Skip to main content

4 May 2015

आपल्या पुराणांतरी
एका मुनिवर्यांचे वर्णन
`भगवान नारद ऋषि:'
असे केले गेले आहे.
स्वत:च्या कर्तृत्त्वाने
भगवत्पदाला पोचलेला
हा तपस्वी!

निर्लोभी-निर्मोही ब्रह्मचर्य,
गायनादि कलांत रुची,
देवेन्द्रापासून सर्वांशी
निकट संपर्क,
योग्य त्या माहितीचा
आणि स्तुतिसूक्तांचा
वापर करून
आपले कार्य
सिद्धीप्रत नेण्याचे कौशल्य,
त्रैलोक्यातल्या कोणत्याही
पाकगृहापर्यंत मुक्त संचार
आणि या सर्व
गुण-क्लृप्त्यांचा
केवळ जगत्कल्याण
हाच उद्देश.....
यामुळे ब्रह्मर्षी नारदमुनींचे
स्थान अढळ अणि
वंद्य ठरले आहे.

देवर्षी नारद

नारद ऋषी हे सृष्टीकर्त्या प्रजापती ब्रह्मदेवांचे मानसपुत्र मानले जातात. महान तपस्वी, तेजस्वी, वेदांताचे जाणकार आणि सर्व विद्या पारंगत असे नारद हे ब्रह्मतेजाने संपन्न होते. आपली प्रतिभा आणि कर्तव्यबळावर त्यांनी परमात्म्याविषयी ज्ञान प्राप्त केले होते. तत्कालीन समाजाच्या प्रत्येक वर्गातील सामान्यजनांत ते सहज मिसळत. देव-दानव-मानव अशा त्रिवर्ग प्रवृत्तींशी स्नेह जोडून ते परस्पर संपर्कातून चिंतन-मनन-मतप्रदर्शन-सूचना-मार्गदर्शन्र्ज्ञ्ींंडण्-मण्ण्-मडत्त्ॅद्धध्द्धॅिंण्-%ूर्ज्ञ्ण्ी-मीर्द्धॅगध्द्धॅिंण्ॅ इत्यादी सर्व पर्यायांद्वारे लोकहितार्थ मग्न असत.
देवर्षी नारदांकडून वीणेच्या साथीने आराधना व विनोदन होत असे. त्या तारा झंकारताना `नारायण' असा ध्वनी निघत असे. भगवद्भक्ती मार्गाने धर्मनीती आणि कर्तव्य यांचा प्रचार-प्रसार हे त्यांनी जीवितकार्य मानले होते.
ते त्रिकालदर्शी विद्वान होते, सर्व विश्वातील घटनांची माहिती त्यांना होई, आणि त्या आधारे विश्लेषण करून त्यामागील कारणे, परिस्थिती व प्रवृत्ती यांचे अचूक निष्कर्ष ते मांडू शकत. सर्व समस्यांचे निरसन करण्याची हातोटी त्यांना साधली होती.
बालपणी ते मोठे मातृभक्त, सुस्वभावी होते. त्यांच्या किशोरवयातच सर्पदंशाने त्यांना मातृवियोग झाला. त्यानंतर `सर्वश्रेष्ठ परमसत्य' शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. प्रचलित कथेनुसार अज्ञातकुलीन असून त्यांनी `देवर्षी' हे सन्माननीय पद मिळवले ते भक्तीमार्ग, साधना आणि तपश्चर्या यांच्या बळावर! संतसेवा आणि भजनपूजन करता करता त्यांना आत्मशुद्धी साधता आली. मुनीजनांच्या आज्ञेनुसार वागत गेल्याने त्यांची गतजन्मातली सगळी पापे पुसून गेली. व्यास, वाल्मीकी, शुक इत्यादी ऋषीजनांचे गुरुपद त्यांना मिळाले. ध्रुव, प्रल्हाद, राजा अंबरिश इत्यादी महान भक्तांना भक्तीमार्गासाठी त्यांनी प्रवृत्त केले.
त्यांच्यासंबंधी पुराणकथेनुसार पूर्वजन्मी त्यांना सारस्वत नामक ब्राह्मणाचा देह लाभला होता. त्या जन्मी जप करून त्यांनी भगवान नारायणाला प्रसन्न करून घेतले. कल्पान्ती त्यांनी जन्म घेतला. त्यांना वारंवार ईश्वराचे दर्शन होई. त्याच्या प्रेरणेनेच ते नि:स्वार्थीपणे सतत कार्यरत राहात. माणूस संसाररूपी मायामोहाच्या बंधनात अडकून दु:खीकष्टी होतो हे त्यांना पाहावत नसे. म्हणूनच भक्तीमार्गाचा अवलंब करून मनुष्याने मुक्ती साधावी, ही त्यांची आत्यंतिक तळमळ होती. त्यांनी सर्वांसाठी भगवद्भक्तीचे महाद्वार उघडले. त्यात दक्ष प्रजापतीच्या सहस्र पुत्रांचाही समावेश होतो. भक्तीमार्गाचा अवलंब करण्यासाठी त्यांनी कीर्तनाचा मार्ग अनुसरला.
गौरवर्णी, अत्यत बुद्धिमान आणि तितकेच मिश्किल असे नारदांचे वर्णन आहे. त्यांची शरीरकांती दिव्य तेजाची होती. देवराज इंद्राकडून प्राप्त झालेली श्वेतवस्त्रे ते परिधान करीत. क्लिष्ट संज्ञांचे अनेक प्रकारे अर्थ लावण्यात ते निपुण होते. चारही वेद व न्यायशास्त्रात ते पारंगत होते. आपल्या दिव्य ज्ञानाच्या आधारे त्यांनी विभिन्न वैदिक धर्मांच्या मर्यादा स्थापित केल्या. नारद पंचरात्र, नारद महापुराण, बृहन्नारदीय उपपुराण, नारद-स्मृती, नारद भक्ती सूत्र, नारद परिव्राजकोपनिषद आदी ग्रंथ व अनेक स्तोत्रे रचली. निश्चिंतपणे भक्तीमार्ग अनुसरावा आणि मुक्ती साधावी हे त्यांच्या ग्रंथांचे सार आहे.
देवर्षी हे कृष्णयुगात गोपिकांचे, रामायण युगात श्रीरामांचे तर महाभारत युगात पांडवांचे हितचिंतक होते. अंगच्या जिज्ञासू वृत्तीमुळे सत्यनारायण व्रताची महती त्यांनी प्रत्यक्ष भगवंताकडून जाणून घेतली. श्रद्धापूर्वक हे व्रत केल्यास सत्यनारायण भक्ताच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करतो हे आश्वासन त्यांना भगवंताकडूनच मिळाले. त्यानंतर त्यांनी समाजमनावर या व्रताचे महत्त्व ठसवले असे मानले जाते.
या ब्रह्मांडात सर्वश्रेष्ठ कोण आहे हे जाणण्याची उत्कट इच्छा एकदा त्यांच्या मनात निर्माण झाली. इच्छापूर्तीसाठी त्यांनी आपल्या आराध्याकडे-भगवान विष्णूकडे धाव घेतली. धीरगंभीर स्वरात भगवंत सांगू लागले, ``नारदा, ही पृथ्वी सगळयात मोठी दिसते, पण तिला सागराचा वेढा पडला आहे. मग समुद्र मोठा आहे का?- छे! अगस्ती ऋषींनी तर त्याला प्राशन केले होते. ते स्वत: या प्रचंड आकाशात एक छोटा नक्षत्रतारा बनून चमकत आहेत. म्हणजे ते आकाशापेक्षा मोठे नाहीत. वामनावतार धारण केल्यावर भगवंताने एका पावलात आकाश व्यापले होते. म्हणजे आकाशही सर्वश्रेष्ठ नाही. मग राहिले कोण? - तर भगवंत; परंतु ते तर तुझ्या हृदयात इवल्याशा जागेत सदैव वास करतात. म्हणजे नारदा, तूच सगळयात महान आहेस.'' देवर्षी नारदाची महती आणि मानवाच्या परमेश्वरावरील श्रद्धेचे महत्त्व वर्णायला हा प्रसंग पुरेसा आहे.
तिन्ही लोकांंत नारदांचा मुक्त संचार चाले. त्यामुळे संपूर्ण विश्वाची अचूक बित्तंबातमी त्यांचेकडे असे. `आद्य वार्ताहर' म्हणून त्यांना गौरवले जाते. पण त्यांचे हे भ्रमण निरुद्देश कधीच नव्हते. त्याला लोककल्याणाची झालर होती. ते नेहमी सकारात्मक विचार करत आणि सकारात्मक विचाराचाच प्रसार करत. नाहक निंदेला त्यांच्या जीवनात स्थान नव्हते. नारदांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करून त्यापासून स्फूर्ती घेऊन त्यांचे अनुकरण केल्यास वर्तमान माहितीयुगात लोककल्याणकारी, समाजहिताची कामे करता येतील. त्यांचा जीवनपट अतिशय प्रेरणादायी आहे. काही समाजांमध्ये नारदांना ईश्वराचे रूप मानले जाते. कर्नाटकात चिगतेरी व कोरवा या गावांमध्ये महर्षी नारदांची मंदिरे आहेत.
(हिंदुस्थान समाचार वृत्तसेवा)

अनुवाद-ज्योती आफळे
ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर, सांगली
मोबा.९९२३७४४४५५


बदलती व्यवस्था : बदलते मानस
गेल्या वर्षभरात भारतातील निवडणुकांचे जे निकाल लागले त्यात भारतीय जनता पक्षाला एकंदरीत चांगले यश मिळाले आहे. मोदी पंतप्रधान बनले ते इतर मागासवर्गीय आहेत, असे ऐकण्यात येते. प्रत्यक्षात त्याची कुणी चौकशी केली नाही आणि करण्याची गरजही नाही. महाराष्ट्नत फडणवीस हे ब्राह्मण मुख्यमंत्री झाले. परंतु इतर राज्यांमध्ये, जिथे भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला आहे तिथे राज्यप्रमुख कोणत्या जातीचा आहे हे, तथाकथित जातीधर्मनिरपेक्ष मंडळींच्या व्यतिरिक्त फारसे कुणी विचारातही घेत नसेल. भारतीय जनता पक्षात बहुतांशी सर्वजण ब्राह्मण आहेत हा जितका चुकीचा किंवा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे, तितकाच मोठा आणि बाष्कळ गैरसमज म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यामुळे ब्राह्मणांची चलती वाढेल. आणखी एक मोठा गैरसमज म्हणजे सगळे ब्राह्मण भारतीय जनता पक्षाचेच आहेत! हे सगळे अपसमज गैर आहेतच, पण ते राजकीय विद्वेषातून मुद्दाम पसरवले गेले आहेत हेही स्पष्ट आहे.

ज्या तळमळीतून किंवा तात्कालिक गरजेपोटी एखादा राजकीय पक्ष किंवा संघटना स्थापन होते, तीच तळमळ, तीच उद्दिष्टे आणि तीच कार्यपद्धती फार काळ त्या संघटनेतही टिकत नाही; आणि बऱ्याच वेळेला या संघटना भरकटल्यासारख्या वागू लागतात. काँग्रेससारख्या १२५ वर्षांच्या पक्षाचीही तशी गत झाली आहे. प्रारंभीच्या टिळक-फिरोजशहा-दादाभाई यांचा काळ केव्हाच मागे पडला, गांधी-नेहरू-पटेल हेही मागे पडले. इतकेच नव्हे तर यशवंतराव-वसंतदादा-इंदिरा गांधी ही मंडळीही काळाच्या पडद्याआड गेली. आजचा ८० वर्षाच्या पुढील वयाचा कोणीही काँग्रेस कार्यकर्ता त्या पक्षाच्या आजच्या पडझडीने आणि विफलतेने पार खचून गेलेला पाहायला मिळतो. श्रीपाद अमृत डांगे यांचा कम्युनिस्ट पक्ष आज राहिलेला नाही आणि पटवर्धन-एस.एम. यांचा समाजवादी पक्षही ढासळत गेला आहे. इतर कोणतीही सामाजिक संस्था-संघटनाही त्याच घसरणीवर आहे. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष सत्तेच्या बाबतीत वरखाली झाला तरी त्याचा दूरान्वयाने संबंध जोडून `त्या त्या समाजगटाचे दिवस बरेवाईट आलेत' हा पोकळ आणि परंपरागत गैरसमज असतो.

भारतीय जनता पक्षाला गेल्या वर्षभरात मिळालेले यश आणि त्यामुळे ब्राह्मण समाजाला बरे दिवस येण्याची शक्यता यांचा वास्तवात परस्पर कोणताही आणि काडीचाही संबंध
नाही. परंतु एक गोष्ट मान्य करता येईल; ती अशी की गेल्या पन्नास-साठ वर्षांच्या इतर पक्षांच्या राजकारणात काही समाजांवर वरदहस्त आणि काही समाजांवर धडधडीत अन्याय ही गोष्ट राजकारणी धोरणात अनुसरली गेली आहे. त्यास त्या पक्षाचा कोणताही तात्विक आधार मुळीच नाही, तर केवळ जातीनिष्ठ निवडणुकांचे आडाखे आणि गणिते आहेत. बहुतांशी ब्राह्मण समाज मतदानासाठी आजवर फारसा बाहेरच पडत नसे ही गोष्ट लक्षात घेतल्यास त्यांच्या बाजूने काही राजकीय निर्णय घेतले गेलेले नाहीत यात फारशी काही चूक म्हणता येत नाही. जो समाज आपल्या बाजूला तर राहोच, पण विरोधातही उतरत नाही त्याच्या हिताचा कोणी कशासाठी विचार करेल?

ताज्या निवडणुकांनी सर्वच प्रस्थापितांना आणि त्यांच्या जातीनिहाय गैरसमजांना धडाधड धक्के दिले आहेत. केवळ हिंदुत्त्ववाद्यांच्या पाठिंब्यामुळे मोदी निवडून आले हे खरे नाही. कारण मग तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या विरोधातील इतर समाज ज्यांच्या विरोधात जाईल किंवा ज्यांच्या बाजूने उतरेल त्यावर निवडणुकीचे यशापयश अवलंबून असणारच. म्हणूनच यावेळी भारतीय जनता पक्ष सर्वत्र निवडून आला याचे कारण केवळ अल्पसंख्य ब्राह्मण समाजाची मते पडली इतके उठवळपणाने मांडले जाऊ नये. काँग्रेस ज्यांना आपली मतपेढी समजत असे, ते मुस्लिम आणि दलित समाजही काँग्रेसच्या थेट विरोधात गेलेले आहेत आणि त्यांच्या पाठिंब्यावर जम्मू-काश्मीरमध्येसुद्धा अर्धी भागीदारी भारतीय जनता पक्षाकडे आली आहे. निदान तिथे तरी ब्राह्मणांचे राज्य आले असे म्हणता येणार नाही, हेही चालू काळच्या जातीय विचारांच्या दृष्टीने कमी महत्त्वाचे नाही.

आजपर्यंत निदान महाराष्ट्नत तरी शासन आणि प्रशासन यांनी कधी  ब्राह्मण समाजाच्या बाजूने फारसा विचारच केलेला नव्हता. ब्राह्मण समाजाची या दोन घटकांनी कधी दखलच घेतली नव्हती. पुष्कळदा अनेकांना असाही अनुभव असेल की, केवळ ब्राह्मण म्हणून काही प्रशासकीय निर्णय विरोधात गेलेले आहेत. ही उघडउघड गळचेपी होती. त्याची कारणे शोधत बसण्याची किंवा कुणावर दोषारोप करण्याची ही जागा नव्हे. परंतु कूळकायद्यासारखे निर्णय असोत किंवा आरक्षणासारखी धोरणे असोत, किंवा काही सामाजिक विचारांची मांडणी असो, प्रत्येक वेळी ब्राह्मण समाजाला आरोपीच्या आणि आक्षेपांच्या पिंजऱ्यात उभे केले गेलेले आहे. कदाचित अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे असेल, पण या प्रतिकूल परिस्थितीवर आपापल्या मगदूराप्रमाणे मात करत ब्राह्मण कुटुंबे पुन्हा सुस्थिर होऊ पाहात आहेत. खेडोपाड्यातील कुटुंबे शहराच्या दिशेने पळाली. शिक्षणाला प्राधान्यावर ठेवून बऱ्यापैकी नोकरी-व्यवसाय त्यांनी मिळवले. आणि जे मिळाले ते कणाकणाने आणि क्षणाक्षणाने जोडत पुन्हा बऱ्यापैकी सामाजिक स्थैर्य त्यांनी प्राप्त केले आहे. संधीचाच एकूण विचार केला तर केवळ परिश्रम आणि बुद्धिमत्ता या जोरावर मिळालेल्या अनेक संधी त्यांनी समर्थपणे हाताळल्या आहेत. त्याउलट, सरकारी धोरणामुळे असो किंवा प्रशासकीय व्यवस्थेमुळे असो, ज्या इतर समाजांना अशा संधी भरपूर उपलब्ध झाल्या त्यांनी त्या संधींचे म्हणावे तसे चोख सोने केलेले नाही. उलट मिळालेल्या संधींच्या तुलनेत त्यांचा विकास कमीच जाणवतो. आज अशी परिस्थिती दिसते की परदेशी नोकऱ्या किंवा माहिती तंत्रज्ञानासारखे आधुनिक क्षेत्र, विज्ञानाच्या विविध शाखा, साहित्य-संगीतादी कला या सर्वांमध्ये ब्राह्मण समाज आघाडीवर दिसतो. ही सर्व मंडळी प्रतिकूलतेशी झगडतच वरच्या स्थानावर पोचण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचवेळी हेही लक्षात घ्यावे की स्वत: पुढे जाताना त्यांनी इतर कोणालाही बाजूला ढकलून देण्याचा प्रयत्न केलेला नाही. ज्या क्षेत्राची जी गरज असेल त्या क्षेत्राला योग्य अशी कर्तबगारी जाणून जातीनिरपेक्ष कर्तृत्व त्यांनी निवडले आहे.

अशा एका नव्या आणि बदलत्या वातावरणात देश आणि राज्यस्तरावर येथून पुढील काळात कोणत्याच जातीधर्मावर आधारलेले राजकारण किंवा राजकीय पक्ष टिकू शकणार नाही वा जोमाने विस्तारू शकणार नाही. कदाचित पुढची निवडणूक याउलट निर्णयांची झाली अशी कल्पना केली तरी सत्तेवर येणारा दुसरा पक्ष कोणाही एका समाजगटाला झुकते माप देताना शंभर वेळा विचार करेल.

आजवरती कोणत्याही समर्थ पक्षाने किंवा लोकप्रतिनिधींनी जनतेला पांगळे ठेवण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केलेला आहे. `तुमच्या समस्या तुम्हीच सोडवायला हव्यात' अशी लोकशाही संरचना समाजाला समजावून देऊन, लोकांनाच बळकट करण्याचा प्रयत्न झालेला नाही. त्याउलट `तुमच्या समस्या माझ्याकडे द्या आणि तुम्ही निवांत आपल्या घरात बसा. राजकारणाच्या किंवा प्रशासनाच्या धबडग्यात तुम्ही पडू नका, तुमचे ते काम नव्हे' असे नेत्यांकडून सांगितले जात असे. त्यामुळे हे असले नेते दांडगेश्वर बनले आणि जनता बिचारी दुबळी राहिली. निवडणूक म्हणजे केवळ `या' दांडगेश्वराऐवजी `तो', इतकाच अर्थ दुबळया जनतेने काढला. मुकी बिचारी कुणी हाका अशी अवस्था राजकारणी मंडळींनी गेल्या कित्येक वर्षांत करून टाकली होती. आता या जनतेला किंवा कोणत्याही समाजाला, कोणत्याही ज्ञातीधर्माला गृहीत धरता येणार नाही हे राजकारण्यांनाही पक्के समजून आले असेल. आठ-दहा महिन्यांपूर्वी दिल्लीत बहुमताच्या जवळपास गेलेला भारतीय जनता पक्ष थेट भुईसपाट झाल्याचे दृश्य पाहता आले. आणि वर्षापूर्वी सत्तेवर असलेल्या काँग्रेसला त्यांच्याच आजवरच्या राजकीय गणितांच्या कोलांट्या पाहायला मिळाल्या आहेत. या सगळयाचा अर्थ असा की, भारतातील नवीन मतदार आणि शहाणी होत चाललेली जनता जातीपातींचे आणि धर्मा-अधर्माचे राजकारण फारसे चालू देणार नाही. किंवा असा विचार न करणारा खरा पक्षच सत्तेवर बसवेल.

असा विश्वास जर निर्माण झाला असेल तर, सर्वांनाच आता योग्य त्या संधी मिळू शकतील अशी आशा करण्याला जागा निर्माण झाली आहे. तो अवकाश लक्षात घेऊन आपापल्या मगदुराप्रमाणे उद्योगधंदे, कलाक्रीडा आणि एकूण सामाजिक जडणघडण यांचा विचार, बहुतांशी सुशिक्षित असणाऱ्या समाजाने केलाच पाहिजे. आरक्षण, सवलत, अनुदान असली मिळालेली कुठलीतरी संधी कुरवाळत बसलो तर हे दिवस फारसे टिकणार नाहीत. जर काही लाभ मिळालेच असतील तर ते व्यक्तिगत किंवा कौटुंबिक किंवा स्वत:च्या समाजापुरतेच भोगत बसलो तर तेही टिकणार नाहीत. आपल्यासमवेत सारा समाज वरती उचलून घेण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. निदान त्यास यापुढे राजकीय अडथळे खूपच कमी होतील असे म्हणता येईल.

आता केवळ तेवढ्याने भागणार नाही. कोणता तरी पक्ष उलथून पडला आणि दुसऱ्या हाती सत्ता गेली एवढ्याने समाज आणि देश बदलणार नाही. समाज स्वत:च्या पायावर संपन्न करायचा असेल तर ब्राह्मतेजही प्रगट व्हायला हवे. तिथे आपल्या बुद्धिमत्तेचा आणि कर्तबगारीचा कस लागणार आहे. तेही प्रगट होईल आणि ही `पृथिवी' निष्कंटक होईल असे सर्वांगाने सर्वार्थी प्रयत्न सुरू करायला हवेत.
***

`अजित बाजीराव' - श्रीमंत पेशवा
जगात कधीही पराभूत न झालेला कदाचित एकच योद्धा असेल, तो म्हणजे पहिला बाजीराव! आयुष्यात ४१ लहान-मोठी युद्धे, लढाया बाजीराव लढला आणि ती सर्वच्या सर्व त्याने जिंकली. त्याच्या पदरी हार कधी आलीच नाही. त्याला कोणीही जिंकू शकले नाही म्हणून तो अजित ठरला. महाराष्ट्नत वा भारतातच नव्हे तर युरोपियन युद्धाच्या अभ्यास पुस्तकांमध्ये या अजित बाजीरावाचा मानाने उल्लेख केल्याचे आढळते.
मूळ एका कसब्याचे स्वरूप असणारे पुणे आपली राजधानी करणाऱ्या या पेशव्याला, मार्च १७२६मध्ये हा कसबा इनाम म्हणून मिळाला. स्वत:चे निवासस्थान शनिवारवाडा बांधल्यावर पुण्याचा विकास करणारा बाजीराव, आजच्या पुण्याचा आद्यपुरुषच!
साताऱ्याचे शाहू महाराज यांचे पेशवे म्हणून १७२० मध्ये नेमणूक झाल्यावर, या २० वर्षाच्या तरुणाने पुढील २० वर्षे संपूर्ण भारताच्या इतिहासात मराठ्यांचा झेंडा भारतभर अजिंक्यतेने मिरवला व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, शाहू महाराजांच्या सेवेत पुढे नेले. संपूर्णपणे वेगळया युद्धतंत्राचा व युद्धनीतीचा वापर हे बाजीरावाचे वैशिष्ट्य होते. अत्यंत गतिमान युद्धतंत्र वापरीत शत्रूला सतत चकित करत त्यावर विजय मिळवणारा हा योद्धा अतिशय आक्रमक होता. त्याने सर्व युद्धे शत्रूच्या प्रदेशातच केली व युद्धाची जागा स्वत:च्या सोयीने निवडून शत्रूचे त्याच जागी खच्चीकरण करत विजयश्री मिळवली. स्वत:चे कमीत कमी नुकसान करत स्वत:च्या मर्यादित साधनांचा बाजीरावाने केलेला पुरेपूर उपयोग हा केवळ आश्चर्यकारकच आहे.  आणखी शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे सामान्य सैनिकांतून भावी नेतृत्व हेरून ते तसे तयार करण्याची बाजीरावाची दूरदृष्टी! राणोजी शिंदे व मल्हारराव होळकर हे महान सरदार त्याचीच उदाहरणे म्हणून सांगता येतील. अजोड स्वामीनिष्ठा, अपार मातृप्रेम, धाडसी रांगडी वृत्ती, कृतिशीलता आणि भविष्याचे अचूक अंदाज-बाजीरावाचे हे गुण आजच्या तरुणांनाही आदर्श ठरावेत.
एप्रिल २८ ही बाजीरावांची पुण्यतिथी. १७४० मध्ये वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी ते निधन पावले. केवळ वीस वर्षांत मराठ्यांची सत्ता थेट दिल्लीपर्यंत नेण्याचे त्यांचे शौर्य जगातील लष्करी इतिहासात मानाचे स्थान टिकवून आहे.
बाजीरावाच्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात मस्तानीचा सहवास केवळ सतरा महिन्यांचा. तरीही एखाद्याचे हिमालयाएवढे गुण झाकून त्याच्या प्रेमप्रकरणात रस दाखवणारा आपला समाज तीच आठवण ठेवून आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीविरुद्ध आपल्या ब्रिटिश सेनेला पहिलावहिला विजय मिळवून देणारा फिल्ड मार्शल माँटगोमेरी, बाजीरावाच्या १७२७-२८ मधील पालखेडच्या लढाईचा आदर्श डोळयांसमोर ठेवून लढला. स्ट्न्ॅटेजिक मोबिलिटीचा हा मास्टरपीस जगभरातील सेनानींना बाजीरावांची आठवण करून देतो. मात्र आपण करंटे, नको त्या गोष्टींचा आदर्श सांभाळतो!
-दीपक घैसास
(सौजन्य - ठाणे टुडे)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन