Skip to main content

Posts

Showing posts from August, 2013

Lekh on V.M.Dhapre, Karad

अश्वत्थव्रती आण्णा - विवेक ढापरे, कराड (मोबा.७५८८२२११४४) लोकसंस्कृतीमध्ये `अश्वत्थाचा पट' नावाचं एक व्रत आहे. पिंपळाच्या पाच प्रकारच्या पानाचं पूजन या व्रतात केलं जातं. त्यातलं हिरवं पान असतं सौंदर्यासाठी, कोवळं पान असतं नवजात पुत्रासाठी, पिकलेलं पान असतं पतीच्या दीर्घायुष्यासाठी, वाळलेलं पान असतं सुखसमृद्धीच्या वृद्धीसाठी आणि फाटलेलं पान असतं अमर्याद संपत्तीसाठी. आपल्या कार्याप्रति अविचल निष्ठा असणाऱ्या विश्वनाथ माधव ऊर्फ अण्णा ढापरे यांनी गेल्या ७९ वर्षांत हे व्रत कधी केलं असेल अशी शक्यताच नाही. पण त्यांनी ऐकलेली पिंपळपानाची सळसळ मात्र आयुष्याच्या प्रवासाची धगधगती कथानकं रेखाटती ठरली व सदैव इतरांसाठी स्वत:चं आयुष्य वेचणारी ठरली. माझे वडील विश्वनाथ ढापरे यांचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील ब्रिटीशकालीन बांधकाम खात्यात नोकरी करीत होते. स्थावर मालमत्ता भरपूर, पण सारीच कुळांच्या आणि साहजिकच त्या अनुषंगाने कोर्टकचेऱ्यांच्या तावडीत अडकलेली. त्यामुळे भाडोत्री घरात राहूनच आजोबांनी सहा मुलांचा प्रपंच केला.विलिंग्डन कॉलेज सांगली मधून माझे वडील बीएस्सी झाले. त्यानंतर अने

Apale Jag 26Aug.2013

ज्ञानरचनावाद-सार्वत्रिक चळवळीची गरज - प्रशांत देशपांडे सचिव, तुळजाभवानी शिक्षण मंडळ, इस्लांपूर (जि.सांगली) फोन : ९८२२२४१९१३ माणसाच्या आयुष्यातील समस्या सोडविता याव्यात हा तर शिक्षणाचा मूळ उद्देश असतो. परंतु गेल्या काही वर्षांत शिक्षण हीच एक समस्या आहे, असे म्हणण्याची पाळी सर्व संबंधी घटकांवर आली आहे. आयुष्य सुसंस्कृत, संपन्न तरीही जिज्ञासू करण्यासाठी शिक्षणाने दिशा द्यायला हवी. तसे `आनंददायी शिक्षण' ही संकल्पना मुलांच्या वाट्याला गेल्या पाच-पन्नास वर्षांत आलेलीच नाही. उलट, शासन-पालक-शिक्षक यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. गेल्या काही वर्षांत तर `घोका आणि ओका' पद्धतीची शिक्षणव्यवस्था आपल्याकडे रुळून गेली. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात चांगले जगता येईल इतकीही क्षमता त्यामधून प्राप्त झालेली नाही. निव्वळ परीक्षार्थी मुले, वेतनार्थी शिक्षक आणि उदासीन पालक अशी एक साखळी तयार झाली. ही स्थिती सर्वच घटकांना अमान्य होती. पुष्कळ वर्षांच्या कटू अनुभवातून आणि अनेक विचारवंतांच्या मंथनातून शिक्षणविषयक नवा प्रयोग अलीकडे सुरू झाला आहे. सहामाही किंवा वार्षिक परीक्षांतील स्मरणआधारी गुणांकना

Lekh

अशानं महासत्ता होईल? - संदीप वासलेकर (स्ट्न्ॅटेजिक ग्रुप) केवळ पाच वर्षांपूर्वी जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्नध्यक्ष म्हणून प्रथम निवडून आले, तेव्हा सौरऊर्जा उत्पादन करण्याचा खर्च एका वॅटसाठी ६ डॉलर होता, तो आता २ डॉलरपर्यंत खाली आला आहे. ग्राहकांच्या दृष्टीनं पाहिलं तर त्यांना सध्या सौरऊर्जा  प्रतिकिलोवॅट तासाला ४० सेंट या दरानं मिळते. २०५० पर्यंत ६ सेंटपर्यंत हा दर कमी होईल, त्यावेळी अमेरिकेतील ३३% ऊर्जा ही सौरऊर्जा असेल. केवळ पाच वर्षांत अमेरिकेला सौरऊर्जा स्वत: उत्पादित करण्यात जे प्रचंड यश मिळालं, त्यामागं आहेत स्टीफन च्यू. चिनी वंशाचे एक अमेरिकी नागरिक. याच पाच वर्षांत अमेरिकेनं दुसऱ्या काही क्षेत्रांत प्रचंड बाजी मारली आहे. त्यातला एक उपक्रम काही विशिष्ट प्रकारचे जंतू निर्माण करतो. ते जंतू एखाद्या झिजलेल्या अथवा तुटलेल्या धातूच्या वस्तूवर पसरवले तर ती वस्तू काही काळात पुन्हा नवी होते. दुसऱ्या एका प्रकारचे जंतू रासायनिक रोबोटमध्ये मिश्रित केले तर तो रोबोट स्वत:हून लहान होतो व एका कापडाच्या अथवा भिंतीच्या छिद्रातून पलीकडं जातो. दुसऱ्या बाजूला गेल्यावर पुन्हा पूर्ववत् होत

Sampadkiya in 5Aug.2013

प्रसार  आणि  फैलाव आजकाल साऱ्या पृथ्वीतलावर सगळे अनैतिक, वाईट, दुराचारी असे गलिच्छ ते घडते आहे असा एक लाडका समज कवटाळून बसण्याची रीत आहे. जे काही चुकीचे, त्याबद्दल त्रागा करावा; आणि त्याचा आपल्याला कसा-किती त्रास होतो हे एकमेकांसमोर कण्हत-कुंथत सांगावे, असे करून माणसाचे आयुष्य आनंदात जात असावे. परंतु जगात सर्वत्र सर्वकाळी केवळ भ्रष्टाचार दुराचार मातलेला असतो असे नाही. वाईट जे घडते ते स्वत: आपण केलेले नसते हे कदाचित खरेही असेल, पण जे काही चांगले घडले पाहिजे असे आपल्याला वाटते त्यासाठी तरी स्वत: काय करतो, हा प्रश्न पूर्णत: निरुत्तर करणारा असतो. सभोवताली फक्त आणि फक्त चांगले असू शकत नाही, कारण ते पुरेसे नाही. त्याला वाईटाची जोड असावीच लागते. आपल्या घराशेजारून झुळझुळत वाहणारा निर्झर असावा हे छानच, परंतु त्याइतकीच सांडपाण्याच्या गटारीची आवश्यकता असते.समारंभात अत्तराचे फवारे उधळले जातात, तशी खरकटे फेकण्याची सोय असावी लागते. प्रश्न असा असतो की त्या दोन्हींचा उपयोग व उपभोग आपण कसा करतो. `आजकाल कोणतेही वृत्तपत्र खून-मारामाऱ्या-आणि फॅशन शो एवढ्याने भरलेले असते' हे एक सहज फेकलेले विधान अस

Advertisement of books

महर्षी वाल्मीकी रचित मूळ संस्कृत महाकाव्यांचे इंग्रजी रूपांतर चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी केले. त्याचा मराठी रसाळ ओघवता अनुवाद श्रीरामायण  (श्री.वि.रा.जोगळेकर) गुरु.शंकर अभ्यंकर यांच्या प्रस्तावनेसह, प्राचीन स्थानसूची, आकर्षक नकाशा व चित्रे असलेला संग्राह्य ग्रंथ पृष्ठ संख्या ३५०, छापील किंमत फक्त रु.२००/- खास सवलत : केवळ १२०/- रुपयात रजि.पोस्टाने पाठविण्यात येईल. मनिऑर्डर/चेक `वि.रा.जोगळेकर' नावावर पाठवावा. पत्ता : श्री गणेश चॅरिटेबल ट्न्स्ट, `राम-सीता' ८१०, जोगळेकर वाडा, पोस्टाजवळ, तासगाव (जि.सांगली) भ्रमणध्वनी : श्री.जयंत जोगळेकर - ९४२१२७२२२२   `आपले जग'मध्ये प्रकाशित झालेल्या काही संपादकीय लेखांचा संग्रह अग्रलेखांची भूमिका - डॉ. दीपक टिळक प्रस्तावना - श्री.सुधीर मोघे परिचयलेख - श्री.भानू काळे वाचन व्यासंग वा भेट देण्यास चांगले पुस्तक पृष्ठसंख्या २२४, छापील किंमत रु. २००/- सवलतीत फक्त रु.१०० + रजि.बुकपोस्ट खर्च रु.२०/- मनिऑर्डर/चेक `आपले जग' नावावर पाठवावा. पत्ता : वाल्मिकी, किर्लोस्करवाडी (जि.सांगली) ४१६३०८ फोन (०२३४६) २२२०५८, २२३५५८

Sampadkiya in 15July 2013

खचणारी रोमांचक वाट भारतीय उपखंडातील निसर्ग, त्यातही मुख्यत: मोसमी पाऊस ही परमेश्वराची देणगी मानली जाते. त्याचप्रमाणे निसर्गाची विविधता हेही भारतवर्षाचे वैशिष्ट्य आहे. या दोन्हींचा मेळ घालून निसर्गाचे सान्निध्य, निरीक्षण, निष्कर्ष यांच्याच आधारे एक स्वतंत्र-संपन्न पर्यटनशास्त्र विकसित केले गेले. कोणत्याही संस्कृतीत देवत्त्वाच्या संकल्पनेला निर्विवाद स्थान असते, भारतात पंचमहाभूतांना सगुण-साकार रूप देऊन त्यांची आराधना करणारा कर्तव्यधर्म रुजत गेला. दैनंदिन कर्तव्यांतून काही विरंगुळा हवा, तो प्रवासातून मिळू शकतो. तथापि त्या विरंगुळयाच्या प्रवासातही जिज्ञासेचे  पोषण व्हावे; पंचमहाभूतांच्या आश्वासक, आल्हादक, आव्हानात्मक अशा लहर-बहर-कहराची अनुभूती यावी यासाठी पर्यटनाची संकल्पना विकसित झाली. पर्यटन हा अशा अवचिताचा अभ्यास आणि प्राकृतिक उत्साहाइतकाच चिंतनाचाही विषय असायला हवा. गावाबाहेरच्या टेकडी-दरीच्या शिवमंदिरातील नित्य उपासना हे एक निमित्य, तसेच त्याकरिता पंढरीची वारी, काशीयात्रा, चारोधाम यात्रा, कैलासदर्शन इत्यादि क्रमाने अवघड होत जाणारे अनुभव घेण्यासाठी पर्यटनप्रेमी माणसांनी त्या बिकट अ

Sampadkiya in 10 July 2013

भ्रामक प्रगतीचे  व्यसन लोकांना अपूर्वाई वाटेल अशा नवनवीन सुधारणा अलीकडच्या काळात येऊन आदळत आहेत. मोबाईल आणि टीव्हींनी तर माळराने आणि स्वैपाकघरे व्यापली. त्या दोन्हींचा प्रसार आणि गवगवा जास्त आहे त्याचप्रमाणे वाहनांची संख्या अतोनात वाढली आहे. शिवाय घरबांधणीची शैली बदलली, त्यामुळे सीमेंट-लोखंड-रंग-टाईल्स यांचाही प्रसार वेगाने होत चालला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी तर ग्रामीण पालकांना वेड लावले आहे. विमा योजना, शेअर गुंतवणूक, मल्टीस्पेशल दवाखाने, आरोग्यतपासण्या, साखळी मार्केटिंग.... असे सगळे नवेनवे विश्व आपल्याभोवती आपल्याभोवती गरगरू लागले आहे. या सगळयांची गरज किती, कुणाला, कशासाठी असे प्रश्न करायलाही कुणी पळभर थांबायला तयार नाही. हे नवे जग विश्वासार्ह किती, त्यात फसगत होऊ शकते का, फसगत झालीच तर दाद कुठे मागायची हे प्रश्नही कुणाला पडत नाहीत. सरकार तर असे की या सुधारणांचे व्यसन जनतेला लावून त्याचाच धंदा करू पाहते आहे. एखाद्या दारूभट्टीवाल्याने आपण तळागाळातल्या श्रमिकांची वेदना हलकी करण्यासाठीच ही जनसेवा करतो म्हणावे; त्याप्रमाणे शासन या नव्या शोभेच्या व्यसनाधीनतेला सुधारणा व आर्थिक विकास

Lekh on Mofat Shikshan

मोफत शिक्षण : संस्था व पालकांची दिशाभूल - प्रा. प्रशांत देशपांडे अन्न, वस्त्र, निवारा व आरोग्य या माणसांच्या मूलभूत गरजांइतकीच शिक्षण ही माणसाची मूलभूत गरज आहे. प्राचीन इतिहासापासून आजपर्यंत, कालमानानुसार शिक्षण आवश्यक असते. त्यासाठी सर्व संबंधी घटकांनी सर्व प्रकारची तरतूद केलीच पाहिजे. सामान्य लोकांसाठी अन्नधान्य पुरवठा सरकारमान्य दुकानातून स्वस्त दरात होतो पण मोफत नाही. लज्जा रक्षणासाठी वस्त्रांची गरज असते, पण त्याची सोय गरजू लोकांसाठी शासनाकडून मोफत उपलब्ध नाही, त्याला बाजारदरानेच खरेदी करावी लागते. सामान्य लोकांसाठी आरोग्याची सेवा सरकारी दवाखान्यातून अल्प दरात उपलब्ध आहे, परंतु मोफत नाही. थोडक्यात असे की, सरकार जी सेवा मोफत किंवा अल्प दरात देते त्यातील गुणवत्ता, दर्जा आणि सहज उपलब्धता जनतेला व लाभार्थींनाही समाधानकारक वाटत नाही हे स्पष्ट वास्तव आहे. शिक्षण क्षेत्रही त्यास अपवाद नाही. ज्यांना आपल्या मुलांसाठी चांगले शिक्षण हवेसे वाटते असे पालक आज शासकीय शाळांकडे पाठ फिरवून `चांगल्या' शाळांकडे वळत आहेत. चांगल्या शिक्षणासाठी चांगला खर्च येतो हे आजच्या काळातील पालक जाणतात. कोणत