Skip to main content

27 Feb 2017

विनोदावर राग
कोणत्याही सजीवास भाषा असते, पण आशयघन ध्वनीरूपांस शब्दांचा आकार आला की त्या भाषेला खूप अर्थ प्राप्त होतात. माणसाच्या भाषेतून वाङ्मयाची आणि लिखित साहित्याची निर्मिती होते. विकसनशील माणसाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून अशी समृध्द भाषा मानली जाते, आणि तीही सतत विकसित होत जाते. भाषेतून विविध भावभावनांचे प्रगटीकरण करण्यासाठी अलंकारांनी ती सजविली जाते. त्याचप्रमाणे ती  नवरसांनीही संपृक्त होअू शकते. अशा समृध्द चिरस्थायी भाषेत जे रसालंकार असतात, त्यात विनोदाला श्रेष्ठ स्थान आहे. माणसाच्या आयुष्यातला विनोद संपला तर समोर केवळ पार्थिवसुध्दा अुरणार नाही. कारण पार्थिवाच्या बाबतीतही पुष्कळजण विनोद प्रसवून ते वातावरण हलके करू शकतात, अेवढी त्याची महती आहे.

अलीकडे भाषेतल्या विनोदाची गंमत नष्ट करून टाकण्याचे कुठे काही  कारस्थान शिजले आहे की काय अशी शंका येअू लागली आहे. सरदारजींना पुढे करून पार सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा प्रसंग सर्वांना माहीत झाला असेल. आपल्याकडे सरदारजी हे टवाळखोर विनोदाचे एक अुत्तम साधन होअून राहिले आहे. कुठल्याही प्रसंगात सरदारजींचा विनोद फिट्ट बसतेा, आितके त्याचे सार्वत्रिकीकरण झाले आहे. वास्तविक शिख समाज हा अुद्योगप्रिय, कष्टाळू, हुशार, लढवय्या वगैरे वगैरे आहे हे तर साऱ्या जगाला मान्य आहे, तरीही त्याची बुद्दू बुध्दी,  असामान्य सामान्यज्ञान यांतून रचलेे जाणारे विनोद त्याच जगाला रिझवतात हेही खरे आहे. अेवढ्यावरून कोणा अेकाने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली, व अशा विनोदांस बंदी घालावी अशी मागणी केली. न्यायालयाने त्यावर निकाल देताना, `कोणाच्या हसण्यालाही अशी कशी बंदी घालता येआील?' -असा प्रश्न विचारून ती याचिका निकाली काढली. सध्या भारताचे सरन्यायाधीश अेक शिख आहेत, ही  बाबही त्यात बोलकी आहे.

अशा सर्वगामी विनोदांस विरोध करण्याने शिखांबद्दल कळवळा व्यक्त होत नाही, तर त्या याचिकाकर्त्याची अविनोदबुध्दीच दिसते. असे विनोद केवळ शिखांबद्दल केले जातात असे नाही. चिक्कू मारवाडीही विनोदांसाठी प्रसिध्द आहेत, पण मारवाड्यांच्या दानधर्मांतून अनेक मोठी  कार्ये अुभी राहतात, हेही खरे आहे. ब्राह्मण पोटजातीतले चित्पावन त्यांच्या अति काटेकोरपणावरून टवाळया अैकून घेतच असतात, त्यास कोणी हरकत घेत नाही. घेअूही नये. आिंग्रजीत तो मान स्कॉटिश लोकांना जातो. मुंबआीतल्या मद्राशांची लुंगी पकडून आपल्याकडचा अेक राजकीय पक्ष फोफावला आहे. त्या पक्षाचे मुखपत्र  लुंगीच्या व सार-भाताच्या यथेच्छ टवाळया करून वाढले. अेकंदरीत कोणत्याही भाषेतील विनोदाला काही निमित्त वा कारण आखून द्यायचे, ही कल्पनाच विनोदी आहे.
अेका मेजवानीच्या प्रसंगी म्हणे, अेकेकाने विनेाद सांगायचा अशी टूम निघाली. अेकजण अुभा राहिला, सरदारजीच त्याच्या डोक्यात घोळत होता. तोवर त्याला समोरच्या श्रोत्यांत तीनचार सरदारजी दिसले. तशी त्याने आपले डोक्यातील वाक्य सुधारून म्हटले, ``अेकदा अेक केरळी  माणूस...''अेवढे म्हणेपर्यंत समोरचा अेक सरदारजी ताड्कन् अुठून म्हणाला, ``अरी ओ, हम सब क्या मर गये क्या?'' -आितके सरदारजीचे नाते विनोदाशी  जुळून गेलेले आहे. त्याला कोणी `शिख जमातीचा अवमान' म्हणत असेल तर तो बहुधा गेल्या जन्मी  `तसाच' असावा. स्त्रियांनी तर विनोदी वाङ्मय किती भरून भारून टाकले आहे, पण हल्ली कुठेतरी त्यांसही आक्षेप येअू लागले आहेत. बायकांवरून केलेल्या विनोदांस आता हसता येणार नाही, आितके बायकीपण भाषेत येअू पाहात आहे.

आजकाल विनोदाला विद्रूप करणारी अेक आचरट जमात सर्वत्र फैलावत असल्याचे जाणवते. सहजावारी होणारे विनोद आणि चेष्टा भलत्याच गांभिर्याने घेतली जात असताना, त्या भोगाला हसावे की रडावे ते कळत नाही. त्या आचरट  गांभिर्याला हसले तर साक्षात भोगच वाट्याला येतात, आणि रडायचे म्हटले तर स्वत :शीही हसूच येते.विद्यमान प्रधानमंत्री मोदी यांनी आधीच्या प्रधानमंत्र्यासाठी जी स्नानगृहातील रेनकोटची अुपमा वापरली, ती वादाचा विषय झाली आहे. या विरोधकांच्या नेत्यांनी मोदींना `मृत्यूचा सौदागर' म्हटले होते, पण फरक असा की ती अुपमा नव्हती तर वास्तव होते, असे ही मंडळी म्हणतील. अेकदा कशाचाही आक्रस्ताळी आक्रोशच करायचा म्हटले तर तेथे विनोदाला माघार घ्यावी लागते हे खरे. तथापि त्या वागण्याला मग रयाच राहात नाही.

विनोदच नव्हे तर अशा अुपमाही भाषेच्या अलंकारपेटिकेतून जप्त होअू शकतील असे वातावरण वाढते आहे. गुजरातमध्ये ज्या लोकांना भोगावे लागले, त्यांच्याबद्दल काय वाटते? -असा प्रश्न मोदींना विचारला गेला; त्यावर ते म्हणाले की, `अहो, आपल्या गाडीखाली अेखादे कुत्र्याचे पिलू सापडले तरी आपला जीव कळवळतो....' म्हणजे त्यापुढचा भाग असा की `ही तर माणसासारखी माणसे, त्यांच्याबद्दल....!' -पण यावरून `त्या पीडित लोकांना मोदी कुत्रे म्हणाले..' असला  बभ्रा करणाऱ्यांना भाषा आणि त्यातले अलंकार कळतात असे म्हणायचे का? शरद पवार वास्तविक अशा मिष्कीलीत चतुर आहेत. गेल्या निवडणुकीत माथाडींच्या सभेत त्यांनी  मतदारांच्या दुहेरी  नाव-नोंदणीवरून अेक गंमत अुच्चारली, त्यावरून थेट निवडणूक आयोगाकडे तक्रारी होअून पवारांच्या नाकी दम आणला गेला. अर्थात पवारांनी विरोधकांच्या बाबतीत तसे मुद्दाम वेड पांघरून पेडगावचा रस्ता काही वेळी धरलेला असल्याने त्यांची खाशी खोड मोडली असे म्हणावे लागते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारी मंडळी  अशा भाषालंकाराच्या बाबतीत भलतीच बूर्झ्वा झाल्याचे जाणवते. त्यांना तर आितरांबाबत काहीही बोलण्याचे -त्याला ते अभिव्यक्ती म्हणतात - स्वातंत्र्य हवे असते, पण यांना कोणी काही म्हणता कामा नये! साम्यवाद हा तर भलत्याच गांभीर्याने बोलण्याचा विषय. सरदारजींचा विनोद टोचणारे कित्ेयक संघवाले आहेत, तसे रशियाच्या बाबतीत साम्यवाद्यांचे असावे! पण तिेथेही विनोद पिकतच असतात. रशियात खायचे दुर्भिक्ष्य होते, त्या काळात म्हणे अेक नागरिक रांगेत अुभा होता. बराच वेळ ताटकळल्यावर तो चिडला. आणि जोराने ओरडू लागला, ``क्रुश्चेव्ह क्रूर आहे, तो दुष्ट आहे...'' लगेच पोलीसांनी त्याला पकडलं आणि त्याच्यावर दोन गुन्हे दाखल केले. अेक, त्याने सार्वजनिक ठिकाणी दंगा केला म्हणून, आणि दुसरा गुन्हा म्हणजे त्याने राष्ट्नीय गुपित फोडले!! अशा प्रकारची खिल्ली क्रुश्चेव्हच्या काळात खपली, आज ती खपेल असे वाटत नाही. कारण हा काळच रुक्ष होअू पाहात आहे. सरकारी आदेशाची किंवा न्यायालयाच्या `ज्याअर्थी - त्याअर्थी'ची भाषाच केवळ टिकून राहील की काय असे वाटू लागले आहे.

अतिशयोक्ती हा भाषालंकार तर विनोदाचा प्राण आहे. पण त्यालाच काहीजण स्वभावोक्ती मानू लागले आहेत. दुर्बोधता हे वैचारिकतेचे लक्षण झाले तर विचार आणि  भाषाच काय, माणूसच संपेल. विचारांत सुबोधता येण्यासाठीही अलंकारांचे स्थान असते. राजकारणी, तथाकथित विचारवंत आणि नस्ती अुठाठेव करणारे समाजकारणी यांच्यापासून भाषेला धोका आहे. व्यंग्यचित्रकार आर के लक्ष्मण म्हणाले होते की, व्यंग्य आणि वास्तव यांतली सीमारेषा नाहीशी होअू लागली आहे, त्याचे प्रत्यंतर आजच्या काळातील समाजजीवनांत येत आहे. वास्तव सहन करण्यासाठी विनोदाचा वापर होण्याअैवजी वास्तवच विनोदी होअून ते गंभीरपणे सहन करावे लागते आहे.

याला कारण हे असावे की, ज्यांना भाषेची व मानव्यशास्त्रांची समज नाही असे लोक अग्रणी आहेत, याअुलट ज्यांना मानवी आयुष्याचे गमक कळले आहे ती माणसे लुप्त होअून राहिली आहेत. त्याचा प्रत्यय पुष्कळ ठिकाणच्या वादविवादांतही येतेा. विचारांचा विनिमय घडत असेल तर त्या वादांतून काही अर्थबोध जन्मतो. विनिमयासाठी देवाणी आितकेच घेवाणीला - म्हणजे दुसऱ्याचे अैकून घेण्याला समजून घेण्याला - फार महत्व असते. केवळ मी म्हणेन ते, आणि मीच म्हणेन ते चालेल अशी भावना आज वाढत चालली आहे. त्यामुळे सहिष्णुता तर राहोच, पण जीवनांतील मौजही नाहीशी होत आहे. सहिष्णुता म्हणजे दुसऱ्याच्या मताचा सन्मान असे न होता, केवळ माझ्या मताला काय ती किंमत असा प्रकार वाढत आहे. त्यामुळे भाषेचा दुरुपयोग होअून माणसांतील सुसंवादच लुप्त झाला आहे. चांगल्या समाजाला हे काही भूषण नव्हे. हे रोगट मनाच्या समाजाचे लक्षण आहे. त्याचा गंभीर विचार निदान प्रसारमाध्यमे, साहित्यिक चळवळी, शिक्षणखाते अशा क्षेत्रांत तरी व्हायला हवा. ज्यांना भाषेचा डौल, खोचा, गंमत कळतच नाही त्यांचे अरसिकत्व कुणाच्या भाळी लिहिले जाऊ नये इतकेच शुभचिंतन मराठी गौरव दिनास करायचे.

माझे कॉपी प्रकरण
मी ११वी च्या वर्षाला होतो, त्या वर्षीच पलूसच्या शाळेत बोर्डाच्या परीक्षेचे केंद्र मंजूर झाले. मी संस्कृत घेतलेले होते. आमच्या वर्गात तो विषय घेणारे तसे कमीच विद्यार्थी असायचे. आमच्याच शाळेच्या तळमजल्यावर अेका वर्गात दुपारी तीनचा पेपर सुरू झाला. संस्कृत हा चांगले मार्क पाडून देणारा (स्कोअरिंग) विषय असतो. माझी तयारी, माझे हस्ताक्षर आणि लिहिण्याचा वेग, शिस्त हे सगळे चांगले होते. त्यामुळे प्रश्नपत्रिका हाती पडताच मी दणाणा लिहायला प्रारंभ केला.
पहिला धडाका संपल्यावर व्याकरणाची रूपे लिहिताना जरा विचार करावा लागतोच. त्यासाठी मान वर केल्यावर अेक चमत्कारिक गोष्ट माझ्या लक्षात आली. आमच्यावर जे पर्यवेक्षक(सुपरवायजर) होते, ते जवळच्या कोण्या गावातील शाळेचे शिक्षक असावेत. मी तरी त्यांना ओळखत नव्हतो. ते माझ्या पेपरातील अुत्तरे पाहून हातातल्या चिटोऱ्यावर लिहीत होते, आणि माझ्यापुढे  चारसहा बाक पुढे बसलेल्या अेका मुलाकडे देत होते. मला पहिल्यांदा विश्वास बसेना, पण मग मी जरा मुद्दाम माझा पेपर खुला ठेवून लिहू लागलो, आणि त्यांचीच परीक्षा घेतली. दोन तीनदा ते घडल्यावर माझी खात्रीच झाली.
मला तो प्रकार सहन झाला नाही. मी धाडकन् अुभा राहिलो, आणि त्या शिक्षकास जाब विचारला. स्वाभाविकच त्याने, `छे रे, तसं काही नाही. अुगीच काहीतरी बोलतोस...' वगैरे धुडकावणी केली. पण मी स्पष्टपणे त्यांस खडसावले. त्यांच्या हातातील चिट्ठी दाखवायला सांगितले. त्यांचा पहिला चढा आवाज क्रमानं क्षीण झाला. तरीही `तसं काही नाही' अेवढं ते म्हणत राहिले.
हा अजब प्रकार त्या वर्गातली सारी मुलं खोळंबून पाहात होती. आमच्या शाळेत हे परीक्षा केंद्र याच वर्षी चालू झाले होते, आणि त्यास अेक प्रतिष्ठा होती. त्यामुळं असा गैरप्रकार घडला तर ते लांच्छन झाले असते. आमच्याच शाळेतले काही विद्यार्थी  आजूबाजूला होते, ते साक्षीदारच ठरले. पेपर सुटल्यावर  मला राहवेना. मी केंद्रप्रमुखाकडे गेलो. कऱ्हाडच्या शाळेचे अेक नामवंत मुख्याध्यापक केंद्रप्रमुख (कंडक्टर) होते. माझी बटुमूर्ती  ज्या स्पष्टतेने सांगत होती, ते पाहून त्यांचा विश्वास बसला असावा. `मी लक्ष घालतो' असे ते मला म्हणाले. मी निघून आलो. पुढं चौकशा कशाला करू? ज्याला उत्तरे पुरवली जात होती, तो त्यांच्या शाळेचा विद्यार्थी असेल. दुसऱ्या दिवशीपासून ते शिक्षक त्यांच्या कामावरून थांबवले गेले असं मला खूप नंतर  कळलं.
परीक्षार्थी मुलांना पिण्याचे पाणी देण्यास खालच्या आियत्तांची काही मुलं असायची. त्यातला अेक मुलगा, हा प्रकार घडला तेव्हा त्या वर्गात पाणी देण्यासाठी होता, त्याने ते सारे पाहिले होते. हा पाणीवाला मुलगा बऱ्याच वर्षांनी कॉलेजात काही काळ प्राचार्य झाला होता. तो भेटला की माझी ही आठवण काढायचा, आणि `मलाही त्यावेळी घाम फुटला होता...' -असं म्हणायचा! त्याचवेळी आमच्या पेपरला बसलेला अेक विद्यार्थीही पुढच्या काळात दुसऱ्या अेका शाळेत मुख्याध्यापक झाला, आम्ही अेकत्र स्वयंसेवी काम करायचो. त्यालाही हा प्रसंग तसाच्या तसा आठवतो. आणि जे केंद्रप्रमुख होते, ते तर कधीच गेले; पण त्यांच्याच शाळेत मी अलीकडे व्याख्यानासाठी गेलो होतो. त्यांचे नाव माजी मुख्याध्यापकांच्या नामवंत फलकावर पाहून,त्यांची ती कडक आठवण संयोजकांना सांगितल्याविना मलाही राहावले नाही.
जाताजाता हेही सांगतो की, मला त्यावर्षी संस्कृत विषयात केंद्राचेे बक्षिस मिळाले.! पण माझी उत्तरे बिनचूक असणार हे त्या शिक्षकास त्ययावेळी वाटलेले होते, हे माझेही मोठेपणच की!
                   -Vasant apte, kirloskarwadi

घुशीचे एन्काऊंटर
सकाळी सकाळी मला फोन आला. पोलीस चौकीतून कोणी शिपाआी दादा बोलत होता, तशी माझी पाचावर धारण बसलीच. मला `ताबडतोब या' म्हणून फर्मान सुटल्यावर काय करणार? जायलाच हवं. माझा पडका चेहरा पाहून पत्नीला राहावलं नाही. तिला तरी सांगून जावं असं मलाही वाटलं... अुगीच कुठं बरंवाआीट....! चुळा भरल्या, आंघोळ कशीतरीच अुरकली, आणि हजर झालो.  चौकीवर जाण्याचा पहिलाच प्रसंग.
चौकीच्या दारात `सद्रक्षणाय..' असं काहीतरी कोटेशन होतं. त्याचा अर्थ लावण्याच्या भानगडीत न पडता पुढं आलो. तिथं दहा बारा लोकांचं टोळकं होतं. काही चेहरे आमच्या शेजार-पाजारचे असावेत असं वाटलं. पण पुष्कळजण शुभ्र नितळ कपड्यात आणि मनगटी कड्यात होते, त्यावरून ते बेरोजगारी  कार्यकर्ते असावेत हे अुघड होतं. त्या साऱ्यांनी अेकच गिल्ला केला, ``आला आला, हाच तो तिरसिंगे. या खुन्याला शिक्षा झालीच पाहिजे!'' मी अवघडलेपणी आत गेलो.
माझ्याविरुध्द तक्रार असल्याचं सांगून पोलीसानी ती वाचून दाखवली. ती पोलिसी भाषेत लिहिली होती, पण त्या मजकुराचा हिंदवी तर्जुमा असा, ``आज सकाळी माझ्या फाटकाशी त्यांना अेक मेलेली घूस मिळाली. मी तिला मारलं होतं - म्हणजे आजच्या भाषेत मी घुशीचा अेन्काअूंटर केलेला होता.'' या लोकांनी ती मेलेली घूस पुराव्यासाठी आणलेली होती. याचा तपास करून वन्य जीवरक्षण कायद्याखाली गुन्ह्यास शिक्षा व्हावी अशी या लोकांची मागणी होती. ठाणे अंमलदारसाहेब मला ओळखत असावेत, पण मी चाचपडलो होतो. टोळीचा म्हेारक्या तर त्यांच्या तंबाखूला आपल्या डबीतला चुना देण्याआितका घसटीतला दिसला. पोलीसानी मला आणि त्या म्होरक्याला थांबायला सांगितलं, आणि बाकीच्यांना जायला लावलं. त्यांतल्या काहींनी सराआीतपणे,``अेक धक्का और दो %'' अशा घोषणा जाताजाता दिल्या.
मला आता जरा धीर आला होता. पोलीस म्हणाला, ``साहेब, तक्रार आहे तेव्हा मला जबाब तर घेतलाच पाहिजे.'' - मग आमचे सवाल जबाब सुरू झाले.
``घुशीला तुम्ही किती वाजता मारलं?''
``रात्री  २च्या सुमारास''
``तसं नको, नक्की सांगा.''
``अेक वाजून बावन्न मिनिटं असावीत...'' हे अुत्तर - सॉरी, जबाब! -त्यांना चालला.
म्होरक्या मधेच म्हणाला,``पण तुम्ही तिला जिवे मारलं? पकडलं का नाहीत?''
``तुम्ही गप्प बसा.जबाब मी घेतोय ना!'' असं दटावत पोलीस माझ्याकडं वळला ``घुशीनं तुमचं काही नुकसान केलं होतं, कुणावर हल्ला वगैरे? स्वरंक्षणार्थ तुम्ही प्रतिहल्ला केलात?'' त्यानं बहुधा माझ्या बचावाच्या दृष्टीनं हा प्रश्न केला असावा.
``नुकसान म्हणजे कसं सांगणार? डब्यातलं धान्य फस्त केलं, कपडे कुरतडले, भांडी पाडली, ...'' मी अुत्तरलो.
म्होरक्याला राहावलं नाही, ``साहेब, यानं घुशीचा अेकाअूंटरच केलाय. फेक अेनकाअूंटरचं कलम लागू शकतंय... गुन्हा तर त्यानं मान्यच केलाय...आणि याच घुशीनं त्याचं नुकसान केलंय कशावरून? ती दुसरीच घूस असेल'' त्याला या सगळयाचा चांगला सराव असावा. तरीच मघाशी त्यांचं चुना तंबाखू चाललं होतं.
मी बचाव सुरू केला. ``साहेब, अुंदीर मारणं हे तर स्वच्छता अभियानातील चांगलं कृत्य आहे.''
``अहो पण ते अुंदराचं झालं! घूस हा वन्यजीव आहे. तुम्ही पर्यावरण वगैरे काही  वाचताय का नाही?'' - मला माझ्या अज्ञानाची कीव आली. शेवटी पोलीसानी कागदी जबाब संपवला, माझी सही घेतली. सरकारी वकीलांचा सल्ला घेण्यास मला सुचवलं. मग त्यानी त्या म्होरक्याकडं म्होरकं वळवलं. ``तुमचा व्यवसाय काय?''
म्होरक्या थंुक टाकण्यासाठी अुठून बाहेर गेला, तोवर पोलीसानं त्याचं अुत्तर  लिहून टाकलेलं मी पाहिलं. `` आिष्टेट डीलर, भिशी चालक, आणि सांस्कृतिक कार्य'' त्यांच्या सोबत आलेल्या लोकांचे तपशील पोलीसानं त्यास विचारून लिहिले,`` आमच्यातला अेकजण डबर वाळू कंत्राटदार आहे. अेकजण डॉक्टर-पेशंट तंटे सोडवतो. माझा अेक भाअू होता, तो मालक भाडेकरू यांची प्रकरनं घेतो. आम्ही समाजातील अन्नाय, अत्याचार याविरुध लडतो. मुक्या प्राण्यासाठी आमची चळवळ आहे. त्यास मानवी हक्क लागू होतो.''
या साऱ्याची नोंद करत पोलीसानी विचारलं, ``आजची तक्रार मिटवण्यासाठी काही तोडगा?'' त्यावर तो अुत्तरला,``कसं आहे साहेब, आम्ही नेहमी तडजोडीला तयार असतो. समाजात सामंज्यश्य पायज्ये. माणूस चुकतो, ते सुधारलं पायजे. करूया काहीतरी...''
अेकंदरीत हा कार्यकर्ता समाजासाठी किती झटतोय याची मलाही कल्पना आली. पोलीस साहेबानी त्याला `नंतर कळवतो म्हणून जायला सांगितलं. मला म्हणाले, ``साहेब, हा पुढल्या निवडणुकीला अुभा राहणार बघा. त्याच्या फंडाला काहीतरी द्या, नाहीतर मग `तुमच्या घरातली मतं देअू' असं तरी म्हणा..'' नंतर त्या पोलीसानं ओळख सांगितली. त्याचा नातू शाळेतून घरी नेण्यासाठी तो यायचा, तेव्हा मी तिथं त्याच कामावर असायचो. आज त्याला मी वर्दीवर ओळखलं नव्हतं.
मी घरी आलो. अशा तळमळीच्या माणसाला मतं द्यायला हरकत काय? नाही का?

द्वारा - अशोक तेलंग, सांगली
(फोन : ९८६० ६७५ ५७५)


Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन