ अशा वेळी टाटा व्यवस्थापनाकडून त्यांना मदतकार्यासाठी पाठवले जाते. अशा वेळी सूचना येताच काही तासांत निघावे लागते. प्रसंग संपल्यावरच परतायचे. त्यामुळे इथल्या कामाची रचना अशी केली आहे की - काम भरपूर असते, पण ते त्या त्या दिवशी संपेल असे. अशी माणसे टाटांच्या सर्व आस्थापनांमध्ये पेरलेली आहेत. काही वर्षांनी `नेमेचि येतो' म्हणणारा दुष्काळ आलाच. टाटा ग्रुपचे मदतकार्य गुजरात, मध्यप्रदेश सीमेवरच्या पंचमहाल जिल्ह्यात सुरू होते. सध्या `गाजत' असलेले गोध्रा गाव हे जिल्ह्

1Dec.2014

`मानव संसाधन'या विस्तृत कल्पनेच्या अंतर्गत शिक्षण हा विषय अंतर्भूत आहे.  सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी-उत्सवाच्या निमित्ताने,  पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू श्री.शं.ना. नवलगुंदकर यांनी व्यक्त केलेले विचार... शिक्षण म्हणजे संस्कार अमेरिकेतील एका विद्यापीठाच्या आवारात मी उभा होतो. मला त्या विद्यापीठाच्या कार्यालयात जायचे होते, पण रस्ता सापडत नव्हता. तिथे उभ्या असलेल्या एका अमेरिकन महिलेला मी विचारले, ``कार्यालय कोठे आहे?'' त्या बाईने दिलेले उत्तर मला विचार करायला लावणारे होते. त्या बाई म्हणाल्या, ``मला कार्यालय कुठे आहे हे माहीत आहे, पण आत्ता मी कोठे आहे हे माहीत नाही!'' माणसाला जीवनाच्या वाटचालीसाठी दोन बिंदू माहीत असावे लागतात; आपल्याला कोठे पोहोचायचे आहे आणि आपण सध्या कोठे आहोत. एक उद्दिष्टबिंदू आहे, तर दुसरा आरंभबिंदू आहे. एर्वीलरींळेप हा शब्द मूलत: एर्वी आणि ज्ञीरींळे या दोन शब्दांपासून बनला आहे. एर्वी या शब्दातून, आपण कोठे आहोत याची, तर ज्ञीरींळे या शब्दापासून आपले उद्दिष्ट कोणते आहे याची अभिव्यक्ती होते. मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हे शिक्ष