Skip to main content

Posts

Showing posts from March, 2013

Sampadkiya in 31 Dec.2012

तुमचे आंदोलन होते,... दिवाळीच्या आधीपासून पश्चिम महाराष्ट्नत सुमारे आठ-दहा दिवस ऊस आंदोलन सुरू होते. त्यानंतर ते थंडावत गेले आणि मग व्यवहार-वाहतूक सुरळीत होत गेली. त्यानंतर वृत्तपत्रांतून उलट सुलट चर्चा, आणि आपापली बाजू मांडणारे लेख-मुलाखती सुरू झाल्या. कृषिमंत्र्यांपासून ऊस तोडणी मजुरांपर्यंत सगळयांनी परस्परांवर चिखलफेक केली, आपणच कसे सामान्य शेतकऱ्यांचे कैवारी आहोत हे ओरडून सांगण्याचे प्रयत्न झाले. त्यांच्या वादावादीशी आणि कैवाराशी ज्यांचा फारसा संबंध नाही त्या बहुसंख्य प्रजेला जो अकारण त्रास झाला, त्या कारणाने मोठे नुकसान पोचले त्याबद्दल कुणी ब्र काढला नाही. शेतकऱ्यांचा फायदा होऊ नये असे कुणीच म्हटले नाही. त्यांचे जे काही कल्याण करायचे  ते करावे; त्यासाठी परस्पर भांडावे. त्याकरिता कागदोपत्री, सभा-मेळावे, काठ्या-बंदुकी वगैरे कशाचा वापर करायचा हे कोण सांगणार? पण सामान्य जीवन विस्कळीतच नव्हे, तर कठीण करण्याचा अधिकार त्यांनी हाती कसा घेतला? कुणी अशा आंदोलनपीडितांबद्दल सहानुभूती व्यक्त करू नये? जी काही समजली-कानी आली त्यापैकी काही उदाहरणे लक्षात घेण्यासारखी आहेत. एसटी बसने घरी येण

Sampadkiya in 4 Feb.2013

लाक्षागृहमंत्री श्री.राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष झाले आणि त्याच वेळी पक्षाचे किंवा खरे तर सोनिया गांधींचे पाईक असणारे गृहमंत्री, राष्ट्नीय स्वयंसेवक संघावर घसरले. देशाच्या गृहमंत्र्याने ज्या उथळपणाने विधाने केली ती ऐकल्यावर आपल्या गृहस्थितीची ग्रहदशा झाल्याचे जाणवते. रा. स्व. संघाकडून अतिरेकी कारवायांसाठी प्रशिक्षण केंद्रे चालविली जातात असे अहवाल प्राप्त झाले असल्याचे गृहमंत्री म्हणतात. त्यावरती त्यांच्या पक्षातील वाचाळ प्रवक्त्यांनी समर्थक चिंता मांडली, पाकिस्तानी उचापतखोर संघटनांनी याच शब्दांचा आधार घेऊन आजवर त्यांना उगीचच दोषी ठरविल्याची मुत्सद्देगिरी दाखविली, आणि इतर अनेकांनी टीकाही केली. खुद्द संघाचा प्रखर विरोध एकवेळ बाजूला ठेवला तरी इतरांनी इतपत जी दखल घेतली, त्यानंतरही गृहमंत्र्यानी त्या विधानापासून माघार घेतली नाही, विपर्यास केल्याचा आक्षेप मांडला नाही, अगर मी असे म्हणालोच नव्हतो असे सांगण्याची प्रथाही पाळली नाही. त्यावरून ते त्यांच्या म्हणण्याशी चिकटून आहेत असे दिसते. देशापुढील एकंदर समस्यांच्या पर्वतापैकी उघड वा छुप्या अतिरेकी कारवायांचा वाटा फार फार मोठा आ

Aapali Upnishde

आपली उपनिषदं संदर्भ : `उपनिषदांचा अभ्यास', लेखक - के.वि.बेलसरे, त्रिदल प्रकाशन, गिरगाव, मुंबई आपणा बहुतेकांना पुराणे ठाऊक असतात. पिचत वाचलेली पण असतात. पण उपनिषदे केवळ नाव ऐकून माहीत असतात. ऋग्वेदानंतर आणि बुद्धपूर्वकाली प्रधान उपनिषदे निर्माण झाली. उपनिषदांना वेदान्त असेही म्हणतात. कारण ती वेदांच्यानंतर निर्माण झाली. वेदवाङ्मयाचे चार भाग आहेत - १)संहिता २) ब्राह्मण ३) आरण्यके व ४) उपनिषदे. ऋषींना स्फुरलेल्या आणि त्यांनी गायिलेल्या छंदोबद्ध मंत्रांचा नीट रचलेला समूह म्हणजे संहिता. या संहितांतील मंत्रांचा अर्थ, स्पष्टीकरण, विधि व विनियोग ज्यांत सांगितलेला आहे ते ब्राह्मण ग्रंथ. हे गद्य ग्रंथ आहेत. ज्ञानपिपासू तपस्वी अरण्यातील आश्रमांत राहून मनन, निदिध्यास व तत्वचिंतन करीत. ते वाङ्मय आरण्यकांत आहे. त्या त्या तत्त्वचिंतनाचा विकास व अर्थविस्तार उपनिषदांमध्ये दृष्टीस पडतो. म्हणून उपनिषदांस `आम्नायमस्तक' म्हणजे वेदांचे उत्तमांग म्हटले आहे. पुढील दशोपनिषदे महत्त्वाची आहेत - १) ईशावास्योपनिषद २) केनोपनिषद ३) कंठोपनिषद  ४) प्रश्नोपनिषद ५) मुंडकोपनिषद ६) मांडुक्योपनिषद ७) तै

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन

Lekh on B. D. Tilak

डॉ.बी.डी.टिळक : स्थितीशी संघर्ष कहाणी सुमारे १५० वर्षांपूर्वीची. एकत्र कुटुंबपद्धत होती. एकमेकांच्या मदतीला धावून जात. एका माऊलीचे यजमान चार लहान मुले पदरात असताना निवर्तले. माऊलीला भावाने आश्रय दिला. भावाला दोन लहान मुले होती. त्याच्या तिसऱ्या मुलाचा जन्म झाला पण दहा दिवसाचे आतच बाळंतीण भावजयीचे निधन झाले. माऊलीने आपल्या व भावाच्या परिवाराचा भार उचलला. माऊलीचे शेंडेफळ अंगावर पीत होते. माऊलीने नवजात अर्भकालाही स्वदूध देण्यास सुरुवात केली. दु:खी वातावरण असल्याने नवजाताचे बारसे झाले नाही. त्याला सर्वजण `बाळ'या नावाने संबोधू  लागले. `बाळ'ने स्वत:चे नाव बाळकृष्ण सांगण्यास सुरुवात केली. ही माऊली म्हणजे माझ्या आईची आई - माझी आजी. बाळ अतिशय हुशार. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात उत्कृष्ट गुणांसह पदवी मिळविली आणि टाटांची शिष्यवृत्ती घेऊन इंग्लंडला प्रयाण केले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून डॉक्टरेट मिळविली. त्यांचे सहाध्यायी डॉ.वुडवर्ड हे नोबेल प्राईझचे मानकरी होते. हे आमचे बाळमामा - डॉ.बी.डी.टिळक. भारताचे ललामभूत शास्त्रज्ञ. महान देशभक्त. परदेशात चांगल्या संधी असूनही आपल्

Lekh on Raobahadur Phadke

कराचीतील एक अधिकारी : रावबहादुर फडके सिंध प्रांतातील कराची, स्वातंत्र्यापूर्वी मुंबई इलाख्यात होते. तिथे मराठी वसती खूप होती. `सिंध-मराठा' नावाचे मराठी साप्ताहिक वृत्तपत्र तिथे निघत असे. त्याच्या १९३८ सालच्या अंकात आलेला हा वृत्तांत. यातील भाषा आणि तपशील त्या काळच्या विविध बाबींवर प्रकाश टाकू शकतील. जन्म व शिक्षण रावबहादूर फडके यांचा जन्म ता.२१ अक्टोबर १८८२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात दोणवली येथे गरीब व प्रामाणिक अशा आईबापाच्या पोटी झाला.  इ.स.१९०० म्यॅट्नीकची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते १९०१ मध्ये सरकारी कॉलेजात सरकारी शिष्यवृत्ती मिळवून दाखल झाले. १९०२ साली पदवीधर होऊन पहिला नंबर पटकाविला. इ.स.१९०४ मध्ये असिस्टंट व्हेटरिनरी ऑफिसर म्हणून नेमणूक होते न होते तोच त्यांना मुक्तेसर येथे त्याच वर्षी व्हेटरिनरी इन्स्पेक्टरच्या मोठ्या हुद्द्यावर बढती मिळाली. १९०८ मध्ये परत त्यांची मुंबईच्या  कॉलेजात बदली होऊन अखेरीस १९१२ मध्ये कॉलेजचे लेक्चरर म्हणून नेमण्यात आले. परदेश गमन इ.स.१९१२ च्या सप्टेंबर महिन्यात स्थानिक सरकारने त्यांची योग्यता व हुशारी ओळखून उच्च शिक्

Samp. in 11 feb2013

सापेक्ष धार्मिकता काश्मीरमधल्या मुलींच्या वाद्यवृंदास बंदी घालून संगीत हे इस्लामविरोधी असल्याचा आचरट शोध सांगत तिथल्या काही `खोमेनी'नी धर्माज्ञांचे उल्लेख चालविले आहेत. याही उप्पर त्या तरुण पोरींना अमानुष धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे `धर्मगुरूंनी निवेदन केलेला धर्म आपल्यास माहीत नव्हता, व त्यांचा फतवा मान्य' असल्याचे सांगत त्या मुलींनी सपशेल माघार घेतली; एकीने काश्मीरातून स्थलांतर केले. त्या `धर्मनेत्यां'च्या चापलुसीचा विजय झाला. त्यांचा जो बोलविता धनी वेगळाची असेल त्याचाही डाव यशस्वी झाला. मात्र त्या मुलींची माघार म्हणजे त्यांचा पराभव नव्हे. तर हा भारतीय सरकारच्या नेभळटपणाचा पराभव आहे. त्या सामान्य स्थितीतल्या तरुण मुली माथेफिरूंशी संघर्ष करू शकणार नाहीत. माथेफिरूंपुढे हतबल असलेले सरकार व त्याचे प्रतिनिधी किंवा पोलिस-लष्करादी दळे काही प्रतिकारच करत नाहीत, अशा स्थितीत सामान्य जनतेने जीव सांभाळून राहण्यासाठी असल्या धर्माज्ञेस शरण जाण्याशिवाय कोणता मार्ग आहे? काश्मीरचे राज्य सरकार वा केंद्रातले सरकार एकवेळ बाजूला राहूदे; पण पुरोगामित्त्वाचा आणि धर्मनिरपेक्षतेच

Lekh about Birthday

घटत जाणारे `वाढ'दिवस - वसंत आपटे, किर्लोस्करवाडी प्रौढपणी साजरे होणारे माणसांचे वाढदिवस हा अलिकडच्या काळात प्रचलित झालेला एक उत्सव आहे. बालक शाळेत जाऊ लागल्यावर दर आठदहा दिवसांनी कुठल्यातरी सवंगड्याचा वाढदिवस म्हणून `लुटलेले' चॉकलेट किंवा खोडरबर घरी घेऊन येते. त्याशिवाय संध्याकाळी त्याच्या बड्डे पार्टीला जमणारे आबालवृद्ध तो उत्सव रंगाढंगानी साजरा करतात. पूर्वी केवळ आई किंवा फारतर वडील-आजी इतक्याच मर्यादेत फिरणारा मुलांचा वाढदिवस आता बदलत्या काळातील छोटे कुटंुब आणि वाढती प्राप्ती यांना अनुसरून थाटमाटी स्वरूपाचा झाला आहे. वयाच्या तीन-चार-पाच वर्षांपर्यंत हा सोपस्कार सोहळा आजही ठीक वाटतो, थोडी ढील द्यायची तर चौदा पंधरा वर्षांपर्यंतचे वाढदिवसीय कौतुक समजून घेता येते. पण तिथपासून अशा निमित्तांनी निर्माण होणारा अहंभाव वाढत्या वयाबरोबरच वाढत जात असतो काय? हल्ली कुठल्याही गावातल्या चौकात किंवा गल्लीबोळात एखादे `उगवते नेतृत्त्व' किंवा `विचार मंचा'तील पुंड आपली छबी झळकवीत वाढदिवसाच्या शुभेच्छांचे गुच्छ मिरवीत असलेले दिसते. जन्मतिथीपासून वयाचे पहिले १० दिवस, मग १ महिना,

samp. in 28 Jan.2013

प्रजा आणि सत्ता प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व मुलांना सांगताना प्रजेची सत्ता, प्रजेसाठी सत्ता अशी काहीतरी शब्दाची फोड सांगितल्याचे स्मरते. आज मात्र प्रजा आणि सत्ता या दोन्ही गोष्टी संपूर्ण भिन्न झाल्या आहेत. किंबहुना प्रजा की सत्ता? यातील कोणातरी एकाचेच हित एकावेळी साधले जाऊ शकते असे सद्यस्थितीत दिसते. सत्ता ही प्रजेतूनच वर गेलेली असते, त्यामुळे प्रजेची सुखदु:खे सोबत घेऊनच त्याची उत्तरे शोधण्यासाठी सत्ता अग्रक्रमाने काम करेल असा भ्रम गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून आहे. प्रजेतून उठून जो कोणी सत्तेत जातो तो तिथल्याच ओरपाओरपीत एवढा व्यग्र होतो की तो प्रजेला विसरूनच जातो. आणि पिढ्यान् पिढ्या सत्तेत असणाऱ्यांच्या नव्या पिढ्या जेव्हा सत्तेच्या क्षितिजावर उगवतात तेव्हा तर त्यांचा प्रजेशी संपर्क मागच्या पिढीपासून तुटलेला असतो. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी प्रजा व सत्ता यातील दुवा म्हणून काम करणे अपेक्षित आहे. पण तिथेही बहुतांशी अपेक्षांचा भंगच होतो. प्रजा तर एका पाठोपाठ एक संकटांनी नाडली जात आहे. दुष्काळाची अस्मानी असो वा ऊसदराची सुलतानी, असाहाय्य महिलेच्या शरीराशी खेळ असो वा खुद्द लष्करी

samp.in 14 Jan.2013

उत्पत्सते%स्ति मम को%पि समानधर्मा कालोह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी । वैचारिक संघर्षाचीच गरज चिपळूणला मराठी `संमेलन'नावाची साहित्यजत्रा पार पडली, संमेलनाच्या अध्यक्षपदावरून श्री.नागनाथ कोत्तापल्ले यांनी साहित्य आणि साहित्यिकांबद्दल योग्य विचार मांडले. ते जे म्हणाले त्याची मध्यवर्ती कल्पना (थीम) अशी जाणवते की, जे साहित्य प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष मांडते, तेच साहित्य-संस्कृती समृद्धीच्या दृष्टीने मोलाचे असते. कोणत्या तरी भूमिकेशिवाय साहित्य असूच शकत नाही, आपापल्या भूमिका मांडण्यासाठी साहित्यक्षेत्र हे एक रणांगणच असते. अध्यक्षांच्या या प्रतिपादनात दुमत होण्याचे कारण नाही; मराठी साहित्यजगताचा सन्मान्य प्रतिनिधी म्हणून मांडलेले हे विचार आहेत. मात्र त्यातील `संघर्ष', `रणांगण' इत्यादी संज्ञा लाक्षणिक अर्थाने घ्यायच्या हे मात्र लक्षात ठेवण्याची गरज ठासून सांगायला हवी. त्या संज्ञा साहित्यक्षेत्राने तरी वैचारिक म्हणूनच जपल्या पाहिजेत. त्याऐवजी तथाकथित विद्रोहवाद्यांनी व ब्रिगेडियर्सनी संघर्षाची दुकानदारी मांडून शब्दश: रणांगण माजविण्याचा प्रघात निर्माण करू पाहिला आहे. त्या

samp.in 7 jan.2013

तणावाच्या आधारे पुढे जाऊ पाहता पाहता पुन्हा एक नवीन वर्ष सुरू झाले, आणि त्यातलाही आठवडा संपला. पोराटोरांनी गरगटलेले रस्ते किंवा रतीब टाकावेत तसे कुणीतरी पाठविलेले `एसेमेस' वगळता वर्षस्वागताच्या उत्साहाची कारंजी यंदा जरा मंदच उडाली. िख्रास्मसपासूनच त्याची उभारी फसफसत यायची, तशी यावेळी जाणवली नाही. कोण्या दामिनीच्या मूक बळीसाठी तरुणाईने हाती घेतलेल्या मेणबत्त्या विझल्या, तरी त्या विषयी मनांतली खदखद शमलेली नाही असे दिसते. या तरुण संवेदनशीलतेचेही प्राप्त परिस्थितीत समाधान वाटू शकेल. पण याच उदासमनस्कांचे `मार्केट' मिळविण्यासाठी `त्या'च प्रकारच्या अत्याचारी बातम्यांचा ओघ वाढल्याचेही दिसते. त्या माध्यमांनी उसन्या उत्साहाने `चला मजेत जगूया', `तणावमुक्ती', `संकल्प-सिद्धी' असे विषय नव्या वर्षाचे म्हणून समोर फेकायला सुरुवात केली तरी त्यामुळे स्फुरण चढल्याचे कुठे जाणवत नाही. अशा मानसिकतेचे कारण म्हणून एका संशोधक-विचारवंताचे नवे प्रतिपादन काही वृत्तपत्रांनी चांगल्या रितीने प्रगट केले आहे, त्याची दखल घ्यायला हवी. हा विचार तसा आपल्याला नवा नाही, तो श्रीकृष्णांनी कधीच प्र

samp. in 31 dec

विकृतीवर उपाय करणार कोण? दिल्लीत घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळं सगळा देश हादरला, सुन्न झाला, धास्तावला व आक्रमकही झाला. घटना राजधानीत घडल्यामुळं व प्रसारमाध्यमांच्या अतिरेकी प्रसिद्धीमुळं त्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं. त्या पाठोपाठ त्याच स्वरूपाच्या बातम्यांना प्रसारमाध्यमांनी अग्रस्थान दिले. स्त्रियांच्या सुरक्षेपासून शिक्षेच्या तरतुदीपर्यंत अनेक मुद्दे ऐरणीवर आले. राजकीय महिलांची संवेदनशीलता, तरुणाईची अस्वस्थता व पाठोपाठ राजकीय पक्षांचा संधीसाधूपणा याही गोष्टी दिसून आल्या. दुर्दैवी मुलीची प्रकृती व आंदोलनास मिळणारे वळण यावरून कदाचित फाशीसारख्या शिक्षेपर्यंत सरकारला यावेही लागेल, पण केवळ या उपायांमुळे अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा घडायचे थांबण्याची शक्यता कमी. एखादी विक्षिप्त घटना घडल्यावर त्याचे तीव्र प्रतिसाद उठणे, प्रतिक्रियात्मक आंदोलने होणे हे स्वाभाविक आहे, आणि सोपेही! समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी वेगळी दृष्टी, वेगळे धाडस, संयम लागतो. त्यासाठी आपण प्रयत्नच करत नाही. समाजात अनेक विकृतींची वा बेदरकारपणाची अभिव्यक्ती अनेक दुर्दैवी घटनांतून दिसत असते. मुलीनं प्रतिस