Skip to main content

Posts

Showing posts from August, 2012

sampadkiya in 27 Aug.2012

झळा अंगाला भिडणार दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. धान्य व शेतीउत्पन्नावर परिणाम होणार हे तर उघडच आहे पण त्याचे आनुषंगिक परिणाम म्हणून पाणी, वीज यांची टंचाई आणि महागाई-चोरीमारी, बेरोजगारी असेही प्रश्न उभे राहणार आहेत. काही राजकीय नेतेमंडळींच्या वल्गना आणि दुष्काळातसुद्धा हातमारीची कंत्राटे हीसुद्धा पीडित जनतेला मनस्ताप देणारी समस्या ठरणार आहे. दुष्काळाचे संकट केवळ आपल्यावर असल्याचे कुणीच मानू नये. जिथे पावसाचे प्रमाण त्यातल्या त्यात ठीक होते, तिथेही आजची पीकस्थिती गंभीर आहे. पंजाबसारख्या गव्हाच्या राज्यात ३० टक्के पाऊस झाला आहे आणि अमेरिकेतही दुष्काळाने कृषि उत्पन्न घटले असल्याच्या बातम्या आहेत. या सगळया जागतिक स्थितीचे खापर आता निसर्गावर फोडले जाईल. आषाढी एकादशीला शासकीय पूजा करून मुख्यमंत्र्यांनी देवाकडे चांगल्या पावसाची मागणी केल्याचे पेपरवाल्यांस सांगितले. या धर्मनिरपेक्ष राज्यात सश्रद्ध मुख्यमंत्र्यांची ही मागणी म्हणजे त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केलेली दुष्काळी पॅकेजची मागणी नव्हे; त्यामुळे त्यास पांडुरंगाने प्रतिसाद दिला नाही. दिल्लीत एकदा अनुदान-मागणीसाठी जाऊन आले की, विमान

Lekh in 27 Aug.2012

पंचगव्य  ऑर्गेनिक फार्मिंग असोसिएशन ऑफ इंडिया (ओफाय) - ही आपल्या देशातील सर्व सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संस्था आहे. ओफायच्या सभासदांमध्ये महिला शेतकरीसुद्धा आहेत व त्यांचा सक्रीय सहभाग असतो. सहकारी संस्था म्हणून नोंदणीकरण झाले आहे. संस्थेचे मुख्य धोरण सेंद्रीय शेतीचा प्रचार, प्रसार व पुरस्कार करणे व यासाठी उपलब्ध सर्व साधनांचा वापर करणे आहे. ओफायने लेबिलंग स्कीम व स्वयंशासित प्रमाणीकरण पद्धती (पीजीएस) उपलब्ध करून देऊन सेंद्रीय शेतकऱ्यांच्या शेतमालाला प्रमाणीकरण प्राप्त करून दिले आहे. हे प्रमाणीकरण देशांतर्गत व्यापारासाठी आहे. भारतातील प्रत्येक राज्यातील सेंद्रीय शेतकऱ्यांच्या संघटना ओफायशी जोडल्या गेल्या आहेत. महाराष्ट्न् ऑर्गेनिक फार्मिंग फेडरेशन (मॉफ) ही संस्थासुद्धा ओफायशी जोडली गेली आहे. नैसर्गिक तत्वावरील सेंद्रीय शेतीसाठीच ही संस्था आहे व तिचा जीएमओ सीडस् व रासायनिक शेती या गोष्टींना ठाम विरोध आहे. हरितक्रांतीच्या नावाखाली आपल्या देशात संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांची एक लाट आलेली आहे. `अधिक धान्य पिकवा' या घोषणेमुळे शेतकरी वर्ग या लाटेत साम

Lekh on Kamaltai Vaidya

श्रीमती कमलताई वैद्य  संस्कृत दिनानिमित्त श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर, धुळे आणि संस्कृत संवर्धन मंडळ, सांगली यांनी चारशे वर्षे पुरातन रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या संस्कृत वाल्मीकि रामायण पोथीचा परिचय कार्यक्रम आयोजित केला. श्रीरामभक्त, ज्ञानोपासक श्रीमती कमलताई वैद्य (वय ८६ वर्षे) यांचा सत्कार केला. त्या निमित्ताने.... १९२७ साली मद्रास येथे श्रीमती कमलताई यांचा जन्म झाला. त्यांचे आईवडील सुज्ञ, सुशिक्षित व सुसंस्कारित होते. स्त्रियांनी शिकले पाहिजे हा त्यांचा आग्रह व कटाक्ष होता. कमलताइंर्ना धार्मिक व आध्यात्मिक शिक्षणाचे संस्कार मिळत गेले. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण आणि आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन वडिलांनी करून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचा विवाह डॉ.बाळकृष्ण श्रीपाद वैद्य यांचेबरोबर मुंबईस झाला. सासरे डॉ.श्रीपाद महादेव वैद्य हे अध्यात्मातील उच्च कोटीला पोहोचलेले गृहस्थ. त्यांनी कमलताइंर्ना अध्यात्मातील खूप पुस्तके वाचायला दिली. १९५१ साली स्वामी प्रज्ञानानंद हे इस्लामपूरला आले होते. ते डॉ.वैद्यांच्या घरी आले व त्यांनी उभयतांना अनुग्रह दिला. स्वामी प्रज्ञानानंद यांनी कम

Sampadkiya in 20 Aug.2012

६५ वर्षांचे बाल्य व्यक्तीच्या आणि देशाच्या संदर्भात कालमापनाची रीत वेगळी असायला हवी. व्यक्तीच्या जीवनातील बदल आणि वळणे ज्या गतीने धावू शकतात त्या गतीने राष्ट्न्जीवन धावू शकत नाही हा भारतीय प्रवृत्तीचा विचार आहे. याचे कारण इथल्या लोकशाहीला स्वातंत्र्याच्या अपक्व फळापेक्षा सर्वसमावेशकता प्राधान्याची आहे. सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्तीसुद्धा स्वत:पुरते निर्णय घेऊन अथवा ते बदलून आपल्याच मनाप्रमाणे अंमलात आणू शकते, पण एकाहून अधिक व्यक्ती कुटुंब म्हणून एकविचाराने निर्णय घेऊन ते एकत्रितपणे अंमलात आणू शकत नाहीत. अशा अनेकानेक कुटुंबांचा बनलेला समाज `राष्ट्न्' म्हणून वाटचाल करीत असताना त्याची गती तितक्या प्रमाणात कमी होणार हेच ठरलेले आहे. ती गती वाढवायची असेल तर जगाच्या पाठीवर काही पर्याय दिसतील. त्यापैकी एक पर्याय म्हणजे स्वातंत्र्य - समता - बंधुता वगैरे मानवी व्यवहारमूल्ये गुंडाळून ठेवावीत आणि इंग्लंडने भारतासह सर्व जगावर जो वसाहतवाद लादला तसा लादावा. पारतंत्र्य काळात भारताला एकराष्ट्नीय स्वरूप आले असा एक सिद्धान्त आपल्यातील पुष्कळजण मनाशी बाळगून असतात आणि त्याच काळात रेल्वे-टपाला

Lekh in 20 Aug.2012

श्रावणमासी... संकल्प मानसी!  - विनिता तेलंग, सांगली चतुर्मास हेे व्रतवैकल्ये-सणवारांचे दिवस. पूर्वी पावसाची संततधार असल्याने फिरस्त्या साधू-बैराग्यांनीही या काळात एका स्थानी राहून साधना करावी असा संकेत होता. दिवस बदलले, निसर्ग बदलला, जीवनव्यवहार बदलले आणि हळूहळू `शास्त्रा'वर `सोयशास्त्र', `सवडशास्त्र' मात करू लागले. सेकंड सॅटर्डेला मंगळागौरी होऊ लागल्या आणि बाप्पांचे आगमन-विसर्जनही सुट्टीनुसार होऊ लागले. जुन्या मंडळींना सगळे साग्रसंगीत व्हावे असे वाटते तर आताच्या नव्या पिढीला मुळात हे कशासाठी, हेच माहिती नसल्याने ते सगळे अवडंबर वाटते. मधली पिढी त्यातल्या त्यात मध्यममार्ग काढू पाहते. हा मध्यममार्ग म्हणजे काय? गुरुजी व यजमान दोघेही खूप `बिझी' म्हणून पूजा शॉर्टकटमध्ये `उरकणे'? कितीतरी व्रते, परंपरा, पूजा निव्वळ चालू ठेवल्याचे समाधान म्हणून कशातरी उरकल्या जातात; मग ते पाहून नव्या पिढीला त्यातून काही घ्यावंसं वाटत नाही. कधीतरी `हे आपण कसे शास्त्रशुद्ध करतो' हे ठसविण्यासाठी बारीकसारीक शास्त्रे काटेकोरपणे पाळली जातात, ती नव्या लोकांना जाचक वाटतात! या सगळया व्

About Advocate Balasaheb Apte

आठवांचे  साठव..... - वसंत आपटे अॅड.श्री.बाळासाहेब आपटे यांचे नाव फार आधीपासून प्रसिद्ध होते, पण त्याआधी प्रत्यक्ष ओळख झाली ती त्यांचे `ज्येष्ठ' ठाण्याचे डॉ.शां.प.आपटे या तत्त्वज्ञाची! माहीमला श्री.बाळासाहेब यांच्याकहे एकदा जायला हवे असे वाटत राहिले पण एकतर त्यांचा प्रामुख्याने दिल्ली आणि शिवाय इतरत्र प्रवास; आणि माझ्या दृष्टीने दिल्लीच काय, मुंबईसुद्धा दूरच! पण जमवायचं म्हटलं की जमतं! दिल्लीत श्री.प्रमोद मुजुमदार यांची भेट घेण्यासाठी बिश्वंभरदास मार्ग (मराठीत बी.डी.रोड) शोधून स्वर्णजयन्ती अपार्टमेंटात शिरलो. रहिवाशांची नावे आणि फ्लॅट नंबरची यादी पाहताना एकदम `अॅड.बाल आपटे, सांसद' दिसले. ते तर मुजुमदारांयाच्या वरती २ मजल्यांवर होते. अर्थातच प्रमोदजींकडचे आवरून मी दोन जिने चढलो, आणि दार ठोठावले. कुणीतरी कर्मचाऱ्याने दार उघडून मला आत घेतले. मी माझे नाव नीट सांगण्याऐवजी बॅगेत बाळगून ठेवलेला भडंगाचा एक पुडा आत पाठवला आणि अंमळ थांबलो. पाच मिनिटात तेच भडंग हातात धरून खासदार पुढे येत म्हणाले, ``कोण सांगलीहून आलंय?''- माझ्या नावपत्त्यापेक्षा त्या भडंगामुळं त्यांना सांगल

Letters in 13 Aug.2012

आम्ही स्वदेशी व बाकी परदेशी पूर्वी घरातील वयस्क व्यक्तीस मान होता. त्या व्यक्तीशी विचारविनिमय करून कौटुंबिक प्रश्नांतून मार्ग काढला जात असे. ती परिस्थिती बदलत चालली. शहरात कुटुंबातील कर्ते पती-पत्नी दिवसभर बाहेर, मुले शाळा-कॉलेजात व्यस्त व वयस्क व्यक्ती दिवसभर घरात बसून असतात. दुखणे/खुपणे व व्यथा याबाबत विचारपूस करण्याचे भान विसरले. ज्या वृद्ध/ज्येष्ठ व्यक्तीकडे संपन्नता आहे त्या व्यक्तीच्या अडचणी थोड्या फार लक्षात घेतल्या जातात. असाहाय्य व्यक्तींचे जिणे खडतर बनते. एकाकी व्यक्तीची प्रतारणा होते. तोंड बंद करून जगण्याशिवाय मार्ग असत नाही. वृद्ध पालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी उदरनिर्वाहाची तरतूद करणारा कायदा मध्यवर्ती सरकारने केला. त्याची अंमलबजावणी राज्य शासन निष्ठेने करत नाही. त्या तरतुदीबाबत जागरूकता नाही. लिगल एड कक्ष काहीच करत नाहीत. कायदा २००७ साली झाला, त्याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचत नाही. उच्च शिक्षण घेणारी मुले परदेशी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. बऱ्याच व्यक्तींनी देशात आलिशान घरे/फ्लॅटस् बांधले आहेत. मुले मात्र देश सोडतात. आई वडील यांना कधीतरी परदेशात घेऊन जाणेचे कर्तव्य असल

Lekh on Aeroplanes

विमानगाथा क्रॅप्टन आनंद जयराम बोडस यांनी तीस वर्षे व्यवसायिक वैमानिक म्हणून नोकरी केली. परदेशी विमानसेवा, खाजगी विमानसेवा, शासकीय विमानसेवा, संरक्षणदल विमानसेवा आणि वैमानिक प्रशिक्षण संस्था अशा विविध विभागांत वैमानिक आणि विमानउड्डाण प्रशिक्षक म्हणून ते कार्यरत राहिले.विमान व्यवसाय सल्लागार म्हणूनही कार्य करतात. या कार्याच्या बरोबरीनेच समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याचा अभ्यास, सनातन धर्मातील विज्ञानाचा अभ्यास सातत्याने सुरू आहे. `विमानगाथा' या नागरी विमान व्यवसायाविषयीच्या परिपूर्ण व भारतीय भाषांतील एकमेव ग्रंथास महाराष्ट्न् शासनाने २०००-२००१ या वर्षासाठी उत्कृष्ट वाङ्मयासाठीचा `सी.डी.देशमुख पुरस्कार' देऊन गौरविले. त्या पुस्तकातील काही अंश... उन्हापावसाच्या त्रासापासून आपला बचाव करण्यासाठी आपण छत्रीचा वापर करतो. लोकांना परवडेल अशा किंमतीला मिळणारी मजबूत बांधणीची, थोड्या आकर्षक स्वरूपाची छत्री लोकप्रिय होते. परंतु जर कोणी चांदीचा दांडा असलेली, सोन्याची मूठ असलेली, मखमली कापडावर खऱ्या जरीचे भरतकाम असलेली छत्री निर्माण केली, तर अशी छत्री स्वत:च्या पैशाने विकत घेणाऱ्यांच

Lekh in 13 Aug.2012

आपल्या `पॅकेज' मध्ये .... गोष्टीतल्या राजकन्येला सात गाद्यांखाली चुकून राहिलेला इवलासा वाळूचा कणही खुपत असायचा, तसं अविस्मरणीय सिक्कीम टूर करून आल्यावर ते वाक्य मला खुपत होतं. टूर कंपनीतर्फे न जाता केवळ प्रवास-निवास यांची आरक्षणे व तिथे फिरण्याची व्यवस्था असे आमचे `पॅकेज' होते. पण गाडी एसी नाही, कम्फर्टेबल नाही, रोज नाश्त्यात ब्रेड-जॅमच का, चहा एकदाच का, अमका पॉइंर्ट दाखवणार होतात त्याचं काय झालं..... या सर्व प्रश्नांना आमच्या टूर कंडक्टरचं एकच उत्तर ठरलेलं - ``आपके पॅकेजमें इतनाही है सर!'' या उत्तराचा सुरुवातीला संताप आला. मग सवय झाली, आणि नंतर नंतर तो एक विनोदच झाला. नंतर नंतर चिल्ली पिल्लीपण `टूर अंकल'ला छळायला लागली, `अंकल, टॉयलेट जाना कितनी बार अलाऊड है? फ्री है या चार्जेबल?'' घरी परतलो. गंगटोकच्या हवेची आठवण काढून उसासे टाकत चहा पीत असताना भाचीचा फोन आला, ``मामी%% मला जॉब लागला. झीफी कंपनी! २.५चं पॅकेज! आणि आत्ता कलकत्ता पोस्टिंग, मग बंगलोर किंवा मुंबई!'' तिची एक्सप्रेस थांबवून मी म्हटलं, `अगं पण तुझं ते परवा मीची कंपनीचं ठरलं होतं ना?&

sampdkiya in 13 Aug.2012

क्रांती की परिवर्तन? श्री. अण्णा हजारे राजकारणात प्रवेश करणार असे काहींना वाटतच होते आणि उरलेल्यांना त्यांनी राजकारणात यावे असे वाटत होते. राजकारण प्रवेशची अण्णा हजारेंची घोषणा एकंदरीत सर्वांच्याच अपेक्षेप्रमाणे झाली आहे. आणि त्याचे परिणामही त्या सर्वांच्या अपेक्षेनेच होण्याचा संभव वाटतो. राजकारणात जाण्यामुळे आण्णांचा मामा होणार असे दोन्ही गटांना वाटत असावे; परंतु एका बाजूला त्याची चिंता आहे आणि दुसऱ्या बाजूस त्याचा धूर्त आनंद आहे. त्या दोन्ही गटांचा अपेक्षाभंग होऊन राजकारणाला व त्यायोगे सर्वंकष राष्ट्न्कारणाला नवी दिशा त्यांनी दिली तर ती हवी आहे. तथापि ती शक्यता फारच अंधूक आहे. असे असले तरी श्री.अण्णा हजारे आणि आजूबाजूची `टीम' यांच्या तळमळीबद्दल शंका न घेता त्यांना शुभेच्छा देणे आवश्यक आहे. जी मंडळी आज राजकारणात आहेत ती पक्की स्वार्थी राजकारणी बनलेली बनेल मंडळी आहेत. हजारे त्यांच्या विरोधात उतरणार असले तरी प्रस्थापित सर्वच विरोधकांतून अलिप्त राहणे अशक्य वाटते; आणि उजवे-डावे-पुरोगामी-प्रतिगामी वगैरे लेबलांचे जे पक्ष आज आहेत त्यांच्यातील कुणाशीही घरोबा केला तरी लोकांना ती प्रत

Lekh on 23-31July2012

माणसं; इथली आणि तिथली आपल्याकडे झेंडा दिन किंवा सैनिक दिन असतो, तसा क्रॅनडात रिमेंबरन्स डे साजरा करतात. पहिल्या-दुसऱ्या महायुद्धात वीरगती मिळालेल्या सैनिकांच्या स्मृती जागवून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी. पण दुर्दैवानं इथंही बहुतेक सगळे `ज्येष्ठ नागरिक'च त्यात सहभागी होत असावेत. त्या दिवशी स्टेशनवर जेव्हा एक बाई (त्याही `ज्येष्ठ'च) ते झेंडे विकत होत्या तेव्हा बहुतेक सगळे ज्येष्ठ नागरिकच ते आवर्जून घेत होते. मी विचारलेल्या कुणाच तरुणाला ते काय आणि कशासाठी याची कल्पना नव्हती. रात्री टीव्हीवर जेव्हा `देशभरात विविध ठिकाणी रिमेंबरन्स डे उत्साहात साजरा झाल्याचे `आजच्या ठळक बातम्या'त सांगितले तेव्हा मला उलगडा झाला. दोष फक्त तरुण पिढीलाच देता येणार नाही...निदान आपल्याकडे तरी! एकदा केवळ राष्ट्नीय कर्तव्य म्हणून मी माझ्या पुतण्याबरोबर झेंडावंदनासाठी त्याच्या बालवाडीत गेलो, आणि तिथे त्या लहानग्यांना उन्हात उभं करून मोठ्यांनाही वैताग आणणारी मूर्ख बडबड ऐकून तासाभरानं परत आलो होतो. `पुढच्या झेंडावंदनासाठी गेलंच पाहिजे' अशी सक्ती त्याच्यावर कोणत्या तोंडानं करणार? इथं एका शाळे

Lekh in 6/8/2012

चाकोरी मुलांसाठी उपयुक्त अशा एका पुस्तकात `चाकोरी कशी पडते' यावर एक मजेदार कविता वाचली. तिचा आशय असा - महानगरातला एक रस्ता खूपच वेडावाकडा होता. त्यामुळे इच्छित अंतर जवळजवळ तिपटीने वाढत होते. एवढ्या सुनियोजित महानगरात हा रस्ता असा का? उत्सुकतेपोटी एका संशोधकाने त्या महानगराचा इतिहास तपासला. शंभर वर्षांपूर्वी हे एक लहान खेडे होते, त्यावेळी बैलगाड्या जाण्याचा हा रस्ता होता. त्याने त्याही पूर्वीचा इतिहास धुंडाळला. त्याला असा शोध लागला की, तीनशे वर्षांपूर्वी त्या जागी एक गुराख्यांची वस्ती होती. त्यांच्याकडची वासरे ते बाहेर चरायला सोडत. त्यातील एक वासरू तरतरीत होते, ते सर्वांच्या पुढे जाई. पण ते होते जरा लंगडे, त्यामुळे ते चरताना खूपच वेडेवाकडे चाले. त्याच्यानंतर जन्मलेली लहान वासरेही त्याच्या मागून जात राहिली; तिथे गुरांची वाट तयार झाली. त्याचीच पुढे गाडीवाट बनली, पुढे त्याचाच हमरस्ता झाला! कविता शेवटी म्हणते की, या प्रगत जगातले हजारो अभिजन वर्षानुवर्षे ज्या वाटेने जात राहिले आहेत, ती वाट एका लंगड्या वासराने `चुकून' पाडली होती! संगणकामुळे झालेला ज्ञानाचा स्फोट व पालकांच्यात

Sampadkiya in 23 to 31 July 2012

तुझे आहे तुजपाशी सहकार ही संकल्पना आपल्याकडे अलीकडच्या - म्हणजे गेल्या शतकभराच्या काळात रुजली असा एक समज आपल्याकडे आहे. आज `सहकार क्षेत्र' असे म्हटले की प्रामुख्याने बँका-सोसायट्या किंवा साखर-सूत गिरण्या एवढ्यांचा विचार प्रामुख्याने मनात येतो. सध्या तिथे जे काही चालले आहे ते पाहून `सहकार धोक्यात आहे' किंवा `सहकार चळवळ संपली' असे सरसकट म्हटले जाते. एखाद्या व्यवसायिक संस्थेच्या व्यवस्थापनात किंवा तिच्या मालकीच्या स्वरूपात, त्यातील हितसंबंध पाहून बदल केले जाऊ शकतात; त्यातील सहकार बदलतो. परंतु त्याव्यतिरिक्त साऱ्या मानवी समाजात सहकार ही एक जीवनपद्धती म्हणूनच राहील हे लक्षात घ्यावे लागते. सहकाराशिवाय मानवी समाज विकसित होऊ शकणार नाही, विनासहकार त्याचा उद्धार होऊच शकत नाही. बँका नि गिरण्या कशाला; आपल्या घरातसुद्धा सहकाराची तत्त्वे लागू करावी लागतात. कुटुंबातील वयस्कर आजोबा-आजी हे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांवर असावे, आणि कर्ता पुरुष (किंवा महिला) कार्यकारी संचालक असावे. वयाची गुंतवणूक न पाहता बालकापासून सर्वांना एकच सममूल्य मत असावे. सर्वांनी निर्णय प्रक्रियेत भाग घ्यावा, त्यानुसार आ