Skip to main content

Lekh on V.M.Dhapre, Karad

अश्वत्थव्रती आण्णा
- विवेक ढापरे, कराड (मोबा.७५८८२२११४४)
लोकसंस्कृतीमध्ये `अश्वत्थाचा पट' नावाचं एक व्रत आहे. पिंपळाच्या पाच प्रकारच्या पानाचं पूजन या व्रतात केलं जातं. त्यातलं हिरवं पान असतं सौंदर्यासाठी, कोवळं पान असतं नवजात पुत्रासाठी, पिकलेलं पान असतं पतीच्या दीर्घायुष्यासाठी, वाळलेलं पान असतं सुखसमृद्धीच्या वृद्धीसाठी आणि फाटलेलं पान असतं अमर्याद संपत्तीसाठी. आपल्या कार्याप्रति अविचल निष्ठा असणाऱ्या विश्वनाथ माधव ऊर्फ अण्णा ढापरे यांनी गेल्या ७९ वर्षांत हे व्रत कधी केलं असेल अशी शक्यताच नाही. पण त्यांनी ऐकलेली पिंपळपानाची सळसळ मात्र आयुष्याच्या प्रवासाची धगधगती कथानकं रेखाटती ठरली व सदैव इतरांसाठी स्वत:चं आयुष्य वेचणारी ठरली.
माझे वडील विश्वनाथ ढापरे यांचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील ब्रिटीशकालीन बांधकाम खात्यात नोकरी करीत होते. स्थावर मालमत्ता भरपूर, पण सारीच कुळांच्या आणि साहजिकच त्या अनुषंगाने कोर्टकचेऱ्यांच्या तावडीत अडकलेली. त्यामुळे भाडोत्री घरात राहूनच आजोबांनी सहा मुलांचा प्रपंच केला.विलिंग्डन कॉलेज सांगली मधून माझे वडील बीएस्सी झाले. त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या करून १९६३ साली गव्हर्मेट पॉलिटेक्नीक रत्नागिरी येथे रुजू झाले. माझी आईही विलिंग्डन कॉलेजमधूनच बी.ए.झाली होती. १९६५ साली त्यांचा विवाह झाला. त्यानंतर सहाच महिन्यामध्ये माझी आजी कर्करोगाने निवर्तली. यानंतर वडिलांनी कराडला फार्मसी कॉलेजमध्ये बदली करून घेतली आणि त्या कोवळया वयामध्ये त्या उभयतांनी आजोबंाच्या साऱ्या प्रपंचाचा डोलारा सांभाळला. आईला कराडमधील शाळांतून नोकरीच्या अनेक संधी चालत आल्या होत्या. पण घरच्या व्यापामुळे तिला त्यावर पाणी सोडावं लागलं. माझ्या आत्याच्या कुटुंबाला सर्व आधार वडिलांनीच दिला. जन्मत: अपंग असलेल्या आत्येभावाचे सर्व उपचार, शिक्षण, नोकरी आणि पुढे लग्न हे सर्व त्यांनी पुढाकार घेऊन केले.
गेली ५०-५५ वर्षे कोर्टकचेऱ्यांची जबाबदारी त्यांनी वडिलांकडून स्वत:कडे घेतली होती. त्यांनी कायद्याची अनेक पुस्तके स्वत: विकत आणून अभ्यास केला. एका केसमध्ये कराडमधील एका नामवंत वकीलांनी विरुद्ध बाजूचे वकीलपत्र घेतले. इतर काही तांत्रिक मुद्यावरून माझ्या वडिलांनी अॅडव्होकेट अॅक्टखाली, कोणताही वकील न देता वीस वर्षे बार कौन्सिल ऑफ महा.(इंडिया) व शेवटी सुप्रीम कोर्टापर्यन्त लढून, त्या वकीलांची सनद घालवली. हे महाराष्ट्नतील एकमेव उदाहरण आहे. त्यावेळच्या वृत्तपत्रांनीही त्याला ठळक प्रसिद्धी दिली होती.
१९८६ सालचा एक प्रसंग.. त्यावेळी आमच्या आजोबांचे आमच्याच एका कुळाने अपहरण केले होते. ते बेपत्ता असल्याने घरामध्ये चिंतेचे वातावरण होते. एका स्थानिक दैनिकातून त्यांच्या नावाने जाहीर नोटीस आली व त्यामध्ये आमची सर्व जागा त्यांनी आजोबांच्या सहीने लिहून घेतली होती. आजोबांचे वय त्यावेळी ८५ वर्षांचे होते. डगमगून न जाता पोलिसात तक्रार करून वडिलांनी त्या नोटीशीला पेपरमधूनच उत्तर दिले होते. पुढे आजोबा परत आल्यावर, कायद्याच्या ज्ञानाचे सर्व कसब वापरून वडिलांनी सर्व जागा सोडवून घेतल्या.
निवृत्तीनंतर त्यांनी स्वयंचलित वाहन बंद करून सायकल चालवण्यास सुरुवात केली. शेवटपर्यंत ते स्वत:चे कपडे स्वत: धूत. स्वावलंबी जगत ते कायम निरोगी राहिले. आयुष्यात कधी हॉस्पिटल लागले नाही. माझ्या दोघी बहिणी सुस्वरूप आणि उच्चशिक्षित. त्यांचे आणि नातवंडांचे कौतुक ते सर्वांना तोंड भरून सांगायचे. मूलत: स्वभाव तापट आणि चिडखोर असल्याने आणि सतत कोर्टकचेऱ्यांच्या कामामध्ये असल्याने ते छोट्या छोट्या प्रसंगातूनही चिडायचे, पण मनातून ते प्रेमळ आणि हळवे होते. आम्हा मुलांच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थित निभावल्या. प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यावर फलटणच्या राममंदिर ट्न्स्टमध्ये व त्यानंतर चिंचवडच्या मोरयागोसावी ट्न्स्टमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी सेवा केली, व तिथेही आपल्या कामसू स्वभावाने छाप उठवली. दहा वर्षांपूर्वी आई अचानक गेल्यानंतर त्यांनी आम्हा भावंडांना खूप आधार दिला.
असलेल्या संपत्तीचा त्यांनी स्वत: कधी उपभोग घेतला नाही. अनेक लोकांना कोणतेही शुल्क न घेता कायदेशीर सल्ला दिला. कराडमधील अनेक वकील त्यांचा सल्ला घ्यायला येत असत. स्वत:चे नातेवाईक, मित्रमंडळी यांना हरएक प्रसंगामध्ये त्यांनी मदत केली. आयुष्यभर कमालीचे साधे जीवन जगत ते इतरांसाठी झिजले व शेवटपर्यंत कार्यरत राहून, ध्यानीमनी नसताना अचानक गेले. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे `शेवटचा दिस गोड व्हावा, याचसाठी केला होता अट्टाहास ।' याची प्रचिती त्यांनी दिली.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन