Skip to main content

Posts

Showing posts from April, 2016

25 april 2016

भारतीय चित्रपटाचा युगारंभ                              -बापू वाटवे       १८८९ हे चलत् चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अतिशय महत्वाचे वर्ष आहे. मुंबईचे हरहुन्नरी इंजिनियर मदनराव माधवराव पितळे हे श्रीकृष्णाच्या जीवनातील काही भाग स्लाईड्वर चितारून हौस मौज म्हणून मॅजिक लँटर्नच्या साहाय्याने दाखवीत. त्याने चलचित्रपट पाहात असल्याचा भास होत असे. हा व्यवसाय होऊ शकेल ही कल्पना कल्याणच्या महादेव गोपाळ पटवर्धन यांना सुचली. त्यांनी एक जुनाट मॅजिक लँटर्न मिळविला, त्यांचा ज्येष्ठ पुत्र विनायक याने चित्रे रेखाटण्याची व अशा चित्रांतून मॅजिक लँटर्नच्या साहाय्याने चलत् चित्राचा आभास निर्माण करण्याची अशा दोन्ही कला आत्मसात  केल्या. हस्तगत झालेली कला रसिकांसमोर सादर करण्याची संधी पटवर्धन पितापुत्रांना लवकरच मिळाली. आपल्या खेळाला त्यांनी `शांबरिक खरोलिका' असे नाव दिले. `शांबरिक' म्हणजे मॅजिक, `खरोलिका' म्हणजे लँटर्न. मॅजी म्हणजे शांबरासुर त्यावरून शांबरिक असा सुटसुटीत शब्द बनविला.लँटर्नला आपण दीप, दिवा असं म्हणतो. पण हा शब्द सगळेच वापरतात. म्हणून अमरकोशातून त्याला खरोलिका हा प्रतिशब्द काढला व म

11 april2016

संपादकीय ।।तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख-दु:ख जीव भोग पावे।। आम्ही ' व `ते'   थांबवूया डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीची चाहूल असतानाच हीन जातीय राजकारणाचे प्रसंग वारंवार येतात. बाबासाहेबांनी सोसलेली अवहेलना, अपमान व अनेक प्रतिकूलतेतूनही सतत प्रज्वलित ठेवलेला ज्ञानाग्नी पाहून आश्चर्य वाटते.एखाद्या सामान्याचे व्यक्तिगत उन्नयन पिचत दिसतेही पण व्वक्तिगत आकांक्षा, पैसा, पत, प्रतिष्ठा किंवा राजकीय महत्वाकांक्षा न ठेवता समाजालाही आपल्यासारखेच बनवायचे ही जीवनधारणा असणे हे बाबासाहेबांच्या कार्याचे वैशिष्ट्य. ज्या समाजाने आपल्याला हीन लेखले त्याही समाजाचा द्वेष नाही. म्हणून त्यांना ``महामानव'' हे सार्थ बिरूद लाभले. आज कु णी त्यांच्या मार्गावरून चाालण्याची इच्छा करत असेल तर त्याला प्रथम जातीय अभिनिवेश, विद्वेश, राजकारण, वैयक्तिक स्वार्थ याला तिलांजली द्यावी लागेल. आज दुर्देवाने त्यांचा वैचारिक वारसादेखील मूठभर विचारवंताना आंदण दिल्यासारखे वर्तन चालू आहे. बाबासाहेबांना ``दलितांचे कैवारी'' म्हणून संबोधणारे त्यांचे अनुयायी त्यांची वैचारिक  उंची शतांशानेही गाठू शकल

4 april 2018

संपादकीय आंधळयासी जन अवघेचि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाही ।  रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाही । तुका म्हणे शुद्ध नाही तो आपण । तया त्रिभुवन अवघे खोटे ।।   गेल्या ११-१३ मार्च ला दिल्लीत श्रीश्री रविशंकर जी यांच्या `जगण्याच्या कले'चा महामहोभव्य मेळावा भरला होता. त्या निमित्ताने लक्षावधी लोक दिल्लीच्या यमुनातीरी जमले, त्यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रम केले, प्रवचने केली, सीताराम सीताराम चा जप केला, अध्यात्मदर्शन घडवले. भारतीय संस्कृती फार महान असल्याचा नवा साक्षात्कार साऱ्या जगाला या महामेळाव्याने झाला असेल तर माहीत नाही. त्यांच्या या मेळाव्याचा जो काही उद्देश असेल तो यशस्वी झाला असावा अशी सदीच्छा दूर बसून करायला हरकत नाही. एक तर इतक्या मोठ्या प्रमाणावर साऱ्या जगभरातून लोक एकत्र आणणे हीच कठीण गोष्ट आहे. त्यांची सारी व्यवस्था करणे हे तर आव्हानच.  तसा काही स्वार्थ नसताना इतक्या संख्येने लोक आपापला कामधंदा सोडून येतात त्यामागची प्रेरणाही अजब आहे. आपल्याकडे यात्रा जत्रा किंवा अगदी मोदी-सोनियांच्या सभांनाही माणसे दिवसच्या दिवस घालवून उन्हापावसात गोळा होतात.