Skip to main content

Posts

Showing posts from April, 2015

20April2015

अमेरिकेतील अश्रद्ध - डॉ.शरद अभ्यंकर बराक ओबामा यांनी एकदा अमेरिकेचे वर्णन `िख्र्तासी, ज्यू, मुस्लिम, हिंदू आणि.... अश्रद्धांचा देश' असे केले. या विधानाला ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण आतापर्यंत कोणाही अध्यक्षाने अमेरिकेतील अश्रद्ध लोकांची अधिकृत दखल घेतली नव्हती. याचा अर्थ असा नव्हे की, अमेरिकेत फार कोणी अश्रद्ध नाहीतच! कदाचित सर्व मुस्लिम, हिंदू आणि ज्यू यांच्या एकत्र संख्येपेक्षा त्यांची संख्या जास्त असेल. निरनिराळया पाहण्यांनुसार ही संख्या ५ ते १० टक्के आहे. अमेरिकेत नास्तिक नागरिकांना बऱ्याच बाबतीत दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. इतकी की नास्तिक असणे हा तिथे जवळपास गुन्हाच मानला जातो. उघडपणे आपण नास्तिक आहोत हे सांगणाऱ्या कोणालाही अमेरिकेत उच्च अधिकारपद मिळू शकत नाही. निवडणुकीला उभा असणारा उमेदवार अश्रद्ध आहे अशी थोडी शंका जरी आली तरी, तो निवडून तर येऊ शकतच नाही; उलट तो उजव्या विचारसरणीच्या िख्र्तासी गटांच्या धारदार टीकेचे लक्ष्य ठरतो. अमेरिकी संसदेतील फक्त एक सदस्य(क्रॅलिफोर्नियाचे रिपब्लिकन प्रतिनिधी पीट स्टार्क) हे, आपण कोणी देवबिव मानत नसल्याचे जाहीरपणे मान्य करतात. नास्तिक

13April2015

एजंट कशासाठी हवेत महाराष्ट्न् राज्य परिवहन आयुक्तानी राज्यभरातील आरटीओ कार्यालये दलाल-मुक्त करणार असल्याची घोषणा करून, त्यास दणकून प्रसिद्धी दिली. वाहन-परिवहन (आर टी ओ) विभाग भ्रष्टाचारी असून तेथील एजंट हेच त्या भ्रष्टाचाराचे कारण व माध्यम आहेत, असा समज करून देण्यासाठी परिवहन खाते प्रयत्नशील असावे. पण `अंदरकी बात' राज्यातल्या जनतेला ठाऊक आहे. आर टी ओ मधले एजंट बंद करण्यामुळे सरकारी बाबूंची खाबूगिरी कशी काय बंद होणार आहे? उलट जनतेच्या सोयीसाठी तिथले एजंट उपयोगी असतात. तिथले काम दहा-पाच मिनिटांत होत असते तर बात वेगळी. एरवी कामाच्या माणसांनी स्वत:चा दिवस मोडून अशा कार्यालयातील साधे-किरकोळ काम करण्यात काय शहाणपणा? अशा एकाच कामासाठी समजू शंभर रुपये एजंट घेत असेल तर अशा दहावीस जणांची कामे एकत्रित करून त्याने त्याच्या दिवसाची कमाई करण्यात चूक काय? एजंट केवळ आरटीओकडेच असतात काय? स्वत:चा खटला चालविण्यासाठी फी देऊन वकील नेमला तर तो एजंट नव्हे का? हल्ली तर काही ठिकाणी वकील लोक शब्दश: `एजंट' म्हणूनच काम करतात असे ऐकण्यात येते, खरे-खोटे ती आंधळी न्यायदेवता जाणे! महसूल, पोलिस अशा ठिकाण

6April2015

स्मृतींची चाळता पाने स्त्री चे आजीपण - वा. मो. बर्वे माझे वडील सन १९४६ मध्ये वारले. तेव्हा ते ४९ वर्षांचे होते. आम्ही भावंडे लहान होतो. माझे वडील एक वर्षाचे असताना, त्यांचे वडील (माझे आजोबा) कॉलऱ्याने वारले. नंतर सख्ख्या आजीने म्हणजे वडिलांच्या आईने विहीरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले, कारण त्याकाळी विधवांचे केशवपन होत असे, आणि त्यांना फार हालात दिवस काढावे लागत. त्यावेळी म्हणजे १८९६-९७ साली आमच्या घरात पाच बालविधवा केशवपन केलेल्या होत्या. वडिलांच्या नातेवाईक म्हणजे कोणी मावशी, काकू, आते, मामी अशा होत्या. त्यांना एकतर `आप घर' किंवा `बाप घर'! त्या वयोवृद्ध महिलांनी आमच्या घरी वडिलांचा सांभाळ व पालनपोषण केले. पुढे वडील कर्ते-सवरते झाल्यावर त्यांनी त्यांचा सन्मानाने सांभाळ केला. माझ्या आठवणीत, त्यांपैकी काहीजणी भ्रमिष्ट झाल्या होत्या; त्याचा सर्व घराला ताप होत असे. पण वडिलांनी त्यांचा चुकूनही कधी अपमान केला नाही, किंवा रागे भरले नाहीत. त्यापैकी एका आजीची मला आठवण आहे. या आजीचा दिवस पहाटे तीन वाजता सुरू होत असे. तिच्याजवळ आमच्या भावंडांपैकी एक मूल निजायला असे. त्याला अंथरुणावर