Skip to main content

Posts

Showing posts from October, 2013

21oct.2013

मनामनांत दीप लावू... दिवाळी म्हणजे नरकासुराचा वध, आणि नरक म्हणजे अस्वच्छता, घाण, अमंगल असा भवताल, घर आणि कलुषित मनसुद्धा! या सर्व ठिकाणची साफसफाई करून शुभ संकल्पांचा दीप लावायचा, ही मूळ कल्पना आपण लक्षात घेतली, म्हणजे मग आजच्या काळातील दिवाळी कशी साजरी करावी याची दिशा स्पष्ट कळते. कधी काळी - पन्नास-साठ वर्षांपूर्वी - साजरी केलेली दिवाळी आपल्या मनांत घर करून राहिलेली असते. त्यावेळी फटाके, फराळ, पहाटेच्या आंघोळी, सोंगट्याचा खेळ या सगळया रूढींचा आनंद घेतला. परंतु आजच्या काळात ते सगळे प्रकार तसे विसंगत आहेत. फटाक्यांच्या आवाजाचे प्रदूषण, शहरी दाट लोकवस्तीला धोका, आणि कागदकपट्याचा कचरा निर्माण करणारा हा प्रकार जितक्या लवकर बंद होईल तितका बरा; ही जाणीव आली तरच शुभकाल निर्माण करता येईल. याशिवाय, फटाक्यांच्या कारखान्यांत बालमजूर घातक वातावरणात काम करतात. त्यांना विम्याचे संरक्षणही नसते. आपल्या मुलांच्या आनंदासाठी त्या असंख्य मुलांचा जीव धोक्यात जातो, हा विचार करायला हवा. फराळाचाही वेगळा विचार केला पाहिजे. `त्या' काळी ते जिन्नस अपूर्वाईचे होते. एकत्र कुटुंबातील पाककलेची ती बहार होती. आज

14OCT.2013

अन्नसुरक्षेचा बारीपाडा मार्ग बारीपाडा हे महाराष्ट्नतले एक छोटेसे गाव (ता.साक्री, जि.धुळे) पलीकडे गुजरातचा डांग जिल्हा. शासन जेव्हा अन्नसुरक्षेच्या विधेयकाची तयारी करत होतं, तेव्हा हे गाव वेगळयाच गडबडीत होतं. गेली दहा वर्षे वनभाज्यांची पाककला स्पर्धा या गावात आयोजित केली जाते. यावर्षी १८० स्त्रियांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. गावाची लोकसंख्या जेमतेम ७००. गावात शंभरच्या जवळपास घरे. जवळपासच्या वाडी-वस्त्यांमधील स्त्रियांनीही या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. शहरी लोकांना माहीत नसलेल्या जवळपास २७ भाज्या या बायकांनी शोधून काढल्या व त्या शिजवून स्पर्धेत मांडल्या. एका म्हाताऱ्या बाईला मी अन्नसुरक्षा विधेयकाबाबत विचारले. ती माझ्याकडे बघतच राहिली. तिने साधा प्रश्न केला `काय देऊन राहिले भाऊ त्यात?' मी पोपटपंची केल्याप्रमाणे `१ रुपयाला ज्वारी/बाजरी, २ रुपयाला गहू, ३ रुपयाला तांदूळ' असं सांगितलं. म्हातारी हसून म्हणाली, `ज्वारी आमी खाईना, गहू जमत नाई. त्यो तसला तांदूळ आमी खाईना.' तांदळात नाही म्हणण्यासारखं काय आहे? बाजूला उभ्या असलेल्या एका तरुण पोरानं समजावून सांगितलं, ``साहेब, य

30Sept.2013

वृद्ध नको, ज्येष्ठ व्हावे! १ ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन असतो. मनुष्यमात्राच्या प्रत्येक अवस्थेत त्याला सन्मान व मानसिक स्थैर्य मिळावे, अशी मानवतेची कल्याणस्थिती निर्माण व्हावी आणि ती चिरंतन टिकावी यात दुमत होण्याचे कारण नाही. गर्भस्थितीपासून मृत्यूपर्यंत सर्व टप्प्यांवरील मनुष्यांची काळजी वाहिलीच पाहिजे; त्यामुळे बालक दिन - युवक दिन - ज्येष्ठ दिन - पाळून त्या त्या विषयांकडे लक्ष वेधावे आणि क्षमता व त्रुटींचा आढावा घेता यावा, इतपत उद्दिष्ट ठीकच आहे. त्याशिवाय महिला दिन, अपंग दिन, अंध दिन असतात. त्याचप्रमाणे ग्राहकदिन, शिक्षकदिन, अभियंतादिन यांचीही भर असते. या सर्वांव्यतिरिक्त मानवी हक्क दिन  पुन्हा वेगळाच असतो. वास्तविक केवळ मानवतादिन म्हटला तरी त्यात यच्चयावत् चराचर सृष्टीचे संवर्धन आणि कल्याण, समाविष्ट होऊन जायला हरकत नाही. म्हणजे इतर दिन पाळायला नकोत. परंतु या सगळया वेगवेगळया गटातील सजीवांचा शारीर आणि भावनिक दृष्ट्या विचार एकेका दिवशी करून, त्याच्या कल्याणाचे काही नियोजन करायला हरकत नाही. प्रत्यक्षात तसे काही घडत नाही; केवळ त्या विशिष्ट गटाचा एक वार्षिक उत्सव घडतो. त्यात

23 Sept.2013 edition

ज्याचा त्याचा देव गणपती त्याच्या गावाला गेले आणि सरळ सभ्य प्रांजळ माणसाला जरा चैन पडेल अशी स्थिती आली. प्रदूषण विषयक नियम, सुव्यवस्थेसाठी आवश्यक शिस्त आणि नवउन्मेषाला पूरक अशी कलात्मक बुद्धी या सर्वांचा ऱ्हास करणारा श्रींचा उत्सव यावर्षीच्या पावसाने पुष्कळ अंशी रोखला. पावसाने दुहेरी फायदा केला. एक म्हणजे, त्याआधीच्या दीड महिन्यांची ओढ नाहीशी करून पीकपाण्यास जीवदान दिले आणि दुसरे म्हणजे गणपतीच्या बेछूट भक्तांचा `आविष्कार'कमी केला. भारतीय समाजात उत्सवप्रियता आहे हे तर त्याचे वैशिष्ट्यच आहे आणि त्यात काही चूक मानण्याचे कारण नाही. साधारणत: निसर्गप्रकृती व ऋतुमान पाहिले तर ते माणसाच्या उत्सवप्रेमाला अनुकूल आहे, ही भारतभूमीची देणगी आहे. त्यामुळे पंचमहाभूते आणि मानवी सहजवृत्ती यांचा सहजस्वीकार करून इथल्या चराचर सृष्टीला देवत्त्व देणारे धर्म, विधी, आचार, परंपरा यांची रेलचेल भारतात पूर्वकालापासून आहे. समाजाला उचित वळण देऊ पाहणाऱ्या बुद्धिमंत धूरिणांनी त्यांचा उपयोग करून घेतला, आणि नव्या प्रथा व कालानुरूप नवे विचार त्याच माध्यमांतून मांडले. कोणे एके काळी त्यामागील उद्देश त्याच काळाला अनु