Skip to main content

Posts

Showing posts from May, 2015

25 May 2015

श ताब्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या, उज्वल परंपरा असणाऱ्या कऱ्हाडच्या नामवंत अशा शिक्षण मंडळा(टिळक हायस्कूल व अन्य शाखा)च्या व्यवस्थापनाची धुरा अलीकडे कराडचे उत्साही आणि धडाडीचे श्री.चंद्रशेखर देशपांडे यांनी स्वीकारली आहे. त्यांनी या जुन्या शाळेला केवळ गतवैभवच देण्याचा नव्हे तर महाराष्ट्नतील एक अग्रगण्य आदर्श शाळा घडविण्याचा चंग बांधला आहे. या शिक्षणसंस्थेच्या सध्या १६ शाखा असून सुमारे १४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कै.यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे कित्येक नामख्यात विद्यार्थी असणारी ही संस्था आज चंद्रशेखर देशपांडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करेल असा विश्वास कऱ्हाड भागात आहे. संस्थेच्या कामकाजात त्यांचा पूर्वीपासूनच सहभाग होता. कऱ्हाडच्या सार्वजनिक जीवनाचा दीपस्तंभ म्हणून ज्यांचा उल्लेख करावा, अशा कै.नानासाहेब देशपांडे, तसेच दादा आणि आशाताई देशपांडे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे अपेक्षा व जबाबदारीही मोठी आहे. नव्या अपेक्षांच्या वळणावर कऱ्हाडच्या जीवनात सन्मानाचे स्थान असलेल्या शिक्षण मंडळाचे  श्री.चंद्रशेखर देशपांडे यांनी `आपले जग'शी केलेला वार्तालाप...

18 May 2015

नागराळे (ता.पलूस) येथे परिवर्तन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्या अंतर्गत `जग पुढे चालले, आपण मागे का?' याविषयी प्रा.सुनिलकुमार लवटे (कोल्हापूर) यांचे व्याख्यान झाले. त्याचा वृत्तांत...... आपण मागे का? नैसर्गिक आपत्ती काही फक्त आपल्याच देशावर किंवा महाराष्ट्नवरच येते असे नाही. ढगफुटी, महापूर, गारपीट, अवकाळी पाऊस अशा घटना जगभर घडतच असतात. नैसर्गिक आपत्ती अटळ आणि दुर्दैवी असतात पण अशी संकटे धीरोदात्तपणे सोसण्याचे बळ आपल्या देशात आढळत नाही. भारतातील आणि जगातील अनेक देशांमध्ये घडणाऱ्या घटना तुलनात्मकदृष्ट्या पाहिल्यास काय आढळते? काही वर्षांपूर्वी जपानमध्ये त्सुनामी आली. प्रचंड नुकसान झाले. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे घरे कोसळली. मोठी प्राणहानी झाली. पण तो देश सावरला. त्सुनामी आल्याच्या तिसऱ्या दिवशी इन्कमटॅक्स भरायची शेवटची तारीख होती. उध्वस्त झालेल्या शासकीय कार्यालयांसमोर जपानी नागरिकांनी आयकर भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या! ही जीवननिष्ठा, राष्ट्न्प्रेम, स्वाभिमान आपल्याकडे का आढळू नये? मदतीसाठी जगापुढे हात न पसरता, तो देश स्वसामर्थ्यावर अल्पावधीत पुन्हा उभा राहिला.

11May 2015

पत्त्यांचा दरबार उन्हाळयाच्या सुटीतील बैठ्या खेळांमध्ये पत्त्यांचा खेळ सर्वत्र असतो. पण त्या `क्रॅट' मधल्या पानांविषयी बरीच माहिती मला अमेरिकेच्या प्रवासात मिळाली. तिथेही त्यावेळी खूप उन्हाळा, रणरणीत ऊन. बाहेर खेळणे अशक्य झाले. मग घरातल्या घरात मुलांना पत्त्याच्या बाबतीत अनेक प्रश्न पडत, उत्तरे देता देता आमच्या ज्ञानात भर पडत गेली.... पत्ते ५२ च का? त्यात बदाम, किलवर, चौकट, इस्पिक असे चारच प्रकार का?... असे कितीतरी प्रश्न! आपल्या क्रॅलेंडरशी मिळतीजुळती अशीच पत्त्यांची रचना व मांडणी असते. पत्त्याच्या क्रॅटमधील ५२ पाने म्हणजे वर्षाचे ५२ आठवडे. पत्त्याचे बदाम, किलवर, चौकट, इस्पिक म्हणजे आपल्या चार दिशा. एकाच रंगाची १३ पाने म्हणजे आपले १ वर्ष. प्रत्येक पत्त्याची बेरीज केली तर ती ३६४ येते. त्यात जोकरची १.२५ किंमत मिळवली तर ती ३६५.२५ येते, म्हणजे आपल्या एक वर्षातील दिवस. पत्त्याची ही आखणी पृथ्वीग्रहाशी मिळतीजुळती आहे. नवव्या शतकात चीनमध्ये पत्त्यांची सुरुवात झाली. अकराव्या शतकात पूर्ण आशियात पत्त्याचा प्रसार झाला. चौदाव्या शतकात युरोपमध्ये पत्ते खेळायला सुरुवात झाली. १४८० मध्ये फ्

4 May 2015

आपल्या पुराणांतरी एका मुनिवर्यांचे वर्णन `भगवान नारद ऋषि:' असे केले गेले आहे. स्वत:च्या कर्तृत्त्वाने भगवत्पदाला पोचलेला हा तपस्वी! निर्लोभी-निर्मोही ब्रह्मचर्य, गायनादि कलांत रुची, देवेन्द्रापासून सर्वांशी निकट संपर्क, योग्य त्या माहितीचा आणि स्तुतिसूक्तांचा वापर करून आपले कार्य सिद्धीप्रत नेण्याचे कौशल्य, त्रैलोक्यातल्या कोणत्याही पाकगृहापर्यंत मुक्त संचार आणि या सर्व गुण-क्लृप्त्यांचा केवळ जगत्कल्याण हाच उद्देश..... यामुळे ब्रह्मर्षी नारदमुनींचे स्थान अढळ अणि वंद्य ठरले आहे. देवर्षी नारद नारद ऋषी हे सृष्टीकर्त्या प्रजापती ब्रह्मदेवांचे मानसपुत्र मानले जातात. महान तपस्वी, तेजस्वी, वेदांताचे जाणकार आणि सर्व विद्या पारंगत असे नारद हे ब्रह्मतेजाने संपन्न होते. आपली प्रतिभा आणि कर्तव्यबळावर त्यांनी परमात्म्याविषयी ज्ञान प्राप्त केले होते. तत्कालीन समाजाच्या प्रत्येक वर्गातील सामान्यजनांत ते सहज मिसळत. देव-दानव-मानव अशा त्रिवर्ग प्रवृत्तींशी स्नेह जोडून ते परस्पर संपर्कातून चिंतन-मनन-मतप्रदर्शन-सूचना-मार्गदर्शन्र्ज्ञ्ींंडण्-मण्ण्-मडत्त्ॅद्धध्द्धॅिंण्-%ूर

27April2015

भटक्या-विमुक्त जातीजमातींसाठीच्या राष्ट्नीय आयोगाचे (मंत्रीस्तरीय) अध्यक्ष मा.भिकूजी तथा दादा इदाते यांचा प्रवास सांगली-मिरजेस १८ एप्रिलला होता. `आपले जग'च्या वतीने वसंत आपटे यांनी त्यांच्याशी वार्तालाप केला, (त्यावेळी श्री.जयंतराव रानडेही होते.) त्या चर्चेचेे हे लेखरूपांतर. भटक्या-विमुक्तांना प्रवाहात आणूया - भिकूजी इदाते युती शासनाच्या काळात मी महाराष्ट्नत याच प्रकारच्या समितीवर काम केले आहे. त्यामुळे आता नव्या केंद्रीय पदाचे काम स्वीकारताना परिस्थितीची पूर्वकल्पना मला होती. या मंडळींशी संपर्क कसा ठेवायचा? आज भीमेकाठी एखाद्या खेड्यात पाले टाकून थांबलेली ही मंडळी, काही दिवसांतच शेजारच्या कर्नाटकात किंवा आंध्र राज्यात स्थलांतरित होतात. त्यांना कुठे शोधायचे? मध्यंतरी पारधी समाजाच्या जाणकारांना ही अडचण सांगितली. त्यावर त्यांनी सांगितले की आमच्या पालांमध्ये रेडिओ असतो. शासनाला काही संदेश द्यायचा असेल तर रेडिओवर जाहीर करा! -तशी ही मंडळी कष्टाळू, पण दारिद्र्य व भूक यांमुळे काही वेळा चोऱ्यामाऱ्या होत असतात. त्यांच्या माथी `गुन्हेगार' जमात म्हणून जो शिक्का बसला तो कायमचाच. त्याम