Skip to main content

29 Jan 2018

जगाचा रचनाकार : विश्वकर्मा
केवळ भारतातच नाही तर साऱ्या विश्वातील समाज अठरा पगड जातींचा बनलेला असतो. त्या जाती म्हणजे, धर्म किंवा जन्मावर आधारित समूह  मानण्याचे कारण नाही. व्यवसाय करण्याच्या सोयीने त्या समूहाचेे वास्तव्य, त्यांच्या व्यवसायासाठी लागणारी सामग्री, प्रशिक्षण, कलाकौशल्य आणि अर्थातच परंपरेने येणाऱ्या चालीरीती, रूढी, आहार-वर्तन आित्यादी साऱ्या बाबतींत सारखेपणा येत राहतो. समाजाची बांधणी चार स्तंभांवर होत असते, -ज्ञान, सत्ता, संपत्ती आणि संस्कृती किंवा मनोरंजन. हे चारही स्तंभ समान शक्तीचे, समान अुंचीचे असतील तरच समाज सुस्थिर राहील. हे चार घटक ज्यांनी साऱ्या समाजासाठीच सांभाळायचे व संवर्धित करायचे असतात अशा मानवसमूहास वर्ण म्हटले जाअू लागले. वर्ण म्हणजे जात नव्हे तर व्यवसाय, चरितार्थासाठी चालविलेली वृत्ती. जोशी-कुलकर्णी-खोत यांना वृत्ती म्हणतात. अमूक तमूक यास खोती दिली, किंवा खोताची वृत्ती देण्यात आली अशी विधाने पूर्वजांच्या कागदोपत्री आढळतील. तात्पर्य असे की, वर्णांचे काम हे समाजासाठी निष्ठेने नेकीने व्यवसाय करण्याचे असते; त्याचा जातीभेदाशी काही संबंध नसतो.
ब्रह्मा-विष्णू-महेश या देवता अनुक्रमे अुत्पत्ती-स्थिती-लय या कार्यासाठी दक्ष आणि व्यस्त असतात. तशाच प्रकारे आितरांकडेही अेकेक काम सोपविलेले असावे. आजच्या काळात डॉक्टर-वकील-शिक्षक-ड्नयव्हर असे वर्ण तयार झालेेच आहेत, त्यांच्या देवताही कल्पिण्यास हरकत नाही. आजच्या युध्दांतही शिवाजी महाराज, गुरू गोविंद, यांचे स्मरण निकराच्या युध्दावेळी केले जाते, तसे कोणत्याही कार्यात त्या त्या क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तीचे स्मरण प्रेरक ठरणारे असतेच. नारद मुनी हे माध्यमांच्या क्षेत्रात, धन्वंतरी हे औषधी प्रांतात, व्यास वाल्मिकी हे साहित्याच्या बाबतीत देवतारूप मानले जातात.
आपल्याकडे काही दशकांपूर्वीच्या ग्रामरचनेत सामान्यत: जे बलुतेदार समजले जात असत ते सोनार कुंभार सुतार माळी वगैरे लोक हे विश्वनिर्माते मानले जात असत. ग्रामातील किंवा नगरातील नवनिर्मिती, कलाकुसर अथवा दैनंदिन गरजेच्या वस्तू तयार करणारे हे लोक विश्वकर्म्याची भूमिका पार पाडतात.अर्थातच हे सारे समूह विश्वकर्मा हीच आपली देवता मानतात. कोणीही ज्ञानमार्गी, सत्ताधारी, अथवा सेवेकरी असला तरी त्याला वस्त्र तयार करणे, भांडी घडविणे, घर बांधणे, शेतीची अवजारे बनविणे, शस्त्रे निर्माण करणे वगैरे साऱ्या निर्मितीक्षम कलाविश्वाची गरज असतेच. अशा कामसू कुशल व्यवसायिकांची विश्वकर्मा ही देवता आहे.
चिंतये विश्वकर्माणं शिवं वटरोरध: । दिव्य सिंहासनासीनं मुनिवृंदनिवितम्।
अुपास्यमान मसौस्तूयमानं महर्षिभि:। पंचवक्त्रं दशभुजं प्रह्मचारीव्रतेस्थितम् ।।
ऋग्वेदामध्ये म्हटले आहे की, वडाच्या झाडाखाली दिव्य सिंहासनावर विराजमान झालेल्या, ऋषिवृंदाने ज्यांची सेवा केलेली आहे अशा कल्याणकारी प्र्रभूची (विश्वकर्म्याची) देवदेवताही आराधना करतात. तसेच मोठे ऋषीही त्याची नेहमी सेवा करतात. ब्रह्मचर्य व्रतधारी पंचमुखी व दशभुजेच्या विश्वकर्म्याचे ध्यान करावे.
कुदालं करणींबाल्यभियंत्रं कमण्डलुं । बिभ्राणं दक्षिणे हस्ते स्वरोह: क्रमात्प्रभुं।
मेरुकेटं स्वनं भूषां वाहि्नंचाद्दधृतं करै:। अवरोहक्रमेणैव वमै शुभविलोचनम् ।।
अुजव्या हाती कुदार कन्नी वास्य अभियंत्र कमंडलू, तर अवरोहक्रमाने मेरू टाकी टाका भूषा तसेच अग्नी धारण करणाऱ्या शुभ्र नेत्रधारी कृपाळू परमात्मा विश्वकर्म्याचे ध्यान करावे.
सृष्टीचे निर्माण करणाऱ्या या देवतेचे अनुयायी, आपल्या बुध्दीशक्तीने ऋषिवरांच्या पंक्तीत गणले जातात. अशा पाच ऋषींच्या प्रार्थनेसाठी मंत्र सांगितलेले आहेत. त्यात विश्वकर्मा, मनु, मय, त्वष्टा, शिल्पी असे पाच प्रकार आहेत. त्या सर्वांना `तीक्ष्णे मेधाम्' देण्याची ब्रह्म्याकडे मागणी केली आहे. म्हणजे या व्यवसायिकांची कामे कष्टाची तर आहेतच, शिवाय ती कौशल्याची आणि प्रज्ञेचीही असली पाहिजेत; तर नवनिर्मिती संशोधन होत राहील. विश्वकर्मा हा जगाचा कर्ता धर्ता हर्ता सारे काही आहे. अर्थात हे साऱ्याच देवतांच्या स्तुतीपर काव्यात म्हटलेले असते.
`त्वमेव केवलं कर्तासि । त्वमेव केवलं धर्तासि । त्वं ज्ञानमयोविज्ञानमयोसि ।'
हे गणपतीलाही म्हटले आहे.
विश्वकर्म्याने देवांना (म्हणजे सदाचारी सत्प्रवृत्त लोकांना) शस्त्रे तयार करून दिली. विष्णूला सुदर्शनचक्र, शंकराला त्रिशूल, आिंद्राला वज्र ही शस्त्रे तयार करून दिली. तर आिंद्रप्रस्थ, द्वारका, वृंदावन, रावणाची लंका ही नगरे त्याने बांधून दिली. रुद्राचा रथ, दधिचीच्या हाडांची हत्यारे त्याने बनवून दिली. लक्ष्मीसाठी सुवर्णालंकार घडविले. तसेच कृषीवलांना सुख व धनधान्यांची वृध्दी करण्यासाठी अवजारे तयार करून दिली. असे त्या विश्वकर्मा देवतेचे कार्य आणि स्थान वर्णिले आहे.
विशेषत: बंगालात आणि मग ओरिसा, बिहार व पूर्व भारतात विश्वकर्मा अुत्सव साजरा होतोे. बंगाली पंचांगाच्या `भद्र' मासाच्या अखेरीच्या दिवशी विश्वकर्मा जयंती असते. त्यास भद्र संक्रान्त किंवा कन्या संक्रांत असेही म्हणतात. मानवी विश्व घडविणारे शिल्पी, वास्तु, विशारद यांचा हा अुत्सव मानला जातो. त्या भागातील कारखान्यांत अलीकडे हत्यारे, अवजारे, यंत्रे यांची पूजा केली जाते. महाराष्ट्नत खांडेनवमीला यंत्रपूजन करतात, तसाच हा पूजनप्रकार असतो. आर्किटेक्ट्स, आिंजिनियर्स व विविध क्षेत्रांतील कामगार आपली देवता म्हणून विश्वकर्म्याचे पूजन करतात.
आजच्या काळात संगणक अभियंते किंवा प्रोग्रॅमर जगाचा कारभार सोपा करीत आहेत. अुपग्रहांवर जाणारी याने किंवा बुलेट ट्न्ेन बनविणारी कुशल माणसे हे सारे विश्वकर्म्याचे अुपासक आहेत असे म्हणता येआील. जगात अन्न वस्त्र निवारा यांतून संपत्तीप्रमाणेच  कला आणि संस्कृती यांची समृध्दी संपन्नता निर्माण करणाऱ्या, मानवी परिश्रमांच्या, मेधाप्रज्ञेच्या साऱ्या विश्वकर्म्यांचे सादर स्मरण करणे म्हणजेच विश्वकर्मा देवतेचे पूजन ठरेल.

-(श्री.अशोक अुद्धव पंडित, पलूस कॉलनी -यांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे)

 संपादकीय
उथळ मिठ्या नव्हे, स्नेहदर्शी आलिंगन
आिस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यनाहू हे भारतात आले त्यावेळी आपल्या पंतप्रधानानी त्यांची गळाभेट घेतली, ती बाबही आपल्या मोदीद्वेषी विरोधी पक्षीयांना टीकापात्र वाटली. मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी पाहुणचाराचा नवा माहोल तयार केेला आहे. आपल्या देशाचे अलिप्ततेचे धोरण त्यामुळे बदलले आहे, असे समजण्याचे कारण नाही. अलिप्तता याचा अर्थ सर्वांशी तुसडेपणा असा नव्हे तर सर्वांशी मैत्र असणे असा आहे, तसाच असला पाहिजे. त्यात मोदी हे भारताचे, किंवा अन्य कोणी विदेशी प्रमुख पाहुणा हा त्या देशाचा प्रतिनिधी असतो. बराक ओबामा भारताच्या प्रजासत्ताक दिनास गतसाली सन्मानाने आले, राहिले, गेले. अमेरिकन दांपत्य मुलांत बागडले, तो नाचरेपणा नव्हता. त्यांच्याशी मोदींंनी जन्मांतरीचे मैत्र असल्याप्रमाणे जमवून दाखविले. प्रत्यक्षात लगेच आपण अमेरिकेच्या आहारी गेलो असे कशाला म्हणावे?

असे काहीतरी समज करून घेणाऱ्यांना भारतीय संस्कारांचा आणि रीती वर्तनाचा फारसा परिचय नाही, असे म्हणावे लागेल. त्यांना हस्तांदोलनाचा शिष्टाचार मान्य असतो, पण असा शारीरस्पर्श मान्य होत नसावा. हा  गेल्या दोन शतकांच्या आिंग्रजी सभ्यतेचा पगडा म्हणावा. त्या पध्दतीलाही नावे ठेवण्याचे कारण नाही, पण केवळ ते आणि तसेच केले पाहिजे असे नाही. पाहुण्याशी सख्य करावे, हा त्यातला विचारगाभा आहे. ते सख्य कसे दाखवावे हे त्या त्या व्यक्तीच्या मनोभावांवर सोडून द्यायला हवे. भारताने अलीकडच्या काळात साऱ्या जगाला आकर्षित केले आहे हे नाकारण्यात तर अर्थ नाही. भारताची कमकुवत धोरणे, आर्थिक स्थिती, शेतीस्थिती, देशातले प्रश्न या साऱ्यांतून कोणतेही  सरकार लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करीत असते. ते प्रयत्न योग्य की अयोग्य हे राजकीय पक्षांनी आपापल्या मगदुराप्रमाणे ठरवावे किंवा संधी मिळाली तर त्यात बदलही करावा. पण म्हणून विदेशांशी किंवा देशांतील कोण्या मान्यवंताशी वागताना त्याच्याशी अगदी अुभ्या चेहऱ्याने वागले पाहिजे असे काही नाही.

अेका मोठ्याशा गावात रोटरी क्लब स्थापन झाला तो प्रसंग या निमित्ताने सांगण्याजोगा आहे. रोटरी आिंटरनॅशनल ही महाकाय सेवाभावी संस्था आहे. त्यांचे तत्व, कार्यपध्दत, धोरणे हे आितर कुठल्याही संस्थेप्रमाणे ठरलेले आहे. ते ज्यांना रुचते पटते असे लोक त्या संस्थेच्या अंतर्गत त्यांच्या परीने काम करीत असतात. त्यात काही चूक बरोबर असेल - नसेल. पण रोटरी क्लब म्हणजे  महाप्रतिष्ठित, जडजंबाल, अतिविशाल असे काहीतरी प्रकरण असून त्याचे सभासदत्व मिळणे म्हणजे आंतरराष्ट्नीय समुदायाची आपल्या महान व्यक्तिमत्वास मान्यता मिळण्यासारखे आहे; असा बिचारा समज या गावातल्या नवागत सभासदांचा झाला असावा. या गावातील रोटरीच्या  स्थापनादिनास सारे होतकरू  सभासद फुलत्या अुकाड्यात फुलसूट, टायबूट असा सरंजाम करून पदाधिकाऱ्यांची वाट पाहात होते. रोटरीत जायचे म्हणजे असे पॉश राहावेच लागते असे त्यांना कोणीतरी बजावले असल्यास ठाअूक नाही. पदाधिकारी आले, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील ती मोठी माणसे होती. तरीही ती  सैलशा साध्या नेटक्या अवतारात होती. या नवागतांना तेच रुचले नाही. `हे असेच चारचौघांसारखे असेल तर मग यांत काय अर्थ? आमच्या घरचेही रोटरीला काय किंमत देतील?' हा त्यांचा अजाण प्रश्न तसा कठीणच होता. मोदींना आजकाल त्यांच्या गळाभेटींवरून नावं ठेवणाऱ्यांचे तसेच काही झाले असावे.

पूर्वीच्या जनता सरकारच्या कारकिर्दीत नानी पालखीवाला हे अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून गेले. त्यावेळी जिम कार्टर हे अमेरिकेत राष्ट्नध्यक्ष होते. त्यांची पहिली भेट घेण्यासाठी आपले हे राजदूत राष्ट्नध्यक्षांच्या निवासी गेले तेव्हा कार्टरांची वृध्द आआी त्यांच्या घरी होती. तिला पालखीवालांनी खाली वाकून नमस्कार केला. या बाआी स्वातंत्र्यापूर्वी मुंबआीत राहिलेल्या होत्या, ती आठवण त्यांनी दिली, वार्तालाप झाला. या अनौपचारिक हृद्य अशा भेटीवर विरोधकांनी टीका केली, आणि अमेरिकेपुढे आपल्या राजदूतांनी लोटांगण घातले असे तारे तोडले. यात राजशिष्टाचारांचा भंग असेल तर तोही आनंदाने अवश्य करायलाच पाहिजे! ओळखीच्या घरी गेल्यावर त्या घरच्या सर्वांशी योग्य त्या सन्मानाने वागायचेच असते; परंतु ते योग्य कोणते, हे काही नियमांनी ठरलेले नसते. मनमोहनसिंग कित्येक राष्ट्न्प्रमुखांशी भेटले बोलले आहेत. ओबामांनी त्यांच्या मैत्रीचा खास अुल्लेखही केला होता, पण त्यांचीच शिष्टाचाराची रीत अेकदम रास्त असे म्हणणाऱ्यांना त्या `गाववाल्या' रोटेरियन्सचा संसर्ग झाला असावा.

अेका विरोधकाला तर त्यात संघ आणि हिंदुत्व दिसले. आता मात्र हद्दच झाली. त्याचा प्रतिवाद करण्यासाठी  अुदाहरण अफजलखानाचे देता येआील. शिवाजीराजे समोर आल्यावर त्यानेच तर हात पसरून राजांना कवेत घेतले होते. ही प्रेम दाखविण्याची पध्दत तरी विरोधकांनी  सर्वधर्मसमभावाची म्हणायला काय हरकत आहे? अुद्या परवेझ मुशर्रफ भेटल्यावरही मोदी त्यांना तसे भेटले तर हे  अुदाहरण तयार असलेले बरे! लग्नात वधू आणि वर हे शत्रूपक्षही तशीच गळाभेट घेतात, ही जनरीत आहे.

आपल्याकडे महिलांशी बोलण्याची भेटण्याचीही वेगळी पध्दत आहे. हल्लीच्या बड्या शिष्टाचारांत हस्तांदोलन करतात. आपल्या व्यवहारात अजून ते सरसकट मुरलेले नाही. सुषमाजी परराष्ट्न्मंत्री म्हणून कोण्या प्रमुखांशी तसे करतात, पण मोदींशी त्यांनी तसे केल्याचे कोणी पाहिलेले नाही. कारण त्यात्या वेळेचा स्थितीचा आणि धारणांचाही काही संकेत असतो. नेहरूंचा अेक फोटो लेडी माअूंटबॅटन यांच्याशी मोकळया हास्यफवाऱ्यांचा प्रसिध्द आहे, त्यातही कुणाला शांतम्पापम् वाटू शकते. पण तसे बादरायण संबंध जोडणाऱ्यांना साऱ्या संदर्भांचा आवाका आलेला नसतो. मनमोहनसिंह हे भारताचे समर्थ प्रधानमंत्री होते, मोदीही आहेत. वाजपयी किंवा नरसिंह राव यांच्याबाबतही आपण संतुष्ट असायला हवे. तथापि त्यांच्या वागण्यांत खूप फरक होता. ती त्यांची ढब होती. अमूक असेच करायचे असते, आजवर कोणी असे वागले नाही, यांनी तर ताळ सोडला.... अशी मुक्ताफळे कुण्या गावच्या गण्यागंप्याने अुधळली तर फारसे लक्ष देण्याचे कारण नाही. पण विरोधी नेत्यांच्या राजकीय विचारांना व मतांना तितक्या खाली अुतरविण्याचे कारण नाही.

आपल्याकडे वारकरी संप्रदायाचे लोक परस्पर गळाभेट घेतात, अुराअुरी भेटतात. पुष्कळ वाट पाहिल्यानंतर भेटणाऱ्या स्नेहशील मित्राला कित्येकजण कडकडून मिठी मारतात. त्यातही अुत्तर भारतात व मराठी मुलखात फरक असतो. दिवाळीत भेटायला येणारा परिचितसुध्दा अुत्तरेत यजमानाच्या तोंडात मिठाआी भरवतो, लाडू कोंबतो. मराठी समाजात आठ वर्षाहून मोठ्या  मुलाला आआीसुध्दा तोंडात अन्न घालत नाही, तो अंगचटपणा म्हणतात. हल्ली ती अुत्तरी रीत सगळीकडे पसरली आहे. कोर्टात आरोपी असणाऱ्या पुढाऱ्याला जामीन मिळाला म्हणून त्याच्या बायकोने मिठाआी भरविल्याची दृष्ये दाखवितात. आनंद व्यक्त करण्याचे ते प्रकार मराठी माणसे असभ्य समजतील. त्यांत कालस्थिती सापेक्षता महत्वाची असते, ती लक्षात घ्यावीच लागते. त्यात चूक बरोबर होत नाही. आजकाल तर सकृद्दर्शनी प्रेमच प्रेम अुतू जाताना दिसत असले तरी माणसे  भावनांची भुकेली राहू लागली आहेत हेही खोटे नाही.

पण त्यातील नेमकेपण दाखविण्याला काही नेमके निकष नाहीत. पंतप्रधानांच्या मिठ्या हा तर वादचर्चेचा विषयच नाही. अेकवेळ त्यात मोदींची चूक म्हटले तर त्यांना तसेच भेटणाऱ्या विदेशी पाहुण्यालाही का चूक म्हणायचे नाही? मोदींनी हात पसरले, पण समोरचा विदेशी प्रमुख, सावरून मागे सरकला असे काही कधी घडलेले नाही. मोदींच्या सादेला त्या परदेशस्थांनीही त्यांचे तथाकथित सभ्य रिवाज सोडून भावनाभर प्रतिसाद दिलेला पाहायला मिळतो. चीनच्या अध्यक्षासोबत झोपाळयावर डुलत चहा घेतला गेला. त्यामुळे पाकिस्तान किंवा चीनचे प्रमुख त्यांची भूमिका बदलतील असे नाही, ती बदलेल असे मानण्याअेवढे मोदीही लेचेपेचे नाहीत; त्या पदाचा कोणीच तसा कच्चा नसतो. पण काही वेळी खरे, काहीवेळी तोंडदेखले, काहीवेळा दांभिक अुपचार सांभाळणे यातली खाचखोच समजून घेणे शहाण्यांसाठी बरे असते. `मुशर्रफला -किंवा त्या ट्न्ंपला मिठ्या मारून काय अुपयोग...?' असल्या प्रतिक्रिया काही भंपक विरोधक किंवा सज्ञान चाहते जाहीरपणे व्यक्त करतात, त्यांनी त्यांच्यापुरती सभ्यता सांभाळून त्या अुच्चपदांविषयी तसे न बोलावे हे बरे. न हून ते बोलणाऱ्यांची कुवत अुघड होते, म्हणून तरी ते भान पाळावे.
***
अशी चीड येते -
रक्त, अश्रू आणि घाम यांनी मिळविलेले आपले अमोल स्वातंत्र्य आपल्या भाग्यात आहे. त्याचा घास घेण्यास किंवा त्याला अुपद्रव देण्यासाठी पाकिस्तान, चीन व अन्य देश टपलेले दिसतात. दु:खाची गोष्ट अशी की, त्यांना छुपी वा अुघड साथ देणाऱ्या घरभेद्यांची संख्या मोठी आहे. त्यांचाही बंदोबस्त फार कठोरपणी करायला हवा.
बरबाद गुलिस्तां करने को  तो अेकही अुल्लू बैठा है ।
अंजाम अे गुलिस्तां का क्या होगा ।
(सुंदर अुद्यान ध्वस्त करण्यास अेक घुबड टपलेले आहे; या अुद्यानाचे काय होणार?) अहिंसा, सहिष्णुता, निधर्मीपणा या गुणांचा अुपदेश फार झाला; -पण राष्ट्न्भक्तीचा अुपदेश केला की त्यावर गदारोळ सुरू होतो. राष्ट्न्प्रेम हे प्रतिगामी मानले जाते, तो देश कसा पुढे येणार? राष्ट्नीय स्वार्थाच्या आड येणाऱ्यांना कापूनच काढायला हवे का; असा संताप होतो.
- सु. ह. जोशी लक्ष्मी अुद्यान, पुणे ३०

`तो' अुल्लेख महत्वाचा होता
भंडारा येथील कटरे यांचे अेक तळमळीचे पत्र वाचून मी माझी प्रतिक्रिया दिली होती, त्यात माझा अनुभव दिला होता. मी ज्या मुलास आपलेपणी मदत केली, तो दत्त्तकरूपी मुलगा हरिजन होता, ते आम्ही  लक्षातही घेतले नव्हते. `आपले जग'ने ते पत्र प्रसिध्द केले त्यातील `हरिजन' हा शब्द गाळला आहे, तसे काहीच कारण नव्हते. मी जी काही मदत, कर्तव्य भावनेने केली त्या पत्राच्या संदर्भात तो मुलगा हरिजन होता हे अधोरेखित करायचे होते.
- भा.वा.आठवले, देवगड (सिंधुदुर्ग)

तो प्रयोग का चालू नाही?
चोऱ्या गुन्हे वाढत आहेत, त्यांनी पोलीस व नागरिक हैराण झाले असतील. पूर्वी दिल्लीच्या पोलिस अधिकारी किरण बेदी यांनी तिहार जेलमध्ये प्रयोग करून पाहिले, त्यांची बरीच हवा झाली. कैद्यांना सुधारण्यासाठी त्यांना काही शिक्षण, व्यवसायशिक्षण, समुपदेशन वगैरे चालत असे. त्या कैद्यांनी काही शाळा कॉलेजच्या परीक्षा दिल्या होत्या म्हणतात. किरण बेदी यांच्या त्या प्रयोगांवर पुस्तके वगैरे झाली. मग तो प्रयोग सर्वत्र चालू का राहिला नाही? `शरण या, योग्य शिक्षा भोगा, तुम्हाला शिक्षण प्रशिक्षण मिळेल, व्यवसाय करता येआील, सुटकेनंतर मानाने जगा...' असे आवाहन करून त्यांना सुधारण्याचे प्रयोग सतत व्हायला हवेत. हल्ली तसे कुठे चालू असल्याचे अैकिवात नाही. कुणा अधिकाऱ्याला हे कसे सुचेना?
- सतीश पटवर्धन कागवाड (ता अथणी) बेळगाव

आम्ही आिंदूरचे, जावआी टिमरणी (म.प्र.)चे. त्यांना बापट पत्रातील टिमरणीचा संदर्भ भावला. मराठी भाषेचा आम्हा साऱ्यांना अभिमान आहे. आपला अंक अुशीरा का होआीना, मिळतो यावर समाधान मानावे लागते. माझी मुलेही मराठीच लिहितात, बोलतात. मोठा मुलगा सेनेत डॉक्टर होता, ब्रिगेडिअर म्हणून निवृत्त झाला. धाकटा आिंजिनियर असून `सेवा भारती'चा सामाजिक कार्यकर्ता आहे.
- शामकांत वैशंपायन ३९३ लोकमान्यनगर, आिंदूर (म. प्र.)

सगळीकडं तेच ते!
सध्याच्या राजकारणाकडं पाहिल्यावर दिसतं की, जगभरातील माणसांची मनोवृत्ती `आज, आत्ता...' अशी झाली आहे. आितके दिवस परदेशांतून जाणवणारा सुजाणपणा आता तिथंही झपाट्यानं लोप पावतोय. शास्ते आणि त्यांचे विरोधक सगळीकडं सारख्याच मनोवृत्तीचे वाटू लागलेत. हे सारे केवळ सत्तेसाठीच चालू आहे. लोकशाहीचा पाया घालणारा ब्रिटनसारखा देश ब्रेक्झिट च्या गुंतावळयातून बाहेर पडू शकत नाही; तर अमेरिकेसारखे बलाढ्य राष्ट्न् शस्त्रांच्या विक्रीत किंवा मुद्दाम अुकरून काढलेल्या बाहेरदेशांच्या आभासी काळजीत! अेकूणात अस्थिरता, चंचलता हेच सारीकडं प्रचलित होत आहे, तसाच प्रघात पडतो आहे. आपल्या अंकातील संपादकीय लेख व अन्य मजकूर वाचनीय.
- वैकुंठ सरदेसाआी १२०६ डेक्कन जिमखाना, पुणे ०४

अेकेक सांगायचे तर नवल...
आमच्या सांगलीचे नारायण गणेश केळकर  म्हणजे सामान्यातील अेक असामान्य दानशूर माणूस. त्यांचा परिचय आणि काही अचाट दातृत्वाच्या कथा आपल्या अंकात पूर्वी प्रसिध्द झाल्या आहेत. नुकतीच आणखी अेक कथा अनुभवली.
या नारायण केळकरनी कुण्या गरजवंताला १० हजार रुपये अुसनवार दिले होते. महिन्याभरात ते परत करण्याचा वायदा त्या गरजूने केला होेता. पण महिना- दोन महिने- चार महिने असे करत पैसे येणे कठीणच झाले. अनेकदा मागून झाले, पुढचे वायदे झाले. पैसे परत मिळेनात. शेवटी अेकदा तोे माणूस रस्त्यात भेटल्यावर नारायण केळकर यांनी त्यास म्हटले, मी त्या पैशाची आता आशा सोडून देतो आहे. ती रक्कम तुला दिली असं समजून तीवर अुदक सोडतो. असे सांगून त्यांनी खरंच तो विषय संपवला. त्याचा परिणाम म्हणा, किंवा त्या गृहस्थाला आता शक्य झाले म्हणा पण ते पैसे दीड वर्षांनी नारायण केळकरना त्याने दिले. हे केळकर म्हणाले, `ते पैसे आता मी तर घेअू शकत नाही कारण मी अेकदा त्यावर अुदक सोडले आहे; आणि ज्यावर अुदक सोडले ते दान परत घेता येत नाही.' असे म्हणत त्यांनी ती सारी रक्कम सांगलीच्या जनकल्याण समितीच्या कार्यासाठी देणगी म्हणून आणून दिली.
- शरद छत्रे
श्रीपाद निवास, पोलीस चौकीसमोर, गावभाग, सांगली   फोन : ९४२३०२३८०८
नारायण केळकर यांचा फोन :८८८८७३४८७८


धडा कोणी घ्यायचा?
डिसेंबरच्या अेका अंकात शिक्षणाची दुरवस्था सांगणारा मजकूर व काही निरीक्षणे दिली आहेत. `योग्य धडा घेण्या'ची आपल्याला गरजच आहे. विविध संस्था आणि सरकारनेच नेमलेले शिक्षण आयोग, आपल्या देशातील शिक्षण समाधानकारक नाही हे वेळोवेळी कित्येक वर्षांपासून सांगत आलेले आहेत.  शिक्षणाशी संबंधित साऱ्या घटकांनी चुकीचा दृष्टिकोण स्वीकारला आहे. विशेषत: सरकार आणि महत्वाकांक्षी पालक भरकटत जात आहेत.
मुलांना शिकवायचे तर त्यांना `शिकू द्यावे.' आजवरचा दृष्टिकोेण बदलणे भाग आहे. मुले आपले आपण शिकतच असतात, त्यांच्या वेगाने शिकत असतात. प्रत्येक मूल वेगळे असते, त्याला मिळालेला बुध्दिमत्तेचा  पट वेगळा असतो आणि त्यासाठी केवळ मदतीची गरज असते. विविधांगी अनुभव त्यांना देअून कृतिशील शिक्षण, साधने, साहित्य दिले पाहिजे. स्वयंअध्ययनाला महत्व द्यायला हवे. आठवीपर्यंतचे शिक्षण प्रत्येक मुलामुलीला मिळायलाच हवे. त्याला सक्षम नागरिक बनविण्यासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हवे. त्या हेतूने मूल्यमापनाची गरज आहे. आजच्या पालकांना पाल्यांच्या बालवयापासून लेखीच परीक्षा हवी असते, अेकेका गुणाचा फरक दाखवून त्यात आपला पाल्य स्पर्धेत पहिलाच आला पाहिजे अशी महत्वाकांक्षा पालकांची असते. दैनंदिन निरीक्षण, वाचन-प्रश्नोत्तरे-संभाषण-मुलाखत-गटचचर्िीज्ञ्ण्-त्त्ॅद्धिंॅण्ैंडॅडद्धें-%ंर्दी$ण-मु्ीर्खड-गछज्ञ्ज्ञ् या प्र्रकारे तोंडी शिक्षण, प्रात्यक्षिक काम, प्रयोग, प्रकल्प, अुपक्रम, चाचणी, स्वाध्याय आणि मग मूल्यमापन यांसारख्या तंत्रांचा वापर करून मुलाची परीक्षा घेतल्यास जगाच्या दृष्टीने तो यशस्वी ठरेल. म्हणूनच त्यांना गुणांअैवजी श्रेणी द्यायची असते.
त्यासाठी रचनावादी विचारसरणी असायला हवी. गावातील ग्रामशिक्षण समिती, शाळेतील शिक्षक पालक संघ, शालेय व्यवस्थापन समिती  यांनी नियमित बैठका घेअून आढावा घेतला तर प्रत्येक  शाळेतील शिक्षण गुणवत्तेचे होआील. त्यासाठी या साऱ्या यंत्रणा सक्षम करायला हव्यात, हा तरी धडा आपण घ्यायला हवा..
- कालीदास मराठे, ढवळी, गोवा  फोन : ९४२३८८२२९०

सेवेचा धंदा
डिसेंबरमधल्या  अंकात वैद्यकी व्यवसायाबद्दल काळजी वाढविणारा लेख वाचला. हा व्यवसाय आता सेवाभावी न राहता धनदांडग्यांच्या हाती गेला आहे. त्यांनी त्याचा धंदाच केला आहे. निष्णात डॉक्टर त्या बड्या धंदेवाल्यांकडे पगारी कठपुतळयांसारखे राहतात.लँन्सेट मासिकात छापून येते ते ब्रह्मवाक्य असे ते मानतात. त्याचा परिणाम म्हणून रुग्ण व त्याचे नातलग तपासण्यांच्या चक्रात लुटले जातात.  यापुढे आरोग्य विमा असेल तर आजारी पडणे (दोघांनाही) परवडेल असे दिसते.
नोव्हेंबर अखेरीच्या अंकात पुतळयांचा सोस आणि त्यायोगे येणाऱ्या समस्या शंकर देव यांनी मांडल्या आहेत. यापुढे पुतळे अुभे करणाऱ्यांनाच पुतळयाप्रमाणे चौकात कायमचे अुभे करण्याची शिक्षा द्यावी. खरे तर सार्वजनिक ठिकाणचे सारेच पुतळे वितळवून त्याच्या युध्दनौका, विमाने बांधावीत; फार तर त्यांना त्या पुढाऱ्यांची नावे द्यावीत. ज्यांना पुतळेच हवे असतील, त्यांनी आपल्या श्रध्देने पुतळे तयार करून द्यावेत व त्यांचे जिल्ह्यातील अेकाच जागेत अेकत्र प्रदर्शन ठेवावे. मोेठ्या लोकांचे पुतळे हा आता सार्वजनिक प्रश्न होणार आहे; त्याअैवजी स्मारक म्हणून ग्रंथालय, शाळा, रुग्णालय यांची अुभारणी करावी.
- विलास फडके, जांभुळगाव (पुणे) (फोन ९४२११७०११५)


...... शतायु विद्वान : अनंतशास्त्री कात्रे ..... 
कात्रे गुरुजींचा जन्म कोल्हापूरच्या गारगोटी तालुक्यात  शेळोली या गावी २१ सप्टेंबर १९१८ला झाला. मुंजीनंतर त्यांनी आपल्या वडिलांकडेच वेदाध्ययन आणि याज्ञिकीचेही शिक्षण घेतले. १९३४मध्ये संकेश्वरच्या शंकराचार्य मठात ते गेले. तेथील दहा वर्षांत त्यांनी वेदाचार्य आणि अहिताग्नींच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. श्रीपादशास्त्री जेरे या पंडिताकडे काव्य, व्याकरण, न्याय ही शास्त्रे शिकली. तसेच तर्क सांख्य ज्योतिष वेदान्त यांचाही अभ्यास केला. नंतरच्या दोन वर्षांत कोल्हापूरच्या शंकराचार्य मठात राहून कलकत्त्याच्या संस्कृत शिक्षा परिषदेच्या काव्य मीमांसा न्याय व्याकरण यांच्या परीक्षा दिल्या व तीर्थ पदवी परीक्षा अुत्तीर्ण झाले. दरम्यानच्या अठरा वीस वर्षांत त्यांनी संकेश्वर पीठाधीशांसोबत भारतभ्रमण, अनेक यज्ञ याग चर्चासत्रे आणि विद्वत्सभांत भाग घेतला. १९५४ पासून २४ वर्षे त्यांनी आिचलकरंजीच्या गोविंदराव हायस्कुलात संस्कृत शिकवले, तर संस्कृत पाठशाळेत प्रमुख अध्यापक म्हणून काम केले. `संस्कृत वाग्विहारमाला' या त्रैमासिक अंकाचे संपादन ते करीत असत.
१९७९पासून ते पुण्यात स्थायी झाले. कर्नाटकातील विख्यात पंडित दीक्षितशास्त्री यांच्याकडून त्यांनी श्रौतातील सप्त हवि:संस्था याविषयी माहिती करून घेतली. पुढे नक्षत्र आिष्टी, दर्शपूर्णिमा याग, पाक्षिक आिष्टी, चतुर्मास याग आित्यादी करवून घेतले. कणकवली येथे त्यांनी ३२ दिवसांचे नक्षत्र सत्र आपल्या प्रमुखत्वाखाली घडवून आणले होते. पुण्यातील पटवर्धन वेदशाळेतही त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. त्या साऱ्या ठिकाणहून त्यांचे बरेच शिष्य विद्वान पंडित म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांचाही अनेक ठिकाणी सन्मान झाला आहे.
आजही ते प्रात:काळी स्वत:ची आन्हिके आवरून प्रसन्न चित्ताने राहतात. घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यापन मार्गदर्शन करतात. प्रापंचिक गोष्टी सांभाळून कुटुंबियांशी जिव्हाळयाने वागत प्रसन्न असतात. तरीही अेखाद्या योग्याप्रमाणे अलिप्त असतात. त्यांची प्रसन्नता व आनंदी वृत्ती यांमुळे त्यांच्या सहवासाचा आनंद अनेकजण घेअू पाहतात. त्यांचा १००वा वाढदिवस करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या अुपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
     - नंदकुमार मराठे
बाबू जमाल दर्ग्याजवळ, कोल्हापूर (फोन : ९९७५४२९४९४)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन