Skip to main content

Posts

Showing posts from June, 2014

16june2014

भूदान पदयात्रेतील मंतरलेले दिवस ! डिसेंबर १९५६. मी आठवीत होतो. गुहागर येथील श्री गोपाळकृष्ण विद्यामंदिर या शाळेचे मुख्याध्यापक श्री.गो.श्री.सोमण यांच्या आग्रहावरून आम्ही पाच-सात विद्यार्थी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान पदयात्रेत सामील होण्यासाठी दाभोळमार्गे दापोली येथे पोचलो. दापोलीला  केळुसकर हॉटेलजवळ एक चर्च होते, त्याच्या शेजारी आमची व्यवस्था केली होती. अतिशय भाग्याची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी ज्यांना कोकणचे गांधी म्हटले जायचे, ते पूज्य अप्पासाहेब पटवर्धन, तसेच अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, दादा धर्माधिकारी, एस.एम.जोशी इत्यादी महान नेत्यांची भाषणे ऐकायला मिळाली. त्यांचा अल्पसा का होईना सहवास लाभला, त्यांच्याशी बोलायला मिळाले. हे सुवर्णाचे क्षण म्हणता येतील. त्यांचे विचार समजून घ्यायचे ते वय नव्हते, परंतु एक वेगळा अनुभव निश्चित मिळाला. पूज्य अप्पासाहेब पटवर्धन हे बोलताना सतत टकळीवर सूत कातत असत. ही सर्व माणसे नि:स्पृह, निगर्वी आणि निष्ठावान समाजसेवक. भूदानविषयक शिबीरात आमचे जीवन जरा खडतरच होते. सकाळी ४ वाजता उठवीत. प्रभात फेरी असायची. गोपुरी पद्धतीचे संडास मी तेथे प्रथ

9 June 2014

नव्या पंतप्रधानांचा संदेश मुलांना हेही शिकवावं... आपल्या समाजात कधी एखाद्या शिक्षकाचा गौरव होतो, पण शिक्षकांबद्दल त्यांचे विद्यार्थी सदैव आदरानं बोलतात. खरं पाहता हा गौरव कोण्या व्यक्तींचा नसून तो एका परंपरेचा गौरव आहे. शिक्षक असणं ही एक नोकरी किंवा पेशा राहिलेला नसून तो एक धर्म झाला आहे. राष्ट्नच्या भवितव्याच्या ह्या शिल्पकारांना मी नम्र भावाने अभिवादन करतो. मी तुम्हाला काही द्यायला येत नाही. तो अधिकार मला नाही. मी आज तर एक भिक्षुक म्हणून तुमच्या दाराशी आलो आहे. मला माहीत आहे की, जाता येता शिक्षकांना उपदेश करण्याची सध्या फॅशन आहे. जो येतो तो शिक्षकांना उपदेश करतो. मी कोण तुम्हाला उपदेश करणारा? ते पाप मी करणार नाही. मी काही द्यायला आलो नाही. मी भिक्षुक म्हणून आलो आहे, याचक म्हणून आलो आहे. टॉकीजच्या बाहेर किंवा पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर एखादा भिकारी कधी तुम्ही पाहिला आहे का? दिसणारच नाही कधी. भिकारी देवळाच्या बाहेर बसतात. कारण त्याला अंदाज असतो की, देवळात येणारी व्यक्ती संवेदनाक्षम असते. तिला माझ्यातही परमात्म्याचा अंश दिसेल, आणि त्यामुळे कदाचित मला काही देण्याची इच्छा तिला होईल

2 June 2014

फेब्रुवारी १९३३ मध्ये सिटी हायस्कूल सांगलीच्या गॅदरिंगनिमित्त  विलिंग्डन कॉलेजचे तत्कालीन प्रिन्सिपल रॅग्लर ग.स.महाजनी यांचे भाषण झाले,  त्याचा संक्षिप्त भाग. आजही ते विचार लागू पडतील. ......जुन्या-नव्याचा मेळ हवा!...... जगात अनेक विषयांसंबंधी वाद सुरू असले तरी दोन गोष्टी निर्विवाद आहेत. आपण जन्माला आलो आहोत ही पहिली आणि आपण या जगात कायम राहणार नाही ही दुसरी. अशा मधल्या स्थितीत जगावयाचे कसे? अनेकांशी आपला संबंध येतो, त्यांच्याशी वागावे कसे? भेटणाऱ्या लोकांना कोपरखळया मारावयाच्या की सर्वांशी सलोख्याने वागावयाचे? आपल्या शास्त्रकारांनी एक वचन लिहिले आहे, `अजरामरवत्प्राज्ञो विद्यामर्थंच साधयेत्' विद्या आणि धन मिळविताना आपणाला म्हातारपण अगर मृत्यू नाही अशी श्रद्धा पाहिजे. समाजाच्या सुखासाठी पाश्चात्यांनी अनेक सोयी केल्या पण त्यापासून सुख लागत नाही, हे महायुद्धापासून तेथील लोकांना कळून चुकले आहे. इंग्लंडात स्वराज्य असले तरी बेकारीचा प्रश्न सुटत नाही. अमेरिका त्याहून श्रीमंत, पण तेथेही तो प्रश्न आहे. लोकमतानुवर्ती राज्यपद्धती चांगली असे म्हणावे तर मेक्सिकोसारख्या देशात दर तीन महिन