Skip to main content

13-3-17

शिक्षणाचे मोजमाप
अेका भल्या गृहस्थाला त्याच्या अुतारवयात मुलगा झाला. त्याची काही संपत्ती, आणि त्याच्या भलेपणाचा वारसा मुलाला मिळणार असला तरी त्यासाठी त्याचे ज्ञान पारखून घेण्याची गरज होती. त्या गृहस्थाने आपले कागदपत्र त्याच्या अेका सन्मित्राकडे दिले होते. मुलगा `सज्ञान' झाल्यावर त्याला तो सारा वारसा द्यायचा, असे मित्राला सांगून ठेवले होते. बापाच्या माघारी मुलगा तरुण झाल्यावर त्याला ते कागदपत्र मिळविण्याची घाआी झाली. वडिलांचा तो मित्र म्हणायचा, `अजून तू सज्ञान नाहीस.' मुलगा पदवीधर झाला, त्याचे लग्न अुभे राहिले, पण त्या मित्राचे म्हणणे तेच, -अजून तू सज्ञान नाहीस'.

वय वाढले किंवा पदवी घेतली म्हणून कुणाला सज्ञान मानता येत नाही हे या कथेचे तात्पर्य आजच्या शिक्षणाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडणारे आहे. माणूस शिक्षणाने शहाणा होतो, आणि माणसाला शहाणे करणार असेल तरच ते शिक्षण म्हणायचे. त्या दृष्टिकोणातून पाहिले तर आपल्या खेडोपाडीसुध्दा अनेक शहाणी माणसे आहेत, -ती पदवीधर असोत, नसोत. त्याचे मोजमाप कसे लावायचे? ते लावण्यासाठी  काहीतरी निकष लावले जातात, आणि त्या निकषांवर माणसांचे शिक्षण मोजले जाते. त्यामुळे ज्याला पदवी आहे तो सुशिक्षित असे मानले जाते. त्यातून`सुशिक्षित बेकार' ही संज्ञा सरसहा वापरली जाअू लागली. ज्याला पोट भरण्याअेवढे मिळवता येत नाही, त्याला सुशिक्षित का म्हणायचे हाच प्रश्न पडायला हवा.

प्राचीन काळी शिक्षणाची वेगळी काही पध्दती होती. जगाच्या प्रारंभापासून संशोधन आणि भौतिक प्रगती पुढे चाललीच आहे, त्याचबरोबर ब्रह्मांडाचा आणि आत्म्याचा वेध घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. वेदांची रचना आणि त्यांचे अंतरंग प्रत्येकाला समजेल असे नाही, पण त्याचे अध्ययन करण्याला कुणावर बंधने होती अशातला भाग नाही. तारतम्याने त्यासंबंधी काही नियम सुचविले गेले, त्यांबद्दल कांगावा करण्याची अेक फ्याशन पुरोगामी विचार-जगतात असते. त्याची दुसरी बाजू समजून घेण्याचा त्रास कोण घेणार? `स्त्रियांना व ब्राह्मणेतरांना वेदांचे पठण करण्याचा अधिकार नाकारण्यात आला' असे म्हणत राहायचे, म्हणजे समानतेच्या  नावाने दुकानदारी चालू ठेवता येते, हे त्यातले आिंगित असावे. प्रत्यक्षात तो अधिकार  कोण नाकारणार होते? अलीकडेच पुण्याच्या वेदभवनात झालेल्या कार्यक्रमात शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती म्हणाले की, `वेद हे सर्वांसाठीच आहेत, सर्व समाजाच्या अुत्थानासाठी आहेत. त्यांच्या अध्ययनाच्या किंवा पठणाच्या बाबतीत भेदभाव असण्याचे कारणच नाही. वेद अुच्चारणाच्या पध्दती असून अुदात्त-अनुदात्त स्वरांसह ते म्हणणे गरजेचे असते. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे हृदय कोमल असते -म्हणून तर त्यंाच्या अंगी स्नेह  वात्सल्य हे गुण अुपजत असतात. वेदांतील कठीण  अुच्चारांचा परिणाम त्यांच्या कोमलतेवर होअू नये म्हणून स्त्रियांनी वेदपठण करू नये असे म्हणायचे, त्यांच्यावर बंदी नाही'

आता या त्यांच्या म्हणण्याचीही चिकित्सा होअू शकते. स्त्रियांचे हृदय कोमल असते का, असाही  आधुनिक शास्त्रीय संशोधनाचा प्रश्न असायला हरकत नाही. बंदी कुणी केलेलीच नाही, तर त्यांचे अैकले पाहिजे असेही नाही. शिक्षणाने ती चिकित्सा करायला अडवणूक नसते तर प्रोत्साहन असते. पण ती पात्रता अंगी आणण्यापेक्षा त्यावर काहूर अुठविण्याचे तंत्र आजच्या काळाला सोपे पडते. त्यासाठीच `खऱ्या' शिक्षणाची गरज भासते आहे. त्या संदर्भात पुढे येणारी आकडेवारी केवळ तांत्रिक तुलनेसाठी आवश्यक असते, पण त्यातील आशय समजून घेअून नवनवे बदल स्वीकारत जाणेही भाग आहे.

कोणे अेके काळी आपल्या देशात ज्ञानभांडार होते हे सत्य स्वीकारायलाही बरेच `विद्वान' तयार नसतात. कृण्वंतो विश्वमार्यम् -म्हणजे हे सारे जग सभ्य प्रतिष्ठित करू असे आपण म्हणत होतो, तेव्हा पश्चिमेला लोक झाडाच्या साली  गुंडाळून फिरत होते. गेल्या चारपाच शतकांत परिस्थितीचा हा फेरा पालटला, आणि अलीकडे तर सारे ज्ञान `तिकडून'च आपल्याकडे आले, असा समज करून देण्यात आला. याचा प्रतिवाद करण्यासाठी मग `तिकडे लागलेला कोणताही आधुनिक शेाध पूर्वापार आमच्याकडेच होता', हे म्हणणारा जाज्ज्वल्य अभिमान कामी आणावा लागतो.त्याने कार्यभाग साधणार नाही. त्यासाठी मूलमूत शिक्षणाची कास धरावी लागेल. संशेाधन, चिकित्सा, प्रयोग, प्रसार,  यांचा समावेश असणारे शिक्षण त्यासाठी रुजवावे लागेल. आजकालच्या मोजपट्टीने मोजले जाणारे शिक्षण वेगळया दिशेला नेत आहे.

अमेरिकेतील ज्यू रिसर्च सेंटरने सर्व धर्मांतील शिक्षणाचा स्तर त्या मोजपट्टीने मोजला. त्या आधारे सुप्रसिध्द `टाआीम' मासिकाने असे प्रसारित केलेे की, ज्यू समाज सर्वाधिक शिकलेला आहे. त्यांची मर्यादित संख्या हे त्यास सोयीचे ठरलेही असेल. पण िख्र्चाश्नांची संख्या जास्त असूनही त्यांचे शिकण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यांना जगभरात शिक्षणाच्या सोयी जास्त अुपलब्ध आहेत. कोणत्याही शाखेचे जीवनोपयोगी शिक्षण घेणे तरुणांना अनेक स्थानी शक्य असते. स्त्रियांचे शिकण्याचे प्रमाण िख्र्तासी समाजात ५०-५० टक्के आहे, पण हिंदू लोकांत मात्र आजही ३८टक्केच महिला शिक्षण घेतात असे दिसते. मुस्लिमांत ते प्रमाण १९ आहे. गेल्या आठ वर्षांत महिलांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. हिंदू समाजही रूढीप्रिय आणि काहीसा कर्मठ असल्याने ते प्रमाण कमी दिसते.

आधीच्या निकषानुसार असे म्हणता येआील की, हे शिक्षणाचे निकष सुधारणा किंवा बदल करण्यासाठी म्हणून अुपयोगात आणायला हरकत नाही, पण शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी पदवीची प्राप्ती असे सरसहा मानले जाण्याने फारकत पडेल. त्या निकषांवर मोजले तर गावाकडच्या अनुभवी  माणसांचे ज्ञान आणि समज अशिक्षित ठरेल. पदवी न घेतलेली कित्येक विद्वान, अुद्योजक, खेळाडू, कलाकार, राजकारणी अशी मोठी माणसे अशिक्षित ठरतील. आणि कुठल्यातरी  रटाळ ग्रंथातली अुचलेगिरी करून `विद्यावाचस्पती' झालेले नेटसेट प्राध्यापक सुशिक्षित ठरतील.

शिक्षण क्षेत्राची पुनर्रचना करायला हवी, हे जसे खरे, तितकेच हेही खरे की ती पुनर्रचना  अेकदाच करून चालत नाही. ती निरंतर प्रक्रिया आहे. कालानुरूप जीवनशिक्षण हे शिक्षणाचे अेक अंग आहे, आणि संशेाधक चिकित्सक लोकांच्या अभ्यासातून मूलगामी  विद्वत्तेला आव्हान देणारी  चिरंतन जिज्ञासा हे दुसरे अंग आहे. या दोन्हींसाठीही  काही अुपयोगच नसलेले सध्याचे पदवीपाठी शिक्षण  सर्वेक्षणासाठी घेतले तर  येणारे निष्कर्षही आजच्या शिक्षणाप्रमाणेच फसवे ठरू शकतील, त्यांचा आधार तारतम्यानेच घेतला पाहिजे. शेतकऱ्याच्या बायकोने भाकरी भाजायचे काम केले तर, किंवा त्याच्या पोराने घरच्या गायीचे दूध प्याले तर त्यांची किंमत जशी  देशाच्या `सकल राष्ट्नीय अुत्पन्ना'त मोजली जात नाही, तसे भारतातला  अनुभवी शहाणपणा  शिक्षणाच्या पदवीत बसवता येत नाही, हे शिक्षणक्षेत्राने लक्षात घ्यावे लागते. त्याआधारे पुनर्रचना करायची ती करावी.

निसर्गाचा कोप
अपघात केवळ वाहनाचे किंवा यंत्राचे असे होत नाहीत, तर निसर्गाचेही बरेच पाहायला मिळाले. अुन्हाळयाच्या सुरुवातीला चक्री वावटळं भिरभिरत यायची. कडबा, छपराचे पत्रे अुंच अुडवायची. त्याची भीती वाटत नव्हती. त्यात मधेच अुभं राहिलं तर भूत दिसतं असं अेकमेकांना सांगायचं. पण ते पाहायला आळीपाळीनं त्या भिंगरीत अुभे राहायचो. तुफान वादळी पाअूस आला तर झाडं गोसाव्याच्या झिपऱ्यांसारखी पिसाटायची. शेंडे पार भुआीला टेकतातसे वाटायचे. वादळाच्या अुलट दिशेची खिडकी अुघडून ते तांडव पाहताना जरा टरकायला होत असे.झंझावाताच्या मोठ्या लाटेत छपराचे पत्रे थडाड थड् करून अुचकायचे. तोंडातून `अर्रर्र,  बा%प रे..' असे अुद्गार निघायचे. पाअूस त्या प्रमाणात होआी असे नाही. जरा शिंतोडा मारून ढग विघरून जायचे. पण त्यानंतर पोतं, बुट्टी घेअून रानात फेरी निघायची. आंबे, चिक्कू, शेवग्याच्या शेंगा यांचा सडा पडलेला; ते गोळा करून आणायचं. फार कैऱ्या पडल्या तर त्याचं पन्हं आणि आंबेडाळ साधायचं म्हणून लगेच आआी चैत्रागौरीचं हळदीकुंकू काढायची. त्यात पुण्य साधायचं.
आमच्या नात्यातल्या ताराक्का वेलणकर म्हणून होत्या. त्यांच्या लग्नाला चाललो होतो. संध्याकाळी पाचची रेल्वेगाडी. किर्लोस्करवाडी स्टेशनवर गाडीची वाट पाहात असताना जोराचं वादळ आणि धबाक्याचा पाअूस सुरू झाला. अर्धा तास तांडव, स्टेशनच्या छपराखाली दाटकी जागा, त्यात माणसं अंग चोरून अुभी. कडाडा विजा सुरू झाल्या. अेक लोळ सरळ खाली आला, आणि स्टेशनच्या खोलीच्या कोपऱ्यावर ढँण्कन आदळला. तो बांधीव कोपरा ढासळला. मी अेका पेटाऱ्यावर बसलो होतो. तिथून हे डोळे दिपणारे तेज पाहिले. चार हात अंतरावर वीज पडली होती.
स्वदेशी जागरण मंच या संघटनेचे राजीव दीक्षित यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ग्राहक पंचायतीच्या वतीने आम्हा कार्यकर्त्यांनी विटे येथे घेतला होता. तिथं असतानाच वादळी पाअूस हळूहळू सुरू झाला होता. आवराआवर करून परतीच्या वाटेला लागलो तर आभाळ फाटल्यागत पाणी कोसळू लागलं. जेमतेम पंचवीस किमि अंतर, संपता संपेना. रस्ताभर खळाळते अुसळते पाणी. कसेतरी आमच्या प्रेसच्या दाराशी आलो. अंधार गुडुप. गाडीतले सामान अुतरायचे होते. तोवरच भयशंका आली. दरवाजा अुघडून आत अंधारात पाहतो, तर पाअूलभर पाणी भरलेेले. पाचसातजण होतो. अंधारात धावपळ करत पुष्कळसा कागद, बंडले, आितर साहित्य अुचलले. अंतराळी कुठं ठेवणार? आिकडं तिकडं काहीतरी करून भरलं. पाण्याचे लोंढे येतच होते.त्यांतून अुलट जात शोध घेतल्यावर लक्षात आलं की, बाहेरच्या कुंपणाची भिंत फुटून पाणी आत धोधाटत होतं. त्याला वाट काढून द्यावी लागली. जवळची विहीर ओसंडून वाहात होती. कधीतरी त्या विहिरीनं खट्ट दुष्काळात कडक अून तळाशी साहिलं होतं. आज तिचा अूर फाटून गेला होता.
अेकदा माझ्या पत्नीसह वृक्षमित्र धों.म.मोहित्यांकडं गेलो होतो. तिथं गप्पा टप्पा जेवण अुरकून परत निघायला रात्रीचे अकरा वाजले.सागरेश्वरच्या अभयारण्यातून मोटरसायकल घाटातून अुतरत असताना अगदी अचानक अेक हरीण सरळ गाडीवर झेपावलं. दोहो अंगानी दहापंधरा फुटांच्या डगरी होत्या. त्यातल्या अेकीवर ते अुभं असावं. मला ते कसं दिसणार? गाडीच्या दिव्यानं ते बुजलं आणि त्यानं अुडी मारली, ती माझ्या गाडीच्या पुढच्या चाकावरच. ते कोलमडलं, पण आम्ही दोघं दणकून आडवे! ते आणखीच बुजून सटपटत पळालं. आम्ही अंधारात आ% ओ% करत अुठलो. सुदैवानं गाडी सुरू झाली, पण दिवा लागेना. तशीच गाडी हळूहळू दामटत घर गाठलं. मागं ही  बसली होती, त्यामुळं वेळ जास्तीचा लागला म्हणून, ढोपरं गुढगे फुटले असले तरी वाआीट वाटण्याजोगं नव्हतं.

ज्ञानधनाचे आगर-धनागरे
धनागरे सर गेले. त्यांच्या प्रकांड पांडित्याबद्दल आणि कर्र्तबगारीच्या आयुष्यक्रमावर वेगळे काय लिहायचे? त्यांच्याशी  काही किरकोळ पत्रापत्री झाल्यावर, १९९५च्या सुमारास अेके दिवशी ते आिथल्या कॉलेजात त्यांच्या कामासाठी आलेले होते, त्याची मला कल्पना असण्याचे कारण नव्हते. पण त्यांनी मला फोन करून  `आहात का घरी?' असे विचारले, भर दुपारी माझ्या घरी आले, घोटभर दूध त्यानी घेतले. ते गेल्यावर मी चार चारदा माझ्याशी खात्री करून घेअू लागलोे. आितका साधा सरळ सौम्य कुलगुरू असू शकतो, हे मला तेव्हाही पटले नव्हते. नंतरच्या काळात परवापरवापर्यंत धनागरे सरांची पत्रे गाठभेट चालू राहिली. त्यांच्या जाण्याची बातमी तशी अनपेक्षितच होती.
मी आणि तासगावचे वि.रा.जोगळेकर असे अेकदा बायोगॅस विषयक काही काम घेअून त्यांना भेटायला कोल्हापूरला गेलो होतोे. त्यांची वेळ घेतलेली होती. पण स्टँडवर अुतरल्यावर वृत्तपत्रात खळबळजनक बातम्या आलेल्या पाहिल्या. राज्याच्या विधानसभेने त्यांच्या विरोधात ठराव करून तो राज्यपालांकडे पाठविला होता. ते वाचल्यावर पुढे विद्यापीठाकडे जावे की परत फिरावे, असा संभ्रम पडला. पण कामाचे राहूद्या, तसेही त्यांना भेटून जावे असे वाटले व आम्ही रिक्षात बसलो. त्यांच्या कार्यालयात बाहेरच्या कक्षात बसलो होतो, तिथे अगदी ठीक वेळेत `आपटे आलेत का?' असा पुकारा झाला, आणि आम्ही सरांच्या पुढ्यात गेलो. पुढच्या पाअूण अेक तासात काम, त्यासंबंधी फेरफटका, चहा, बाकीची खुशाली असे सारे झाले; पण `त्या' बातमीच्या संबंधी कुठे काही अुल्लेखही झाला नाही. न राहवून आम्ही आमची शंका सांगितली. तो सारा हंगामा सरानी सहजतेने सोसला होता.जोगळेकर म्हणाले, ``तुम्ही योगी आहात!''   भेट संपवून आम्ही बाहेर आल्यावर मी तिथल्या अेका विषयप्रमुखाला म्हटलं, ``बाहेर यांच्यासंबंधी अेवढी लढाआी पेटली आाहे, आिथं त्याचा परिणाम किती?'' ते प्रोफेसर अुत्तरले, ``छे, बाहेरचं बाहेर. या आवारात काही अशांत नाही. त्यांच्या हाताखाली काम करायला आम्हाला छान वाटतं.'' त्यांच्याविरोधात जे काहूर माजविले गेले होते, त्या सगळयाला ते पुरून अुरले. पण त्या साऱ्या दडपणाचा मानसिक धक्का त्यांच्या पत्नी निशाताआी यांना पुढे भोगावा लागला, आणि  त्यामुळे धनागरे सर जास्त दु:खी झालेे होते...
ग्राहक पंचायतीच्या अेका कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना सांगलीला बोलावलं होतं. नंतर अशोक तेलंगांच्या घरी भोजन होतं. आम्ही चारपाचजण, निशाताआी, आणि `प्रौढ निरंतर शिक्षण'च्या अनुराधा गुरव या होत्या. हसतखेळत पंगत झाली. परत जाताना अनुराधा गुरव यांना रात्रीच्या वेळी  बसची सोय काय? त्या तरी थेट कुलगुरूंना `तुमच्या गाडीतून येअू का?' हे कसं विचारणार? मला तो प्रोटोकॉल कळला नाही, सहज मी म्हटलं, `बाआी तुमच्या गाडीतून येअूद्यात ना?'  सरानी म्हटलं, ``अहो गाडी विद्यापीठाची आहे, आणि त्या विद्यापीठातच काम करतात! प्रश्नच कुठे येतो?''  त्यांची सोय झाल्याबद्दल बाआी नंतरच्या भेटीत माझेच आभार मानायच्या.
सर पुण्याला गेल्यावर माझी जवळीक वाढली. पुष्कळदा त्यांच्या घरी अनौपचारिक जाणे घडले. `आपले जग'चा रौप्यवर्षाचा कार्यक्रम २००४ मध्ये आम्ही पुण्यात घेतला, त्यास धनागरे सर अध्यक्ष होते. तयारी करून अभ्यासपूर्ण भाषण त्यांनी केले. मागच्या वर्षी औदुंबरच्या संक्रांत साहित्यसंमेलनात श्री.नानासाहेब चपळगावकर अध्यक्ष होते,आणि  धनागरे सरांचे दुसऱ्याच दिवशी सांगलीत अेक व्याख्यान होते. म्हणून ते आदल्या दिवशी पुण्यातून निघाले. त्या संध्याकाळी औदुंबरला थांबून  पुढे जायचे असा त्यांचा बेत होता. सातारा सोडल्यानंतर त्यांनी मला फोन केला, आणि औदुंबरला येताय ना, विचारलं. मग प्रथेनुसार मी माझ्या घरी जेवायला येण्यास सुचविलं. ते आले. माझ्या घरी कोणी नव्हतं, मी अेकटाच होतो. तरीही जरा शक्कल लढवून मी संक्रांतीनिमित्त गूळ-पोळयाचा बेत केला. त्यावर तूप वाढताना म्हटलं, ``कोकणस्थाकडं जेवताय, तूप भरपूर घ्या, नंतर सवा रुपाया दक्षिणा दिली की माझे पुण्यही साधेल!'' सर खळखळून हसत होते. दुपारी आम्ही औदुंबरच्या वाटेवर बरीच गप्पाष्टके झोडली.
माझ्या माघारी त्यांनी केलेला अुल्लेख  आितरांकडून समजला; तो मला सदैव भूषणावह वाटेल. शिवाजी विद्यापीठात वृत्तविद्या (जर्नालझम)च्या पदवी वाटपाचा कार्यक्रम होता. बेळगावच्या तरुण भारतचे किरण ठाकूर अध्यक्ष होते. धनागरे तिथे भाषणात म्हणाले, ``ग्रामीण भागातूनही वृत्तपत्र कसे चालविले जाते, पत्रकारिता कशी करता येते, याचे अेक अुदाहरण माझ्या पाहण्यात आहे. तुमच्यापैकी ज्यांना शक्य आहे, त्यांनी किर्लोस्करवाडीला जाअून `आपले जग पाहावे,'' -मागे वळून ते ठाकूरना म्हणाले, ``किरणराव, मी तुम्हालाही तिथं जाअून यायला सुचवीन...'' त्यांना मध्येच तोडत किरण ठाकूर म्हणाले, ``...सर मी तिथं आधीचाच जाअून आलेलेा आहे. तो आमचाच तर माणूस आहे.'' .... सन्मान सन्मान म्हणतात तो याहून वेगळा काय असतो?
धनागरे सर गेले. माझ्या आयुष्यातील अेक संपन्न पर्व दृष्टीआड झाले.

 भारतीय अंकगणना
 १८ पदांपर्यंत प्रचलीत आहेत, त्या अशा १-एकम्, त्यावर एक शून्य-दहम्, एकावर दोन शून्ये-शतम्, एकावर तीन शून्ये-सहस्त्र, एकावर चार शून्ये-दशसहस्त्र, एकावर पाच शून्ये- लक्ष, एकावर सहा शून्ये-दशलक्ष, एकावर सात शून्ये- कोटि, एकावर आठ शून्ये-दशकोटि, एकावर नऊ शून्ये-अब्ज, एकावर दहा शून्ये-खर्व, एकावर अकरा शून्ये-निखर्व, एकावर बारा शून्ये-महापद्म, एकावर तेरा शून्ये-शंख, एकावर चौदा शून्ये-जलधि, एकावर पंधरा शून्ये- अंत्य, एकावर सोळा शून्ये- मध्य, एकावर सतरा शून्ये-परार्ध
-संकलन-गोपाळ विष्णू जोशी,सांगली
फो.नं. ९७६४१८६०५७
खसखसशीचा मळा
प्रात्यक्षिक शिक्षण
   केस कापून घेण्यासाठी अेकजण रिकाम्या दिसणाऱ्या  `बेष्ट सॅल्यून'मध्ये गेला. तिथं अेका खुर्चीकडं अगत्यशील हात करून मालकानं त्याला बसायला सांगितलं. जवळच त्या दुकानदाराचा जाणतासा  मुलगा अुभा होता.        तो म्हणाला, ``बाबा, या साहेबांचे केस मी कापू का? मला जरा जमतंय का बघतो की...''
   मालक खुशीत येअून म्हणाला, ``हो हो, कर की. आता यायलाच पायज्ये तुला. पण काळजी घे. बेाटबीट कापून घेशील...''

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन