Skip to main content

Posts

Showing posts from June, 2013

Ha.....Ha....

पिढीतलं अंतर बंडू : आजोबा, मी पास झालो. तुम्ही मोठ्ठं प्रेझेंट देणार होता ना? मला अॅपल किंवा ब्लॅकबेरी आणून द्या. आजोबा :  हे बघ, हे केळं आणि संत्रं संपव. मग जाऊ आपण त्या फळवालीकडं! आधुनिक भिकारी : माई, भाकर वाढा. गृहिणी : ए बाबा, भाकरी झाल्या नाहीत अजून, नंतर वेळानं ये, जा! भिकारी : या कार्डावर माझा मोबाईल नंबर आहे. भाकरी झाल्यावर मिसकॉल द्या. गृहिणी : तसं कशाला? भाकरी झाल्या की फेसबुकवर स्टेटस् अपडेट करते. ते बघ, आणि ये.

about D.V.Kelkar

द्वारकानाथ वासुदेव (द्वा.वा.)  (जन्मदिनांक १ जुलै १९२६) पत्रद्वारे दासबोध अभ्यासक्रम राबवून तो लोकप्रिय करणारे कुशल संयोजक म्हणून श्री.द्वा.वा.केळकर हे सुपरिचित आहेत. त्यांचे वडील वासुदेव नारायण हे स्वातंत्र्यपूर्व पाणीपुरवठा खात्यात इंजिनियर होते. श्री.द्वा.वा. हे बी.एस्सी. बी.टी. झाल्यावर त्यांनी कऱ्हाड, सांगली, इचलकरंजी, पुणे येथे अध्यापन केले. त्यांना राष्ट्नीय स्तराचा आदर्श शिक्षक पुरस्कार तीनवेळा मिळाला; तो मिळविणारे ते महाराष्ट्नतील पहिलेच शिक्षक. त्यांची खरी ओळख, दासबोधाचे अभ्यासक आणि मार्गदर्शक म्हणून आहे. सज्जनगडच्या नियामक मंडळावर त्यांनी काम केले. परीक्षार्थींच्या उपयोगाची `दासबोध प्रवेश, दासबोध परिचय आणि दासबोध प्रबोध' अशी पुस्तके लिहिली. त्याशिवाय विज्ञान, स्काऊटिंग, अध्यात्म याही विषयांत लेखन करून २०-२५ पुस्तके प्रसिद्ध केली. ते वयाची ८६ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांचे चिरंजीव डॉ.विक्रम (जन्म २६ जुलै १९५२) हे पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच लेक्चरर होते. संपर्क - `रघुनंदन' पटवर्धन बाग, २४/१२ अ, एरंडवणे, पुणे ०४ फोन (०२०) २५४४६९५०, ९९२३०८९७१९

Sampadkiya in 24 June 2013

या गावात काय आहे! आधी गावात-शहरात गर्दी करायची; आणि तिथे फार गजबजाट वाटतो, असे म्हणून थोड्या दूरवर जाऊन छानपैकी वसाहत करायची हा माणसाचा स्थायीभाव आहे, तो पृथ्वीतलावर सर्वकाळी सारखाच आहे. पोटापाण्यासाठी किंवा सद्यस्थितीच्या कटकटी टाळण्यासाठी स्थलांतर करायचे; त्या नव्या जागेवर प्रतिष्ठा मिरवायची! पण काही काळानंतर तिथल्यापेक्षा तिकडे दुसरीकडे जास्त काहीतरी मिळेल असे वाटू लागते; किंवा आहोत तिथेही कटकटी वाढत जातात. मग आपले बिऱ्हाड-बाजले उचलून दुसरीकडे तीन दगड मांडून माणूस नव्या जागेत प्रपंच थाटतो. तिथे राहण्याची नवी प्रतिष्ठा मिरवू लागतो. मथुरेत जरासंधाला श्रीकृष्णाने भीमाकरवी ठार मारले, पण एकतर मथुरेत कटकटी वाढल्या होत्या आणि विदेशी व्यापारधंद्यासाठी बंदर हवे झाले होते म्हणून त्याने द्वारका वसवली. न्यूयॉर्क ही अमेरिकेतल्या उच्चभ्रू श्रीमंत लोकांची नवी वसती होती. तिथे हळूहळू इतकी गजबज झाली की, आता न्यूयॉर्कमध्ये राहणे म्हणजे आपल्याकडील मार्केट यार्डात राहण्यासारखे मानतात; तिथे दिवसभर रहदारी आणि रात्री उंदीर घुशी असतात असे म्हणतात. पूर्वी पुण्यातल्या कसब्यात राहात असेल तर तो मूळचा पुणेक

Sampadkya in 17 June2013

मीडियागिरीचा हंगामा लहान मुलांच्या लपाछपीत किंवा चोरशिपाई खेळात भिडू `सापडला' की त्याच्या पाठीत धपाटा घालतात, त्याची हुर्यो करतात; आणि मग त्याच्यावर `राज्य' येते. हे सगळे आळीपाळीने चालते. प्रत्येक भिडू, किंवा गट, किंवा संघ वेगळे काही करत नाही. एखाद्यावर कधीच राज्य येत नाही असे होत नाही. कौशल्य - कसब - चपळाई थोडी कमीजास्त असेल; पण राज्य कधीतरी येतेच; परंतु एखाद्यावर राज्य आले, किंवा धपाटा मारून त्याच्यावर उलटवले की त्याला रडकुंडीला आणण्याइतके चिडवायचे; - जसे काही आपण कधीच चुकणार नाही! श्री नरेंद्र मोदी प्रकरणात आडवाणींसह इतर सर्वच पक्षांनी जे अकांडतांडव चालविले आहे ते पाहिल्यावर त्या बालिश खेळातल्या धपाटेगिरीची आठवण होते. श्री.नरेंद्र मोदी हे त्यांच्या पक्षाचे निवडणूक प्रमुख झाले, यावर त्यांना `संपविण्या'साठी  इतर गिधाडांनी किती दगड उगाळावेत! आडवानी तर त्यांच्या पक्षात सर्वज्येष्ठ नेता आहेत. त्यांनीही केलेला बालिशपणा, म्हातारपण आणि लहानपण सारखेच असते असे मानून सोडता येईल. परंतु शेजारघरच्या मुलाने परजातीच्या वधूशी लग्न ठरविले, म्हणून हा शेजार सोडून दूर राहायला जाण्यासारखे

Muslim rashtriya manch

मुस्लीम राष्ट्नीय मंच : नवा इतिहास गेल्या आठवड्यात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना आहे देशाच्या सर्वोच्च संसदेत घडलेली. संसदेचा सत्रसमारोप वंदे मातरम्ने होत असताना बहुजन समाज पक्षाचे खासदार शाफिकुर रेहमान बर्क संसदेतून चालते झाले. `वंदे मातरम् हे इस्लामच्या विरोधात आहे; त्यामुळे आपण बाहेर निघून गेलो आणि यापुढेही असेच करू' असे मोठ्या उद्धटपणे सांगत त्यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले. हे अपमानजनक दृश्य दूरचित्रवाणी संचावर पाहिले. त्या घटनेच्या विरोधात पिचतच स्वर उमटले असतील. दुसरी घटना याच्या अगदी विरुद्ध घडली ती जम्मू-काश्मीरमध्ये, जेथे कायम भारत विरोधी वातावरण असते; वंदे मातरम्सारख्या गीतांचे गायन तर फार दूरची गोष्ट! अशा वातावरणात देशभरातून जम्मूत जमलेल्या दोनशेहून अधिक मुसलमानांनी उच्च स्वरात वंदे मातरम् गाईले आणि `भारतमाता की जय'च्या घोषणांनी सारा आसमंत भारून टाकला. मी या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. गेल्या सात आणि आठ (मे) तारखेला जम्मूच्या हजारो नागरिकांनीदेखील हा सुखद अनुभव घेतला. मुस्लीम राष्ट्नीय मंचाने राष्ट्नीय सेमिनार आयोजित केले होते. ज्या दोनशेहून अध

Mr.' I '

मिस्टर `आय' एका शहरात चार मित्र गप्पा मारत चालले होते. त्यांंची नावे होती मिस्टर नोबडी, समबडी, एनीबडी आणि एव्हरीबडी! या चौघांच्या पुढे एक व्यक्ती जात होती तिचे नाव होते मिस्टर निग्लिजंट! हे साहेब रस्त्याने चालताना केळी खाऊन त्याची साल रस्त्यातच फेकत होते. मागे चालणाऱ्या चौघांना हे मुळीच आवडलं नाही. रस्त्यात साली टाकणंं योग्य नाही याबद्दल चौघाचं एकमत होतं. पण चौघांपैकी एकहीजण मि.निग्लिजंटना तसे सांगण्यास तयार नव्हता वा केळीची साले स्वत: उचलणे त्यांना मान्य नव्हते. साली उचलणेबाबत त्यांची चर्चा चालली होती. १) समबडी, एव्हरीबडी, नोबडी म्हणाले `हे काम क्षुल्लक आहे. एनीबडी क्रॅन डू इट!' २) एनीबडी, एव्हरीबडी, नोबडी म्हणाले, `समबडी हॅज टू डू धीस जॉब!' ३) नोबडी, एनीबडी, समबडी यांचं म्हणणं होतं, `एव्हरीबडी हॅज टू डू धीस वर्क!' ४) नोबडी पुटपुटला, `हू अॅम आय? आय एम नोबडी!' सारांश - केळयांची साले रस्त्यात पडली होती. हे चारजण फक्त चर्चा करीत होते. या चौघांचे  मागून जी व्यक्ती येत होती तिचे नाव `मि.आय' होते. मि.आय या चौघांची चर्चा ऐकत होते. ते चौघांना म्हणाले, ``वे

Lok Kya Boltat

गुन्हेगार प्रतिनिधी सध्या ५४७ खासदारांपैकी २७४ खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. लिली थॉमस या व्यक्तीने या भयंकर वस्तुस्थितीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात केस दाखल केली आहे. या केसमध्ये संविधानातील कलम ८(४) ला आव्हान दिले आहे. फाली नरिमन हे लिली थॉमस यांचे वकील आहेत. हे कलम काय सांगते? एखाद्या सामान्य माणसाने (सध्याच्या परिभाषेत आम आदमीने) गुन्हा केल्याचे शाबित झाले तर तुरुंगातून सुटलेल्या तारखेपासून सहा वर्षे त्याला निवडणूक लढता येणार नाही. पण लोकप्रतिनिधीला मात्र या ८(४) कलमान्वये वेगळा न्याय आहे. या कलमाने गुन्हा शाबित होऊनही त्याला संरक्षण देण्यात आले आहे. त्याला गुन्हेगार ठरविता येणार नाही. गुन्हेगार लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या या सुरक्षाचक्रामुळे गुन्हेगारांची लोकसभा अशी कुख्याती आपल्या लोकसभेची झाली आहे आणि काठावरच्या बहुमतामुळे अशा लोकप्रतिनिधींची मदत घेऊनच सत्ताधारी पक्ष राज्य करीत आहे ही भयावह स्थिती नरीमन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस आणून दिली आहे. सर्वांना समान न्याय या तत्त्वाला या कलम ८(४) मुळे धक्का पोहोचतो तेव्हा त्याचा फेरविचार करणे आवश्यक असल्याचे

Rani Laxmibai

झाशीची लक्ष्मी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव भारतीय इतिहासात कोरले गेले आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसंगरात त्यांना वीरगती मिळाली, हा स्फुलींग सर्वज्ञात आहे. परंतु त्याआधीचा त्यांच्या राज्यकारभाराचा दरारा कसा होता हे लक्षात आणून देणारे हे वर्णन. वरसई (जि.रायगड) येथील विष्णुभट गोडसे यांनी त्या कालखंडात उत्तर भारतात केलेल्या प्रवासाचा वृत्तांत `माझा प्रवास' या पुस्तकाने प्रसिद्धी पावला. झाशीतील त्यांच्या वास्तव्यातून `हुजुरां'ची दिनचर्या समजते, ती वेधक वाटेल - बाईसाहेबांचा नित्यक्रम येणेप्रमाणे होता. त्यांस शरीराचा षोक लहानपणापासून होता तो त्यांनी स्वतंत्रता मिळाल्यावर पूर्ण केला. पहाटेस उठून कसरतशाळेत जाऊन जोर, जोडी, मलखांब करावा. नंतर घोड्यावर बसून फिरावयास जावे व घोडा मंडळावर धरावा, कुंपणावरून उडवावा, खंदकाचे पार घालवावा, एकदम खाली बसवावा इत्यादी नाना प्रकारच्या घोड्याच्या कसरती कराव्यात. कधी कधी हत्तीवरही बसत. याप्रमाणे सात आठ वाजेपर्यंत मेहनत झाल्यावर नेहमी खुराक खात असत. नंतर तासभर कधी निजत असत. कधी तशाच स्नानास जात. स्नान झाल्यावर स्वच्छ पांढरे चंदेरी पातळ वस्त्र

Lekh on IPL Matches

फसवणूकीची साखळी - विवेक ढापरे, कराड  (मोबा. ७५८८२२११४४) पूर्वी  आपल्याकडे राजे-महाराजे स्वत:च्या करमणुकीसाठी बैलांना, कोंबड्यांना विकत घेऊन त्यांच्या झुंजी लावून, पैसे उधळून, आपली करमणूक करून घ्यायचे. आय पी एल हा त्याचाच नवा  सुधारित अवतार वाटतो. इथे चित्रपट, व उद्योग क्षेत्रातील बडी धेंडे खेळाडूंचा लिलाव पुकारतात. खेळाडूंवर कोट्यावधींच्या बोली लावून त्यांना विकत घ्यायचे व मालकांच्या संघांनी एकमेकात सामने खेळायचे. लोकांना खुळे करून टाकतात, क्रिकेटवेडा भारतीय माणूस या तमाशाचा उत्सव करू पाहतो. दुनिया झुकतेच, हे झुकानेवाले आहेत! मला क्रिकेट पाहण्याची फारशी आवड कधीच नव्हती. पोटापुरती भाजीभाकरी मिळवून प्रपंच करणारी आपण सामान्य माणसं, हल्ली त्या बड्या दुनियेत रमू लागलो. दोष आपलाच की! माझ्या पगारदार नवश्रीमंत भाच्याने तिकीटे काढली होती, त्यामुळे अनवधानाने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा, मला आयपीएल चा सामना प्रत्यक्ष पाहण्याची संधी(?) मिळाली. १५ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रात्रौ ८ वाजता मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना होता. आम्ही संध्याकाळी साधारण साडेसहाच्य

Lekh on Buddha

गेल्या २५ मे रोजी बुद्ध पौर्णिमा झाली. त्यानिमित्ताने गौतमांनी समाजसंघटन करण्यासाठी आपल्या चिंतनातून शास्त्र बनवले. त्याविषयी काही अभ्यासचर्चेतून, नव्या धर्मसंघटनेच्या संदर्भात जी कार्यपद्धती मांडली, ती आजच्या काळातील स्वयंसेवी संघटनांस उपयुक्त ठरेल. भगवान बुद्ध व संघटनशास्त्र - विनिता तेलंग (मोबा.९८९०९२८४११) स्वत:च्या कठोर तपाचरणातून विश्वातील सत्य जाणून घेतलेले व ज्ञानावर आधारित `धम्म' - म्हणजेच सदाचरणाचे नियम - सांगणारे भगवान गौतम बुद्ध हे पहिले संघ (संघटना) संस्थापक होते. त्या काळातही अनेक विचारधारांचे वेगवेगळे संघ होते, पण बुद्धांचा संघ कालौघात गडप न होता टिकून राहिला. संघ म्हणजे एकविचाराने आचरण करणाऱ्यांचा समुदाय. बुद्धांचे संघजीवन विशिष्ट नियमांनी नियंत्रित होते. परिस्थितीनुसार नियम बदलत होते. बुद्धांच्या संघात ते असतानाही खूप उत्क्रांती झाली. स्वत:ला झालेल्या अंतिम सत्याच्या दर्शनानंतर बुद्धांनी प्रथम सारनाथ येथे त्यांच्या पहिल्या पाच सहकारी भिक्षूंना सांगितलेले ज्ञान म्हणजे `धम्मचक्र प्रवर्तन'. बुद्धांचे अनुयायी वाढत वाढत संघ नंतर लाखोंच्या घरात पोचला. बुद्ध अ

Annapurna Yojna

अन्नपूर्णा योजना नाशिकच्या मनोहर रुग्ण सेवा केंद्रामार्फत `अन्नपूर्णा योजना' सुरू आहे. नाशिकमध्ये आजूबाजूच्या खेडेगावांतून, आदिवासी भागातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी दररोज रुग्ण येत असतात. त्यावेळी त्यांचे जेवणाचे हाल होतात. साधे व चांगले पदार्थ मिळत नाहीत. आर्थिकदृष्ट्या हॉटेलही परवडत नाही. त्यांना जेवण उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य हेतू आहे. मनोहर रुग्ण सेवा केंद्राचे दोन कार्यकर्ते सर्व वॉर्डातून फिरून रुग्ण बांधवांना व त्यांच्या नातेवाईकांना धीर देत असतात. दर महिन्याच्या ठराविक तारखेस शहराच्या एकेक विभागातून गव्हाच्या आठ पोळया कागदात गंुडाळून त्याला पुरेशी कोरडी भाजी एका प्लॅस्टीक पिशवीत भरून याप्रमाणे घराघरांतून गोळा करतात. ते पॅकेट गरजू रुग्ण बांधवांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन देतात. ते जेवत असतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील घरचे जेवल्याचे समाधान पाहून मनस्वी आनंद होत असतो. जेवणाची पाकीटे देण्यासाठी निरनिराळया भागांना वेगवेगळया तारखा वाटून दिल्या आहेत. त्यामुळे महिनाभर ही अन्नपूर्र्णेची थाळी भरतच असते. साधारणपणे ४०-५० कुटुंबे सहकार्य करतात. या माताभगिन

Sampadkiya in 10June2013

भ्रष्टाचाराच्या भेसळवाटा ज्यात त्यात भेसळ करण्याबद्दलची एक कथा सांगितली जाते की, असल्या आयुष्याला वैतागून एकाने विष खाल्ले. परंतु त्यातसुद्धा इतकी भेसळ होती त्यामुळे त्या माणसाला मरणही आले नाही. हे सगळे संकट टळले म्हणून त्याच्या घरच्यांनी पेढे आणले, त्याला पहिला पेढा भरवला. त्या पेढ्यात भेसळ अशी की तो पेढा खाऊन माणूस मेला. उत्तर भारतात कुठेसे छोटे कारखाने आहेत असे म्हणतात, तिथे शेंगदाणे, ज्वारी, तांदूळ अशाच रंगारूपाचे गारेचे खडे बनवले जातात आणि आपल्यासारखे भेसळसम्राट ते विकत घेऊन आपल्या मालात घालतात. खरे-खोटे तो गारेचा देवच जाणे. याची आठवण करून देणारा एक शासकीय निर्णय म्हणजे नारळाला भेसळ-प्रतिबंधक नियम लागू केला असून नारळ विकणाऱ्यांनी अन्नभेसळीबाबतचा परवाना घेण्याची अट घातली आहे. देवाची करणी अन् नारळात पाणी या म्हणीचा वापर आता करू नये, कारण नारळात पाणी घालण्याचे काम देव करतो हे समजले तर देवाने तो उद्योग करण्यासाठी भेसळप्रतिबंधक परवाना त्याला द्यावा लागेल. दुकानातला नारळ `टकटकटॅक' करून वाजवून देण्या-घेण्याचा एक उपचार असे. त्यावरून फारतर नारळ पिचलेला असेल तर कळून येईल, तो कुजका आ

Grahakanchya Apeksha

ग्राहकांच्या अपेक्षा `पोस्ट खाते म्हणजे भोंगळ' असा एक (गैर)समज बाहेरच्या जगात आहे. पोमा, स्टेमा आणि शामा (पोस्टमास्तर, स्टेशनमास्तर, शाळामास्तर) हे म्हणजे गरीब बिचारे प्राणी असे पूर्वीपासून समजत. त्या काळी मुख्यत: या साऱ्यांचे पगार तुटपुंजे होते, जेमतेम प्रपंच ओढाताणीत चालावा इतकीच प्राप्ती. इतर `सुप्रसिद्ध' खात्यांप्रमाणे कुठे हात मारण्याची संधी या दोन-तीन खात्यांमध्ये नव्हती आणि तशी प्रवृत्तीही नव्हती. नियम कायदे कठोर होते. साहेब लोकांचा वचक होता. एकंदरीत कामच करण्याशिवाय इलाज नव्हता. अलिकडे शाळांची स्थिती बदलली. शिक्षक गाडीतून फिरू लागले. रेल्वे आणि इतर शासकीय खाती कात टाकू लागली. पोस्ट खाते मात्र पूर्वीच्याच वातावरणात गुंग राहून थोडेस मागे पडले होते. `अॅरो प्रोजेक्ट'च्या मोहीमेने ते वातावरण बदलू लागले. दुसरीकडे सहावा, सातवा वेतनआयोग लागू झाला, पगार वाढले, पोस्टाला नवा रंग चढला, काचा-फेर्नचर आले, कॉम्प्यूटर आले! परंतु....! `पोस्ट बदलले' असे अजून लोक म्हणत नाहीत. हे खाते असे आहे की त्याचा संबंध प्रत्येक नागरिकाशी येतो. लोकांचा पोस्टावर प्रचंड विश्वास आहे, पण `

Sampadkiya in 3June2013

नवी दिशा समजून घ्यावी नव्या युगाच्या चाहुलीतून टपालखाते आता ताजेतवाने होऊ पाहात आहे. पोस्टाची आजची सेवा इंग्रजांच्या काळात सुरू झाली, त्यास दीडशे वर्षे उलटून गेली. त्यापूर्वी टपाल-वहन होतच असे. कोणी दूत पाठवीत, कुणी खलिता पाठवीत, कुणी सांडणीस्वार पाठवीत. कबुतराच्या चोचीत पत्र-चिठी देऊन पाठविण्याची कविकल्पना कदाचित प्रत्यक्षातही असू शकेल. हे संदेशवहनाचे प्रकार इतिहासजमा झाले, आणि इंग्रजांची डाक-सेवा आजपर्यंत अथक चालू आहे. इलेक्ट्नॅनिक्स-ई मेल व सेलफोनच्या जमान्यात पत्रलेखन कमी झाले ही तर वस्तुस्थिती आहे. हल्ली पोस्टाच्या पेटीत पत्रे फारशी पडत नाहीत, त्यावरून `पोस्ट खाते बंदच होईल' असे बरळणारे काही महाभाग पाच-दहा वर्षांपूर्वी होते. परंतु आता त्यांची गणना वेड्यातच करावी लागेल. कारण पोस्टात येणारी पत्रे कमी झाली तरी इतर असंख्य प्रकारचे टपाल इतके वाढले की, पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना दररोज कामाचा डोंगर उपसावा लागतो. फोनबिले, अहवाल, नोटीसा, विमा, वगैरेंचे प्रमाण महाप्रचंड वाढले आहे. त्याशिवाय पोस्टाच्या नव्यानव्या योजना, आवर्ती ठेव, पोस्टल विमा, ईएमओ वगैरेंनी प्रत्यक्ष पत्रसेवेची कसर

life in Canada

मॉन्ट्नीयल कार-नामा स्वच्छता, टापटीप, पोशाख, खाद्यपदार्थ, संस्कृती सगळयाच बाबतीत मॉन्टि्न्यलवर फ्रान्सचा आणि नवीन पिढीवर अमेरिकेचा प्रभाव आहे. क्युबेकमध्ये इंग्रज आणि फ्रेंचांचं सांस्कृतिक वरचष्म्यासाठी बरेच दिवस शीतयुद्ध सुरू होतं. अजूनही कुठे-कुठे छोट्या मोठ्या लढाया होत असतात, पण तेवढ्यापुरत्याच! एकूणच समाजावर आणि समाजजीवनावर `मिडिया'चा भलताच प्रभाव इथंही आहे. त्यामुळं मिडियाची अक्षरश: `बुवाबाजी' चालू असते.`अमूक एक ठिकाणी बॉम्बहल्ल्याची शक्यता' अशी बातमी कुठंतरी छापून येते. मग महिनाभर त्यावर चर्चा, रिपोर्टस्, हल्लेखोर कुठून-कसे येऊ शकतील याची कल्पनाचित्रं यांनी टीव्ही आणि पेपर्स भरून जातात. टीव्हीवर तज्ज्ञांच्या मुलाखती होतात. शेवटी एखाद्या कंपनीला तिथे हजारो सीसी टीव्ही आणि क्रॅमेरे बसवण्याचं कंत्राट मिळतं. सगळं हळूहळू थंड होतं. मग थोड्या दिवसांनी `हल्ल्याची शक्यता ही क्रॅमेरे बसविणाऱ्या कंपनीने उठवलेली अफवा होती' अशी बातमी दुसरा पेपर छापतो. एखाद्या मॉलनं खूप मोठ्या प्रमाणावर टोमॅटो घेतले तर पेपर-टीव्हीमधून ७२ रोगांवर टोमॅटो कसे गुणकारी आहेत त्यावर लेख किंवा

Sampadkiya in 27may2013

मूल्ये रुजविणारी पथ्ये `पाकीटमार' या नावाचा एक सिनेमा पूर्वी होता, त्यात देवआनंदची प्रमुख भूमिका होती. उगवत्या तारुण्यात त्याला वाईट वळण लागले आणि लोकांच्या गर्दीतून खिशातील पाकिटे लंपास करण्याचे कौशल्य लवकरच मिळाले. पुढच्या दीडदोन तासात त्याच्या त्या पाकीटमारीचा खेळ, त्यातून आलेला हरामीचा पैसा, एकट्या विधवा आईला फसवून स्वत:स मोठी नोकरी असल्याची बतावणी, आणि एका भोली-भाली टिंगाणीसह बागेतील लपंडाव. शेवटच्या भागात त्या आईला याचे प्रताप समजतात, ती उन्मळून पडते आणि मरते. तिच्या चितेकडे पाहून या उंडार तरुणाला पश्चात्ताप होतो आणि डाव्याउजव्या खिशातून बदाबदा पाकिटे काढत तो ती सगळी मारलेली पाकिटे त्या चितेवर फेकून चांगले वागण्याची मनोमन शपथ घेतो. वाईटाचा त्याग करून चांगल्याचा संदेश त्या सिनेमातून मिळेल असा हेतू निर्मात्यांचा होता का, ते ठाऊक नाही. परंतु एका शिक्षकांनी तसा चांगला संस्कार मुलांवर घडेल या अपेेेक्षेने तो पाहण्याची शिफारस मुलांना केली. नंतरच्या महिनापंधरा दिवसांत पोरांनी आपल्या वर्गातील मुलांच्या वस्तू त्यांच्या नकळत लांबवण्याचा सराव केला, आणि बोलता बोलता पैज लागून एका नसराण्

Sampadkiya in 20may2013

राव पडले, पंत चढले कर्नाटकातील निवडणुकीचे निकाल त्या राज्यात राजकीय उलथापालथ करणारे आहेत; परंतु सामान्य जनतेला `तेच ते आणि तेच ते' असे वाटण्यासारखेच आहेत. आधीच्या पाच वर्षात भाजप ने काँग्रेसी राज्य केले, ही प्रतिक्रिया बोलकी वाटत असली तरी यापुढची पाच वर्षे काँग्रेसवाले भाजपी राज्य करतील यात शंका नाही. पाच वर्षांपूर्वीची काँग्रेस राजवट लोकांनी झिडकारण्याचे कारण त्या कालावधीतील भ्रष्टाचार हे असल्याचे सांगितले जात होते. भाजपवाल्यांनी तोच मुद्दा प्रचाराचा केला होता. लोकांनी तो उचलून धरत कधी नव्हे ती या राज्याची सत्ता भाजप वाल्यांकडे दिली. त्यांनी तोच वारसा चालवत ठेवला आणि त्या भरीला निर्नायकी ढिसाळ प्रशासन आणले. काँग्रेसचे कुणी वरिष्ठ नेते म्हणतात की, `कर्नाटकात भाजप च्या विचारांचा पराभव झाला, आणि तेथील जनतेने राहुलजींच्या नेतृत्त्वावर विश्वास टाकला.' असली विधाने करणारे लोक वरिष्ठ पदावर आहेत हेच काँग्रेसच्या भावी अपयशाचे स्पष्ट कारण ठरण्यास पुरेसे आहे. मुळातच भारतीय जनता पक्ष अथवा इतर कोणत्याच राजकीय पक्षाकडे काही मूल्ये आणि तत्त्वविचार शिल्लक आहे असे जनतेच्या अनुभवास येत नाही

Sampadkiya in 13 may 2013

भिंतीवर टांगलेला धर्म पोलिस आयुक्तानी एक फतवा काढून कोणत्याही पोलिस कार्यालयात - ंठाण्यावर - चौकीत देवाचे फोटो लावणे, पूजा-आरती करणे वा कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी केली आहे, असे वृत्त प्रकाशित झाले. आपले शासन-प्रशासन घटनेनुसार धर्मनिरपेक्ष असल्यामुळे आणि नैतिक दृष्ट्या ते तसेच हवे असल्यामुळे शासकीय जागेत त्या धर्मकार्याचे देव्हारे माजविणे निखालस चूक आहे. परंतु इतक्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी इतक्या सहज रोखता येणे शक्यच नाही, हेही स्पष्ट वास्तव आहे. एक तर शासकीय कार्यालयाची व्याख्या फक्त पोलिस ठाण्यापुरती मर्यादित का ठेवली हाही प्रश्न आहे. कारण कित्येक जिल्हा परिषदा, विभागीय शासकीय संकुले, बस-स्थानक अशा जागी देवांचे फोटो नव्हेत, तर ऐटदार मंदिरे उभी आहेत. पोलिस ठाणीही अपवाद नाहीत. अशा स्थितीत त्या फतव्याचे पालन करायचे तर ती मंदिरे काढून टाकणे कसे शक्य आहे? त्याहीपुढे जाऊन पंढरीच्या मंदिरात होणाऱ्या शासकीय पूजेला येणारे मंत्री हे व्यक्तिगत हजर नसतात, तर लाल दिवा आणि पोलिसी बंदोबस्त मिरवत येतात. ईदच्या वेळी इफ्तार पार्टीत अख्खे शासन सहभागी होते, त्यावेळी प्रत्येका

sampadkiya in 2 may 2013

विक्रम-वैराग्याशी राजकारणाची फारकत विक्रम वैराग्य एकजागी नांदती धर्म-राजकारण समवेत चालती पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा प्रिय अमुचा एक महाराष्ट्न् देश हा । - श्री.कृ.कोल्हटकर महाराष्ट्न् राज्याचा स्थापना दिन १९६० च्या १ मे पासून साजरा केला जातो. भाषावार प्रान्तरचना ही एक स्वतंत्र भारताची, संघराज्यांच्या निर्मितीप्रक्रियेतील सोय होती. तरीही भाषिक अस्मिता आणि त्यांतून अन्याय हे दोन्ही फुलत राहिल्याचा अनुभव पन्नास-साठ वर्षांनीही येत आहे. बराच काळ लोटला, पिढ्या मागे पडल्या, सभोवारची परिस्थिती बदलली परंतु त्या काळी सुरू झालेले वाद अजूनी संपत नाहीत. तेलंगण, विदर्भ, लडाख इथली फुणफुण चालू आहे. एकाच कुटुंबातील माणसे वेगळी राहू लागली तरी त्यांच्या अस्मितांमुळे वाद होतच राहतात. नंतर कधीतरी प्रसंगाने ती सगळी फुटलेली घरे एकत्र भेटतात, त्यावेळी मात्र `आपण एकाच मूळ बुडख्याच्या फांद्या आहोत' याचा साक्षात्कार वरकरणी तरी झाल्याचे दिसते. त्याच चालीवर या राज्यांना वादासाठी सतत निमित्त मिळतच असते - कधी भाषेचे, कधी पाणीवाटप, कधी गुन्हेगारी हस्तांतर किंवा कधी उद्योगांचे स्थलांतर. हे वाद