Skip to main content

Lekh on Kamaltai Vaidya


श्रीमती कमलताई वैद्य 
संस्कृत दिनानिमित्त श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर, धुळे आणि संस्कृत संवर्धन मंडळ, सांगली यांनी चारशे वर्षे पुरातन रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या संस्कृत वाल्मीकि रामायण पोथीचा परिचय कार्यक्रम आयोजित केला. श्रीरामभक्त, ज्ञानोपासक श्रीमती कमलताई वैद्य (वय ८६ वर्षे) यांचा सत्कार केला. त्या निमित्ताने....

१९२७ साली मद्रास येथे श्रीमती कमलताई यांचा जन्म झाला. त्यांचे आईवडील सुज्ञ, सुशिक्षित व सुसंस्कारित होते. स्त्रियांनी शिकले पाहिजे हा त्यांचा आग्रह व कटाक्ष होता. कमलताइंर्ना धार्मिक व आध्यात्मिक शिक्षणाचे संस्कार मिळत गेले. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण आणि आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन वडिलांनी करून घेतले.
वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचा विवाह डॉ.बाळकृष्ण श्रीपाद वैद्य यांचेबरोबर मुंबईस झाला. सासरे डॉ.श्रीपाद महादेव वैद्य हे अध्यात्मातील उच्च कोटीला पोहोचलेले गृहस्थ. त्यांनी कमलताइंर्ना अध्यात्मातील खूप पुस्तके वाचायला दिली. १९५१ साली स्वामी प्रज्ञानानंद हे इस्लामपूरला आले होते. ते डॉ.वैद्यांच्या घरी आले व त्यांनी उभयतांना अनुग्रह दिला. स्वामी प्रज्ञानानंद यांनी कमलताइंर्ना रामोपासना व बाळकृष्णपंताना श्रीदत्तउपासना सांगितली. स्वामींच्या भेटीचा योग श्री.ना.भा.जोशी, कुंडल यांच्यामुळेच आला.
सन १९५१ पासून कमलताई तुलसी रामायण वाचू लागल्या ते आजपर्यंत. त्या बोलू लागल्या म्हणजे स्वत:ला विसरून भरभरून तुलसी रामायणाबद्दल बोलतात. समोरचा मनुष्य अवाक् होऊन जातो.
कमलताइंर्नी विवाहानंतर १८ वर्षांनी एस.एस.सी.ची परीक्षा दिली. पास झाल्या. १९६५ साली त्यांच्या पतीचे निधन झाले. रामकथेचा आधार आणि गुरूंच्यावर निस्सीम श्रद्धा यामुळे त्यांना कष्ट वाटले नाहीत. १९६६ पासून अभ्यास करून एम.ए.ची पदवी प्राप्त केली. एकनाथी भागवतासारख्या ग्रंथावर अभ्यास पूर्ण करून १९८७ मध्ये पीएच.डी. प्राप्त केली. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी हे यश प्राप्त केले.
स्वामी प्रज्ञानानंद यांचे चरित्र त्यांनी प्रसिद्ध केले. गोस्वामी तुलसीदास यांचेही चरित्र प्रसिद्ध झाले आहे. परांडा (जि.उस्मानाबाद) येथे भव्य शिल्प श्रीराम विश्रामधाम, प्रज्ञानानंद स्मारक यात कमलताइंर्चे फार मोठे योगदान आहे.
कमलताइंर्ची दिनचर्या पहाटे २.४५ ते ५.०० ध्यान व मानसपूजा, अजपा जप, अखंड लिखाण, वाचन इ. वर्तमानपत्र व दूरदर्शन वाचणे-पाहणे पूर्ण बंद.सर्व संतमहंतांशी संपर्क, प्रत्येक जीवात राम पाहून सौहार्दपूर्ण वर्तन.
- शाम रघुनाथ साखरे,  मिरज

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...