Skip to main content

Posts

Showing posts from January, 2018

29 Jan 2018

जगाचा रचनाकार : विश्वकर्मा केवळ भारतातच नाही तर साऱ्या विश्वातील समाज अठरा पगड जातींचा बनलेला असतो. त्या जाती म्हणजे, धर्म किंवा जन्मावर आधारित समूह  मानण्याचे कारण नाही. व्यवसाय करण्याच्या सोयीने त्या समूहाचेे वास्तव्य, त्यांच्या व्यवसायासाठी लागणारी सामग्री, प्रशिक्षण, कलाकौशल्य आणि अर्थातच परंपरेने येणाऱ्या चालीरीती, रूढी, आहार-वर्तन आित्यादी साऱ्या बाबतींत सारखेपणा येत राहतो. समाजाची बांधणी चार स्तंभांवर होत असते, -ज्ञान, सत्ता, संपत्ती आणि संस्कृती किंवा मनोरंजन. हे चारही स्तंभ समान शक्तीचे, समान अुंचीचे असतील तरच समाज सुस्थिर राहील. हे चार घटक ज्यांनी साऱ्या समाजासाठीच सांभाळायचे व संवर्धित करायचे असतात अशा मानवसमूहास वर्ण म्हटले जाअू लागले. वर्ण म्हणजे जात नव्हे तर व्यवसाय, चरितार्थासाठी चालविलेली वृत्ती. जोशी-कुलकर्णी-खोत यांना वृत्ती म्हणतात. अमूक तमूक यास खोती दिली, किंवा खोताची वृत्ती देण्यात आली अशी विधाने पूर्वजांच्या कागदोपत्री आढळतील. तात्पर्य असे की, वर्णांचे काम हे समाजासाठी निष्ठेने नेकीने व्यवसाय करण्याचे असते; त्याचा जातीभेदाशी काही संबंध नसतो. ब्रह्मा-विष्णू-म

22 Jan 2018

काँप्यूटारलेले मराठीपण क्रॅनडातल्या हेलिफॅक्स या छोट्या गावात तीस बत्तीस मराठी कुटुंबं आहेत, त्यांनी अेकमेकांशी संपर्क साधून गेट टुगेदर केलं. आपोआपच तिथं मराठी मंडळ फॉर्म झालं.त्यांनी बायमंथली अेक मराठी फेस्टिवल अरेंज करण्याचं ठरलं; आणि कालची  संक्रांत तिथं सेलिब्रेट केली. रेवती आपटे या ग्रँडमा तिथं अनायासे होत्या, त्यांनी तीळगूळ, भोगी वगैरे आिंन्फर्मेटिव लेक्चर डिलीव्हर केलं. आता तिथं नेक्स्ट जनरेशनच्या मुलांना आपलं कल्चर अेंजॉय करता येआील. या पृष्ठभूमीवर, दोन वर्षांपूर्वी प्रकाशित केलेला अेक वृत्तांत पुष्कळ काही सांगून जातो - अनेक अनिवासी भारतीय(अेनआरआय) ग्रीनकार्ड मिळवून निवासी अमेरिकन झाले आहेत. त्यांना तिथे वावरताना आिंग्रजीचा वापर करावा लागत असला तरी घरी परत आल्यावर ते लोक मराठीतून बोलतात, लिहितात. अमेरिकेतील मराठी भाषकांना ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे. अमेरिकेत  ५० राज्ये आहेत; आणि बहुतांश साऱ्या राज्यांत महाराष्ट्न् मंडळे आहेत. त्यांची सदस्य संख्या तीनशे चारशे पाचशे  आहे. मंडळाची फी कुटुंबासाठी ५० डॉलर आणि व्यक्तीला २५ डॉलर अशी साधारणत: आहे. सर्वजण आपा

8 Jan 2018

स्नेहमयी मकरसंक्रांत इंग्रजी कालगणनेनुसार नवीन वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते. १४ जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीचा दिवस. पौषमासातील गुलाबी थंडीच्या काट्याबरोबरच हलव्याचा नाजूक काटाही फुलायला लागतो. तिळगुळाचा खमंग वास दरवळू लागतो. रंगीबेरंगी हलवा, हलव्याचे दागिने, संक्रांतीला लुटण्याच्या वाणाच्या विविध वस्तू, काळया रंगाच्या तऱ्हतऱ्हेच्या साड्या, केशरी गजरे, टपोरी बोरे, हिरवे मटार यांनी बाजार फुलून येतो आणि वातावरणात आपसूकच गोडवा निर्माण होतो. मकरसंक्रांत म्हणजे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलून सहजतेने उत्तरेकडे सरकत जातो. या काळाला `उत्तरायण' म्हणतात. सूर्याच्या ह्या संक्रमणाशी मानवी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. मानवी जीवन प्रकाश आणि अंध:कार यांनी वेढलेले आहे. अंधकाराकडून प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा हा संक्रमणाचा काळ. अज्ञानाच्या अंधकाराने व्यापलेल्या मानवी मनाला ज्ञानप्रकाशाने उजळवून टाकणारे हे वैचारिक संक्रमण असायला हवे. सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे म्हणजे संक्रमण. हे संक्रमण एकूण १२ वेळेला होते. परंत

1 Jan 2018

घाबरावे ते किती! पावसानं झोेडपलं आणि राजानं मारलं तर दाद कुठं मागायची; असा अगतिक प्रश्न विचारला जात असे. काळानुसार तो गैरलागू ठरेल असे आजही वाटण्याचे कारण नाही, कारण त्यातील तात्पर्यभाव कायमचाच लागू पडणार असतो. तथापि वास्तवात आजच्या काळात पावसानं झोडपण्याआधी हवामानखात्यानं नुसती चाहूल दिली तरी  लोक नुकसान-भरपाआी मागू लागतात, आणि राजानं केवळ पाणीपट्टी-वीजपट्टी मागितली तरी त्याचं सरकार अुलथून टाकू म्हणतात. हे स्वस्त लोकशाही प्रशासन आपल्याला महागात पडेल हे तर खरेच आहे; पण  अजून तरी तितकी भीषण परिस्थिती आल्याचे दिसत नाही. तोपर्यंत राजाने -म्हणजे सरकारने, काही कायदेकानू केले आणि ते व्यक्तिगत कुणावर अन्यायकारक ठरले तरी त्याबद्दल कुठे दाद मागता येत नाही; -मागून फारसा अुपयोग होत नाही. लोकशाही शासन व्यवस्थेचे बंधनच असे असते की तसा मनमानी अन्याय सरकारला करता येत नाही. बहुजनांच्या म्हणजेच राष्ट्नच्या सर्वंकष हितासाठी काही निर्णय घ्यावे लागले तरीही त्यातून कुणावर व्यक्तिगतही अन्याय होअू नये अशी काळजी केली जाते. राजरोस बेधडक मनमानी करणारी सुलतानशाही आजच्या जगात चालत नाही. आजच्या सरकारने संसदेपु

18 Dec.2017

एक पत्र : आवर्जून वाचावे असे! अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ रत्नागिरी स.न.वि.वि. आपले पत्र व सोबत संस्थेचे कार्यवृत्त मिळाले. मी आज रुपये अकरा हजार आपल्याकडे पाठविले आहेत. माझ्या आईने लीला त्रिंबक बापट हिने १९३८ ते १९४२ च्या दरम्यान तिच्या वैद्यकीय शिक्षणासाठी रुपये ९६०/-(नऊशे साठ) आपल्या संस्थेकडून अर्थसाहाय्य घेतले होते. ही माहिती मला आत्ता वयाच्या ७४व्या वर्षी, जुनी कागदपत्रे चाळत असताना मिळाली. किती मदत घेतली याचा काही त्यात उल्लेख नाही. हे ऋण फेडले गेले की नाही याचीही माहिती कुठे दिसली नाही.. तेव्हा अद्यापि परतफेड झाली नसल्यास आपण ती करून टाकावी, असा एक स्वाभाविक विचार मनात आला, आणि आपली संस्था अद्यापि अस्तित्वात तरी आहे की नाही याची चौकशी मी उत्सुकतेपोटी फेसबुकवर केली; व आपल्याशी संपर्क केला. आपल्याकडे इतकी जुनी नोंद अजूनही सुस्थितीत आहे, ही वस्तुस्थितीच आपल्या संस्थेचा कारभार चोख आहे याचे द्योतक आहे. त्यावरून दिसते की, वरील रकमेपैकी ४०० रुपयांची परतफेड करण्यात आली होती. परंतु आईचे गंभीर दीर्घकालीन आजारपण व अकाली मृत्यू (१२ ऑगस्ट १९५५) यांमुळे उरलेेले ५६०