Skip to main content

22 Jan 2018

काँप्यूटारलेले मराठीपण
क्रॅनडातल्या हेलिफॅक्स या छोट्या गावात तीस बत्तीस मराठी कुटुंबं आहेत, त्यांनी अेकमेकांशी संपर्क साधून गेट टुगेदर केलं. आपोआपच तिथं मराठी मंडळ फॉर्म झालं.त्यांनी बायमंथली अेक मराठी फेस्टिवल अरेंज करण्याचं ठरलं; आणि कालची  संक्रांत तिथं सेलिब्रेट केली. रेवती आपटे या ग्रँडमा तिथं अनायासे होत्या, त्यांनी तीळगूळ, भोगी वगैरे आिंन्फर्मेटिव लेक्चर डिलीव्हर केलं. आता तिथं नेक्स्ट जनरेशनच्या मुलांना आपलं कल्चर अेंजॉय करता येआील.
या पृष्ठभूमीवर, दोन वर्षांपूर्वी प्रकाशित केलेला अेक वृत्तांत पुष्कळ काही सांगून जातो -
अनेक अनिवासी भारतीय(अेनआरआय) ग्रीनकार्ड मिळवून निवासी अमेरिकन झाले आहेत. त्यांना तिथे वावरताना आिंग्रजीचा वापर करावा लागत असला तरी घरी परत आल्यावर ते लोक मराठीतून बोलतात, लिहितात. अमेरिकेतील मराठी भाषकांना ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे. अमेरिकेत  ५० राज्ये आहेत; आणि बहुतांश साऱ्या राज्यांत महाराष्ट्न् मंडळे आहेत. त्यांची सदस्य संख्या तीनशे चारशे पाचशे  आहे. मंडळाची फी कुटुंबासाठी ५० डॉलर आणि व्यक्तीला २५ डॉलर अशी साधारणत: आहे. सर्वजण आपापली फी  न  चुकता कार्यालयात आणून बिनचूक भरतात. (हे मराठीपण काय?) अमेरिकेत सहसा कोणी आपल्या घरी आपल्या राष्ट्नीय नेत्यांचे फोटो लावत नाहीत; मात्र त्यास शिवाजी महाराज हा अपवाद!
काही मंडळांशी चर्चा केल्यावर विविध अुपक्रमांची माहिती मिळाली. वानगीदाखल त्यातले काही अुपक्रम सांगावेसे आहेत - न्यू जर्सीच्या मराठी विश्वाचा वर्धापनदिवस साजरा होतो. त्या वर्षी त्या निमित्ताने  सामुदायिक पूजाविधी झाला. १० मुलांनी  त्यांच्या पालकांसह पूजेत यथाविधी भाग घेतला होता. पूजेसाठी चौरंग, देवाची मूर्ती, सारे पूजासाहित्य आणून पुजारीबोवा शास्त्रोक्त पूजा सांगत होेते, प्रत्येक कृतीचा अर्थ समजावून सांगत होते. साऱ्या पालकंाना नवनवीन माहिती मिळत होती. दरवर्षी  १जुलैला `क्रॅनडा डे'च्या निमित्ताने परेड (संचलन) होते; त्यात विविध वंशाचे गट सामील होतात. मराठी गट त्यात अुत्साहाने भाग घेतो. अेके वर्षी तर मराठी गटाने लेझीम सादर केले होते. टोरंटो च्या पूर्व-पश्चिम भागात दरवर्षी मराठीचे वर्ग चालतात. मराठी भाषेशी आणि मराठीपणाशी आपले नाते टिकवण्याचा आटोकाट प्र्रयत्न चालतो.
अ.भा.गांधर्व महाविद्यालयाचे अधिकृत परीक्षा केंद्र मिसिसागा आणि अँटॉरियो येथे सुरू करण्यात आले आहे. मराठी माणूस नाट्यवेडा आणि संगीतप्रेमी आहे. अमेरिकेत राहिलेल्या बऱ्याच जणांची मुले कलाप्रेमी आहेत, त्यांना नावाजलेल्या शिक्षणसंस्थेतून प्रमाणपत्र मिळविता येआील. क्रॅनडातील तशा केंद्रात गायन तबलावादन नृत्य यांच्या परीक्षा होतात.
बहुतांश मराठी मंडळे आपापली नियतकालिके प्रकाशित करतात.  त्यांचा खर्च भागण्याआितक्या जाहिराती मिळतात.(हेही मराठी वाटत नाही) विभागीय साहित्य संमेलनही भरतात. अमेरिकेत जाहिरातींचे चांगले अुत्पन्न मिळते, त्यात खर्च सहज भागतो, शिल्लक राहते. भारतात -मराठी मुलखांतला याबाबतचा अनुभव कुणी कुणाला सांगू नये हे बरं! फ्लोरिडा अटलांटा टेक्सास टोरंटो या राज्यांतील अनिवासी भारतीयांची काही नियतकालिके पाहायला मिळाली; त्यांची नावे मराठी विश्ववृत्त, गुजगोष्टी, स्नेहबंध, अभिरुची अशी आढळली. त्यांचे स्वरूप साधारण आपल्याकडे बँकांची नियतकालिके (हाअूस मॅगेजिन्स) किंवा कॉलेजांची वार्षिके असतात, तसे वाटते. पण भारतीयांची मुलेमुली त्यांत लिहीत असतात, म्हणून त्यांस महत्व आहे. त्यातलेही काही नमुने येथे पेश -
काँप्युटरच्या देवा तुला बाआीट बाआीट वाटूदे
डॉलर रूपी माया तुझी आम्हावरी राहूदे ।
लेणं लेवू अेच वन चं, फ्लाआीट धरू स्वीस अेअरचं
युनिक्स जावा ओरॅकल ग्रीनकार्ड चं मिरॅकल
लवकरच होअूदे ।।
रिसेशनची पीडा टळो, व्हॅलीमध्ये घर मिळो
देशप्रेम माझं महाराष्ट्न् मंडळात वेळोवेळी अुतू जाअूदे ।। (प्रज्ञा जोशी)

दिवस तुझे हे फुगायचे
मोजून मापून जेवायचे ।
पाण्यात लिंबाला पिळायचे
पोटात सॅलट भरायचे
दमून जरासे टेकायचे
कळेना काय ते करायचे ।। (नम्रता बापट)

दिवाळी
रोषणाआी आिथेही आहे
पण आकाशीदिव्यांची मजा नाही
झगमगाट आिथेही आहे
त्यास पणत्यांची सात्विकता नाही ।
टबबाथ आिथे आहे
त्याला अभ्यंगस्नानाची सर नाही
बॉडीवॉश आिथे आहे
त्याला अुटण्याचा सुगंध नाही ।
माणसे तर आिथेही आहेत
त्यांना अेकमेकांकडे जायला वेळ नाही
शुभचिंतक आिथेही आहेत
आशीर्वाद द्यायला मायबाप जवळ नाहीत ।।
(गायत्री आपटे)

अमेरिका तू अशी
गोऱ्या गोमट्यांच्या देशात
संपन्नतेच्या प्रदेशात
मोठमोठाली घरे
बेडरूमपासून बाथरूमपर्यंत वस्तूंची दाटी
रस्त्यांवर माणसं शेाधण्यासाठी
डोळयांना कसरत करावी लागते मोठी
प्राणीप्रेम तर जास्तच
माय बेबी माय स्वीटी
खाताना सन्मान जास्तच वाटतो
अशा वेळी आपल्याकडचा
कुत्र्यामांजरांचा घोळका आठवतो.
सगळीकडे मॅनर्सचा दिखावा
नसतो कुठे भावनांचा ओलावा
म्हणूनच की काय परदेशी
भारतीयाला भारतीय भेटला की
तुम्ही कुठले आम्ही कुठले
कधी आलात  कुठे अुतरलात
या शब्दांतही मिळतो दिलासा ।।
(रजनी जहागीरदार)
अशा कवितांतून भारतीय समुदायाच्या भावना समजतात. हौसेनं काढलेली ही नियतकालिकं, अशांच्या दरवर्षी स्पर्धा घेअून पारितोषिके वगैरे दिली तर त्यांच्या लेखनांसही अेक प्रकारे प्रोत्साहन मिळेल.
अमेरिकेत मराठी वाचनालय चालविले आहे, आणि ते चालले आहे.अभी द्विवेदी नावाच्या महिलेने टंपा विभागातील त्यांच्या घरात हे वाचनालय सुरू केले. अमेरिकेत घरांना नांवे देण्याची प्र्रथा नाही, पण या द्विवेदी बाआींचे घर `रसिकामृत'. त्यांच्या घरातल्या वाचनालयात पुस्तके, सुमारे २५० दिवाळी अंक, सुमारे १००मासिके ठेवली आहेत. त्यात भर पडत असतेच.
आपल्या घरात आपल्यांचे कौतुक नसते, पण माणूस दूरदेशी गेला की त्याला आपल्या मुलखाची ओढ सुटत नाही. स्थलांतर हा तर माणसाचा स्थायीभाव आहे, आणि दुसरीकडं राहायला गेल्यावर आधीच्या घराची ओढ राहणं हाही त्याचा स्वभावच आहे.
(कलबुरगी-गुलबर्गा  येथील मराठी साहित्य-मंडळाच्या त्रैमासिकात शामसुंदर मुळे यांनी अमेरिकेतील निरीक्षणे नोंदविली आहेत, त्यावर आधारित)

गटशेती करणे हा अुत्तम पर्याय 
शेतकऱ्यांच्या बाबतीत आजकाल सगळेच घटक फार हळवे झालेले आहेत. शेती हा तर भारताचा प्रमुख व्यवसाय आहे, आणि तोच व्यवसाय संकटात असल्याची खरी-खोटी ओरड चालू असते. स्वातंत्र्यानंतर स्वावलंबन आपल्याला कोणी शिकविले नाही. प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी सरकारनेच करायला हवी असा समज करून देण्यात आला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून आज शेतीसारखा स्वयंपूर्ण पेशा लाचार याचक बनू लागला आहे. हे अत्यंंत घातक आहे. मी तसा ग्रामीण भागातला आहे, आणि माझी सारी हयात शेतीपूरक क्षेत्राशी परिचयाची राहिली आहे. त्यावरून मी काही पर्यायंाचा विचार केला आहे.
शेती परवडत नाही असे बरेच जण सांगतात. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नाही हे त्यांचे दुखणे आहे. तो कसा मिळू शकेल हे मात्र कोणीच सांगत नाही. शेतमालाच्या किंमती ग्राहकांना जास्तच असतात. म्हणजे अुत्पादकांना आणि ग्राहकांना  न  परवडणारा व्यवहार चालणार नाही. त्यावर अुपाय शोधला पाहिजे. शेतकऱ्यांनीच जर शेतीचा माल बाजारात नेअून ग्राहकांस पोचविला तर हा प्रश्न बराचसा सुटेल. त्यासाठी गटशेती करणे हीच आता गरज आहे.
कूळकायदा झाल्यानंतर त्याचे अनिष्ट परिणाम आता ५०-६० वर्षांनी दिसू लागले आहेत. विशेषत: पश्चिम महाराष्ट्नत पूर्वी शेती अुच्चवर्णीयांकडे होती, परंतु त्या मालकाच्या घरची सारी मंडळी शेतीवर अवलंबून नव्हती. त्यांची मुले डॉक्टर-वकील-मास्तर-पुजारी-ज्योतिषी किंवा सरकारी नोकर होती. हुंडेकरी-अडते अशी होती. घरचा कोणी शिकलेला नसेल तर तो शेती करायचा. त्यामुळे शेतीचा व्यवसाय तितपतच चालू राहिला.शेती करण्यास माणूसबळ  लागते, तसे पैशाचे बळही लागते.गटशेती करण्यामुळे शेतीतील माल ग्राहकांपर्यंत पोचेल तर व्यापाऱ्यांनाही तो माल आपल्या व्यवसायासाठी चढ्या दराने खरेदी करावा लागेल. घरांतील आितर लोक अन्य व्यवसायांत राहिले तर शेतीला ताजा पैसाही पुरवत राहता येआील.
कूळकायद्याने शेती `कसणाऱ्या' शेतकऱ्यांकडे आली तरी ती कसण्यासाठी पैशाची जोड लागते, ती त्यांच्याकडे नव्हती. त्यातच पुढच्या पिढ्यांत वाटण्या झाल्या जमीनींचे तुकडे पडले. शेतीच्या अुत्पन्नात घट झाली, शेतीकडे दुर्लक्ष सुरू झाले; मग शेती परवडेनाशी झाली. बँकेचे किंवा सावकारांचे कर्ज वाढू लागले. ते फेडता येआीना आणि शेतकरी अेकटा पडला.शेतकऱ्यांची मुले मुंबआीत किंवा मोठ्या शहरांत जाअू लागली. तिकडून येणाऱ्या मनीऑर्डरवर जगणे सुरू झाले.
गटशेती सुरू झाली तर यातले मोठे प्रश्न सुटणार आहेत, परिस्थिती बदलणार आहे. विशेषत: कोकणात तर ही योजना फार फायद्याची ठरेल. तिथे सध्या मजूर मिळत नाहीत, त्यामुळे कोकणातील सगळी जमीन लागवडीला घेतली जात नाही. अेकत्रित गट केला तर ५०-६० अेकर शेतजमीनीत अेखादा तरी ओहोळ (व्हाळ) असतो, त्याचा अुपयोग करून घेता येआील. जानेवारी महिन्यात कोणत्याही साध्या पध्दतीने त्या ओहोळाचे पाणी अडविता येते, आणि पुढे काही महिने त्या शेतजमिनीस देता येते. मी १९७२च्या आसपास निळोली येथील पशूपैदास केंद्रावर अधीक्षक होतोे, त्यावेळी त्या भागात असे बांध घातले होते. पाणी अडवा-पाणी जिरवा हे तत्व मी त्या काळी अंमलात आणले, त्याबद्दल नंतर १० वर्षे सलग माझे अनुभव मुंबआी आकाशवाणीने प्रसारित केले आहेत. अलीकडे कुडाळ तालुक्यात त्या प्रकारे ३००ओहोळ (व्हाळ) अडविल्याचे अैकायला मिळते. माझेही समाधान झाले. सांगायचे कारण,  गटशेतीकरिता हा पाण्याचा स्रोत फार अुपयुक्त असतो.
अल्पभूधारक जिराआीत शेतकऱ्यांना गटशेती मदत करू शकेल हे आता सरकारनेही स्वीकारले असून त्यास यंदा ७०० कोटिंचे अनुदान मंजूर केले आहे. या कल्पनेचा प्रसार करावा लागेल. या गटाच्या मार्फत दूध अंडी कोंबड्या बोकड हेही शहरांत नेअून विकता येआील, त्यातून चांगले पैसे मिळतात.
महाराष्ट्नत ४ कृषीविद्यापीठे आहेत. पशूसंवर्धन आणि कृषी अशी दोन वेगळी खाती आहेत, त्यांच्याकडे कृषीविस्तार म्हणून वेगळी शाखा आहे. यामार्फत प्रत्येकी २० अल्पभूधारकांचा अेक याप्रमाणे गट किंवा सोसायटी स्थापन करावी. प्रारंभी असे १२० गट तयार करावेत. अेकेका शेतकऱ्याची २.५-३अेकर शेती असेल. गटशेतीत साधारणत: १०० देशीकोंबड्या, ५० शेळया, २० गायी पाळून सुरुवात करावी. जमिनीत खरीप व रबी पिके घ्यावीत. २० कुटुंबांपैकी प्रथम सहा महिने १जण शेतीत पूर्णवेळ राबेल, दुसऱ्या सहामाहीत दहा शेतकऱ्यांची माणसे राबतील. त्या लोकांना गटाकडून मजुरी मिळेल, ती मजुरी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातूनही देता येआील. विहिरीला पाणी लागले तर थोडे बागायत होआील. अंबा, केळी, शेवगा अशी अुत्पन्नाची झाडे लावावीत.
पिकणारा माल गटशेतीच्या सभासदांना विकत द्यावा. बाकीचा माल शहरात विकण्यासाठी शहरात अेक दुकान टाकावे. त्या दुकानांतून गावातल्या सधन कुटुंबांशी संबंध वाढवून त्यांना माल पोचवावा. बाजारभावाप्रमाणे त्यांस दर मिळू शकतो. तो दर शासनाच्या हमीभावापेक्षा कितीतरी जास्त असेल. मधल्या व्यापारी दलालांचा वाटा नाही. पण त्यांचा विरोध कमी होआील कारण  आपल्या गटाचा व त्या सधन ग्राहकांचा पाठिंबा राहील.पुरवठादारांवर विश्वास वाढेल. ती सधन कुटुंबे सहकार्य करतील; वेळप्रसंगी भांडवली पैसा अुपलब्ध करतील.
यामुळे अेकाच कुटुंबातील माणसांना शेतीत राबावे लागणार नाही; आितरांना आितरत्र नोकरी धंदा करता येआील. शेतीमालास कोणताही पुढारी भाव वाढवून देणार नाही. तो आपण `मिळवावा' लागेल. खेचून आणावा लागेल. पण त्यासाठी आर्थिक जगाचे व्यवहार शिकायला हवेत; आंदोलने आणि रस्ते अडवून सामाजिक रोष घेअून काही होणार नाही. नुकसानच होआील. त्यासाठी गटशेतीच करावी लागेल. त्याचा अभ्यास करून सरकारकडे नोंदणी करावी, त्यास सरकार काही अुचल किंवा कर्ज देण्याची सोय करू शकेल. शेतीखाते, पशूसंवर्धन ही खाती व विद्यापीठे अवजारे, तज्ज्ञ, तंत्रज्ञान वगैरे मार्गदर्शन करतील. त्यांना तेवढेच काम ठेवावे, बाकीसाठी आपण अेकत्रित अुभे राहिले पाहिजे.
शेतकरी प्रयोग करू शकतात, अेकमेकांचे पाहून अनुकरणही करतात.  अशी काही योजना करून त्यांचा अवलंब केला तर शेतीला समृध्दी येआील. त्यांचे प्रश्न सुटतीलच; पण ग्राहकांचीही अुत्तम शेतमालाची गरज भागेल. हे सर्व शेतकऱ्यांच्याच हाती आहे. कोणते सरकार किंवा राजकीय पक्ष, संघटना हे करणार नाही, आपल्याला मार्ग शेाधावे लागतील. तितकी हुशारी आणि कामाची तयारी त्यांच्याकडे नक्कीच असते. कुठेतरी सुरुवात तर करायलाच हवी!
- डॉ.राम नेने, मुंबआी ६२  (फोन-९७६९६३२६३०)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन