Skip to main content

15Dec.2014

पुढची चौकस पिढी
रामायण आणि महाभारताविषयी इतकं लिहिलं-बोललं गेलंय की त्याची थोरवी नव्यानं काय सांगणार? भारतवर्षातल्या कित्येक पिढ्यांचा सांस्कृतिक परिपोष ह्या दोन ग्रंथांवर झालाय. वैयक्तिक, कौटुंबिक, सामजिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रातील न्याय-नीति-नियम, ह्या ग्रंथातील दाखल्यांवरून ठरवले जातात. `व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।' आणि `वन्दे वाल्मीकि कोकिलम् ।'वगैरे..वगैरे!

बालकांवर संस्कार होण्यासाठी त्यांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगाव्यात असा आमच्यावर संस्कार आहे. आपल्या महान संस्कृतीचा परिपाक असणाऱ्या त्या महान ग्रंथपरंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे पालकांचं परमकर्तव्य! विशेषत: परदेशात राहात असताना आम्हा `नव पालकांत' तशा चर्चा होत असतात. एका चर्चेनंतर मी घरी यायला आणि चिंगीने `बाबा गोष्ट' अशी मागणी करायला गाठ पडली. मुलांच्या शंका-प्रश्नांना उत्तर देणं अवघड व्हावं, अशा बऱ्याच गोष्टी महाभारतात असल्यामुळं मी रामायणाला हात घातला. ``बस, रेल्वे, कार असं काही नव्हतं पूर्वी, पण मग श्रावणबाळाने निदान रथ, बैलगाडीसुद्धा न नेता कावड का न्यायची?''-याचं उत्तर जुळवून देईपर्यंत पुढचा प्रश्न, ``दशरथ राजा शिकारीला का गेला होता? तो राजा होता, तर त्याला जेवणाचा काही प्रश्न नव्हता. मग मजेसाठी प्राणी मारतात का? तसं करणं चूक आहे. र्धेी हर्रींश ींे लश पर्रींीीश षीळशपवश्रू. जंगलात गेलं तरी तिथल्या कोणत्याही गोष्टीला हात लावायचा नाही - अगदी गोगलगायीलासुद्धा! असं आम्हाला शाळेतल्या बाइंर्नी सांगितलंय!
``पूर्वी जर ेश्रव रसश हेाशी आणि शाशीसशपलू हशश्रश्रिळपश नव्हती तर श्रावणबाळाच्या आई-वडिलांचं पुढे काय झालं? आपला मुलगा चुकून मेला, हे कळूनसुद्धा त्यांनी दशरथाला शाप कसा काय दिला? - माझं खेळणं कोणी मोडलं, म्हणून मी त्याचं खेळणं मोडून त्याला रडवलं, तर तू मला ओरडतोस ना?''
अरे बापरे! ही गोष्ट कुठेतरीच चालली. ती कशीबशी गुंडाळून मी रामायणाच्या क्लायमॅक्सकडे वळलो. राम-रावण युद्ध! दुष्टांचा पराभव, सज्जनांचा विजय म्हणजे एकदम सेफ झोन! पण लहान मुलांची-विशेषत: मुलींची मानसिकता वेगळीच असावी! एकतर चिंगीला मारामारी, युद्ध याची जाम भीती वाटते, ऐकतानासुद्धा! त्याची कल्पना असल्यामुळं मी ते थोडं मजेच्या अंगाने सांगायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे `रावणाच्या मो%%ठ्या पोटावर एक गुच्ची मारली' वगैरे. पण तरी चिंगीच्या मते युद्धाची काही गरज नव्हती. ``थोडं समजावून, आणि अगदीच नाही ऐकलं तर पोलिसांचा धाक घालून रावण बधला असता! आणि नसता, तर त्याची तक्रार करायची.... एकानं खोडी काढली म्हणून आपण त्याला मारलं तर आम्हाला हेडमास्तर ऑफीसमध्ये बोलावून वॉर्निंग देतात.''

दुसऱ्या दिवशी थोडी अधिक तयारी करून मी परत मैदानात उतरलो. आज रामजन्माची गोष्ट. ही गोष्ट खूपच व्यवस्थित पार पडली. म्हणजे अडचणीत आणणारे काही प्रश्न न येता. स्वत:वरच खूष होऊन हुश्श केलं. चिंगी मात्र विचारात पडलेली दिसत होती.
थोडं छेडल्यावर म्हणाली, ``रामाच्या काळात बस-कार काही नव्हतं तर अयोध्येत हॉस्पिटल्स होती?''
मी म्हटलं, ``नाही. का गं?''
``प्रसादामुळं बाळ होणार ठीक आहे, पण हॉस्पिटल नसेल तर आईच्या पोटातून बाळ बाहेर कसं येणार?''- तरी एकंदर कालच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे आजचा प्रश्न बराच सोपा होता. हुरूप वाढून मी महाभारताकडे मोर्चा वळवला. मुख्य कथानकापेक्षा उपकथानकाला फाटे फुटण्याची शक्यता कमी, म्हणून मी कृष्ण-सुदाम्याची गोष्ट निवडली. आश्रमात मित्रांबरोबर राहायची कल्पना तिला थ्रिलींग वाटली. शिवाय अभ्यासाबरोबर जंगलात जायचं, लाकडं तोडायची, पावसात भिजायचं, कपडे धुवायला नदीवर जायचं... हे सगळं तिच्यासाठी फारच रोमांचक होतं. क्षणभर ती त्या स्वप्नातच रमली. नाही म्हणायला मुलांना अशी कामे करायला लावणं म्हणजे चाईल्ड लेबर असं शाळेत सांगितल्याची एक किरकोळ शंका आली. पण त्यावर `ती मोठी मुलं होती. त्यांनी थोडीफार मदत केली तर चालते' वगैरे सांगून तेवढी शंका मिटली. अजूनही त्या क्रॅम्पींगसदृश्य शालेय जीवनाच्या स्वप्नात रमल्यामुळे चिंगीच्या डोक्यात बहुधा इतर शंका आल्या नसाव्यात. आमची गोष्ट पुढं चालली -
``पण सुदामा गरीब होता म्हणजे काय होता?'' ``म्हणजे त्याच्याकडे कमी पैसे होते.'' मी.
``थोडे कमी असले तर चालतंच की. त्या बंगलेवाल्या लोकांएवढे पैसे आपल्याकडे कुठायत?''
``अगं, पण त्याच्याकडे फारच कमी होते गं. अगदी जेवायलासुद्धा नव्हते.'' मी.
``पैसे नसतील, क्रेडिट कार्डपण नव्हतं?''
पाकिटात पैसे नसतील तर आईबाबा कार्डावरून खरेदी करतात ते तिने बऱ्याचदा पाहिले होते.
``अगं खूप गरीब असेल, त्याला बँक कार्ड देत नाही. आणि पूर्वी बँकापण नव्हत्या.'' मी
``म्हणजे भिकाऱ्यासारखं? पण ती माणसं तर आळशी, व्यसनी आणि वाईट असतात ना?''
पाश्चात्य देशांतून बहुधा ड्न्ग अॅडिक्ट माणसं अशी भीक मागतात.
``आणि कृष्णासोबत एवढी शाळा शिकूनसुद्धा तो नोकरी का करत नव्हता?'' चिंगी.
माझा रामजन्माच्या गोष्टीच्या विजयाचा आधीचा आनंद मावळायला लागला. शिवाय `काहीतरीच गोष्टी' सांगितल्याची शिक्षा म्हणून दोन `चांगल्या' गोष्टी सांगायचं वचन द्यावं लागलं. शेवटी रामायण-महाभारत पुढल्या वर्षीवर ढकलून मी रचीव गोष्टीची जुळवाजुळव करू लागलो.

दुसऱ्या दिवशी फिरायला गेल्यावर कुठल्यातरी यड्याबिद्र्या पोरीला बघून चिंगीने माझा हात सोडवून तिला मिठी मारली. पाश्चात्य देशात हे मिठ्याचं प्रकरण जरा जास्तच असतं. म्हणून मी तिला थोडं चापलं. म्हटलं, ``चिंगे, उगाच कसल्यापण पोरींना काय मिठ्या मारतेस?''
``बाबा, ती माझी गट्टीची मैत्रीण होती'' चिंगी.
``ई%%% असली?'' नकळत मी बोलून गेलो.

सुदाम्याची गोष्ट चिंगीला रुचली नाही तरी पचली होती. मला मात्र कदाचित् नुसतीच रुचली... ती लवकरात लवकर पचावी अशी आता व्यासांकडे प्रार्थना!
-चारुदत्त आपटे, क्रॅनडा


कोण, कुणाचे, का ऐकेल?
खुलीकरण व उदारीकरण या चळवळीचे परिणाम आता सर्वत्र दिसू लागले आहेत. त्या अर्थव्यवहारांच्या जोडीला दळणवळणाच्या क्षेत्रात संगणक व इलेक्ट्नॅनिक तंत्राने क्रांती केली. त्यामुळे व्यवहार व परंपरा यांच्या सगळया कल्पनाही बदलत चालल्या. गावातल्या किंवा फारतर त्या प्रदेशातल्या उत्पादनांची खरेदीविक्री आता आंतरदेशी पातळीवर गेली आहे. गावच्या कुंभाराने केलेला सुखकर्ता गणपती कधीच विसर्जन पावला, त्याच्या जागी चिनी कारखान्यातला गणपती डॉल्बीच्या तालावर धम्माल करणारा इव्हेंट बनला. मेणचट किलतानावर बसून गुळाचा खडा बत्त्याने फोडणारा वाणी गेला, मॉलमधून निवडलेली भाजी व आदिदासचे बूट घरात येऊ लागले.

हे रोखणे शक्य होत नसते. ते चांगले की वाईट याची चर्चा झडत राहावी इतकेच. पर्यावरण, तापमानवाढ, स्वदेशी वगैरे मुद्दे चूक नाहीतच; पण ते ऐकून घेण्यास कुणाला सवड नाही. `सामर्थ्यवान असेल तो टिकेल' हा नव्या व्यवस्थेचा मंत्र आहे. तोच प्रभाव गाजवत आहे. त्यामुळे गावात रिक्षा आल्या, की टांगेवाल्यांच्या पोटावर पाय येणार म्हणून त्यांनी ओरडा करावा हे काहीकाळ सहानुभूती निर्माण करणारे असते पण टांगे नाहीसे होऊन ऑटोरिक्षा रुळणार हे निश्चित आहे.

काही काळापूर्वी मोठमोठ्या कंपन्या किरकोळ दुकानदारीच्या क्षेत्रात उतरल्या. तेव्हा गावोगावीचे छोटे दुकानदार कंठशोष करून दमले. त्यांनी आपल्या व्यवसायात चांगले व्यवस्थापन विश्वासार्हता किंवा सेवाभाव अशा मूलभूत व्यवहारतंत्रांशी पूर्णत: फारकत घेतली होती. फसवणूक-उर्मटपणा-भेसळ अशा गैरप्रकारांनी जनतेला त्रस्त केले होते. त्यामुळे खुलीकरणाच्या लाटेत त्यांचे कुणी ऐकलेही नाही. मॉलमधील स्वयंसेवा, निवड करण्याचे स्वातंत्र्य, उपलब्धता, चोख गुणवत्ता, ठराविक दर या पद्धतींकडे लोक आकर्षित झाले. मोठ्या खेड्यांतूनही त्याच धर्तीवर `बझार' गजबजले, आणि वाणीदादाही आपल्या कळकट पोत्यावरून डुलत्या खुर्चीत बसण्याइतका बदलला. हा सगळा फरक प्रामुख्याने अर्धनागरी व शहरी भागात झाला. तथापि ग्रामीण भागातील आठवडी बाजार, यात्रा-जत्रा किंवा लग्ने-बारशी यांच्यात फारसा बदल नाही. फारतर भेळ-बत्ताशांची जागा वडापावने घेतली अथवा वडाच्या-केळीच्या पानांवर जेवणाऐवजी लॅमिनेट कागदाचे थाळे आले.
मथितार्थ असा की, हे बदल होण्याची गती वाढली, तर त्या वेगाशी कोणत्याही स्तराच्या अर्थव्यवहाराला जुळवून घ्यावेच लागते. त्यास विरोध टिकत नाही, रोखणे शक्य नसते. रिलायन्स, बिर्ला, बिग बझार, शॉपर्स स्टॉप वगैरे बड्या बड्या कंपन्यांनी मोठ्या शहरांत एके काळी हवा निर्माण केली, त्यावेळी किरकोळ दुकानदारांनी बरीच आरडाओरड केली. त्यांचे कुणी ऐकलेही नाही. ग्राहकांनी त्यांना बदलणे भाग पाडले. जे बदलले त्यातले कुणीही नष्ट झाले नाही. लोक पुन्हा त्यांच्याकडे वळले आणि बड्या कंपन्यांची प्रचंड गुंतवणूक घाट्यात येऊ लागली. शहरांतही त्यांची दमछाक झाली, मग गावोगावी ते येतीलच कशाला? पूर्वी दुकानदारांना खरेदीसाठी मोठ्या गावच्या पेठेत जावे लागत असे, आता कंपन्यांची उत्पादने तेल-मीठ-साबणसुद्धा खेड्यांत नेऊन पोचविली जातात. या प्रकारच्या छोट्या अर्थव्यवहारात बड्या कंपन्या टिकत नाहीत. उत्पादनाची आक्रमक व महाप्रचंड जाहिरात करून कोकाकोला पसरतो, पण ते विकणारे `हाटेल' गावातल्या गंप्याचे छबुरावाचे असते. तो मोठ्या उत्पादकाचा धंदा करू शकत नाही.

अलीकडे ऑनलाईन मार्केटिंग सुरू झाले. त्यात अॅमेझॉन, फ्िलपकार्ट वगैरे विदेशी कंपन्या उतरल्या आहेत. शहरी राहणीमानाच्या कित्येक वस्तू त्या कंपन्या ग्राहकाच्या थेट दारातच आणून पोचवतात. त्यांची मागणी इंटरनेटच्या माध्यमातून नोंद करता येते. अमेरिकेत तयार होणाऱ्या वस्तूंची माहिती इथे बसून मिळू शकते. या वस्तूंच्या आणि या प्रकारच्या आधुनिक व्यवहारांच्या नावीन्याचे आकर्षण नवश्रीमंत वर्गात असतेच. त्याचा परिणाम म्हणजे बड्या कंपन्यांच्या मॉलचे ग्राहक कमी झाले व ते थेट ऑनलाईन खरेदी करू लागले. म्हणून हे मॉलवाले, त्यांच्यापेक्षा बड्यांच्या विरोधात आता ओरडू लागले आहेत. अर्थातच त्याचा काही उपयोग होणार नाही. सरकार तर त्यांच्या भानगडीत पडणार नाही, पडूही नये. याच खाजगी बड्या कंपन्या एकेकाळी स्पर्धेच्या भीतीने खुलीकरणास विरोध करत होत्या, त्यांच्या धोरणांनुसार त्यांनी व्यवसाय पसरल्यावर छोट्या उद्योगांवर अतिक्रमण केलेच आहे. यालाच आर्थिक व्यवहारांचे खुलीकरण म्हणायचे. यात कोण कुणासाठी थांबणार नाही, कुणाची कणव करता येत नाही. आज ज्याची चलती आहे तो चार दिवस उड्या मारतो. त्याच्यापुढे जाणारा कुणीतरी उपजतो, हा मागे पडतो. त्याला सावरायला, उठवायला कोण थांबणार? थांबणाऱ्याला स्वत:च्या अस्तित्वाचीच काळजी असते; तो कसा थांबेल?
एके काळी बजाज स्कूटर मिळण्यासाठी सातसात वर्षे नंबर लावावा लागत असे. आज असली वाहने घेऊन `गाडी घेता का गाडी....' असे ओरडत फिरण्याची वेळ आहे. साधा लँडलाईनचा फोन घेण्यासाठी मिनतवारी  करावी लागे; आज हे फोनमंडळ जगते की मरते असे आहे. आता त्यांनी `मोबाईल कंपन्यांपासून आम्हाला वाचवा-' म्हणून आकांत केला, किंवा संघटित कामगार शक्तीच्या जोरावर काही चापलुसी केली तर त्यांच्यामागे कोण येणार? हीच तऱ्हा केवळ खाजगी वस्तू-ुउत्पादक किंवा व्यापाऱ्यांचीच नव्हे, तर सर्व क्षेत्रांची होऊ शकते. बँक कर्मचाऱ्यांनी गेल्याच महिन्यात पगारवाढीसाठी संप केला, याचा परिणाम काय तो दिसेलच. पण उद्या त्यांना त्यांच्या `आत्यंतिक सेवाभावा'चाही परिणाम सोसणे अटळ होणार आहे. शिक्षण, वृत्तपत्रे वगैरे क्षेत्रे जगाला शहाणपणा शिकवण्याचा मक्ता घेतल्याच्या थाटात वावरत असतात, पण त्यांनाही या प्रकारच्या आधुनिक ऊरफोड्या स्पर्धेला तोंड द्यावेच लागेल. पुढची पिढी कदाचित ऑक्सफर्ड-केंब्रिज-येल-हॉवर्ड वगैरे विद्यापीठांचे अभ्यासक्रम घेऊन ऑनलाईन परीक्षा देऊ लागेल. त्यावेळी आपल्याकडच्या थोर शिक्षणमहर्षींची डीम्ड विद्यापीठे असाच निरुपयोगी आक्रोश करतील व `त्या परीक्षांवर बंदी घाला' म्हणतील. ते कुणीही ऐकणार नाही. टिळक-आंबेडकर-आगरकरांची परंपरा सांगणारी पण आज प्रत्यक्षात भविष्य आणि कोडी छापणारी वृत्तपत्रे मार्केटचे तंत्र घेऊन भांडवल ओतणाऱ्या स्पर्धकांच्या नावाने असेच गळे काढतील.

एक गोष्ट नक्की आहे की ही सगळी झगमगाटी बाजारू स्पर्धा, त्याच प्रकारच्या `गिऱ्हाइकां'साठी होणार आहे. ज्याचा खराखुऱ्या गुणवत्तेवर, चिरंतन मूल्यांवर आणि आर्थिक शुचितेवर विश्वास आहे अशांची ताकद फार कमी पण ती पुरेशी असेल. त्यांना या बाजारी गजबजाटाचे भय नाही. मोठमोठ्या बँका-मॉल-मोटार कंपन्या यांची युद्धे चालू राहणारच; पण स्वच्छ चारित्र्याच्या छोट्या पतसंस्था, गावातला वाणीदादा किंवा सायकलवर फिरून धंदा करणारा सामान्य भाजीवाला यांना उत्तम जगता येईल. त्यांनीही स्वत:त बदल करत उत्तमतेशी दृढ राहिले पाहिजे. आज कोणताही आर्थिक व्यवहार स्पर्धेशिवाय सुरक्षित कवचात राहणार नाही. आज हसणारे उद्या संकटात येऊ शकतील. अर्थव्यवस्थेच्या खुलीकरणात बळी तो कान पिळी हे अपेक्षित होतेच. परंतु कुणाचे कान न पिळता जगायचे ठरविले तर बलवान होण्याच्या स्पर्धेशीही काही घेणेदेणे नसावे!
***

नव्या विषयावरचे चरित्र
जिऊबाई ह्या नाना फडणवीसांच्या नवव्या आणि शेवटच्या पत्नी. त्यांचे नानांशी लग्न झाले त्यावेळी लग्न म्हणजे काय हेदेखील त्यांना माहिती नसावे, असे त्यांचे वय होते, अवघे नऊ वर्षेे! नानांच्या इतर आठ बायका नानांच्या हयातीतच वारल्या. जिऊबाइंर्चे नानांशी लग्न झाल्यावर काही वर्षांतच नानाही मृत्यू पावले. त्यानंतर जिऊबाई चोपन्न वर्षे जिवंत होत्या. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने जिऊबाइंर्ना त्रास दिला. नानांची दौलत हस्तगत करण्याचे मोठे प्रयत्न बाजीरावाने केले, पण जिऊबाई मोठ्या धीराच्या निघाल्या. इंग्रजांना आपल्या बाजूला वळवून जिऊबाइंर्नी बरीच दौलत राखली.
मेजर मॅकडोनाल्ड हा जिऊबाइंर्ना मेणवलीला भेटला. त्याने नाना फडणवीसांचे चरित्र लिहिले आहे. जिऊबाईबद्दल त्याने चांगलेच लिहिले आहे. बाई सदाचरणी असून तिने नवऱ्याचे नाव राखले. `भले बुद्धीचे सागर' म्हणवणाऱ्या नानांसारख्या हिकमती कारभाऱ्याशी लग्न हाच जिऊबाइंर्च्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण होता. जिऊबाइंर्बद्दल कागदपत्रे अत्यल्प आहेत. तसे त्यांचे विस्तृत चरित्र कागदपत्रांअभावी लिहिणे कठीण आहे.
`घाशीराम कोतवाल' हे नाना फडणवीसांवरती लिहिलेले नाटक, पण त्यात असलेली नानांच्या चरित्रावरची टीका ही पुराव्याअभावी केलेली आहे असा स्पष्ट उल्लेख करूनसुद्धा `घाशीराम कोतवाल' हे नाटक जगभर गाजले. ह्या नाटकात केलेेले उल्लेख नाना फडणवीसांच्या जीवनात घडलेले आहेत का, याबद्दल काही पुरावा शोधण्यासाठी अभ्यास सुरू करताना वरील प्रकारचे पुरावे लेखी स्वरूपात सापडले नाहीत. सतत दहा वर्षे अभ्यास करूनसुद्धा पुरावे मिळत नाहीत म्हणून फार आनंद झाला. चुकीचे उल्लेख असतानाही नाटक गाजत आहे हे पाहून मन:स्ताप झाला. आम्ही नानांच्या घराण्यातील असून ह्या गोष्टीचा काहीतरी  बीमोड करावा असे वाटू लागले, त्यासाठी अजूनही प्रयत्न चालू आहेत.
पण ह्या सर्व अभ्यासात एक गोष्ट अतिशय आनंदाची झाली ती म्हणजे नानांना मिळालेली गौरवपत्रे, त्यांच्या मृत्यूनंतर इंग्रजीमध्ये त्यांच्यावर झालेले लिखाण, त्यामध्ये नाना फडणीसांनी लिहिलेले आत्मचरित्राचे कागद व त्यातील उल्लेख मिळाले. नानांचे आत्मचरित्र इंग्रज साहेबांना त्यांच्याकडील कागदपत्रांवरून मिळाले. परंतु हे आत्मचरित्र लिहिणारे स्वत:च नाना फडणीस आहेत. हे आत्मचरित्र वयाच्या १५ वर्षांपर्यंत, १७५९मध्ये लिहिले गेले आहे. पानिपत मोहिमेच्या वेळी ते १५-१६ वर्षांचे होते. राजकारणाच्या रणधुमाळीत त्यांना पुढील चरित्र लिहिण्यास वेळ मिळाला नाही. कारण त्यांच्यावर प्रचंड संकटे आली होती. पुढे हे आत्मचरित्र इंग्रजी लेखक मॅकडोनाल्ड यांनी १८५१ मध्ये नानांच्या पत्नीकडून (जिऊबाईसाहेब फडणवीस) व इतरांकडून माहिती जमवून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी येथे पुनर्मुद्रण केले. पुढे १८५९ मध्ये नाना फडणवीस यांची संक्षिप्त बखर पंडित विष्णूशास्त्री यांनी प्रसिद्ध केली. तेव्हापासून नाना फडणवीस यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले व लोक नाना फडणवीस यांच्यावर अभ्यास करू लागले.
या कर्तृत्ववान व्यक्तीच्या पत्नी जिऊबाई वैशंपायन या होत. नाना फडणवीसांच्या मृत्यूसमयी यांचे वय अंदाजे १० ते १२ वर्षे होते. नानांच्या मृत्यूनंतर यांना शनिवारवाड्यात कैदेत राहावे लागले. कैदेतून सुटल्यानंतर त्यांनी नाना फडणवीसांविषयी अभ्यास करून त्यांच्या सर्व राजकीय, आर्थिक व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून घेऊन नाना फडणवीस ऊर्फ भानू घराण्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी ब्रिटिशांशी प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. पण यातूनही त्यांनी माघार घेतली नाही. घराण्याचा वंश चालू ठेवण्यासाठी व दत्तक घेण्यासाठी जिऊबाइंर्ना प्रचंड कष्ट घ्यावे लागले. यातूनच दिसणारे त्यांचे मानसिक धैर्य वाखाणण्याजोगे आहे.
सर्व कागदपत्रे वाचून व त्यांच्या मामाचे एक पत्र वाचून मला त्यांच्याविषयी एक पुस्तक लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. जिऊबाइंर्चे ३ ऑगस्ट १८५४मध्ये देहावसान झाले. ते समयी त्यांच्या दत्तक पुत्रांनी माहिती दिल्यावरून पुण्याच्या तत्कालीन पेपर `ज्ञानप्रकाश'मध्ये ९ ऑगस्ट १८५४ मध्ये त्यांच्याबद्दल माहिती छापून आली. त्यात इंग्रजांनी व त्या काळातील लोकांनी त्यांच्याबद्दल गौरव उद्गार काढल्याचे आढळून आले. `नाना फडणवीसांची पत्नी जिऊबाई ह्या वाईजवळीत मेणवली ह्या गावी राहात होत्या. बाईसाहेब मनाने व आचरणाने निर्मळ होत्या. ब्राह्मणांचे ठायी भूतदया अंत:करणपूर्वक होती. मुख्यत्वेकरून बाइंर्चे घर हे ब्राह्मणांस माहेरच होते. त्यांच्या मृत्यूमुळे पेशवाई कारकिर्दीतील लोकांस प्रचंड दु:ख झाले.'
अशा ह्या कर्तृत्ववान स्त्रीचा आदर वाटावा व अशा असंख्य स्त्रिया आहेत ज्यांच्याविषयी नोंद आढळत नाही. त्यामुळे असे कागदपत्रं मिळण्यास प्रचंड काळ लागला व मलाही बराच अवधी लागला. फडणीस घराण्यातील मी एक व्यक्ती असल्याने ह्या स्त्रीचे कर्तृत्व लोकांसमोर यावे म्हणून पुस्तक रूपाने हा केलेला प्रयत्न.
- वैशाली मोहन फडणीस (आपटे)
१७७/७८, बेलबाग, पुणे
फोन : ०२०-२४४९३११६



आठवांचे साठव...!
ग्राहक चळवळीत..
एखाद्या सामाजिक चळवळीशी मी जोडला जावा, असा माझा पिंड नाही. आज माझा संबंध दूरान्वयानं का असेना, काही सामजिक संस्थांशी आहे. मी कोणत्याही संस्थेचा सभासदच नाही, त्यामुळं पदाधिकारी होण्याचा प्रश्न नाही. अनेक मान्यवर लोक आपापल्या संस्थांचे कार्य झोकून देऊन करत असतात, त्यांच्यासोबत काही काळ-काही अंतर चालायला-पळायला आवडतं. उपजत बुद्धी, हिंडणंफिरणं आणि तपशिलात विचार करण्याची शिकवण यांमुळे त्या त्या कार्याचं आकलन लवकर होतं. त्यामुळं लोकांचा घोटाळा होतो, आणि त्या संस्थेचा `प्रमुख कार्यकर्ता' समजतात.
ग्राहक पंचायत हे नावही मी ऐकलं नव्हतं. १९९२-९३ साली सांगलीतील काही कार्यकर्ते त्यात होते, त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. डॉ.देवीकुमार देसाई सांगलीचे अध्यक्ष होते. अशोक तेलंग, किशोर लुल्ला हे विस्ताराच्या दृष्टीनं जिल्ह्यात फिरत होते. त्यांची एक सभा तासगावला होती म्हणे. मला त्याबद्दल मागमूसही नव्हता. दोन दिवसांनी एका पेपरात वाचलं की, तासगाव तालुका ग्राहकपंचायत स्थापन झाली आणि त्याचे अध्यक्ष माधव प्रेसचे बंडोपंत देवधर, आणि सचिव वसंत आपटे! (हे देवधर नुकतेच निवर्तले) देवधरना फोन केला. त्यांच्याकडून कळलं की बापूसाहेब पुजारींनी ती नावं सुचवली होती, ती त्या सभेत जाहीर केली. हे कार्य काय, कसलं.... त्याबद्दल फारसं माहीत नाही. तितका अलिप्तपणा मला जमत नाही. म्हणून मी सांगलीत गेल्यावर बापूसाहेबांना भेटलो. ते उपाध्यक्ष होते. त्यानी घोळात घेतल,`जमेल तेवढं कर' म्हणाले.
मग अभ्यासवर्ग, बैठक यांतून जाणं भागच होतं. पुण्याला एका वर्गासाठी सांगलीतून ८-१०जण गेलो. त्या वर्गाच्याच दिवशी पुण्यात नानासाहेब गोरे यांचं निधन झालं (१मे). त्यावेळी पुण्याचे कलेक्टर असलेले श्रीनिवास पाटील फेटाबिटा बांधून आले होते. दामूआण्णा दाते यांनी `कार्यकर्ता' याच विषयावर सत्र घेतलं, ते विलक्षण प्रभावी वाटलं. मनांतील द्विधा स्थिती आणि मला कुणीतरी धरून आणल्याची मनातील भावना दूर झाली; आणि मी `कार्यकर्ता' झालो.... उचलून घोड्यावर बसवलेला!
सांगलीत कॉलेजविद्यार्थ्यांसाठी एक दिवसाचा अभ्यासमेळा होता. कुलगुरू वरुटे आले होते. परीक्षेचे निकाल, कार्यपद्धत इत्यादी समस्यांवरून विद्यार्थ्यांनी त्यांना `फायर' केल्याचे पाहिले. याच कार्यक्रमात मी `नको, नाही' म्हणत असताना माझी ग्राहक पंचायतीचा जिल्हा संघटनमंत्री म्हणून नियुक्ती झाली; आणि मी वाहात गेलो. प्रांत कार्यकारिणीवर व इतर ठिकाणी नियुक्त्या होत गेल्या; पण पदाचा विचार गौण मानला तरी ग्राहकपंचायतीचा महाराष्ट्न् प्रांताचा व कार्यकारिणीचा मी काही काळ प्रमुख सदस्य कार्यकर्ता होतो. ग्राहकसंरक्षण कक्ष प्रत्येक जिल्ह्यात क्रियाशील होते. श्री.बिंदुमाधव जोशी यांना त्यावेळच्या युती शासनाकडून `ग्राहक कल्याण उच्चाधिकार समिती'चे अध्यक्षपद व क्रॅबिनेट दर्जा मिळाला होता. त्यांच्या `लाल दिव्या'तून सगळया जिल्हाधिकारी दालनांत बैठका होत. मी पुष्कळांचे `बौद्धिक' घेत असे. उगीचच पावशेर मारायला मिळायचा. या अवधीत प्रत्येक तालुक्यात स्वतंत्रपणे जायला मिळाले. किशोर लुल्ला आणि मी खूप फिरलो. सुरुवातीला पुष्कळदा अशोक तेलंग बरोबर असत. या प्रवासातील मौज, खिदळणं, विचार, मुक्काम, बैठका-भेटी ही एक अजब प्रेरणा होती. एकामेकांच्या संगतीत खूप बदललो, असं आमचं आम्हालाच वाटायचं. आमच्याकडून ग्राहक-कल्याणाचं कार्य किती झालं ते काय सांगणार, कपाळ! पण आम्हाला बरंच शिकायला मिळालं. ग्रामीण भागातली म्हण वापरायची तर, `म्हैस भादरली नाही, पण निदान वस्तऱ्याला धार लागली!'
- वसंत आपटे

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन