Skip to main content

Posts

Showing posts from March, 2017

20-3-17

फोटोची निगेटिव्ह बाजू आजकालच्या जमान्यात फोटोचं कुणाला फारसं कौतुक नाही.... म्हणजे फोटो काढण्याचं नाही, पण आपला फोटो झळकण्याचं कौतुक नक्कीच आहे. फेसबुक आणि तत्सम माध्यमांतून फोटो प्रसारित करण्याची अेक लाटच आली आहे. अेक काळ असा होता की फोटो काढला तर आयुष्य कमी होतं असा समज होता. छपाआीकलेचा विस्तार झाला तसे फोटो छापले जाअू लागले तरी ते फोटो जतन करण,ं त्याचे ठसे वेळेवर बनवून घेणं हे कटकटींचं काम होतं. ते ठसे कुणाच्या फोटोचे आहेत हे ओळखणं हे तज्ज्ञाचं काम असायचं. आजही जुने पुराणे कुणाचे फोटो मिळाले तर `हा कोण? हे कोण?' असं करत बसावं लागतं. चुकीचे फोटो पेपरात छापणं हेही बऱ्याचदा घडत असे. `साहित्यसूची'त १३साली रविप्रकाश कुलकर्णीनी फोटोविषयी काही गंमती दिल्या आहेत. दत्तो वामन पोतदार गेल्याची बातमी  दूरदर्शनवर दिली, त्यात फोटो मात्र न.र.फाटक यांचा दाखवत होते. न.र.फाटक यांनी त्या बाबतीत अेक घोटाळा अनुभवलेला होता. त्यांनी न्या.रानडे यांच्यावर अेक लेख लिहिला आणि मुंबआीतच प्रसिध्दीसाठी पाठविला. लेख छापायचा तर फोटो हवाच. मग शोध घेतला पण वेळेत रानड्यांचा फोटो मिळेना, म्हणून फाटकांच्याकड

13-3-17

शिक्षणाचे मोजमाप अेका भल्या गृहस्थाला त्याच्या अुतारवयात मुलगा झाला. त्याची काही संपत्ती, आणि त्याच्या भलेपणाचा वारसा मुलाला मिळणार असला तरी त्यासाठी त्याचे ज्ञान पारखून घेण्याची गरज होती. त्या गृहस्थाने आपले कागदपत्र त्याच्या अेका सन्मित्राकडे दिले होते. मुलगा `सज्ञान' झाल्यावर त्याला तो सारा वारसा द्यायचा, असे मित्राला सांगून ठेवले होते. बापाच्या माघारी मुलगा तरुण झाल्यावर त्याला ते कागदपत्र मिळविण्याची घाआी झाली. वडिलांचा तो मित्र म्हणायचा, `अजून तू सज्ञान नाहीस.' मुलगा पदवीधर झाला, त्याचे लग्न अुभे राहिले, पण त्या मित्राचे म्हणणे तेच, -अजून तू सज्ञान नाहीस'. वय वाढले किंवा पदवी घेतली म्हणून कुणाला सज्ञान मानता येत नाही हे या कथेचे तात्पर्य आजच्या शिक्षणाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडणारे आहे. माणूस शिक्षणाने शहाणा होतो, आणि माणसाला शहाणे करणार असेल तरच ते शिक्षण म्हणायचे. त्या दृष्टिकोणातून पाहिले तर आपल्या खेडोपाडीसुध्दा अनेक शहाणी माणसे आहेत, -ती पदवीधर असोत, नसोत. त्याचे मोजमाप कसे लावायचे? ते लावण्यासाठी  काहीतरी निकष लावले जातात, आणि त्या निकषांवर माणसांचे शिक्षण

27 Feb 2017

विनोदावर राग कोणत्याही सजीवास भाषा असते, पण आशयघन ध्वनीरूपांस शब्दांचा आकार आला की त्या भाषेला खूप अर्थ प्राप्त होतात. माणसाच्या भाषेतून वाङ्मयाची आणि लिखित साहित्याची निर्मिती होते. विकसनशील माणसाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून अशी समृध्द भाषा मानली जाते, आणि तीही सतत विकसित होत जाते. भाषेतून विविध भावभावनांचे प्रगटीकरण करण्यासाठी अलंकारांनी ती सजविली जाते. त्याचप्रमाणे ती  नवरसांनीही संपृक्त होअू शकते. अशा समृध्द चिरस्थायी भाषेत जे रसालंकार असतात, त्यात विनोदाला श्रेष्ठ स्थान आहे. माणसाच्या आयुष्यातला विनोद संपला तर समोर केवळ पार्थिवसुध्दा अुरणार नाही. कारण पार्थिवाच्या बाबतीतही पुष्कळजण विनोद प्रसवून ते वातावरण हलके करू शकतात, अेवढी त्याची महती आहे. अलीकडे भाषेतल्या विनोदाची गंमत नष्ट करून टाकण्याचे कुठे काही  कारस्थान शिजले आहे की काय अशी शंका येअू लागली आहे. सरदारजींना पुढे करून पार सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा प्रसंग सर्वांना माहीत झाला असेल. आपल्याकडे सरदारजी हे टवाळखोर विनोदाचे एक अुत्तम साधन होअून राहिले आहे. कुठल्याही प्रसंगात सरदारजींचा विनोद फिट्ट बसतेा, आितके त्य