Skip to main content

Posts

Showing posts from February, 2013

common man

व्यवस्था सुधारण्यासाठी सामान्य माणूसही काहीतरी करू शकतो. `आभाळ फाटलंय' हे खरंच; पण आपल्या परीनं त्यास एक टाका घालू.... लगे रहो कॉमन मॅन....! ठिकाण - गणेशोत्सवाचे एक मंडळ एक हालता पौराणिक देखावा सुरू आहे. एका बाजूला एका स्टुलावर एक मुलगा गणपतीचा मुखवटा घालून नाचतोय. पार्श्वभूमीला कुठलेतरी हिडीस गाणे लागले व हा गणपती त्यावर यथेच्छ हिंदकळतोय. दृश्य पाहणाऱ्या दोन-तीनशे लोकांना खटकलं. पण सगळेजण निमूट पाहात होते. गणपती पाहायला निघालेल्या पाच-सात कॉलेजवयीन मुलींच्या गटाला हे पाहवेना. त्या पुढे झाल्या. सरळ त्या मुलाला हाताला धरून खाली उतरवले व मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे घेऊन गेल्या. गणपतीच्या उत्सवात गणपतीचा मुखवटा घालून असा बीभत्स नाच करणे चुकीचे आहे, हे पटवून दिले व आपला निषेध नोंदवून तो प्रकार बंद पाडला. ठिकाण - मुलींच्या कॉलेजचा कट्टा ११ वीतल्या एका मुलीला कुठलातरी एक मुलगा सतत फोन करून त्रास देतोय. फ्रेंडशीप कर हा आग्रह. `मला तुझे सगळे माहीत आहे. तुझे घर, कॉलेज, क्लास, फोन नंबर, येण्या-जाण्याच्या वेळा, रस्ता...' असे सांगितल्यावर मुलगी घाबरली. पाच-सहा दिवस हा प्रकार सु

lekh on Shrikantji Joshi

श्रीकान्तजी : एक सच्चा मार्गदर्शक राष्ट्नीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ प्रचारक व हिंदुस्थान समाचार या बहुभाषी वृत्तसंस्थेचे समन्वयक श्रीकांत शंकर जोशी यांचे मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. श्रीकांत जोशी मूळ गिरगावातील. तरुणपणीच ते संघाचे प्रचारक (पूर्णवेळ कार्यकर्ते) झाले. नांदेड येथे काही काळ संघकाम केल्यानंतर पुढे सुमारे २५ वर्षे आसाममध्ये ते कार्यरत होते. आसाममध्ये फुटीरतावादी चळवळीतून निर्माण झालेल्या अशांततेतही राष्ट्नीय भावना जोपासण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या संघकार्यकर्त्यांमध्ये श्रीकांतजींचे नाव प्रामुख्याने आहे. आसाममध्ये अनेक संस्थांना पाठबळ देत त्यांनी संपूर्ण ईशान्य भारतात राष्ट्न्वादी विचारसरणीची युवापिढी घडविली. श्रीकांतजी जोशी यांनी तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही सुमारे १५ वर्षे सावलीसारखी साथ केली. संघामध्ये प्रचार विभाग सुरू झाल्यापासून ते त्याच्याशी संबंधित होते. पुढे ते अखिल भारतीय प्रचार प्रमुखही झाले. या काळात विश्व संवाद केंद्र या संस्थेची स्थापना त्यांनी क

sampadkiya in 28 jan 2013

प्रजा आणि सत्ता प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व मुलांना सांगताना प्रजेची सत्ता, प्रजेसाठी सत्ता अशी काहीतरी शब्दाची फोड सांगितल्याचे स्मरते. आज मात्र प्रजा आणि सत्ता या दोन्ही गोष्टी संपूर्ण भिन्न झाल्या आहेत. किंबहुना प्रजा की सत्ता? यातील कोणातरी एकाचेच हित एकावेळी साधले जाऊ शकते असे सद्यस्थितीत दिसते. सत्ता ही प्रजेतूनच वर गेलेली असते, त्यामुळे प्रजेची सुखदु:खे सोबत घेऊनच त्याची उत्तरे शोधण्यासाठी सत्ता अग्रक्रमाने काम करेल असा भ्रम गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून आहे. प्रजेतून उठून जो कोणी सत्तेत जातो तो तिथल्याच ओरपाओरपीत एवढा व्यग्र होतो की तो प्रजेला विसरूनच जातो. आणि पिढ्यान् पिढ्या सत्तेत असणाऱ्यांच्या नव्या पिढ्या जेव्हा सत्तेच्या क्षितिजावर उगवतात तेव्हा तर त्यांचा प्रजेशी संपर्क मागच्या पिढीपासून तुटलेला असतो. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी प्रजा व सत्ता यातील दुवा म्हणून काम करणे अपेक्षित आहे. पण तिथेही बहुतांशी अपेक्षांचा भंगच होतो. प्रजा तर एका पाठोपाठ एक संकटांनी नाडली जात आहे. दुष्काळाची अस्मानी असो वा ऊसदराची सुलतानी, असाहाय्य महिलेच्या शरीराशी खेळ असो वा खुद्द लष्करी

padmakar kelkar

 ब्राईट स्टार   श्री. पद्माकर केळकर यांनी गव्हर्मेट कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे येथून १९७२ साली प्रथम वर्ग विशेष प्राविण्यासह बी.ई.(इले.अॅन्ड टेलीकम्युनिकेशन) आणि १९७४ साली प्रथम वर्गात एम.ई. ही पदवी संपादन केली. यानंतर काही काळ त्यांनी अडवानी अर्लिकॉन कंपनीत काम पाहिले व त्यानंतर त्यांनी टाटा मूलभूत अनुसंधान संस्था (ढरींर खपीींर्ळींीींश ेष र्ऋीपवराशपींरश्र ठशीशरीलह) या संस्थेत काम सांभाळले. काही वेगळे करावे या उद्देशाने त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. सुमारे ३० वर्षांपूर्वी `ब्राईट स्टार्स इलेक्ट्नॅनिक्स' या नावाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. आणि स्वत:चे नाव कमविलेे आहे. परदेशातल्या प्रवासात श्री.केळकरांनी तेथे मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणाऱ्या `स्वयंचलित फिरते तुषार सिंचन' संचाचा अभ्यास केला आणि अशा प्रकारचा संच हा आगामी काळात भारतात शेतीसाठी खूपच उपयुक्त ठरेल असे वाटून, त्यांनी सौर उर्जाचलित फिरती तुषार यंत्रणा विकसित केली आहे.  तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची फवारणी करते. या यंत्रणेचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे `पाण्याचे सुयोग्य व परिपूर्ण नियो

lok kya boltat in 14 Jan 2013

बुफे पद्धत गैरसोयीची डिसेंबर अंकातील संपादकीय आवडले. `अन्नसेवन हे यज्ञकर्म आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ-वृद्ध यांना बुफे पद्धत असू नये. त्यांना एका हाती ताट-वाट्या धरता येत नाही. वृद्धांच्या एका हातात काठी-छत्री असते. ताट-वाटी सांभाळणे व एका हाताने अन्न वाढून घेणे एक संकटच असते. संयोजकांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. दहा बारा व्यक्तींनी त्यांना हवे त्या व तेवढ्या पदार्थांचे ताट वाढून दिले तर त्यांना सोपे जाईल. अन्नाची नासाडी वाचेल. - दि. ज. डोंगरेे `कृतार्थ' गव्हर्मेट कॉलनी, विश्रामबाग (सांगली) कुणीतरी लक्षात घेत आहे `यज्ञकर्म की मस्ती' या संपादकीय लेखातील प्रत्येक परिच्छेदाचा विचार अंतर्मुख होऊन करण्याची गरज आहे. मी नुकताच एका विवाहासाठी (मुलीची बाजू) जाऊन आले. आपल्या लेखातील बुफे पद्धतीचा वास्तव अनुभव घेऊन आलो. अलिकडे ऐकलेेले नितिन गडकरी पुत्राचे लग्न आणि पूर्वी ऐकलेले अकलूजच्या मोहिते-पाटलांकडचे लक्षभोजन. तिथे जेवणाऱ्यांचे अगत्यप्रेम मान्य केले तरी अन्नब्रह्माचा अनादर मनात राहतोच. `हे असंच चालायचं का?' असं वाटत होतं; पण नाही! - कुणीतरी लक्षात घेतो आहे. - दि. भा.

sampadkiya in 14 jan 2013

उत्पत्सते:स्ति मम कोपि समानधर्मा कालोह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी । वैचारिक संघर्षाचीच गरज चिपळूणला मराठी `संमेलन'नावाची साहित्यजत्रा पार पडली, संमेलनाच्या अध्यक्षपदावरून श्री.नागनाथ कोत्तापल्ले यांनी साहित्य आणि साहित्यिकांबद्दल योग्य विचार मांडले. ते जे म्हणाले त्याची मध्यवर्ती कल्पना (थीम) अशी जाणवते की, जे साहित्य प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष मांडते, तेच साहित्य-संस्कृती समृद्धीच्या दृष्टीने मोलाचे असते. कोणत्या तरी भूमिकेशिवाय साहित्य असूच शकत नाही, आपापल्या भूमिका मांडण्यासाठी साहित्यक्षेत्र हे एक रणांगणच असते. अध्यक्षांच्या या प्रतिपादनात दुमत होण्याचे कारण नाही; मराठी साहित्यजगताचा सन्मान्य प्रतिनिधी म्हणून मांडलेले हे विचार आहेत. मात्र त्यातील `संघर्ष', `रणांगण' इत्यादी संज्ञा लाक्षणिक अर्थाने घ्यायच्या हे मात्र लक्षात ठेवण्याची गरज ठासून सांगायला हवी. त्या संज्ञा साहित्यक्षेत्राने तरी वैचारिक म्हणूनच जपल्या पाहिजेत. त्याऐवजी तथाकथित विद्रोहवाद्यांनी व ब्रिगेडियर्सनी संघर्षाची दुकानदारी मांडून शब्दश: रणांगण माजविण्याचा प्रघात निर्माण करू पाहिला आहे. त्यामु