Skip to main content

Lekh

अशानं महासत्ता होईल?
- संदीप वासलेकर (स्ट्न्ॅटेजिक ग्रुप)

केवळ पाच वर्षांपूर्वी जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्नध्यक्ष म्हणून प्रथम निवडून आले, तेव्हा सौरऊर्जा उत्पादन करण्याचा खर्च एका वॅटसाठी ६ डॉलर होता, तो आता २ डॉलरपर्यंत खाली आला आहे. ग्राहकांच्या दृष्टीनं पाहिलं तर त्यांना सध्या सौरऊर्जा  प्रतिकिलोवॅट तासाला ४० सेंट या दरानं मिळते. २०५० पर्यंत ६ सेंटपर्यंत हा दर कमी होईल, त्यावेळी अमेरिकेतील ३३% ऊर्जा ही सौरऊर्जा असेल. केवळ पाच वर्षांत अमेरिकेला सौरऊर्जा स्वत: उत्पादित करण्यात जे प्रचंड यश मिळालं, त्यामागं आहेत स्टीफन च्यू. चिनी वंशाचे एक अमेरिकी नागरिक. याच पाच वर्षांत अमेरिकेनं दुसऱ्या काही क्षेत्रांत प्रचंड बाजी मारली आहे. त्यातला एक उपक्रम काही विशिष्ट प्रकारचे जंतू निर्माण करतो. ते जंतू एखाद्या झिजलेल्या अथवा तुटलेल्या धातूच्या वस्तूवर पसरवले तर ती वस्तू काही काळात पुन्हा नवी होते. दुसऱ्या एका प्रकारचे जंतू रासायनिक रोबोटमध्ये मिश्रित केले तर तो रोबोट स्वत:हून लहान होतो व एका कापडाच्या अथवा भिंतीच्या छिद्रातून पलीकडं जातो. दुसऱ्या बाजूला गेल्यावर पुन्हा पूर्ववत् होतो. असे दोन नव्हे, तर शेकडो उपक्रम अमेरिकेच्या संरक्षण खात्यातली `डार्पा' ही संस्था चालवते. त्या संस्थेच्या संचालक आहेत आरती प्रभाकर. भारतीय वंशाची महिला. आपण जरी अमेरिकेतल्या आर्थिक धोरणात अलीकडं झालेल्या चुकांबद्दल चर्चा करण्यात एरंडाचं गुऱ्हाळ चालवलं, तरी संशोधन, ज्ञान व शाश्वत मूल्यं यांचा त्रिवेणी संगम करून पुढची अनेक शतकं जगावर प्रभुत्व निर्माण करण्यात अमेरिका मग्न झाली आहे. युरोप, जपान, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर, स्वित्झर्लंड, इस्राईल हे एवढेच देश अमेरिकेशी सहकार्य अथवा स्पर्धा करून पुढची पाच-सातशे वर्षं जगावर स्वामित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात गुंतले आहेत.
जगातल्या संशोधनांपैकी ३०% खर्च एकटी अमेरिका करते. संशोधन केल्याबद्दल तिथल्या कंपन्यांना करात केवळ ६% सवलत मिळते, म्हणजे उद्योगसमूह केवळ कर वाचवण्यासाठी संशोधन करत नाहीत, तर त्यांना संशोधनावर व ज्ञानावर आधारित समाज निर्माण करायचा आहे, म्हणून ते संशोधन करतात. त्यासाठी केवळ गुणवत्तेवरच तरुण शास्त्रज्ञांना संधी दिली जाते. त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. हे शास्त्रज्ञ चिनी अथवा भारतीय किंवा अजून कोणत्या वंशाचे आहेत हे पाहिलं जात नाही. त्यांना दूरदृष्टी आहे का व त्यांच्यात कर्तबगारी आहे का, एवढंच पाहिलं जातं. म्हणून बराक ओबामा यांनी स्टीफन च्यू यांना देशाचं ऊर्जामंत्री केलं आहे, तर आरती प्रभाकर यांना अमेरिकेच्या संरक्षण साम्राज्यातल्या सर्वात गुप्त व महाप्रभावी अशा संशोधन कार्यक्रमाच्या संचालकपदी नेमलं आहे. परदेशी संशोधकांच्या सहकार्यानं मूलभूत संशोधन करण्यासाठी युरोपनं ५२ अब्ज युरो (३५ हजार कोटि रुपये) एवढी रक्कम ठेवली आहे. त्याचा फायदा जगातील कुणीही शास्त्रज्ञ घेऊ शकतात. भारतातले शास्त्रज्ञही घेऊ शकतात; पण भारतातल्या इंग्रजी प्रसारमाध्यमांना `भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे व युरोपचं वाटोळं होणार आहे' असला पोकळ प्रचार करण्यात मजा वाटते. युरोपमध्ये भारतातल्या व जगातल्या शास्त्रज्ञांसाठी कोट्यवधी रुपये आहेत, त्यावर चर्चा करणं आपल्या माध्यमांना उपयुक्त वाटत नाही.
अमेरिका व युरोप आपलं लक्ष कृत्रिम जीव, सौरऊर्जा, मानवाच्या मेंदूपेक्षा जास्त वेगानं विचार करणारे संगणक, गटारातल्या पाण्यापासून नवजलाची निर्मिती असे अनेक नवीन शोध लावून चौथी औद्योगिक क्रांती घडवून आणू पाहात आहे. ते लोक जुने-पुराणे समजले जाणारे, मोटारगाड्या उत्पादन करण्याचे कारखाने भारतीय उद्योगपतींना विकतात. आपले उद्योगपती असले कारखाने विकत घेऊन स्वत:ची संपत्ती चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी वापरायची सोडून जुन्या अर्थव्यवस्थेची अर्चना करण्यासाठी वाहतात व आपला उच्चभ्रू वर्ग त्याला `वाहवा' करून दाद देतो.
भारतीय नेत्यांना बरंच काही माहीत आहे. आपल्याला कोणत्या दिशेनं जायला हवं, याची संवेदनाही त्यांच्याकडं आहे. २००८ मध्ये प्रतिभा पाटील राष्ट्न्पती असताना त्यांनी मला राष्ट्न्पती भवनात न्याहरीसाठी बोलावलं होतं. बोलताना मोंटी जोन्स यांचा विषय निघाला. मोंटी जोन्स हे आफ्रिकेतले कृषिशास्त्रज्ञ. दुष्काळी भागात अत्यल्प पाणी लागणाऱ्या तांदळाचा शोध त्यांनी लावला. भारतात अनेकदा अवर्षण आल्यास असा तांदूळ खूप उपयोगी पडेल, म्हणून प्रतिभाताइंर्नी मोंटी जोन्स यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मोंटी जोन्स यांना मुंबईला बोलावलं. त्यांची ओळख करून दिली; परंतु राजशिष्टाचार व सुरक्षेच्या कारणांमुळं प्रतिभाताई तिथं थांबू शकल्या नाहीत व हा मुद्दा तिथंच थांबला. त्यानंतर डिसेंबर २०११ मध्ये राष्ट्न्पती या नात्यानं प्रतिभाताई पुन्हा भेटल्या. त्यांनी भारतात सौरऊर्जा कमी खर्चात करण्यासाठी संशोधन करण्याबद्दल खूप रस दाखवला, पण पुन्हा एकदा नोकरशाहीच्या नियमामुळे हा संवाद पुढं सरकला नाही.
अशा प्रसंगी अमेरिकेचे राष्ट्नध्यक्ष असते किंवा जर्मनीच्या पंतप्रधान असत्या तर तिथं नोकरशहांचं जास्त चाललं नसतं. दरम्यानच्या काळात इतर काही व्यक्ती व संघटनांच्या पुढाकारानं भारतात अवर्षण हवामानात निर्माण होणाऱ्या तांदळाचा शोध लागला आहे. दक्षिण भारतात त्याची लागवडही करण्यात आली आहे.
भारतीय कृषिसंशोधन क्षेत्रात बरंच संशोधन सुरू आहे; पण त्याला मिळालेलं यश किती वेळा देशासमोर येतं? किती वाहिन्यांवर चर्चा होतात? या संशोधन संस्थांना आवश्यक ते आर्थिक साहाय्य व उपकरणं देण्यासाठी किती उद्योगसमूह पुढं येतात? शास्त्रज्ञांना वैचारिक स्वातंत्र्य किती देण्यात येतं? जातीपातीचा विचार न करता उन्नती किती प्रमाणात घडवली जाते? आंतरराष्ट्नीय प्रवास करून जगातल्या नवीन शोधांचा वेध घेण्याची सोय किती प्रमाणात मिळते? यावर संसदेत अथवा विधिमंडळात किती चर्चा होतात? अमेरिका, युरोप, चीन, जपान, स्वित्झर्लंडमध्ये असं काही नवीन संशोधन सुरू आहे की, ज्यामुळं येत्या ४०-५० वर्षांत सारं विश्व बदलून जाईल. यात भारत कुठं असेल? ज्या भारतीय युवकांची असं परिवर्तन करण्याची क्षमता आहे त्यांना पाठिंबा द्यायला आपले उद्योगपती, राजकीय नेते, प्रसारमाध्यमं तयार आहेत का?
इतर देशांत एखाद्या युवकाकडं वैज्ञानिक कल्पकता असेल, तर त्या युवकाला कसा पाठिंबा मिळतो याचं उदाहरण बघा. काही वर्षांपूर्वी माद्रिदला एका हॉटेलच्या लॉबीत मी बसलो होतो. तेवढ्यात समोरून एक ओळखीचे गृहस्थ आले. त्यांच्याबरोबर एक युवक होता. त्यांनी त्याच्याशी माझी ओळख करून दिली. त्या युवकानं बॅटरीवर चालणाऱ्या मोटारीची एक योजना बनवली होती. त्यानुसार शहरातल्या सर्व पेट्नेल पंपांचं बॅटरी स्टेशनमध्ये रूपांतर करायचं, म्हणजे मोटार उत्पादक आपोआप पेट्नेलऐवजी विजेवर चालणाऱ्या गाड्यांचं उत्पादन करतील, असा हिशेब होता.  त्या युवकाकडं पैसे व मोठ्यांच्या ओळखी नव्हत्या. काही दिवसांनी ज्यांनी माझी त्या युवकाशी ओळख करून दिली, त्यांनी एका वयोवृद्ध व्यक्तीशी त्याची ओळख करून दिली. त्या वयोवृद्ध व्यक्तीनं युवकाला आपल्या गावी ऑफिसात बोलावलं आणि गावातल्या अनेक श्रीमंत माणसांना स्वत: फोन करून त्या युवकाला भेटायला सांगितलं. तो युवक त्या श्रीमंतांना भेटला व रिकाम्या हातानं परत आला. रोज सकाळी तो युवक वयोवृद्ध माणसाच्या ऑफिसात जाई. असं काही दिवस झाल्यावर काही श्रीमंतांना युवकाची कल्पना आवडली व त्यांनी त्याला पूर्ण भांडवल दिलं. त्या युवकाचं नाव होतं शाही आगासी. त्या वृद्धाचं नाव होतं सिमॉन पेरेस. ते इस्राईलचे राष्ट्न्पती होते व सध्याही आहेत. मला राष्ट्न्पती सिमॉन पेरेस यांनी पश्चिम आशियातल्या शांतताविषयक चर्चेसाठी त्यांच्या घरी एकदा बोलावलं. बोलताना त्यांनी एका नवीन संशोधनाची माहिती दिली. बर्फाच्या लादीवर अंडं ठेवलं तर पंधरा फुटांवर काही अदृश्य लहरींचा वापर करून अंडं शिजतं; पण बर्फ तसाच राहतो, अशी नवीन प्रकारची ऊर्जा इस्राईल तयार करीत आहे. मी आणि पेरेस चौथ्या औद्योगिक क्रांतीसंबंधी बराच वेळ बोललो. मला देण्यात आलेली वेळ केव्हाच संपली होती; परंतु त्यांच्या कार्यालयातल्या कुणालाही सुरक्षेच्या अथवा राजशिष्टाचाराच्या कारणांमुळं आमचा संवाद थांबवावा असं वाटलं नाही.
आरती प्रभाकर, सुनीता विल्यम्स, हरगोविंद खुराना यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञांना जन्म देणारी ही आपली भारतभूमी; पण त्यांची गुणवत्ता ओळखतात अमेरिकेचे राष्ट्नध्यक्ष! भारतात आजही कार्यक्षम, महत्त्वाकांक्षी, गुणवान युवक आहेत. आपले नेते व उच्चभ्रू वर्ग त्यांच्यामागं कधी उभा राहणार? आपण केवळ नातीगोती, जातीपाती असा जप करत पाहात राहणार? आणि फक्त चकचकीत मॉल, सॉफ्टवेअर कर्मचारी व जगानं फेकलेले जुने उद्योग उभे करून `भारत महासत्ता झाली' असं भाबड्या राष्ट्न्प्रेमी लोकांना सांगून त्यांची फसवणूक करणार?
(आंतरजालवरून संकलन)
सौजन्य : आप्पाजी आपटे, पुणे
(निवृत्त बँक अधिकारी)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन