Skip to main content

Muslim rashtriya manch

मुस्लीम राष्ट्नीय मंच : नवा इतिहास
गेल्या आठवड्यात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना आहे देशाच्या सर्वोच्च संसदेत घडलेली. संसदेचा सत्रसमारोप वंदे मातरम्ने होत असताना बहुजन समाज पक्षाचे खासदार शाफिकुर रेहमान बर्क संसदेतून चालते झाले. `वंदे मातरम् हे इस्लामच्या विरोधात आहे; त्यामुळे आपण बाहेर निघून गेलो आणि यापुढेही असेच करू' असे मोठ्या उद्धटपणे सांगत त्यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले. हे अपमानजनक दृश्य दूरचित्रवाणी संचावर पाहिले. त्या घटनेच्या विरोधात पिचतच स्वर उमटले असतील.
दुसरी घटना याच्या अगदी विरुद्ध घडली ती जम्मू-काश्मीरमध्ये, जेथे कायम भारत विरोधी वातावरण असते; वंदे मातरम्सारख्या गीतांचे गायन तर फार दूरची गोष्ट! अशा वातावरणात देशभरातून जम्मूत जमलेल्या दोनशेहून अधिक मुसलमानांनी उच्च स्वरात वंदे मातरम् गाईले आणि `भारतमाता की जय'च्या घोषणांनी सारा आसमंत भारून टाकला. मी या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. गेल्या सात आणि आठ (मे) तारखेला जम्मूच्या हजारो नागरिकांनीदेखील हा सुखद अनुभव घेतला.
मुस्लीम राष्ट्नीय मंचाने राष्ट्नीय सेमिनार आयोजित केले होते. ज्या दोनशेहून अधिक मुसलमान बंधू-भगिनींनी हा नवीन इतिहास लिहिला ते सर्व मंचाचे कार्यकर्ते होते. गेल्या एक दशकापासून मुस्लीम राष्ट्नीय मंच ही संघटना भारतीय मुसलमान समाजात देशभक्तीची ज्योत जागविण्याचा प्रयत्न करीत आहे. हिंदू व मुसलमान या समाजात परस्पर प्रेम, बंधुभाव, शांतता आणि सौहार्द टिकून राहावे यासाठी ही संघटना कार्यरत आहे. मंचाला मिळालेल्या यशाचा अनुभव जम्मूच्या या सेमिनारमध्ये घेता आला.
दिल्लीहून मुस्लीम मंचाचे राष्ट्नीय संयोजक मोहम्मद अफजल व त्यांची पत्नी शहनाझ यांच्यासोबत जम्मूला जाण्याचा योग आला. प्रवासातील चर्चेदरम्यान त्यांनी मंचाची भूमिका स्पष्ट केली. सन २००२ मध्ये देशातील काही प्रमुख मुस्लीम मौलाना, धर्मगुरू, बुद्धिजीवी आणि संघाचे अधिकारी यांची चर्चा झाली आणि या चर्चेचे फेलत म्हणून मुस्लीम राष्ट्नीय मंच स्थापन झाला. मंचाने आजपर्यंत बराच पल्ला गाठला आहे. गोहत्त्या बंद व्हावी म्हणून मंचाने देशभरातील आठ ते दहा लाख मुसलमान बांधवांच्या सह्या गोळा केल्या व संघाच्या पाठिंब्याने काढण्यात आलेल्या विश्व मंगल गो-ग्राम यात्रेत ठिकठिकाणी सहभागही घेतला. कृषिप्रधान भारतभूमीत गोपालनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
आतंकवादाचे व अतिरेकी हिंसाचाराचे धर्माच्या नावावर होत असलेले समर्थन चुकीचे आहे आणि त्या विरोधात मंचाने देशभरात कार्यक्रम घेत प्रभावी आवाज उठविला. देवबंद सारख्या मुस्लिमांच्या धर्मपीठाने अतिरेकी हिंसाचार इस्लामला मान्य नाही असा फतवा जारी केला होता.
जम्मू-काश्मीर हा देशाच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाचा विषय राहिला आहे. अलीकडे मनमोहन सरकारने ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्री.दिलीप पाडगावकर यांच्या नेतृत्त्वाखाली तीन-सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने सरकारला जो अहवाल आणि शिफारसी सादर केल्या त्या विरोधात मंचाने देशभर जोरदार आवाज उठविला. स्थापनेपासून तो आजपर्यंत मंचाने सदैव देशहिताचेच काम केले आहे आणि भारतीय मुसलमान हा पक्का देशभक्त आहे आणि शांतताप्रिय आहे हे सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या सात-आठ मे ला जम्मूत आयोजित `हम हिंदुस्थानी' व `जम्मू-काश्मीर हिंदुस्थान का' या विषयावरील सेमिनार राष्ट्नीय मुस्लिम मंचाच्या यशातील एक महत्त्वाचा टप्पा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये मुसलमानांनी `वंदे मातरम्' व `भारतमाता की जय'च्या स्वरांनी परिसर दुमदुमवून सोडला. या सेमिनारचे संयोजक गुलाम अली म्हणाले, ``६७ साल में पहली बार यह हुआ है और वो भी मुसलमानों के द्वारा । यह बहुत अहम बात है ।''

पृष्ठभूमी
या सेमिनारची पृष्ठभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. दिलीप पाडगावकर समितीने काश्मीरात सक्रिय असलेल्या भारतविरोधी आणि फुटीरतावादी शक्तीची भलावण केली होती. फुटीरांची भाषा वापरून आपल्या शिफारशी सादर केल्या होत्या. राज्याला विशेष दर्जा देणारे घटनेचे ३७० वे कलम स्थायी करावे आणि त्याला विशेष दर्जा द्यावा असेही या समितीने सुचविले होते. मुस्लीम राष्ट्नीय मंचाने या शिफारशीच्या विरोधात मुसलमान समाजाचा आवाज उठविण्याचे ठरविले. २०११ साली या कार्यक्रमाची घोषणा झाली. पहिल्या टप्प्यात देशभर मशिदी, दर्ग्यात प्रार्थना करण्यात आली, पत्रकार वार्ता घेण्यात आल्या. दिल्लीच्या जंतरमंतर येथे १८ डिसेंबर २०११ रोजी देशभरातून दहा हजार मुसलमान एकत्र आले व त्यांनी धरणे धरले. काश्मीरातून मोठ्या संख्येने मुस्लीम बंधू-भगिनी या धरणे कार्यक्रमात सामील झाले होते हे विशेष!
पुढील कार्यक्रमात काश्मीरच्या वास्तविक परिस्थितीचे नित आकलन मुसलमान बांधवांना करून देणे, समितीच्या शिफारसींना विरोध करणे आवश्यक आहे हे त्यांना पटवून देणे आणि त्यांच्या सह्या घेणे हे होते. मंचाच्या कार्यकर्त्यांनी देशभरात मुसलमान समाजात जाऊन आठ लाखाहून अधिक सह्या एकत्र केल्या. यापैकी ४३ हजार सह्या जम्मू-काश्मीरमधील मुसलमान बांधवांच्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशहिताच्या एखाद्या मुद्द्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात मुसलमान समाजाने सक्रीय सहभागी होण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा.

सेमिनारचे उद्घाटन
जम्मू सेमिनारसाठी जम्मू-काश्मीरातून शंभरहून अधिक आणि देशाच्या अन्य प्रांतातून शंभर असे प्रतिनिधी हजर होते. संमेलनाचे उद्घाटन करताना मंचाचे राष्ट्नीय संयोजक महम्मद अफझल म्हणाले की, ``१९४७ मध्ये धर्माच्या नावावर देशाचे एक विभाजन झाले परंतु आता मात्र आम्ही पुन्हा धर्माच्या नावाखाली देशाची फाळणी होऊ देणार नाही.''
इस्लामचा खरा अर्थ शांती, बंधुभाव, सुरक्षा, प्रगती असा आहे आणि हे जगाला सांगण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. मुस्लीम राष्ट्नीय मंच हेच सांगण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे. अमरनाथ आंदोलनात मंचाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून तो श्रीनगरच्या लाल चौकापर्यंत पैगाम-ए-अमान यात्रेचे आयोजन केले होते आणि हिंदू बांधवांचे समर्थन केले होते.
जम्मूचे मुस्लीम बुद्धिजीवी खालिद हुसेन म्हणाले की, ``आमचा देश हक सुफी संतांचा देश आहे. परंतु मुस्लीम समाजात शिक्षणाचा प्रसार कमी झाल्याने अतिरेकी कारवायात मुस्लीम युवक बळी पडत आहेत. मुसलमानांनी गीता व वेदांचे अध्ययन केले पाहिजे. त्यासाठी त्यांचे उर्दू भाषेत अनुवाद होणे गरजेचे आहे.''
इंग्रजांनी हिंदू व मुसलमान समाजात फूट पाडून राज्य केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारांनीदेखील तेच धोरण पुढे नेले, जेणेकरून त्यांचा सत्ताकारणासाठी उपयोग करून घेता येईल. आम्ही सर्व भारतीय आहोत, आमचे पूर्वज, संस्कृती, मातृभूमी एक आहे. मग भेद कसा? मंचाने हे चांगले समजून घेतले असून भारतीय मुसलमान समाजात एक प्रभावी संदेश प्रसारित केला आहे.
जम्मू काश्मीरसाठी जे कलम तात्पुरते घटनेत अंतर्भूत करण्यात आले होते ते ताबडतोब दूर करण्याची वेळ आता आली आहे. हे कलम मुसलमानातदेखील भेदभाव करते. यामुळेच जम्मूचा विकास झाला नाही परंतु काही मूठभर लोकांचा मात्र जरूर विकास झाला आहेे.
मंचाचे संरक्षक व प्रेरणास्रोत इंद्रेश कुमार म्हणाले की, ``मुस्लीम राष्ट्नीय मंच ही मुसलमान समाजात देशभक्तीची भावना जागृत करणारी एक चळवळ आहे. इस्लामचा खरा अर्थ शांती व सुरक्षा आणि मुसलमानचा अर्थ बंधुभाव व दोस्ती असा आहे हे मंचाच्या माध्यमातून आम्ही दाखवून देत आहोत.'' आपल्या भाषणाच्या सुरुवातीसच `बेटी बचाओ'चा संदेश देत इंद्रेश कुमार म्हणाले की, मुलगा जर कुलदीपक असेल तर मुलगी घरचा प्रकाश आहे. प्रत्येकाला आई, बहीण, पत्नी हवी असते, मग मुलगी का नको? आम्ही मुलींची हत्त्या करणार नाही. त्यांची बेअब्रू करणार नाही. त्यांना नेहमीच सन्मान देऊ.
सेमिनारच्या दुपारच्या सत्रात जम्मूचे चौधरी लाल हुसेन, डोडाचे मोहम्मद इकबाल भट्ट, काश्मीरचे बशीर अहमद, चौधरी मंजूर हुसेन, मोहम्मद फैज खान, अनंतनागचे मोहम्मद सिद्दीकी, जयपूरचे मुन्नवर चौधरी, अब्दुल कय्यूम रजा, ग्वालियरचे अॅडव्होकेट शकील हुसेन, दिल्लीच्या शहनाज अफजल, रेशमा, जम्मूचे गुलाम मोहम्मद, बिहारच्या इशरत खातून आणि अन्य प्रतिनिधींनी आपले विचार व्यक्त केले आणि ३७० वे कलम खारीज करण्याची व आतंकवाद संपविण्याची जोरदार मागणी केली.

सेमिनारचे समापन
या द्वि-दिवसीय सेमिनारचे समापन मोठ्या दिमाखात जम्मू क्लबच्या सभागृहात झाले. माजी केंद्रीय मंत्री शाहनवाझ हुसेन, ताक्सीम या उर्दू दैनिकाचे संपादक सुहैल काझमी, इंद्रेश कुमार, नझीर मीर, छात्तीस्गार्ह वक्फ बोर्डाचे अध्यक्ष मोहम्मद सलीम अश्रफी यांच्या उपस्थितीत पार पडले.
शाहनवाझ हुसेन यांनी कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरचा विकास होत नसल्याचे नमूद करून ते म्हणाले की, `भारतातील मुसलमान भाग्यवान आहेत कारण त्यांना भारतासारखा उत्तम देश मातृभूमी म्हणून हिंदू समाजासारखा शेजारी मिळाला आहे. जगातील कोणत्याही देशात राहणारा मुसलमान इतका सुखी नाही. संपूर्ण भारतीय समाजाला जोडण्याचे काम मुस्लीम मंच करीत आहे. आमच्यासाठी ही जननी आणि जन्मभूमी आहे. हिच्या संरक्षणासाठी आम्ही आमचे प्राणही देऊ पण कोणत्याही परिस्थितीत सौदा करणार नाही.
भारतात असलेल्या अन्य मत पंथाचे लोक हे सर्व भारतीयच आहेत. आमची भाषा, रीतीरिवाज एकच आहे. केवळ उपासना पद्धती बदलली म्हणजे राष्ट्नीयता बदलत नाही. या धारणेतून मुस्लीम राष्ट्नीय मंचाचा जन्म झाला आहे.'
मंचाने घेतलेल्या देशव्यापी स्वाक्षरी अभियानाला मिळालेला प्रतिसाद अतिशय चांगला, उत्साहवर्धक होता असे सांगून इंद्रेश कुमार म्हणाले की, `मंचाने पुन्हा एकदा संपूर्ण देशाला संसदेने १९६२ आणि १९९४ साली पारित केलेल्या प्रस्तावांची आठवण करून दिली आहे. मंचाने एकत्र केलेल्या आठ लाख मुसलमान बांधवांच्या या सह्यांचे एक निवेदन राष्ट्नध्यक्ष प्रणव मुखर्जी यांना देण्यात येईल असे त्यांनी घोषित केले.'
मंचाची वेबसाईट नुकतीच सुरू झाली आहे : र्ुुु.ाीीश्रळाीरीहींीळूरारपलह.ेीस
- विराग पाचपोर, नागपूर (मो.९४२२८७०८४२)
(`एकता ' वरून साभार....)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन