Skip to main content

Posts

Showing posts from February, 2016

Sampadkiya in Vishesh ank

पाऊलवाटेची चाल सेवीं धैर्य, धनान्ध त्यांप्रति वृथा दावूं नको दीनता कूपीं कीं जलधीत कुंभ जल घे जें मापिलें तत्वतां ।। - वामनपंडित छत्तीसावे वर्ष संपले आणि `तीन तपांचा एक टप्पा ओलांडला' त्या मन:स्थितीत काही महिने गेले, तोवर आज सदतीसावेही वर्ष झाले. दरवर्षी भिंतीवरचे क्रॅलेण्डर बदलताना प्रत्येकाला तसा अनुभव येतो. दिवसाचे चोवीसच तास, आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तसेच असतात; पण दरवेळीच असे वाटते की, हे वर्ष आले आले म्हणेतो फारच लवकर संपले! गेल्या वर्षभरात शब्दश: असंख्य वाचकांनी या अंकातील विषयांना, व एकूण विचारदिशेला समरसून दाद दिली हे नमूद केलेच पाहिजे. ३७वर्षांचा टप्पा एखाद्या कार्याच्या वा संख्येच्या बाबतीत मोजण्यासारखा नाही, पण एखादे काम एकहाती करत राहण्याला वाचकांची ती दाद फार महत्त्वाची ठरते आहे. हे `नियत'कालिक असले तरी त्याची काही निरंतर व्यवस्था असली पाहिजे अशी साधारण विचारसरणी असते. एखादे कार्य निरंतर चालू राहिले पाहिजे, राहावे -असे वाटणे स्वाभाविक आहे पण तसे तर कधीच कुठे घडत नाही. संत सज्जनांनीसुद्धा आपापले जीवितकार्य चिरंतन चालत राहण्यासाठी काही व्यवस्था केल्याचे

Vishesh Ank

आपल्या कर्तृत्वाने आणि वेगळया वैचारिक भूमिकेने आपले सामान्यपण असामान्य करणारी व्यक्तिमत्वे असतात.त्यांचे मोठेपण आज कुणी सांगण्यापेक्षा त्यांनीच आपली वाटचाल थोडक्यात सांगावी; त्यातून स्वत:चे मूल्यमापन करावे की ज्यातून त्यांची जीवनदृष्टी जाणवेल! अशा काही मान्यवर व्यक्तींना केलेल्या विनंतीवरून, त्यांनी स्वत:विषयी केलेले कथन `असा मी....!' अखंड काम करावेसे वाटते मी विजय मुकुंद आठवले. जन्म पुणे येथे १ जानेवारी १९४६चा, नुकतीच सत्तरी ओलांडली आहे. मी एक वर्षाचा असताना माझी आई वारली. आमच्या घरात बाईमाणूस कोणीही नव्हते, त्यामुळे माझे वडील व धाकटे अविवाहित काका रोज आलटून पालटून स्वयंपाक करीत. आमचे पुण्याच्या सदाशिव पेठेत टेलरिंगचे दुकान होते. वडिलांनी व मोठ्या काकांनी मला वाढविले आणि संस्कार, शिस्त, वक्तशीरपणा व गरिबीत व्यवस्थित राहणे शिकविले. १९६२मध्ये मी मॅट्नीक झालो. मेक्रॅनिकल ड्नफ्टस्मनचा दोन वर्षांचा कोर्स केला. कासारवाडी-पुणे येथे नोकरीला लागलो. दोन वर्षांनी मला ठाणे येथे व्होल्टाजमध्ये नोकरी लागली. ठाण्याला मी व माझा एक मावसभाऊ दोघे बरोबर नोकरीला जात येत असू. २१व्या वर्षीच

Jan.2016

न्याय समजून घ्यावा लागतो कोणत्याही मानवी समाजाच्या परस्पर व्यवहारांना नियंत्रित ठेवून ते सुरळीत चालू राहण्यासाठी काही व्यवस्था असावी लागते, ती राज्ययंत्रणा राज्यघटनेने ठरवून दिलेल्या कायद्यानुसार चालते. त्यातही काही वाद उत्पन्न होतात; ते सोडविण्यासाठी न्यायालय स्थापन करावे लागते. कायदे करणारे विधिमंडळ श्रेष्ठ, की त्यानुसार निर्णय देणारे न्यायालय श्रेष्ठ; असा एक मुद्दा पुष्कळदा चर्चेत असतो. त्याशिवाय सामान्य मााणसाला तर प्रशासनातील तलाठी किंवा पोलिस श्रेेष्ठ वाटतो. ती व्यवस्थेची तिसरी बाजू असते. हे सर्व वास्तव असले तरी, एकदा न्यायालयाने योग्यायोग्यतेचा निर्णय दिल्यावर तो शिरसावंद्य मानून प्रत्यक्षात आणणे हा सभ्यसंस्कृतीचा एक पैलू आहे. आजकाल तोही कालबाह्य ठरतो, ही चिंता करण्याजोगी गोष्ट आहे. श्री.नरेंद्र मोदींवर काँग्रेस पक्ष व तथाकथित पुरोगामी धर्मनिरपेक्ष लोकांनी आपल्या धर्मसापेक्ष बुद्धीने वाटेल तसे आरोप केले, न्यायालयात ते टिकले नाहीत. सलमानखान निर्दोष ठरला. असे सर्वच निर्णय एका बाजूला न पटणारे असतात पण ते मान्य करायचे असतात. नर्मदेच्या धरणाची उंची वाढविण्याविरोधात मेधा पाटकर इरे